मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 1000 वारकर्यांनी घेतला लाभ
पुणे:
वानवडी येथील इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे दिंडीतील वारकर्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 1000 वारकर्यांनी या शिबिराचा लाभ घेतला, अशी माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. परवेझ इनामदार यांनी दिली.
या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी, लसीकरण, मोफत औषधांचे वाटप, डॉक्टरांचा मार्गदर्शक सल्ला आणि रूग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली होती.
नवयुग मित्र मंडळ, पंचमुखी मारूती चौकाजवळ, गुरूवार पेठ येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे सहावे वर्षे होते. या शिबिरामध्ये हॉस्पिटलचे डॉक्टर, परिचारीका, सहाय्यक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.