पुणे –येथील ” श्री लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बॅंकेची सन २०२३ ते २०२८ या कालावधीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून बॅंकेच्या अध्यक्षपदी अॅड अभय भाकचंद छाजेड तर उपाध्यक्षपदी अशोकराव झुंबरलाल नहार यांची एकमताने निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ.स्नेहा जोशी यांनी कामकाज पाहिले.पुणे शहरातील महत्वाच्या चार शाखा पूर्णपणे संगणकीकृत कार्यरत असून.श्री लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बॅंक नाविन्याचा व नविन टेक्नॉलॉजीचा स्वीकार करून व्यवसायवाढ करत आहे.सन २०२३- २०२८ या कालावधीसाठी पुढील संचालकांची निवड बिनविरोध झाली.
नवनियुक्त संचालक
ऍड .अभय भाकचंद छाजेड, श्री .सुरेश मारुती कोते, श्री. विजयकुमार मर्लेचा, श्री. संजय रमेशलाल गुगळे, श्री.मोरेश्वर देशपांडे, श्री.विरेंद्र किराड, श्री. अशोक नहार , श्री.अमरजितसिंग मक्कड , श्री बाबूराव गायकवाड, श्री.अविनाश गुलाबचंद कोठारी , सौ. प्रिया महिंद्रे , सौ. भावना केदारी , श्री. नारायण गोंजारी , श्री विलास पगारीया, श्री.नितीन शहा , श्री. हिंमत संचेती, श्री.संजय लोढा