‘एन्थुझिया’ महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस, मार्केटिंग इव्हेंट मॅनॅजमेन्टचे गॅब्रियल जोन्स, गायिका सीमा लिमये, बँकिंग सेक्टरचे सदाशिव कुलकर्णी, जेडब्ल्यू मॅरियटचे व्यवस्थापक गिरीश सहगल, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटचे अधिष्ठाता डॉ. कल्याण स्वरूप, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अंजली साने, ‘एन्थुझिया’ समन्वयिका आणि बीबीए इव्हेंट मॅनेजमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. पल्लवी आद्य, प्रा. शलाका घोडके, प्रा. सुमिता जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाचे संयोजन तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले.
‘सिम्बायोसिस’ने पटकावले ‘एन्थुजिया’चे सर्वसाधारण विजेतेपद
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (अंडर ग्रॅज्युएट) आयोजित दोन दिवसीय ‘एन्थुजिया’ महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद सिम्बायोसिस महाविद्यालयाने पटकावले. विजेत्या महाविद्यालयाला करंडक, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व सहभागी विद्यार्थ्यांना पदके देऊन गौरविण्यात आले. महोत्सवाचे यंदा नववे वर्ष होते. गायन, वादन, नृत्य या कलांच्या बहारदार सादरीकरणासोबतच बुद्धीला चालना देणाऱ्या विविध स्पर्धांनी ‘एन्थुजिया २०१९’ महोत्सवात रंगत आणली.
एमआयटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या या महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. नृत्य, संगीत, बौद्धिक, व्यवस्थापन, सांस्कृतिक, बॉक्स क्रीडा, स्कॅव्हेंजर हंट, ट्रेजर हंट, कुकिंग, वादविवाद स्पर्धा, सोलो डान्स, ग्रुप डान्स, सोलो सिंगिंग, टग ऑफ वॉर अशा एकूण १८ प्रकाराचा समावेश असतो. यंदा पुण्यातील एकूण ३७ महाविद्यालयांतील अंदाजे ११०० विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला.
डॉ. रवीकुमार चिटणीस म्हणाले, ”विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच विविध कला आत्मसात करण्यासाठी एन्थुजिया महोत्सव एक चांगले व्यासपीठ आहे. संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी विविध क्षमतांचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गेल्या नऊ वर्षांपासून विद्यार्थ्यांतील कलाकार घडविण्याचे काम हे एन्थुजीया व्यासपीठ करत आहे.”
बहारदार गाण्यांवर थिरकली तरुणाई
गणपती बाप्पा मोरया, शिशें से शिशा टकराये, धूम ताण तनुम धूम, मेरे रश्खे कमर, चल छैंया छैंया चल छैंया छैंया, अप्सरा आली, जय मल्हारी अशा बहारदार गाण्यावर तरुणाई थिरकली. सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकांना प्रोत्साहन देत उपस्थितांनी टाळ्या, शिट्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकल आणि समूह नृत्य करणाऱ्या स्पर्धकांनी अफलातून सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकली.