पुणे : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील असामान्य कामगिरी करणा-या लघुउद्योजकांकरीता राज्य शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकास 15 हजार रुपये व द्वितीय क्रमाकांस 10 हजार रुपये व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
जिल्हा पुरस्कारासाठी ज्ञापन, पोहोच भाग- 2, उद्योग आधार हा स्थायी लघुउद्योग म्हणून उद्योग संचालनालयाकडे तीन वर्षे नोंदणीकृत असावा. तसेच उद्योग घटक मागील दोन वर्षे सलग उत्पादनप्रक्रियेत असलेला असावा, तसेच सदर लघुउद्योग कोणत्याही संस्थेचा बँकेचा थकबाकीदार नसावा.
जिल्हा पुरस्कारासाठी शासनाने विहित केलेल्या निकषाप्रमाणे लघुउद्योगांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र लघुउद्योजकांनी या पुरस्कारासाठी 30 नोव्हेंबर 2019 अखेर अर्ज सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांचेकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. पुरस्कारासंदर्भात अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांचे कार्यालय कृषी महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे (020-25537541, 25537966 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.