पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावला आणि वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने स्पर्धा
पुणे : अव्वल मानांकित आणि अनुभवी एच.एस. प्रणॉय आणि दुसरा मानांकित किदाम्बी श्रीकांत यांचा वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कस लागला. स्पर्धेत प्रणॉयला किरण जॉर्जकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. श्रीकांतला विजयासाठी मणिपूरच्या मेईराबाचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला.
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावाला आणि वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने योनेक्स सनराईज ८४ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू आहे.

महिला विभागात आकर्षी कश्यपनेही जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत दुसऱ्या मानांकित तान्या हेमंतचे आव्हान संपुष्टात आणले. महाराष्ट्राच्या नेहा पंडित, आर्य भिवपाठकी आणि हर्षिल दाणी यांनी आपली आगेकूच कायम राखत तिसरी फेरी गाठली.

पुरुष एकेरीच्या लढतींना दुसऱ्या फेरीला सनसनाटी सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात एअरपोर्ट अॅथॉरिटीच्या किरण जॉर्जने अव्वल मानांकित एच.एस. प्रणॉयचा २१-१२, २१-१५ असा पराभव केला. प्रणॉयच्या खेळात थकवा जाणवत होता. पुढील व्यग्र कार्यक्रमही लक्षात घेऊन प्रणॉयने फारसा जोरकस खेळ केला नाही. याचा फायदा किरणने अचूक उठवत सनसनाटी विजयाची नोंद केली. दुसऱ्या मानांकित श्रीकांतने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र, त्यालाही विजयासाठी तीन गेम झुंजावे लागले. मणिपूरच्या मेईस्नाम मेईराबाविरुद्ध श्रीकांतने १ तास ८ मिनिटांनंतर २१-१९, १८-२१, २१-१७ अशी जिंकली.

