मुंबई: पुढील पंधरा महिन्यांमध्ये, महिंद्रा अँड महिंद्रा लि.मधील वरिष्ठ नेतृत्वातील अनेक जण निवृत्त होत आहे. वरिष्ठ व्यवस्थापनाच्या उत्तराधिकाऱ्यांसंदर्भातील नियोजन 20 डिसेंबर 2019 रोजी जाहीर करण्यात आले.
थोडक्यात, 20 डिसेंबर 2019 रोजी करण्यात आलेल्या प्रमुख घोषणा पुढीलप्रमाणे आहेत:
1 एप्रिल 2020 पासून, आनंद महिंद्रा हे महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या संचालक मंडळाचे अ-कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. डॉ. पवन गोएंका 1 एप्रिल 2020 पासून वर्षभरानंतर त्यांच्या निवृत्तीपर्यंत व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हा कार्यभार पुन्हा स्वीकारणार आहेत. या पुनर्रचनेमुळे रिपोर्टिंग व्यवस्थेमध्ये कोणताही बदल होणार नाही. डॉ. गोएंका यांच्या निवृत्तीपूर्वीच्या या बदलांच्या कालावधीत त्यांच्याकडे सांगयोंग मोटर्स, महिंद्रा फोर्ड जॉइंट व्हेंचर, महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड, ऑटोमोबिली पिनइनफारिना व महिंद्रा ऑटोमोटिव्ह नॉर्थ अमेरिका यांची थेट जबाबदारी कायम राहणार आहे. डॉ. अनिश शहा 1 एप्रिल 2020 रोजी एमअँडएम संचालक मंडळाचे उप व्यवस्थापकीय संचालक ग्रुप सीएफओ म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत. 2 एप्रिल 2021 पासून ते व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी होणार आहेत. 1 एप्रिल 2020 रोजी, राजेश जेजुरीकर कार्यकारी संचालक (ऑटो अँड फार्म सेक्टर्स) म्हणून एमअँडएम संचालक मंडळात जबाबदारी स्वीकारणार आहेत आणि टेक महिंद्रा लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सी. पी. गुरनानी अ-कार्यकारी संचालक म्हणून एमअँडएम संचालक मंडळामध्ये सहभागी होणार आहेत.
समूह अध्यक्ष (एचआर व कॉर्पोरेट सर्व्हिसेस) व मुख्य कार्यकारी अधिकारी (आफ्टर-मार्केट सेक्टर) राजीव दुबे 1 एप्रिल 2020 रोजी नियतसेवा वयमानानुसार निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर रुझबेह इराणी ग्रुप एचआर व कम्युनिकेशन्स यांचे नेतृत्व करणार आहेत. त्यामध्ये सीएसआर, एथिक्स व सीआयएस यांचा समावेश असेल. आफ्टर-मार्केट सेक्टर, महिंद्रा लॉजिस्टिक्स व ऑटो मोबिलिटी सर्व्हिसेस यांचे एकत्रीकरण करून तयार केलेल्या नव्या मोबिलिटी सर्व्हिसेस सेक्टरचे नेतृत्व व्ही. एस. पार्थसारथी करणार आहेत.
या घोषणांच्या अनुषंगाने, ग्रुप कॉर्पोरेट ऑफिस आणि ऑटो व फार्म क्षेत्रे यामध्ये 01 एप्रिल 2020 पासून आणखी बदल केले जाणार आहेत. हे बदल पुढीलप्रमाणे आहेत:
- ग्रुप कॉर्पोरेट ऑफिस (जीसीओ):
एस. दुर्गाशंकर हे फायनान्स व अकाउंट्सचे ग्रुप कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहेत. योग्य प्रशासन व गव्हर्नन्स राखण्यासाठी ते समूहातील सर्व व्यवसायांच्या सीएफओंबरोबर काम करणार आहेत आणि सेक्रेटरिअलची जबाबदारी यापुढेही पाहणार आहेत. ते डॉ. अनिश शहा यांना रिपोर्ट करतील.
- ऑटो अँड फार्म सेक्टर्स (एएफएस):
राजन वधेरा निवृत्त होणार आहेत आणि ऑटो सेक्टरचे अध्यक्ष या पदावरून पायउतार होणार आहेत.
हेमंत सिक्का फार्म इक्विपमेंट सेक्टरचे हेड होणार आहेत.
वीजय नाकरा यांची नियुक्ती ऑटो डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केली जाणार आहे. त्यांच्याकडे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस वगळता, पीअँडएल जबाबदारीसह, संपूर्ण सीव्ही व्यवसाय आणि पीव्ही ही जबाबदारी असणार आहे.
आर. वेलुसामी यांची नियुक्ती ग्लोबल प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचे (ऑटोमोटिव्ह) चीफ म्हणून केली जाईल.
विनोद सहाय यांची नियुक्ती एएफएसचे चीफ परचेस ऑफिसर म्हणून केली जाणार आहे. हेमंत, वीजय, वेलुसामी व विनोद हे राजेश जेजुरीकर यांना रिपोर्ट करतील.
राजीव गोयल यांची नियुक्ती एएफएसचे सीएफओ म्हणून केली जाणार आहे. ते राजेश जेजुरीकर व दुर्गशंकर या दोघांनाही रिपोर्ट करतील.
राजेश्वर त्रिपाठी हे एएफएससाठी चीफ ह्युमर रिसोर्सेस ऑफिसर असतील. ते राजेश जेजुरीकर व रुझबेह इराणी या दोघांनाही रिपोर्ट करतील.
अशोक शर्मा यांच्या नेतृत्वाखालील कृषी व्यवसाय एएफएसमधून हलवला जाणार आहे आणि यापुढेही एअरोस्पेस, संरक्षण व स्टील क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्या व डॉ. अनिश शहा यांना रिपोर्ट करणाऱ्या एस. पी. शुक्ला यांच्याकडे सुपुर्द केला जाणार आहे.