· सुश्री राधिका गुप्ता यांची एएमएफआयच्या उपाध्यक्षपदी पुन्हा निवड
· २७ व्या एजीएम आणि नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या बैठकीनंतर झाली पुनर्रचना
मुंबई- श्री. ए बालसुब्रमण्यन यांची सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या २७ व्या एजीएम नंतर एएमएफआयच्या नुकत्याच झालेल्या मंडळाच्या बैठकीत असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) चे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड करण्यात आली आहे. बोर्डाने श्री. ए. बालसुब्रमण्यन यांची एएमएफआयचे अध्यक्ष म्हणून आणि सुश्री राधिका गुप्ता यांची एएमएफआय च्या उपाध्यक्षा म्हणून २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या समाप्तीपर्यंत पदावर राहण्यासाठी एकमताने पुन्हा निवड केली.
एएमएफआय चे अध्यक्ष या नात्याने श्री. ए. बालसुब्रमण्यन हे पुढील एजीएमच्या समाप्तीपर्यंत एएमएफआय वित्तीय साक्षरता समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहतील.
· श्री. विशाल कपूर (मुख्य कार्यकारी अधिकारी, आयडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड) यांची एमएफआय कमिटी ऑफ सर्टिफाइड डिस्ट्रिब्युटर्स (ARN समिती) चे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झाली आहे.
· श्री. संदीप सिक्का (ईडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, निप्पॉन लाइफ इंडिया अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड) यांची एमएफआय ईटीएफ समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
· सुश्री राधिका गुप्ता (व्यवस्थापकीय संचालक – मुख्य कार्यकारी अधिकारी, एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंट लि.) यांची एमएफआयच्या कामकाज, अनुपालन आणि जोखीम विषयक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
· श्री. निलेश शाह (व्यवस्थापकीय संचालक, कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड) यांची एमएफआयच्या मूल्यांकन समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे.
· श्री. नवनीत मुनोत (व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड) यांची एमएफआय इक्विटी सीआयओ समितीमध्ये पुन्हा निवड झाली आहे.
हे निर्णय सेबी नोंदणीकृत म्युच्युअल फंडांच्या उद्योग मंडळाने एमएफआयने नुकत्याच झालेल्या मंडळाच्या बैठकीत घेतले.