पुणे-नगरसेवक,आमदार,खासदार,पालकमंत्री या प्रवासात कसब्याचे स्थान विशेष आहे,मैत्री जोडायच्या माझ्या नीतीमुळे मला उदंड प्रेम मिळाले,खूप कामे मार्गी लावता आली,सर्व समाजाचा कमविलेला विश्वास हीच माझी खरी दौलत आहे.पण यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाहीर प्रचारात सहभागी होण्यास मर्यादा आहेत,आजवर शहर आणि कसब्याने मला भर भरून प्रेम दिले. कसब्यातील मतदार अनेक दशके भाजपच्या पाठीशी राहिला याही वेळेस तो राहील,थोडी ताकद लावा,मी बरा होऊन परत येईल..असे आवाहन आज खासदार गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.
काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली होती. आज केसरी वाड्यातील मेळाव्यामध्ये बापट हे नाकाला ऑक्सिजन ट्यूब लावून हजर होते. पल्स मीटरने सतत त्यांची तपासणी केली जात होती. थेट व्हीलचेअरवर बसून बापट प्रचारात उतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.गिरीश बापट यांनी अनेक वर्षे या मतदार संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे त्यांचा शब्द कसब्यात महत्त्वपूर्ण ठरतो. शिवाय भाजपने ब्राह्मणेत्तर उमेदावर दिल्याने मतदार वेगळा निर्णय घेतील, याची शक्यता होता. त्यामुळे आज हेमंत रासनेचा प्रचार करण्यासाठी खुद्द बापट समोर आले आहे.बापट म्हणाले, १९६८ नंतर प्रथमच मी या निवडणुकीत सक्रिय नाही. अनेक निवडणुका आपला पक्ष लढला अनेक वेळा जिंकू अनेक वेळा हरलो, पण पक्ष संघटन कायम राहिले. ही निवडणूक चुरशची नाही, ही निवडणूक आपण चांगल्या मताने जिंकणार आहोत. कार्यकर्त्यांनी चांगलं काम करा, कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे. मी गेले अनेक वर्ष त्या आत्म्याची सेवा करण्यात धन्य मानलं, असं बापट यांनी म्हटलं.आपला उमेदवार नक्की जिंकून येणार आहे. हेमंतचे काम चांगले आहे, थोडं नागरिकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. थोडी ताकद लावा मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल, असं आवाहनही बापट यांनी केलं.
यावेळी गिरीश बापट म्हणाले, 1968 नंतर मी पहिल्यांदा निवडणुकीत सक्रिय नाही.
अनेक निवडणुका आपला पक्ष लढला अनेक वेळा जिंकून अनेक वेळा हरलो.
पण पक्ष संघटन राहिले. ही निवडणूक चुरशीची नाही, ही निवडणूक आपल्या चांगल्या मतांनी जिंकणार आहोत.
कर्यकर्त्यांनी चांगलं काम करा, कर्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे. मी गेली अनेक वर्ष त्या आत्म्याची सेवा करण्यात धन्यता मानत आहे.
आपला उमेदवार नक्की जिंकणार आहे. हेमंत (Hemant Rasane) चे काम चांगले आहे थोडे नागरिकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे.
थोडी ताकद लावा मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल असा विश्वास गिरीश बापट यांनी यावेळी व्यक्त केला.