पुणे -महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये व कोविड सेंटर मध्ये स्त्री रोग तज्ज्ञांची नेमणूक करावी अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी केली आहे .
ते म्हणाले,”शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत असून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे बाणेर,बालेवाडी, शिवाजीनगर,नायडू,दळवी,लायगुडे,गणेश कला क्रीडा मंच,सोनावणे,कमला नेहरू व विविध ठिकाणी जम्बो कोविड सेंटर आयसीयू व ऑक्सिजन बेडसह उभारण्यात आले. तिथे कोविडचे उपचार देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. अनेक कोरोना रुग्ण येथे उपचार घेत असून यामध्ये गरोदर महिला व मासिक पाळी असलेल्या महिलांना देखील कोविड झालेला दिसत आहेत. परंतु पुणे महानगरपालिकेच्या कोविड सेंटर मध्ये कोठेही त्यांना स्वतंत्र अशी त्यांची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्याकडे अधिक लक्ष देणे व सर्व सोय करणे गरजेचे आहे असे पुणे महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल म्हणाले.
पुणे महानगरपालिकेच्या सोनवणे हॉस्पिटलमध्ये प्रसूतिगृह आहे. परंतु याठिकाणी प्रसूतिगृह असताना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची व्यवस्था नाही. महानगरपालिकेचे एवढे मोठे प्रसूतिगृह असताना व तेथे कोविड सेंटर असताना तेथे या सुविधा उपलब्ध नाहीत ही खेदाची बाब असून येथे त्वरित ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करावी. तसेच महानगरपालिकेच्या सर्व हॉस्पिटलमध्ये व कोरोना सेंटरवर स्त्री रोग तज्ज्ञांची नेमणूक केली नाही ही खेदाची बाब असून त्वरित सर्व महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये व कोविड सेंटर मध्ये स्त्री रोग तज्ज्ञांची नेमणूक करावी अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे आबा बागुल यांनी केली.
बागूल म्हणाले की, कदाचित महाराष्ट्रामध्ये कोठेही अश्या पद्धतीची स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात आली असावी असे मला वाटत नाही. त्यासाठीच पुणे महानगरपालिकेने त्याच्या आकडेवारीचा अभ्यास करून पुणे महानगरपालिकेचे सोनावणे हॉस्पिटलसह महानगपालिकेच्या सर्व कोविड सेंटर मध्ये अश्या पद्धतीची सुविधा स्वतंत्रपणे उभी केल्यास कोविड पॉझिटिव्ह असलेल्या गरोदर व मासिक पाळी असलेल्या महिलांची संख्या अधिक असून त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार देणे शक्य होईल. त्यामुळे बाळ व बाळंतीण अश्या दोघांचेही जीव वाचवणे शक्य होईल. व मासिक पाळी असणाऱ्या महिलांना अभय मिळेल त्यादृष्टीने तातडीने विचार करून कार्यवाही केली जावी व महानगरपालिकेच्या सर्व हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये स्त्री रोग तज्ज्ञांची नेमणूक करावी अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे आबा बागुल यांनी केली.