पुणे: भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘बजाज अलियान्झ लाइफ’ने 31 डिसेंबर 2020 रोजीपर्यंत 70,000 कोटी रुपयांच्या एकूण मालमत्तेचा (अॅसेट अंडर मॅनेजमेन्ट – एयूएम) महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ‘कोविड’च्या साथीमुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात अनिश्चितता असतानादेखील कंपनीने ही स्थिर वाढीची कामगिरी बजावली असल्याने तिचे महत्त्व वेगळेच आहे. मूल्य-वर्धित उत्पादनांच्या नवकल्पना आणि ग्राहक सेवांमध्ये अर्थपूर्ण सुधारणा यांमुळे कंपनीने गेल्या दहा वर्षात आपल्या ‘एयूएम’मध्ये 79 टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदविली आहे आणि 2020 या वर्षभरात, डिसेंबर 2020पर्यंत, 70,295 कोटी रुपयांचा ‘एयूएम’ नोंदविला आहे.‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तरूण चुघ म्हणाले, “आमच्या ब्रँडवर ग्राहकांचा मोठा विश्वास आहेच, त्याशिवाय एखाद्या आजाराची साथ असो किंवा नसो, ग्राहकांच्या आयुष्याची आर्थिक उद्दिष्टे साकार करण्यात आम्ही कमी पडत नाही, याकरीता आमच्या कर्मचारी वर्गावर ग्राहकांचा जो विश्वास आहे, त्याचे हे प्रतिबिंब आहे. ‘कोविड-19’च्या साथीमुळे बाजारात चढउतार होऊनदेखील आमच्या फंडांमधून जोखीम-समायोजित परतावा मिळत राहील, याविषयी आमच्या गुंतवणूक विभागातील तज्ज्ञांनी वेळोवेळी खबरदारी घेतली. मागील वर्षातील घडामोडींतून आम्हाला मिळालेला धडा आणि व्यवसायात नव्याने निर्माण झालेले वातावरण यांच्या आधारे, आम्ही आमच्या ग्राहकांमधील विश्वास वाढवू आणि अधिक विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख मिळवू, याचा मला आत्मविश्वास आहे.”