नवी दिल्ली, 30 जुलै – रेसिंगचे चाहते असलेल्या मोटरसायकलप्रेमींची प्रतीक्षा आता संपली आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज सुपर स्पोर्ट विभागाताली सीबीआर 1000 आरआर- र फायरब्लेड आणि फायरब्लेड एसपी इंडिया या दोन प्रकारांचे बुकिंग सुरू केल्याचे जाहीर केले आहे. सीबीआर 1000 आरआर- र फायरब्लेड आणि फायरब्लेड एसपी इंडिया भारतात कम्प्लीटली बिल्ट- अप (सीबीयू) प्रकारात उपलब्ध केली जाणार आहे.
2019 च्या ईआयसीएमए शो मिलानमध्ये होंडाच्या सुपर स्पोर्ट्स लाइन- अप अंतर्गत अनावरण करण्यात आलेल्या सीबीआर 1000 आरआर- र फायरब्लेड आणि फायरब्लेड एसपी इंडिया आतापर्यंत उपलब्ध करण्यात आलेल्या सर्वात ताकदवान बाइक्स आहेत.
सर्किट रायडिंगवर भर देत कामगिरी आणि नियंत्रणाची असामान्य पातळी असलेली 2020 फायरब्लेड होंडा रेसिंग कॉर्पोरेशनच्या (एचआरसी) भरीव योगदानासह तयार करण्यात आली आहे.
आरसी213व्हीएस ‘स्ट्रीट लीगल मोटोजीपी मशिन’च्या इंजिन व चासिस तंत्रज्ञानावर जास्त भर देत, आरसी213व्ही मोटो जीपी मशिनच्या एरोडायनॅमिक्सपासून प्रेरणा घेत बनवण्यात आलेल्या नव्या फायरब्लेडचे न्ही प्रकार जबरदस्त ट्रॅक कामगिरीसाठी इंजिन, हाताळणी व एरोडायनॅमिक्सच्या बाबतीत ग्राउंड अपपासून डिझाइन करण्यात आली आहे.
फायरब्लेड एसपीला अतिरिक्त आणि अत्याधुनिक ओहलिन्स स्मार्ट इलेक्ट्रॉनिक कंट्रोल (एस- ईसी) सस्पेंशन आणि युजर इंटरफेज, न्यू ब्रेम्बो स्टाइलेमा ब्रेक कॅलिपर्स – 330एमएम डिस्क, 2 लेव्हल एबीएस आणि क्विक शिफ्टरसह बसवण्यात आले आहेत.
फायरब्लेडचा वारसा आणि होंडाच्या प्रीमियम व्यवसाय योजनांविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘होंडाच्या जागतिक उत्पादन श्रेणीतील उत्पादने उपलब्ध करण्यातून आमचा रेसिंग डीएनए भारतात एका नव्या उंचीवर नेण्याचे आमची तीव्र इच्छा अधोरेखित झाली आहे. प्रसिद्ध फायरब्लेड योग्य हाताळणी, समतोल आणि चालवण्याचा असामान्य आनंद या गुणांसाठी गेली 28 वर्ष प्रसिद्ध आहेत.’
2020 साठी आरक्षण खुले केल्याची घोषणा करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.च्या विक्री आणि विपणन विभागाचे श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘वारसा पुढे नेणारी नवी फायरब्लेड होंडाच्या आरसी213व्ही मोटो जीपी मशिनवरून प्रेरणा घेत बनवण्यात आली आहे. या ‘बॉर्न टु रेस’ मोटरसायकलीची ताकद जबरदस्त आहे, शिवाय ट्रॅकवर आधारित कामगिरीची असामान्य पातळी गाठण्याची क्षमता तिच्यात आहे. या परफॉर्मन्स बाइकसह चालकांना पूर्णपणे नवा आणि जबरदस्त अनुभव घेता येईल. आजपासून भारतातील होंडा बिगविंग वितरकांकडे आरक्षण खुले झाले आहे. वितरण ऑगस्ट 2020 पासून सुरू होईल.’
प्रमुख वैशिष्ट्ये
रेसिंगप्रेम जागं करा
2020 होंडा सीबीआर 1000आरआर फायरब्लेड मध्ये 1000 सीसी इन- लाइन फोर- सिलेंडर इंजिन बसवण्यात आले आहे, जे 160 केडब्ल्यू@ 14,500 आरपीएम, 113 एनएम उच्च टॉर्कची @ 12,500rpm निर्मिती करते. ते मोटोजीपीच्या आरसी213व्ही मोटरसायकलप्रमाणे पूर्णपणे नवे बोअर अँड स्ट्रोक (81एमएम x 48.5एमएम) वापरते. अल्युमिनीयमपासून तयार केलेले पिस्टन्स आरसी213व्ही मध्येही वापरण्यात आले असून ते सुमारे 5 टक्क्यांनी हलके आहे.
