पुणे- भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या यांच्या कोरेगाव पार्क मधील काही लेन ला पिंगळे नगर नाव देण्यावरून निर्माण झालेला वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत . कॉंग्रेसच्या संगीता तिवारी यांनी आपण येथील नाव बदलून देणार नाहीच असा पवित्र घेत आंदोलनाची जोरदार तयारी सुरु केली आहे.
कोरेगाव पार्क चे नाव आम्ही बदलत नाहीये ,तेथील काही लेनला नंबर ऐवजी नाव देतोय असा खुलासा स्थानिक भाजपचे नगरसेवक उमेश गायकवाड यांनी मायमराठी कडे करताना कोरेगाव पार्कचे नामांतर होतेय हि राजकीय अफवा असल्याचे स्पष्ट केले होते .
यावर तिवारी यांनी ,पिंगळे नगर नाव कशाला ? पिंगळे यांची नावे विविध ठिकाणी अगोदरच दिलेली आहेत .असे आक्षेप घेत . काही लेनची नावे बदलतोय असे सांगत निम्म्याहून अधिक कोरेगाव पार्कचे नाव बदलण्याचा घात घातला जातोय असा आरोप केला आहे. पहा नेमके त्या काय म्हणाल्या त्यांच्याच शब्दात ….