देशाच्या संरक्षणासाठी लष्करी जवान भक्कम ,मोदींनी त्यांचा आसरा घेवू नये – अरविंद शिंदे
पुणे- देशाच्या संरक्षणासाठी भारताचे लष्कर आणि जवान भक्कम आहेत त्यांचा राजकीय आसरा मोदींनी घेण्याची आवश्यक्यता नाही असे प्रतिपादन मोदी यांच्या शहरभर झळकत असलेल्या जाहिरातीनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी केले तर कॉंग्रेसचे दुसरे युवा नेते नगरसेवक अविनाश बागवे यांनी पुण्याच्या दोन्ही भाजपा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून एक मंत्री निवडणूक प्रचारात सर्वत्र दिसत असून तरीही ते फरार असल्याची माहिती पोलीस कोर्टाला देत आहेत असा आरोप केला आहे.
आज दुपारी कॉंग्रेस चे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ ताडीवाला रोड या परिसरात पदयात्रा काढण्यात आली तेव्हा ते ‘माय मराठी ‘ शी बोलत होते . या परिसरातील नगरसेवक , कार्यकर्ते आणि दलित ,मुस्लीम समाजाचे असंख्य कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते . या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला .
पहा या पदयात्रेची एक झलक आणि यावेळी कोणी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या ..