कमी वजन
सीबीआर 1000आरआर फायरब्लेडमध्ये हलक्या वजनाची अल्युमिनियम फ्रेम 2एमएम जाडीच्या वॉल सेक्शनसह वापरण्यात आली आहे. टायटॅनियम कनेक्टिंग रॉड्स आणि रॉड बोल्ट्स थ्रेड थेट रॉड बॉडीमध्ये जात असल्यामुळे त्यात स्वतंत्र फास्टनिंग नट्स देण्यात आलेला नाही. यामुळे स्टील रॉडच्या तुलनेत वजन अंदाजे 50 टक्क्यांनी कमी झाले आहे आणि त्याचे डिझाइन आरसी213व्ही- एस रॉड सारखेच आहे.
संपूर्ण नियंत्रण देणारे डिझाइन
सुधारित थ्रॉटल-बाय-वायर (टीबीडब्ल्यू) जलद प्रतिसाद देत असल्यामुळे नवी फायरब्लेड चालवण्याचा अनुभव आणखी उंचावतो. यामध्ये तीन डिफॉल्ट रायडिंग मोड (पॉवर (पी), इंजिन ब्रेक(ईबी) आणि व्हीली कंट्रोल (डब्ल्यू)) देण्यात आले आहेत. यात देण्यात आलेले होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल नऊ पातळ्यांमध्ये अडजस्ट करता येण्यासारखे असल्यामुळे चालकाला पूर्ण नियंत्रणाचा आत्मविश्वास मिळतो.
रॅपीड व्हील स्पिनवर नियंत्रण मिळावे यासाठी यात स्लिप रेट कंट्रोलही देण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक पॅकेजमध्ये आता स्टार्ट मोडही (अडजस्टेबल) देण्यात आले आहे. सीबीआर1000आरआर- आरमध्ये आता शोवाचे नवे तीन स्तरीय होंडा इलेक्ट्रॉनिक स्टिरयिंग डॅम्पर (एचईएसडी) देण्यात आले आहे, जे व्हील स्पीड सेन्सर्स आणि आयएमयूच्या इनपुटद्वारे नियंत्रित करता येते.
याच्या डॅम्पिंग व्हॉल्यूनुसार शोवा 43 एमएम बिग पिस्टन फोर्क (बीपीएफ) इन्व्हर्टेड टेलिस्कोपिक फोर्क अतिशय कार्यक्षमपणे कॉम्प्रेशन आणि एक्सटेन्शनअंतर्गत तयार झालेले हायड्रोलिक प्रेशर कमी करतो. रियर शॉक पूर्णपणे अडजस्टूल शोवा बॅलन्स फ्री रियर कुशन लाइट (बीएफआरसी- लाइट) आहे. रियर टायरचा आकार आता 200/55-ZR17 आहे.
बळकट चासिस
नव्या फायरब्लेडचे चासिस तंत्रज्ञान आरसी213व्ही- एसच्या ‘द स्ट्रीट लीगल मोटो मशिन’ प्रेरणा घेऊन बनवण्यात आले आहे. 1455 एमएमचा वाढीव व्हीलबेस आणि रेक व
24°/102 एमएम (1405एमएम, 23°/96एमएम) स्थैर्य वाढवतो. समतोल आणि गुरुत्वाकर्षण बिंदू, क्रँकशाफ्टमध्ये करण्यात आलेले लक्षणीय बदल (3323°/96) वजनाचे समतोल वितरण करतात, तर उच्च गुरुत्वाकर्षण बिंदूमुळे पिचिंग कमी होते व साइड- टु साइड चपळाई वाढते.
गोलाकार, थिन- वॉल अल्युनमिनियम ट्युबिंगमुळे कमीत कमी सब- फ्रेम तयार होते. ते वरपासून फ्रेमपर्यंत (बाजूने होण्याऐवजी) उंच होते व त्यामुळे इंधनाची टाकी आणि आसनामागचा भाग अरूंद होतो. पर्यायाने रायडिंगसाठी चपखल आणि एयरोडायनॅमिकली कार्यक्षम जागा तयार होते. आसनाची इंची 830 एमएम असून हँडलबार पोझिशन पुढेच्या बाजूने (लेव्हरेजसाठी) आणि फूट पेग मागील बाजूस उंचावर हलवण्यात आले आहे.
सुधारित ब्रेकिंग
गाडीमध्ये नवे निस्सिन फोर- पिस्टन रेडियल माउंट फ्रंट ब्रेक कॅलिपर्स अधिक रिजडीटी व कमी वजन, मोठे 330 एमएम डायामीटर डिस्कसह (+10एमएम) बसवण्यात आले आहेत. ट्रॅक वापरासाठी ब्रेकिंगची ताकद वाढली असून 5एमएम डिस्कची जाडी उष्णतेचेही कार्यक्षमपणे वितरण करते. रियर ब्रेक कॅलिपर हे आरसी213व्ही- एस मध्ये वापरण्यात आलेले समान ब्रेम्बो युनिट आहे.
