पुणे-महापालिकेच्या नव्या वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेत आपल्या नेत्यांची हुजरेगिरी करताना केवळ वरोधक पदावर आहेत म्हणून अशा पदांची अवहेलना करण्याचा प्रकार महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांकडून झाल्याचे आज मुख्य सभेत उघड झाले. २०२०-२०१२ चा अर्थसंकल्प आज मुख्य सभेला स्थायी समितीने सादर केला . यावेळी अंदाजपत्रकाची पुस्तिका सर्व सदस्यांना दिली गेल्यावर यात मुख्यमंत्री ठाकरे यांचा आणि विपक्ष्नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो प्रथम पानावर असल्याचे दिसून आले त्यानंतर १ पान सोडल्यावर दुसऱ्या पानावर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचा फोटो असल्याचे निदर्शनास आले .मध्यंतरी आमदार चंद्रकांत दादा पाटील आणि अन्य मान्यवरांचे फोटो आहेत . मुख्यमंत्र्यांनंतर वास्तविक पाहता तिथेच उपमुख्यमंत्री यांचा व नंतर विपक्ष्नेते फडणवीस यांचा फोटो पदांच्या क्रमवारीनुसार आणि सन्मानधिकारा नुसार असायला हवा होता असा आक्षेप बजेट मांडून झाल्यावर महापालिकेतील राष्ट्रवादीचे नेते दिपाली धुमाळ तसेच माजी उपमहापौर दीपक मानकर , माजी महापौर प्रशांत जगताप ,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी उपस्थित केला आणि याप्रकरणी जाब विचारला .कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी देखील कॉंग्रेसच्या २ आमदारांचे फोटो यात नसल्याचे निदर्शनास आणून दिले .आणि अशा पद्धतीच्या बालबुद्धीच्या राजकारणाचा निषेध केला . त्यांच्या आक्षेपाला उत्तरे देणे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी टाळल्याने त्यांचा सामना माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी करण्याचा प्रयत्न केला . अखेरीस महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी च्या अध्यक्षांना छपाई बदलून घेण्याचे आदेश देत यावर पडदा टाकला