तीनही गेमला गुणांसाठी जबरदस्त चुरस झाली. आक्रमक, वेगवान आणि ताकदवान स्मॅशचा खेळ या लढतीत पहायला मिळाला. श्रीकांतने बरोबरीत चालणारी पहिली गेम बरोबरीच्या कोंडीतून अगदी अखेरच्या क्षणी गेम पॉइंट वाचवत जिंकली. दुसरी गेम अशाच बरोबरीच्या नाट्यानंतर मेईराबाने जिंकली. गेमच्या मध्यानंतर १२-१२ अशी बरोबरीनंतर मेईराबाने श्रीकांतला फारशी संधी दिली नाही. तिसरा गेमही असाच रंगला. गेमच्या मध्याला आणि त्यानंतरही बरोबरीची कोंडी सुटू शकली नाही. गेममधील १३-१३ अशी बरोबरीनंतर सलग चार गुण घेत श्रीकांतने १७-१३ अशी बरोबरी साधली. पण, मेईराबाने प्रतिआक्रमण करत १७-१७ असी बरोबरी साधली. यावेळी अनुभवी श्रीकांतने सलग चार गुणांची कमाई करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
महिला एकेरीत आकर्षि काश्यपने दुसऱ्या मानांकित तान्या हेमंतचे आव्हान १ तास १२ मिनिटांच्या लढतीनंतर २१-२३, २२-२०, २१-१७ असे मोडून काढले. पहिल्या गेमला सुरुवातीच्या बरोबरीनंतर तान्याने गेमच्या मध्याला ११-७ अशी आघाडी मिळविली होती. पण, त्यानंतर १२-११, १३-१२ अशा स्थितीनंतर आकर्षीने १४-१२ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर अखेरच्या टप्प्यापर्यंत एक दोन गुणांच्या फरकाने आघाडीचे पारड सतत बदलत राहिले. आकर्षिने २०-१९ अशा स्थितीत एक गेम पॉइंट गमावला. पण, बरोबरी साधल्यावर तान्याने दोन्ही गेम पॉइंट सार्थकी लावताना पहिली गेम जिंकली. दुसऱ्या गेमला आकर्षीने ५-५ अशा बरोबरीनंतर सलग ५ गुणांची कमाई करताना १०-५, नंतर १२-६ अशी आघाडी मोठी आघाडी मिळवली. मात्र, तान्याने सलग पाच गुण घेत पिछाडी १२-११ अशी भरून काढली. पुढे १६-१६ अशी बरोबरी राहिली. या वेळी दोघींनी एकेक गेम पॉइंट गमावला. मात्र, २०-२० अशी बरोबरीनंतर आकर्षिने सलग दोन गुण घेत गेम जिंकली. निर्णायक तिसऱ्या गेमला ८-८ अशी बरोबरीनंतर आकर्षीने सातत्याने दोन-चार गुणांची आघाडी राखत ती निसटणार नाही याची काळजी घेतली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
महाराष्ट्राच्या पूर्वा बर्वेलाही तीन गेमचा सामना करावा लागला. पूर्वाने ऐशानी तिवारीचे आव्हान २१-१४, २५-२७, २१-११ असे मोडून काढले.
निकाल –
पुरुष – किरण जॉर्ज वि.वि. एच. एस. प्रणॉय २१-१२, २१-१५, प्रथमेश कुलकर्णी वि.वि. झुचोपेमो ओडुयो २१-८, २१-११, एम. थरुन वि.वि. डॅनिएल फरिद २१-१०, २१-१८. डी. शषरथ वि.वि. अभिषेक येलीगर २१-१३, २१-१३, जगदीश के. वि.वि. श्रेयांश जयस्वाल २१-०, १६-२१, २१-१८, शंतुन शर्मा वि.वि. वकुल शर्मा २१-१६, २१-१२, वरुण कपूर वि.वि. शुभम गुसेन २१-१५, २१-१६, प्रयांश राजावत वि.वि. एस. नवीन २१-१०, २१-११, अलाप मिश्रा वि.वि. यशवर्धन २१-८, २१-१२, आर्य भिवपाठकी वि.वि. वैभव जाधव २१-१४, २१-१४, एम. रघु वि.वि. आर्यमान टंडन २१-१२, २१-१६, यश योगी वि.वि. शुभम पटेल २१-१६, २१-१६, अन्सल यादव वि.वि. सिद्धार्थ मिश्रा २१-१८, २१-१६, साई चरण कोया वि.वि. अंश नेगी २१-११, २१-१४, हर्षिल दाणी वि.वि. अभिनव ठाकूर २१-१३, २१-१८, बी. साईप्रणित वि.वि. पारस माथूर २१-१२, २१-७, दर्शन पुजारी वि.वि. सिद्धनाथ गुप्चा २१-७, २१-१८, सौरभ वर्मा वि.वि. आदित्य बापीनिडू जी. २१-१४, २१-१४, भावेश पाण्डे वि.वि. आदित्य चव्हाण २१-१५, २१-१८, रघुल यादव सी. वि.वि. सिद्धार्थ २१-१६, २१-११, चिराग शेठ वि.वि. स्वधिन गौडा २१-१८, २१-१०, एस. भार्गव वि.वि. सरमवीर २१-१५, २१-१३, एम. मिथुन वि.वि. हर्ष चापलोट २१-६, २१-१९, कौशल धर्मामेर वि.वि. सोहित हुडा २१-१४, २१-१३, कार्तिक जिंदाल वि.वि. अधीप गुप्ता २१-११, २१-१२, आदित्य जोशी वि.वि. अर्जुन रेहानी २१-१५, २१-१४, कार्तिकेय गुलशन कुममार वि.वि. अवधेश जाट २१-१५, २१-९, अभिषेक सैनी वि.वि. अभ्यांश सिंग २१-१२, २१-१७, लक्ष्य शर्मा वि.वि. ध्रुव नेगी २१-६, २१-१९, जी सनीथ वि.वि. प्रणव राव गंधम २१-७, २१-१८, सिद्धार्थ प्रताप सिंग वि.वि. ताबारेझ महंमद २१-१०, २१-१२, के. श्रीकांत वि.वि. मैस्नाम मेईरबा २१-९, १८-२१, २१-१७
महिला – मानसी गर्ग वि.वि. जननी अनंतकुमार २१-२३, २१-९, २१-१४, ईश्राणी बरुआ वि.वि. रिजुल सैनी २१-३, २१-१७, सुर्य करिष्मा तामिरी वि.वि. दिरपशिखा सिंग २१-१०, २०-२१, २१-११, स्मित तोष्णीवाल वि.वि. सी. सुजिथा २१-८, २१-९, आदिती भट वि.वि. साद धर्माधिकारी २१-११, २१-५, अस्मिता चालिहा वि. वि. कनिका कन्वल २१-१४, २१-१४, साक्षी फोगट वि.वि. विजेता हरिष २१-९, ८-२१, २१-१९, राधिका शर्मा वि.वि. प्रहंसा बोनम २१-१४, २१-१७, अनुपमा उपाध्याय वि.वि. प्रेरणा अलवेकर २१-११, २१-८, उन्नती भट वि.वि. तनू चंद्रा २१-१२, १४-२१, ३०-२९, मधुमिता नारायण वि.वि. शेखोटोलु पुरो २१-५, २१-८, तनिशा सिंग वि.वि. लिखिता श्रीवास्तव १७-२१, २१-१९, २१-१६, श्रीयांशी वालीशेट्टी वि.वि. रितुपर्ण दास २१-१७, २१-१७, धरिती यातीश वि.वि. दिव्या बोरा २१-८, २१-८, अनुरा प्रभुदेसाई वि.वि. आंद्रेआ सारा कुरियन २१-१८, २१-११, माहेश्वरी देवी क्षेत्रिमायुम वि.वि. उन्नती जरल १४-२१, २१-१४, २१-११, श्रीयांशी परदेशी वि.वि. सलोनी कुमारी २१-१७, २१-१५, मेघना रेड्डी वि.वि. रसिका राजे २१-११, १४-२१, २१-१२, मालविका बनसोड वि.वि. सेजल जोशी २१-१, २१-२, ईरा शर्मा वि.वि. आशी रावत २१-१४, २१-१९, काजल पवार वि.वि. रिक्षिता चलिहा २१-८, २१-८, श्रुती मुंदडा वि.वि. रुजुला रामू १३-२१, २१-१२, २१-१९, नेहा पंडित वि.वि. आनंदिता तामरा २१-१५, २१-१८, आदिता राव वि.लवि. केयुरा मोपती २१-१८, २१-, मिहीका भार्गव वि.वि. मीनाक्षी विणी २१-९, २१-८, भाव्या रिषी वि.वि. दिपशिखा नेरेडिमेली २१-८, १३-२१, २१-१४, देविका सिहाग वि.वि. अमोलिका सिंग २१-११, २१-१८, तारा शहा वि.वि. श्रुती अगरवाल २१-९, २१-१४, दिव्यांशी शर्मा वि.वि. सुतन्वी सरकार १५-२१, २१-१९, २१-१४, पूर्वा बर्वे वि.वि. ऐशानी तिवारी २१-१४, २५-२७, २१-११, अंजना कुमारी वि.वि. लालथाझुआली अबिगेल २१-५, २१-१२, आकर्षि काश्यप वि.वि. तन्या हेमंत २१-२३, २२-२०, २१-१७