‘नाम रंगी रंगुनी’ भक्तीगीतांचा कार्यक्रम : आरव पुणे निर्मित आणि हटके म्युझिक ग्रुप यांच्या वतीने आयोजन
पुणे : तू माझा देवा प्रेमळू…खुले देवघर दरवळावे पहाटे…प्रेम से बोलो बस एक नाम,जय जय राम जय जय राम…बाई मी विकत घेतला शाम..विठू माऊली तू माऊली जगाची…पीठ शेल्याला लागले झाला राउळी गोंधळ कुण्या घरचे दळण आला दळूनी विठ्ठल अशा भगवंताची आळवणी करणाऱ्या आणि भक्तीचे गोडवे गाणाऱ्या भक्तीगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
आरव पुणे निर्मित आणि हटके म्युझिक ग्रुप यांच्या वतीने ‘नाम रंगी रंगुनी’ या भक्तीसंगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते.
संगीतकार सुधीर फडके, लक्ष्मीकांत प्यारेलाल, पांडुरंग दिक्षीत,अनिल-अरुण, संत पुरंदरदास यांच्या रचानांसोबत गायक संगीतकार निखिल महामुनी यांच्या रचना कार्यक्रमात सादर झाल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी गातो माझे गाणे हे गीत सुरवातीला निखिल महामुनी यांनी सादर केले – त्यात शिरीष कुलकर्णी यांनी एक अनोख्या पद्धतीने शिळे ने साथ दिली .. त्यानंतर सुबह सुबह जब आँखें खोलो, दीपावली मनाये सुहानी… सत्यम शिवम सुंदरम…या गीतांना श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. नाम जपन क्यूं छोड दिया…शंभो शंकरा करुणाकरा…तुम से क्या मांगू मेरे साई…नाम रंगी रंगले या गीतांच्या सादरीकरणाने वातावरण प्रसन्न केले. हार्मोनिका किंवा माऊथऑर्गन (मराठीत बाजा) या पाश्चिमात्य वाद्यावर “विठू माउली तू” हा अभंग वाजवण्याचे अनोखा प्रयत्न झाला
कुमारी ऋचा निखिल महामुनी आणि कु.श्रिया निखिल महामुनी यांच्या गीत सादरीकरणाला रसिकांनी उभ राहून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटामध्ये कौतुक करून खूप मोठी दाद मिळाली
डॉ. अनुराधा गोगटे, अपर्णा काळे, अश्विनी आगाशे, डॉ.विजया पुराणीक, ऋचा महामुनी श्रीया महामुनी यांनी सहगायन केले. शिरीष कुलकर्णी यांनी निवेदन केले. श्री शैलेंद्र गोस्वामी यांचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमाला मिळाले होते.
