अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन स्पर्धा ; हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत कृष्णा जसूजा आणि सार्थक पाटणकर यांनी आपापल्या गटाचे विजेतेपद पटकावले.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित सार्थक पाटणकरने अग्रमानांकित कोणार्क इंचेकरवर १५-८, १४-१६, १५-१३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. ही लढत ३२ मिनिटे चालली. यानंतर १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत कृष्णा जसूजाने दुसऱ्या मानांकित आद्य पारसनीसला १५-११, १५-१३ असा पराभवाचा धक्का देऊन विजेतेपद पटकावले.
निकाल : अंतिम फेरी – ५५ वर्षांवरील पुरुष दुहेरी – नितीन कोनकर-परेश पटानी वि. वि. भरत भोसले-संजय परांडे १५-४, १५-७. उपांत्य फेरी – भरत भोसले – संजय परांडे वि. वि. रमाकांत शिरनाळकर – सुभाष अंबवणे १५-१०, १५-१०; नितीन कोनकर- परेश पटानी वि. वि. उमेश देवधर -विक्रांत लुकतुके १५-७, १५-२.
५० वर्षांवरील पुरुष दुहेरी – नितीन कोनकर – रवी सारांगपाणी वि. वि. अजय रावळ – संदीप डांगी १५-८,१५-५. उपांत्य फेरी – नितीन कोनकर – रवी सारांगपाणी वि. वि. भीमराव कदम – नागेश शिंदे १५-९, १५-१२; अजय रावळ – संदीप डांगी वि. वि. हीरो मोटवाणी – शशिकुमार अय्यर १८-१६, ४-१५, १५-१३.
४५ वर्षांवरील पुरुष एकेरी – अंतिम फेरी – सचिन फडके वि. वि. विश्वनाथ भिडे १७-१५, ११-१५, १५-१०. उपांत्य फेरी – सचिन फडके वि. वि. अभय खर्शिकर १५-१२, ७-१५, १५-५; विश्वनाथ भिडे वि. वि. विक्रमसिन्हा शिंदे १५-६, १५-८.
४५ वर्षांवरील महिला एकेरी – अंतिम फेरी – मंजूषा सहस्त्रबुद्धे वि. वि. रुची वहाळ १५-३, १५-५. उपांत्य फेरी – मंजूषा सहस्त्रबुद्धे – स्वाती कुलकर्णी १५-७, १५-९; रुची वहाळ वि. वि. अनिता कदम १५-९, १५-४.
४५ वर्षांवरील पुरुष दुहेरी – अंतिम फेरी – अमित तेरे-शिवकिरण सिंग ठाकूर वि. वि. हर्षवर्धन दामले -विश्वनाथ भिडे १५-७, १५-१०. उपांत्य फेरी – अमित तरे – शिवकिरण सिंग ठाकूर वि. वि. मोहित खेउर – सचिन फडके १५-१२, १६-१४; हर्षवर्धन दामले – विश्वनाथ भिडे वि. वि. अजित गोरे – अजित सप्रे १५-११, १५-१३.
४५ वर्षांवरील मिश्र दुहेरी – अंतिम फेरी – अमित तरे – वैशाली किरणे पुढे चाल वि. दीपक पटवर्धन – दीपाली जोशी. उपांत्य फेरी – दीपक पटवर्धन – दीपाली जोशी पुढे चाल वि. मनीष तेरदालकर – अनिता कुलकर्णी; अमित तरे-वैशाली किरणे वि. वि. शशिकुमार अय्यर- सुजा नायर २०-१८, १५-११.