पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली . या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांनी अलिकडे वाचन हा संस्कारच घराघरातून हरवला आहे अगदी पहिल्या वर्गापासून परीक्षा व त्याला मिळालेली टक्केवारी यालाच अनन्यसाधारण महत्त्व दिले जातेत्यामुळे पाठ्य पुस्तका व्यतिरिक्त वाचनकरण्याची विद्यार्थ्यांची प्रवृत्तीच नष्ट झाली आहे शाळा, परीक्षा, शिकवणी वर्ग यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर होण्याची दुर्दम्य आकांक्षा व त्यातून निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी होणारा अवैध मार्गाचा अवलंब या दृष्टचक्र मध्ये आजची तरुण पिढी व पालकवर्ग अडकलेला आहे या सर्व गोष्टींमधून वेळ काढून निरपेक्ष आणि निखळ आनंद देणारे वाचन करण्यास कोणाला वेळच नाही वाचन समृद्ध असेल तर लेखन प्रवृत्ती देखील प्रबळ होते कल्पनाशक्तीला वाव मिळतो सामाजिक जाणीव दृढ होतेवाचनाने व्यक्ती समृद्ध बनते,विचारांची श्रीमंती वाढते, नवीन विचार सुचतात व कल्पनाशक्तीला वाव मिळतो, सृजनशीलतेचा वाट सापडते आणि माणूस सुसंस्कृत होतो असे सांगून मार्गदर्शन केले वाचन प्रेरणादिनाचे औचित्य साधून ग्रंथपाल प्रा तानाजी माळी यांनी डिजिटल लायब्ररी च्या माध्यमातून सर्व विद्यार्थी व शिक्षकांना वाचनासाठी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी पुस्तके ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली . शिवाय वाचन प्रेरणा दिनाची जागरूकता निर्माण करण्यासाठी ग्रंथालय विभागाच्या वतीने ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सर्वांनी आपल्या मित्राला, भावाला बहिणीला किवां महाविद्यालयातील कार्यक्रमावेळी व आपल्या वाढदिवशी एकमेकांना पुस्तक भेट देण्याची शपथ घेतली सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनिल ठाकरे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल प्रा.तानाजी माळी यांनी केले. महाविद्यालयाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्या बद्दल संस्थेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले . हा सोहळा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टसिंगचे नियम पळून पार पडला