केजे महाविद्यालयात ‘मल्हार युवा महोत्सव’ उत्साहात

Date:

पुणे : “प्रत्येकाच्या आतमध्ये सुप्त गुण दडलेले असतात. या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर आयोजिले जाणारे महोत्सव उपयुक्त ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानासह कला-कौशल्ये आत्मसात करावीत,” असे मत प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी केजे शैक्षणिक संस्थेच्या केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘मल्हार युवा महोत्सवा’च्या उद्घाटनावेळी जितेंद्र भुरुक बोलत होते.

सहा दिवसांच्या या युवा महोत्सावात अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, व्यवस्थापनशास्त्र व वास्तुशास्त्राच्या विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. फॉर्मल टाय डे, साडी डे, रोज डे, बॉलीवुड डे, चॉकलेट डे, स्कूल डे, मिसमॅच डे, सिग्नेचर डे, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट डे व ट्रेडीशनल डे आदी दिवस साजरे झाले. विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, पेन्सिल स्केचेस, छायाचित्रे, हस्तकला व रांगोळींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कलादालनाचे उद्घाटन सुनंदा जाधव व विभावरी जाधव यांनी केले.

‘म्युझिकल इव्हीनींग’मध्ये प्रसिध्द डीजे मित यांच्या उपस्थितीत मुलांनी नृत्याचा आनंद घेतला. गायन, संगीत, नृत्य, नाटक आदी कलांचे सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रमात झाले. विद्यार्थ्यांनी दर्जेदार गाणी, नृत्य व नाटकांद्वारे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सर्व कलेतील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने पारितोषिके प्रदान करण्यात आली. कृष्णात पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. सुहास खोत यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

महोत्सवाच्या समारोपावेळी भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागाचे प्रमुख कृष्णाथ पाटील, संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा देशमुख-जाधव, विभावरी जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, ट्रिनिटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. जी. फाकटकर, ट्रिनिटी अ‍ॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. एन. जे. उके, डॉ. मंगेश कश्यप, जी. बी. इंगोले, सर्व विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. ‘मल्हार युवा महोत्सवा’चे समन्वयक व केजे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत, प्रा. छबिलदास गाजरे, प्रा. विकास मरळ, प्रा. अमृता ताकवले व सहकार्‍यांनी मेहनत घेतली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राजीव बर्वे व प्रियंका बर्वे यांच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

अभंग-गवळणींच्या सुरांनी जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवात रंगली भक्तीमय मैफल पुणे...

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सदानंद अंचवल स्मृती पुरस्कारांचे वितरण

विद्यार्थ्यांवर भारताला ‘जगाचे गुरुस्थान’ मिळवून देण्याची जबाबदारी – पांडुरंग...

शासन व्यवस्थेचा अंकुश न राहिल्यानेच भोंदूगिरीचे प्रस्थ वाढले-गोपाळदादा तिवारी

पुरोगामी महाराष्ट्रात, ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’ काँग्रेस ने केला.. मात्र...

आरटीई कायद्यात सुधारणा करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी

पुणे  : राईट टू एज्युकेशन ॲक्ट, 2009 मध्ये आवश्यक...