पुणे-महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पुणेकरांना जंगलाच्या राजा आणि राणीचे राजीव गांधी प्राणी संगहालयात दर्शन झाले. गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयाच्या वतीने ही सिंहाच्या नर-मादीची जोडी देण्यात आली आहे. कात्रज उद्यानातील या सिंहाचे नाव तेजस, तर मादीचे नाव सूब्बी असे ठेवण्यात आले आहे. आज जेव्हा तेजस व सुब्बी ही सिंहाची जोडी पिंजऱ्यातून बाहेर आली. तेव्हा त्या जोडीला पाहणा-यांची अक्षरशः झुंबड उडाली काहींनी टाळ्या वाजवून तर काहींनी शिट्ट्यामारून या जोडीचे स्वागत केले.
या रुबाबदार जोडीचे फोटो काढण्यासाठी उपस्थितांचे कॅमेरे सरसावले. चार फूट उंच आणि दणकट यष्टी आणि मानेवरी आयाळ यामुळे तेजस राजासारखा दिसत होता. या उपक्रमाचा शुभारंभ महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, विद्यार्थी, पर्यटक उपस्थित होते. या जोडीला 21 डिसेंबर 2016 रोजी गुजरात येथील जुनागडच्या शक्करबाग प्राणीसंग्रहालयातून आणण्यात आले आहे. तेजस आणि सुब्बी या सिंहाच्या जोडीला आज नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. या जोडीचा जन्म 2010 मध्ये झाला आहे. गेल्या 7 वर्षात हे दोघेही गुजरातमधील प्राणीसंग्रहालयाच्या आवारात रमले आहेत. त्यामुळे पुण्यातील प्राणी संग्राहलयात देखील चांगले रमले आहेत. यांचा महिन्याचा खाण्याचा खर्च 25 ते 30 हजार रुपये आहे. रोज 8 किलो मांस या जोडीला देण्यात येत आहे.कात्रजच्या उद्यानात सध्या चारशेच्यावर प्राणी आहेत. त्यात आता सिहांचीही भर पडली आहे. विशेष म्हणजे राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील पाच विदेशी प्रजातीचे पक्षी सक्करबाग प्राणीसंग्रहालयास देण्यात आले आहेत. त्याबदल्यात ही नर मादी जोडी सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने कात्रजच्या प्राणीसंग्रहालयास दिली आहे