पुणे-आपापल्या घरीच गणेश मूर्तींचे विसर्जन करा आणि फिरते हौद दारी येतील तेव्हा तिथे मूर्तींचे विसर्जन करा अशी महापौरांनी घेतलेली भूमिका सर्वांना विश्वासात घेऊन सर्व सहमतीने घेतलेली नाही आणि ती संस्कृतीवर घाला घालणारी आहे . अशा वेळी संस्कृती रक्षक स्वतःला म्हणविणारे सभागृहनेते गप्प का राहतात असा सवाल करत शिवसेनेने केला आहे. आज मुख्य सभेत गणेश विसर्जनाबाबत भूमिका स्पष्ट करा आणि चर्चा करून निर्णय घ्या अशी मागणी शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली परंतु त्यांना महापौरांनी बोलण्यास परवानगी दिली नाही आणि त्यांच्या मुद्द्यावर बोलणे टाळले यामुळे शिवसेनेने आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यांना घरी विसर्जन करणे शक्य नाही , ज्यांना दारी आलेल्या हौदात विसर्जन मान्य नाही त्यांच्या मुर्त्यांचे विसर्जनासाठी प्रत्येक प्रभागात सामाजिक अंतर पाळून एका घरातील मोजक्या लोकाना परवानगी देत हौदात गणेश विसर्जनाला सहाय्य करणार आहे . पहा याबाबत नेमके शिवसेनेचे गटनेते प्र्यथ्वीराज सुतार आणि नगरसेवक विशाल धनवडे यांनी काय म्हटले आहे.