पुणे : पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ अ च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी आघाडीच्या रेणुका चलवादी यांचा पराभव केला आहे. तर समाविष्ट गावांचा नवीन निर्माण केलेल्या पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 42 मधून अ जागेतून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे तर ब या महिलांसाठी राखीव असलेल्या जागेतून भाजपाच्या अश्विनी पोकळे विजयी झाल्या आहेत.
महापालिकेच्या नव्या फुरसुंगी-लोहगाव (प्रभाग क्र.42) मधील निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली. या प्रभागातून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे आणि भाजपच्या आश्विनी पोकळे निवडून आल्या. तर, धानोरी-कळस-विश्रांतवाडी (प्रभाग क्र.1) मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या ऐश्वर्या जाधव विजयी झाल्या.
या निवडणुकीत ढोरे यांना 26 हजार 304 मते मिळाली असून, शिवसेनेचे अमोल हरपळे यांना 20 हजार 224 मते मिळाले. त्यात ढोरे यांनी 6 हजार 8 मतांची आघाडी घेतली. पोकळे यांनी 24 हजार 851 मते घेत कामठे यांचा 932 मतांनी पराभव केला. कामठे यांना 23 हजार 919 मते मिळाली. धानोरी-कळस-विश्रांतवाडीतून जाधव यांना 7 हजार 100 मते मिळाली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रेणुका चलवादी यांना 4 हजार मतांवर समाधान मानावे लागले.या प्रभागातील भाजपच्या किरण जठार यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने त्यातील एका गटासाठी पोटनिवडणूक झाली. येथील वंचित बहुजन आघाडीच्या रेहिणी टेकाळे यांना 2 हजार 900 मते मिळाली.
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ अ च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी आघाडीच्या रेणुका चलवादी यांचा पराभव केला आहे. तर समाविष्ट गावांचा नवीन निर्माण केलेल्या पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 42 मधून अ जागेतून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे तर ब या महिलांसाठी राखीव असलेल्या जागेतून भाजपाच्या अश्विनी पोकळे विजयी झाल्या आहेत. या प्रभागातून महायुतीतर्फे प्रथम शिवसेनेने जाहीर केलेली उमेदवारी ऐनवेळी माघारी घेऊन संभ्रम निर्माण केला. उमेदवारी देण्याच्या घोळामध्ये अधिकृत पक्षाचे चिन्हाला शिवसेनेच्या उमेदवाराला मुकावे लागले यामुळे शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले. पुणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत ३ जागांवर २ भाजप व 1 जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. प्रभाग 42 ( अ) गणेश ढोरे (राष्ट्रवादी) 4 हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या दोन जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपकडून अश्विनी पोकळे, शिवसेना पुरस्कृत अमोल हरपळे, राष्ट्रवादीचे गणेश ढोरे तर काँग्रेसकडून भाग्यश्री कामठे हे उमेदवार रिंगणात होते. या दोन जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. यामध्ये एकुण १ लाख ९६ हजार मतदार होते. त्यापैकी ५१ हजार ४२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यानुसार २२ टक्के मतदान झाले. यानंतर आज झालेल्या मत मोजणीत प्रभाग ४२ (अ) मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश ढोरे यांना २६ हजार ३०४ तर शिवसेना पुरस्कृत अमोल हरपळे यांना २० हजार २२४ एवढी मतं मिळाली. यानुसार सहा हजारांपेक्षा अधिक मतांनी राष्ट्रवादीचे गणेश ढोरे विजयी झाले. तर (ब) मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाग्यश्री कामठे यांना २३ हजार ९१९ तर भाजपाच्या अश्विनी पोकळे यांना २४ हजार ८५१ या मतं मिळाली. या आकडेवारीवरून भाजपच्या अश्विनी पोकळे ९३२ मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ अच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी आघाडीच्या रेणुका चलवादी यांचा पराभव केला आहे. पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून भाजपच्या ऐश्वर्या आशुतोष जाधव ह्या ३०९५ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना ७१८० मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या रेणुका चलवादी यांना ४०८५ मत मिळाली आहेत. पुणे महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये निवडणुकी प्रभाग क्रमांक १ मधून भाजपाच्या किरण जठार विजयी झाल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाकडे त्यांनी जे जात प्रमाणपत्र दाखल केले होते ते अवैध असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्रमाणपत्राची तपासणी केली असता ते अवैध असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर प्रभाग क्रमांक १ अची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत आघाडीकडून रेणुका चलवादी, भाजपाकडून ऐश्वर्या जाधव, वंचित आघाडीच्या रोहिणी टेकाळे या उमेदवार होत्या. २२. ५ टक्के इतके मतदान झाले. आज सकाळी मतमोजणी झाली. सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये रेणुका चलवादी आणि ऐश्वर्या जाधव यांच्यात स्पर्धा पाहण्यास मिळाली. मात्र महत्त्वाची बाब ही की पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत ऐश्वर्या जाधवच आघाडीवर होता. ऐश्वर्या जाधव या ३ हजारहून जास्त मतांनी विजयी झाल्या.
या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार व त्यांना मिळालेली मते :
१) ऐश्वर्या जाधव (भाजप) – ७१८०
२) रेणुका चलवादी (राष्ट्रवादी)- ४०८५
३) रोहिणी टेकाळे (वंचित) – २३४४