Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आयआयएचएम (IIHM) च्या यंग शेफ ऑलिम्पियाड २०२३ चे पुण्यात आयोजन

Date:

गभरांतील तरुण आणि नवोदित शेफ्स चा गौरव करण्यासाठी आयआयएचएम यंग शेफ ऑलिम्पियाड २०२३ चे आयोजन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे आयोजन ~

१९ जानेवारी , पुणे –  आयआयएचएम (इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) च्या यंग शेफ ऑलिम्पियाड (वायसीओ२०२३ तर्फे पुण्यात आज यंग शेफ ऑलिम्पियाडची घोषणा करण्याच्या हेतूने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात होते.  यंग शेफ ऑलिम्पियाड च्या ९ व्या पर्वाचे यजमान पद या वर्षी भारताला मिळाले असून जगभरांतील ६० देशांतून आलेल्या शेफ्स चा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.  या मंचाच्या माध्यमातून जगभरांतील नवोदित शेफ्स ना त्यांची कला सादर करण्याची संधी प्राप्त होणार असून त्याच बरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून खाद्य जगताची सफर घडवण्याचीही संधी त्यांना मिळणार आहे.  इंडिजस्मार्ट ग्रुपचा भाग असलेल्या आयआयएचएम तर्फे आणि इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काऊन्सिलयूके यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. 

स्पर्धेची पहिली फेरी ही दिल्लीबंगलोरपुणेहैद्राबाद आणि गोवा  येथे २ दिवस सुरु असेल.  त्यानंतर सर्व देश हे शहरांची सांस्कृतिक राजधानी असलेल्या कोलकात्या कडे ग्रान्ड फिनाले, प्लेट ट्रॉफी आणि डॉ. बोस चॅलेंज ट्रॉफी साठी प्रयाण करतील. पुण्याच्या पहिल्या फेरीत फ्रान्ससौदी अरेबियाइंग्लंडबोट्सवानाइजिप्पनेदरलँड्सओमानयुगांडाटर्की आणि थायलंड हे देश भाग घेतील. ९ व्या इंटरनॅशनल वायवीओ मध्ये जगभरांतील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कार्यरत असलेले प्रतिथयश शेफ्स परिक्षक म्हणून काम पहाणार आहेत, यामध्ये क्राफ्ट गिल्ड ऑफ शेफ्स,यूके आणि इंग्लंड मधील लंडन येथील रॉयल गार्डन हॉटेल चे माजी एक्झिक्युटिव्ह शेफ स्टीव्ह मुंकली,  भारतातील इंडिगो चे संस्थापक आणि रेस्ट्रॉरेटर,मास्टर शेफ राहूल अकेरकर, इंग्लंड मधील वेस्टमिन्स्टर किंग्जवे कॉलेज च्या कुलिनरी आर्ट्स चे प्रोग्राम ॲन्ड ऑपरेशनल मॅनेजर शेफ पॉल जर्व्हिस, कार्डिफ ॲन्ड वेल कॉलेज चे सिनियर शेफ लेक्चरर जॉन क्रोकेट्ट आणि ई हॉटेलियर अकादमी चे डीन पीटर  जोन्स  यांचा समावेश असून ते पुण्यातील स्पर्धेचे परिक्षण करतील.   

या परिषदेत यंग शेफ ऑलिम्पियाड २०२३ विषयी माहिती देतांना वायसीओ ग्लोबल काऊन्सिल चे चेअरमन आणि इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काऊन्सिललंडन चे चेअरमन तसेच इंडिस्मार्ट ग्रुप चे संस्थापक आणि चीफ मेंटर डॉसुब्रोनो बोस यांनी सांगितले “ वायसीओ हा अनेक देशातील वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतींना एकाच छताखाली आणून खाद्यसवयीतील वैविध्याचा आनंद घेण्यासाठी असलेला अनोखा मंच आहे.  या कार्यक्रमाचा शाश्वतता हा विषय असल्याने तरुणांना या माध्यमातून आंतरराष्ट्रीय  पाककलांना जाणून त्यांची कौशल्ये ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील देशांना दाखवण्याची संधी मिळणार आहेही स्पर्धा म्हणजे तरुणाईमैत्री आणि सर्वसमावेशकता दर्शवण्याचीही संधी आहे.”

एफआयआयएचएमआयआयएचएम पुण्याचे संचालक आणि वायसीओ २०२३ च्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य श्री रुपिंदर सिंग खुरानाआयआयएचएम पुण्याच्या असोसिएट डायरेक्टर आणि वायसीओ २०२३ च्या असिस्टंट ॲडज्युरिकेटर श्रीमती संगीता भट्टाचार्जीआयआयएचएम पुणे च्या फूड प्रॉडक्शन चे एचओडी तसेच वायसीओ २०२३ च्या टेक्निकल जज शेफ होशांग देब्ताकन्सेप्ट हॉस्पिटॅलिटी ग्रुप च्या एफॲन्डबी चे कॉर्पोरेट जनरल मॅनेजर तसेच प्रतिथयश ऑब्झर्व्हर शेफ रितेश सेन इत्यादी मान्यवर  सुध्दा या परिषदेला उपस्थित होते.

