पुणे-
प्रणव गुरव आणि अवंतिका नराळे या दोन्हीही पुण्याच्या खेळाडूंनी राजपथ ७१ व्या महाराष्ट्र वरिष्ठ गट अॅथलेटिक्स स्पर्धेत १०० मी धावण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात प्रथम क्रमांक जिंकून ‘वेगवान धावपटू’चा किताब जिंकला.
महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुल येथील मुख्य स्टेडियमच्या ट्रॅकवर दि. २१ ते २३ मे या कालावधीत संपन्न होत असलेल्या या स्पर्धेत पुण्याच्या प्रणव गुरवने १०० मी शर्यतीमध्ये १०.५६ सेकंदची वेळ नोंदवून प्रथम क्रमांक जिंकला. अकोल्याच्या सौरभ नैतामने १०.६१ सेकंदची वेळ नोंदवून दुसरा तर मुंबई उपनगरच्या जय शहाने १०.७१ सेकंदची वेळ नोंदवून तिसरा क्रमांक संपादन केला.

महिलांच्या १०० मीटरच्या शर्यतीत पुण्याच्या अवंतिका नराळेने ११.७८ सेकंदची वेळ नोंदवून महिलागटात प्रथम क्रमांक पटकाविला. सातारच्या सुदेष्णा शिवणकरने १२.१६ तर मुंबई शहरच्या सरोज शेट्टीने १२.३२ सेकंदची वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक जिंकला.
पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत मुंबई उपनगरच्या शुभम पाटेकरने ७.२२ मीटर लांब उडी मारून प्रथम क्रमांक मिळविला. ठाणेच्या धीरज मिश्रा याने ७.०० मीटर आणि मुंबई शहरच्या अनिलकुमार साहूने ६.९४ मीटर लांब उडी मारून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
महिलांच्या लांब उडीमध्ये राजगडच्या कैशा मोदी हिने ५.७३ मीटर उडी नोंदवून प्रथम क्रमांक पटकविला. मुंबई उपनगरच्या शर्वरी परुळेकर हिने ५.६६ मीटर आणि मुंबई उपनगरच्या श्वेता ठाकूरने ५.६३ मीटर उडी नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.
पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत पुण्याच्या ऋषिकेश साखरे याने १६.१२ मीटर गोळाफेक करून प्रथम क्रमांक पटकाविला. सांगलीच्या प्रफुल्ल थोरातने १६.०९ मीटर आणि मुंबई उपनगरच्या प्रवीण गुप्ता याने १४.७८ मीटर गोळाफेक करून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.

महिलांच्या गोळा फेक स्पर्धेत मुंबई शहरच्या हंसिका वासू हिने १२.४८ मीटर गोळा फेक करून प्रथम क्रमांक पटकविला. अमरावतीच्या विशाखा तुमाणे हिने ११.८२ मीटर आणि ठाणेच्या अग्रता मेळकुंडेने ११.६० मीटर गोळा फेक करून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.
पुरुषांच्या पोलव्हॉल्ट स्पर्धेत कोल्हापूरच्या महेश मांगले याने ३.७० मीटर नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. कोल्हापूरच्या समर्थ सावंत याने ३.६० मीटर आणि सोलापूरच्या सिद्राम विभूतेने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
महिलांच्या पोलव्हॉल्ट स्पर्धेत कोल्हापूरच्या सानिया कांजर हिने २.५० मीटर नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला.
पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सांगलीच्या उत्तम पाटीलने ७४.१३ मीटर लांब भालाफेक करून प्रथम क्रमांक मिळविला. मुंबई शहरच्या अक्षय घोंगे याने ७१.०५ मीटर आणि अहमदनगरच्या ऋषिकेश कुऱ्हे याने ६२.८९ मीटर भालाफेक करून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.
पुरुषांच्या ५००० मीटर स्पर्धेत सोलापूरच्या अरुण राठोडने १४.३९.३२ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकाविला. सातारच्या सुशांत जेधेने १४.४२.९० आणि मुंबई उपनगरच्या कार्तिक करकेराने १४.४९.१५ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.
महिलांच्या ५००० मीटर स्पर्धेत कोल्हापूरच्या प्राजक्ता शिंदेने १६.५९.२४ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. नाशिकच्या रिंकी पावराने १७.१५.१८ आणि सातारच्या आकांक्षा शेलारने १७.५५.८४ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.
पुरुषांच्या हातोडा फेक स्पर्धेत पुण्याच्या शंतनू उचलेने ५७.६६ मीटर हातोडा फेक करून प्रथम क्रमांक मिळविला. भंडाराच्या समीर देशमुखने ५०.१९ मीटर आणि राजगडच्या राज पाटीलने २५.९० मीटर असा अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
महिलांच्या हातोडा फेक स्पर्धेत अमरावतीच्या वर्षा कानपुरेने ४९.३० मीटर हातोडा फेक करून प्रथम क्रमांक मिळविला. नाशिकच्या वेदिका चवान्के हिने ३८.८७ मीटर आणि पुणेच्या ईशा गुरवने ३६.२० नोंदवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत औरंगाबाद येथील तेजस शिरसे याने १३.९७ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. कोल्हापूरच्या विकास खोडकेने १४.७३ आणि मुंबई शहरच्या साहिल गेदामने १५.२२ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.
महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ठाणेच्या क्रिस्टल वडाकेलने १६.७६ वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. पुणेच्या स्नेहा गर्जेने १७.३७ आणि पुणेच्या दिपाली बांदलने १८.११ वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.