पुणे- पुण्यातील पब,स्पा अशा पाश्चात्य संस्कृतीसाठी प्रसिध्द असलेल्या केपी अर्थात कोरेगाव पार्क परिसरातील सिग्नेचर थाई स्पा वर छापा टाकून पुणे पोलिसांनी ७ महिलांची सुटका केली ज्यामध्ये ४ परदेशी महिलांचा समावेश आहे.येथील साउथ मेन रोड वरील विद्युतनगर सोसायटीत या स्पा मध्ये वेश्या व्यवसाय सुरु होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाने हि कारवाई केली . काल त्यांनी येथे बनावट ग्राहक पाठवून हा छापा टाकला . वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव , सहायक निरीक्षक अनिकेत पोटे यांच्या पथकाने हि कारवाई केली .या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला असून एकास ताब्यात घेतले आहे तर दुसरा फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले मात्र त्यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही .