पुणे-लोणी काळभोर सुरु असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापे घालून तेथे जुगार खेळणारे व खेळविणारे अशा 12 जणांवर कारवाई करीत अटक केली आहे.मात्र, दोन्ही ठिकाणचे मटका अड्डा चालविणाऱ्यांना पोलीस पकडू शकले नाहीत.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यशकिरण हॉटेल जवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये मटका खेळला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री 8 वाजता पोलिसांनी तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे मटका घेणारे 3 रायटर व मटका खेळणारे 3 जण होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हा जुगार अड्डा युवराज चालवत होता. त्याच्यासह संतोष बबन टकले (वय 29 रा. हांडेवाडी चौक), शमशुद्दीन मैनुद्दीन शेख (वय 57, रा. कोंढवा), मोहन नागनाथ पोतू (वय 33, रा. हांडेवाडी) हे रायटर स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे पैशावर मटका व सोरट जुगार पैशांवर घेत असताना व अजय हिरामण चव्हाण (वय 26, रा. शेवाळवाडी), लक्ष्मण जानू राठोड (वय 48, रा. हांडेवाडी), इस्माईल मोहम्मद शेख (वय 57 वर्षे, रा. घोरपडी) मटका खेळणार्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 3 हजार 300 रुपये रोख, जुगार साहित्य, 6 मोबाईल असा माल जप्त करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फुरसुंगी गावातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये मटका, सोरट खेळविला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती.
त्यानुसार गुरुवारी सायंकाळी 5 वाजता छापा टाकण्यात आला.हा अड्डा दादासाहेब तुपे (रा. फुरसुंगी) हा चालवितो.
या अड्ड्यावर प्रफुल्ल मोहन कामठे (वय 35, रा. चांभळी, सासवड, ता. पुरंदर),किरण भैरु चव्हाण (वय 29, रा. हरपळे वस्ती) हे मटका व सोरट जुगार घेत होते.दीपक ललन निसाद (वय 25, रा. कोंढवा),विलास शरनाप्पा चौगुले (वय 48, रा. फुरसुंगी),
प्रकाश तानाजी हरपळे(वय 33, रा. फुरसुंगी),भीमा किसन कदम (वय 60, रा. फुरसुंगी) हे जुगार खेळताना आढळून आले.
त्यांच्याकडून 6 हजार 690 रुपये रोख, जुगार साहित्य, 6 मोबाईल असा 19 हजार 690 रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे ,पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाकडील पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक
पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर तसेच सामाजिक सुरक्षा विभागाकडील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.