
पुणे : तैपाई चायनीज येथे आंतरराष्ट्रीय कुराश (कुस्ती) स्पर्धेचे आयोजन २० जुलै ते २४ जुलै २०१६ रोजी केले आहे. ही कुराश स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरची असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. महाराष्ट्रातील एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ८ कुस्ती पटूंची निवड या स्पर्धेसाठी झाल्याने आंतरराष्ट्रीय खेळात एका प्रकारे महाराष्ट्र राज्य देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. कुस्ती हा खेळ खरा महाराष्ट्राचा कुस्ती महाराष्ट्रात रुजली वाढली आली मराठी माणसाने जगाच्या कानाकोपऱ्यात हा खेळ नेहला.
तैपाई चायनीज येथे आंतरराष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील संघ १९ जुलैला महाराष्ट्रातून तैपाईला रवाना होणार आहे. कुराश स्पर्धेसाठी भारतीय महिला कोच म्हणून सौ. सीमा सावंत यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रासाठी ही गोष्ट अभिमानास्पद आहे.
योगेश उंटवाल (औरंगाबाद ), आशितोष लोहकरे ( मुंबई ) शिवराज मगदूम (कोल्हापूर ), फारूक मन्सूरी (मुंबई ), पूर्वा मॅथ्यु (मुंबई ), तेजश्री व्यवहारे ( पुणे ), पूजा धोपेश्वर ( पुणे ), रुचा धोपेश्वर ( पुणे ) या स्पर्धेमध्ये हे खेळाडू सहभागी होणार आहेत. आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र कुराश संघटनेचे अध्यक्ष रणजीत जगताप यांनी अशी माहिती दिली.
यावेळी राकेश काळभोर ( कुराश अध्यक्ष पुणे जिल्हा ), संदीप बालवडकर ( कुराश पुणे शहर अध्यक्ष ) दत्तात्र्य व्यव्हारे (पुणे जिल्हा उप – अध्यक्ष कुराश ), रुपेश मोरे ( खजिनदार ), शिवाजी साळुंखे ( कार्य अध्यक्ष महराष्ट्र कुराश ), कुमार उपाध्याय (तांत्रिक कमिटी), सचिन हंडे ( संघटक पुणे जिल्हा ), दीप्ती पाठाक ( संघ व्यवस्थापक ), कैलाश बडदे ( संघटक पुणे शहर ) आदी मान्यवर उपस्थित होते.

