पुणे- अनिल चौधरी
महापालिकेने छोट्या- मध्यमवर्गीयांच्या अतिक्रमणांवर कारवाई करताना सर्व नियम पायदळी तुडवीत कारवाई केली असा आरोप करीत अशा पद्धतीने केवळ दहशत बसविण्यासाठी कारवाई कार्नार्यची चौकशी करा आणि त्यांना निलंबित करा अशी मागणी बहुजन मोर्चा आणि अन्य नागरिकांनी येथे केली .
विमाननगर येथील हातगाडी पथारी व अनधिकृत शेडवर कारवाई करण्यासाठी सह.आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्या मार्गदर्शनखाली दिनांक 10.2.2016 रोजी कारवाई करण्यात आली , परंतु या कारवाईत लोंढे व ढोकळे यांनी सूडबुद्धीने व अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य कारवाई केली. ज्या जागी जे सीबीची गरज नाही त्या ठिकाणी दहशत बसविण्यासाठीच जेसीबी लाऊन नियम तुडवून कारवाई केली असा आरोप बहुजन मोर्चा कडून करण्यात आला आहे .
यावेळी अनेक हॉटेलवर कारवाई करण्यात आली मात्र हॉटेलच्या शेड बरोबर त्याठिकाणी ठेवण्यात आलेल्या फ्रीज,कॉम्पुटर,हेही जेसीबी द्वारे तोडण्यात आले. तसेच सीसीडी चौकात टेम्पो वर हि जेसीबी ने कारवाई केली जी वस्तू हलवता येते तिला जप्त करून प्रशासनाच्या ताब्यत घेऊन तिच्यावर कारवाई केली जाते मात्र सिंघम स्टाईल दाखवण्याच्या नादात लोंढे व ढोकळे ह्यांनी जागेवर नियमबाह्य पद्धतीने जे सीबी ने टेम्पो तोडला ,असा आरोप करीत बहुजन मोर्चा कडून लोंढे व ढोकळे ह्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश खडके तसेच ऑड . वाजेद खान यांनी वरिष्ठांनी लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा आम्ही लोंढे व ढोकळे ह्यांच्या विरोधात कोर्टात जाऊ असा इशारा दिला आहे . ह्यावेळी मनसेच्या विशाखा गायकवाड ह्यांनी लोंढे व ढोकळे ह्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली तसेच लवकरात लवकर पाथरी व्यवसायिकांना जागा देण्यात यावी अशी मागणी केली.ह्या नंतर भीमसेने महासंघाचे प्रदीप साठे म्हणाले , कारवाईला कोणाचाही विरोध नाही मात्र नियमबाह्य कारवाईला विरोध आहे नियमाना कचऱ्याची टोपली दाखवून चुकीची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी केली.
विमाननगर भागातील नियमबाह्य कारवाईच्या विरोधात आंदोलनात मान्यवरांनी त्यांच्या मागण्या मांडल्या ढोलेपाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन बहुजन मोर्चा वडगावशेरी अध्यक्ष सोहित बनकर ह्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले ह्यावेळी अड. वाजेद खान, विशाखा गायकवाड,प्रदीप साठे,जितेंद्र भोसले किरण भालेराव,रविराज भोसले,राहुल शिरसाठ,शनीभाई शिंगारे,फिरोज खान,आशिष धोत्रे,सानी छडे, फिरोज शेख,वसीम सय्यद,गफूर शेख,किरण डोळस,रवी औदुत,महादेव वडमरे,शंकुरा शेख,प्रतीक जाधव,समसुद्दीन शेख,राजेश मस्के, नाना मस्के,सचिन चंदनशिवे,प्रसाद जठार, अमोल पवार उपस्थित होते.