फुल कलर टीएफटी मीटर
होंडाच्या आरसी213व्ही- एस स्ट्रीट लीगल प्रकारातून प्रेरणआ घेऊन बनवण्यात आलेल्या नव्या फायरब्लेडमध्ये मोठे आणि चांगल्या रिझोल्यूशनचे फुलकलर 5 इंची हाय रिझोल्यूशन टीएफटी इन्स्ट्रुमेंट स्क्रीन देण्यात आले आहेत. ते रायडरला स्क्रीन सेटिंग पर्यायांच्या मेनूमधून निवडण्याचा पर्याय देतात व त्यानुसार हव्या त्या फॉरमॅटमध्ये माहिती दाखवली जाते.
टायटॅनियम मफलर
सीबीआर1000 आरआर- आर फायरब्लेड मफलरचा विकास अक्रापोव्हिकसह एकत्रितपणे करण्यात आला आहे. हलक्या वजनासाठी ते टायटॅनियमपासून बनवण्यात आले आहे आणि याचे डिझाइनची बाइकच्या मास सेंट्रलायझेशनमध्ये योगदान देणारे आहे. एक्झॉस्टमधील खास व्हॉल्वह टॉर्कला लोअर रेव्हमध्येवेग देण्यासाठी आणि जास्त आरपीएमला हॉर्सपॉवर वाढवण्यासाठी मदत करतो.
एयरोडायनॅमिक विंगलेट्स
सीबीआर1000 आरआर- आर फायरब्लेडमध्ये बसवण्यात आलेले विंगलेट्स ट्रॅक वेगावर कार्यक्षमपणे डाउनफोर्सची निर्मिती करतात. डाउनफोर्स निर्मितीसाठी प्रत्येक डाव्या आणि उजव्या डक्टमध्ये तीन विंग्ज बसवण्यात आले आहेत.
स्मार्ट की
आता किल्लीशिवाय इग्निशन करता येते व हँडलबारचे लॉकही त्याचप्रमाणे उघडता येते. दैनंदिन वापरासाठी हे अतिशय सोयीचे असून त्यामुळे स्पर्धेसारख्या टॉप योकचा वापर होतो, तर रॅम एयर सिस्टीमसाठी जास्तीत जागा खुली होते.
ब्रेम्बो ब्रेक्स (फायरब्लेड एसपीमधे खास बसवण्यात आलेले)
सीबीआर1000 आरआर- आर फायरब्लेड एसपीमध्ये फ्रंट ब रेक डिस्क 330 एमएम इतक्या मोठ्या असल्यामुळे ब्रेकिंगची ताकद वाढते. बाइकमध्ये ब्रेम्बो स्टाइलेमा फ्रंट कॅलिपर्स आहेत, तर रियर कॅलिपर आरसी213व्ही- एसप्रमाणे आहेत. ब्रेम्बोद्वारे देण्यात आलेले ब्रेक मास्टर सिलेंडर्स आणि फ्रंट ब्रेक लिव्हर रायडर्सचा ब्रेम्बोची एकंदर ब्रेकिंग कामगिरी सुधारतात.
ऑहलिन्स नवे तंत्रज्ञान स्मार्ट ईसी सस्पेंशन (फायरब्लेड एसपीमधे खास बसवण्यात आलेले)
सीबीआर1000 आरआर – आर फायरब्लेड एसपीमध्ये इलेक्ट्रॉनिक पातळीवर नियंत्रित करता येणारे, ऑहलिन्सने उत्पादित केलेले एनपीएक्स फोर्क्स बसवण्यात आले आहेत. आधीच्या सीबीआर1000 आरआर एसपी मध्ये वापरण्यात आलेले एनआयएक्स फोर्कमधे प्रेशराइज्ड डॅम्पिंग यंत्रणा बसवून डॅम्परमधील कॅव्हिएटेशन कमीत कमी करून डॅम्पिंगची ताकद स्थिर करण्यात आली आहे, तर धक्का पचवण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे.
होंडाने आजपासून आपल्या प्रीमियम बिगविंग वितरकांकडे सीबीआर 1000 आरआर- र फायरब्लेड आणि फायरब्लेड एसपी इंडियाचे बुकिंग सुरू केले आहे.
प्रकार | 2020 सीबीआर 1000 आरआर- र फायरब्लेड | 2020 सीबीआर 1000 आरआर- र फायरब्लेड एसपी |
रंग | ग्रँड प्रिक्स रेड मॅट पर्ल मोरियन ब्लॅक | ग्रँड प्रिक्स रेड |