मुंबई. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात वाइन शॉप पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही मागणी करताना राज ठाकरे म्हणाले, कोरोना आणि त्यानंतर लॉकडाउनमुळे महाराष्ट्राच्या महसूलात सातत्याने घट होत आहे. वाइन शॉप पुन्हा सुरू केल्यास राज्याच्या महसूलात वाढ होईल. त्यांनी याबाबतचे एक पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले आहे.
नैतिकतेमध्ये अडकू नये, जो आवश्यक आहे तो निर्णय घ्यावा
मुख्यमंत्री कार्यालयाला लिहिलेल्या पत्रामध्ये राज ठाकरे म्हणाले, वाइन शॉप उघडा म्हणून मी दारुड्यांची बाजू घेत नाही. परंतु, लॉकडाउनमुळे राज्यावर संकट आले आहे. अशात महसूल वाढवण्यासाठी मी वाइन शॉप पुन्हा सुरू करण्याचे सांगत आहे. गेल्या महिनाभरापासून लॉकडाउन लागू करण्यात आला. तेव्हापासूनच वाइन शॉप बंद आहेत. त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू करून पुन्हा सुरू करण्याची परवानगी देता येईल. ही वेळ अतिशय वाइट आहे, अशात सरकारने नैतिकतेमध्ये अडकून पडू नये, जो निर्णय आवश्यक आहे तो घ्यावा. समस्येला सामोरे जात असताना त्यावर तोडगा काढू. असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
हे देखील सुरू करा…
यासोबतच मनसे अध्यक्षांनी वाइन शॉप सुरू करण्यासोबतच स्वस्त जेवण पुरवणारे हॉटेल आणि किचन सुरू करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक याच जेवणावर विसंबून असतात. कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंग ठेवून त्यांना परवानगी देता येईल. राज्यातील ढासळत्या अर्थव्यवस्थेला यातून मदत मिळेल असे राज ठाकरे म्हणाले आहेत.




