वेगळी चूल मांडणाऱ्यांना पक्षात घेऊ नका -रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार

Date:

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचा राजीनामा देणाऱ्या व स्वतःच्या स्वार्थासाठी वेगळी चूल मांडणाऱ्या चार रिपब्लिकन नेत्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये. त्यांनी केलेल्या पक्षविरोधी कृतीचा निषेध करून त्यांना कायमचे पक्षाबाहेर पाठवावे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मागे ठामपणे उभे राहून त्यांचे हात बळकट करू, असा निर्धार पुणे शहरातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केला.
दोन दिवसांपूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडीचे हनुमंत साठे, श्रमिक आघाडीचे महेश शिंदे, पक्षाचे माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता आठवले यांनी राजीनामे देऊन पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष अशोक कांबळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत स्वार्थापोटी पक्षविरोधी वागणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला.
या बैठकीला उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, आयुब शेख, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, निलेश आल्हाट, मंदार जोशी, महिपाल वाघमारे,,संजय सोनवणे, नगरसेविका सुनीता वाडेकर, सोनाली लांडगे, फर्जाना शेख, बाबुराव घाडगे, मोहन जगताप, भगवान गायकवाड, चिंतामण जगताप, महादेव कांबळे, गौतम शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले “रामदास आठवले पक्षासाठी जो निर्णय घेतील त्याचे पालन करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करायला हवे. पक्षातून बाहेर पडून विरोधात काम करणे योग्य नाही. पक्षाने आजवर या नेत्यांना खूप काही दिले. मात्र त्यांच्या अपेक्षा वाढतच आहेत. आठवले यांचे नाव पुढे करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना पुन्हा पक्षात घेऊ नये, असा ठराव झाला आहे.” बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण  यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांचा निषेध केला.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...