एचव्हीआर फिटनेस ट्राइबच्या मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद
पुणे, दि. ३० जानेवारी: आजच्या व्यस्त जीवनात निरोगी शरीर आणि मन हे नागरिकांसाठी आव्हान आहे. आपण नियमित व्यायाम केला पाहिजे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हा मुख्य उद्देश्य ठेऊन कोथरूड येथील हिल व्ह्यू रेसिडेन्सीच्या एचव्हीआर फिटनेस ट्राइब तर्फे मॅरेथॉन २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये युवकांबरोबरच आबाल वृद्धांपर्यत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला होता. ३ व ५ किमीच्या मॅरेथॉनमध्ये महिला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एचव्हीआर फिटनेस ट्राइब तर्फे आयोजित ही स्पर्धा कोथरूड येथील हिल व्ह्यू रेसिडेन्सीच्या मुख्य गेट पासून सुरू झाली. या मध्ये एकूण ७०० पेक्षा अधिक रहिवासी सहभागी झाले होते. यात सहभागी सर्वात लहान २ वर्ष आणि सर्वात वृध्द ८० वर्षाच्या धावपटूच्या चेहर्यावर ही आनंद दिसत होता. या वेळी झुम्बा, वॉर्मअप व स्ट्रेचिंगच्या विशेष सत्रांचे आयोजन ही करण्यात आले होते. येथे आहार तज्ञांनी नागरिकांना सकस आहाराच्या सवयींचा सल्ला दिला. आपला आहार सर्वंकष कसा असावा व त्यात कार्बोहायडे्रट आणि प्रथिने यांचा समावेश याचे मार्गदर्शन दिले गेले.
एचव्हीआर फिटनेस ट्राइब यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना टिशर्ट, मेडल व ब्रेकफास्ट दिला. या मॅरेथॉनमुळे आरोग्य जागृतीतून अप्रतिम अनुभव आला. असे सांगून नागरिकांनी एचव्हीआर फिटनेस ट्राइब चे आभार मानले. तसेच दर वर्षी अशी मॅरेथॉन घेण्याची विनंती केली. आज पुण्यात अनेक सोसायटी आहेत परंतू अशा प्रकारची मॅरेथॉन घेतली जात नाही. इतरांनी या सोसायटीचा आदर्श घेऊन अशा मॅरेथॉनचे आयोजन करावे.