स्पर्धेचे स्वरुप:

रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी नवी दिल्ली येथे स्वागत आणि उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला असून सोमवार ३० जानेवारी २०२३ पासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पर्धेची पहिली फेरी ही दोन दिवस दिल्ली, बंगलोर, पुणे, हैद्राबाद आणि गोवा येथे होणार असून त्यानंतर सर्व देश हे शहरांची सांस्कृतिक राजधानी कोलकाता येथे ग्रांण्ड फिनाले, प्लेट ट्रॉफी आणि डॉ. बोस चॅलेंज ट्रॉफी करता प्रयाण करतील.  ४ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्राण्ड फिनाले मध्ये पहिल्या फेरीतील आघाडीचे १० स्पर्धक भाग घेतील.  त्याच बरोबर ११ ते २० वे स्थान पटकावणारे पुढील १० स्पर्धकांची घोषणा  होईल आणि ते शुक्रवार ३ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात येणार्‍या वायसीओ प्लेट ट्रॉफी साठीच्या स्पर्धेत भाग घेतील. उर्वरीत स्पर्धकांना त्यांच्या पाककलेतील कौशल्यांसह स्पर्धा करण्याची अनोखी डॉ. बोस चॅलेंज च्या माध्यमातून प्राप्त होणार आहे.   

युनायटेड वर्ल्ड ऑफ यंग शेफ चे आयोजन १ फेब्रुवारी २०२३ रोजी कोलकाता येथील आयआयएचएम ग्लोबल कॅम्पस येथे संध्याकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान करण्यात येणार असून यावेळी  विशेष रुपाने तयार करण्यात आलेल्या काऊंटर्स वर राष्ट्रीय ध्वजासह परंपरागत वस्तूंसह पदार्थ ठेवण्यात येणार आहेत.  प्रत्येक चमूला तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे १२ सँम्पल्स समोर ठेवायचे आहेत.  हा कार्यक्रम विशेष असून यामध्ये भारतातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करणारे दिग्गज तसेच विशेष निमंत्रित उपस्थित राहणार आहेत,  यामध्ये ॲम्बेसेडर्स आणि हाय कमिशनर्स, मोठे व्यावसायिक, सेलिब्रिटीज, कॉर्पोरेट शेफ्स, एक्झिक्युटिव्ह शेफ्स, माध्यमे आणि इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काऊन्सिल चे सदस्य, वायसीओ परिक्षकांचे मंडळ, सेलिब्रिटी शेफ्स इत्यादी अनेकांचा समावेश आहे.

वायसीओ २०२३ साठी परिक्षक मंडळाचे सदस्य खालील प्रमाणे आहेत

●    परिक्षक मंडळाचे अध्यक्ष- प्रो. डेव्हिड फॉस्केट्ट- एमबीई, सीएमए, एफआयच, बीईडी (ऑनर्स)

●    प्रमुख परिक्षक आणि मार्गदर्शक- आयकॉनिक पद्मश्री शेफ संजीव कपूर

●    प्रमुख परिक्षक- शेफ ब्रायन टर्नर सीबीई, शेफ रेस्ट्रॉरंटर, टिव्ही सेलिब्रिटी शेफ आणि लेखक, रॉयल अकादमी ऑफ कुलिनरी चे अध्यक्ष, सिटी गिल्ड्स ऑफ लंडन इन्स्टिट्यूट चे फेलो, बोक्युस डी ऑर यूके चे अध्यक्ष

●    डेप्युटी चीफ जजेस- शेफ ॲन्ड्रेस मुल्लर, व्हीटीसी हाँगकाँग येथील प्रोग्राम डायरेक्टर (इंटरनॅशनल क्युझिन)

●    शेफ राहूल अकेरकर- मास्टर शेफ, रेस्ट्रॉरंटर आणि भारतातील इंडिगो चे संस्थापक

●    शेफ जॉन वूड –  मिशलिन स्टार शेफ आणि इंग्लंड येथील किचन कट चे संस्थापक

अन्य सिनियर जजेस:

●    शेफ गॅरी मॅक्लीन : कुलिनरी एज्युकेटर, यूके मँचेस्टर द प्रोफेशनल्स च्या मास्टरशेफ चे तसेच स्कॉटलंड येथील नॅशनल शेफ चे विजेते.

●    शेफ स्टी मुंकली : यूकेतील क्राफ्ट गिल्ड ऑफ शेफ्स चे व्हाईस प्रेसिडेंट आणि इंग्लंडच्या लंडनमधील रॉयल गार्डन हॉटेल चे माजी एक्झिक्युटिव्ह शेफ

अन्य सेलिब्रिटी जजेस:

●    शेफ ॲन्टोन एडलमन – शेफ, कुकरी लेखक, लंडन येथील सॅव्हॉय हॉटेल मधील माजी मैत्रे शेफ देस कुझिन

●    शेफ एन्झो ओलिव्हेरी- सिसिलियन शेफ

●    शेफ रणवीर ब्रार- भारतीय सेलिब्रिटी शेफ

●    शेफ अभिजीत साहा – सेलिब्रिटी शेफ आणि लेखक

●    शेफ स्टेफन होगन- माल्टा येथील कॉरोंथिया पॅलेस हॉटेल मधील एक्झिक्युटिव्ह हेड शेफ

●    शेफ स्टीव्हन कार्टर- लंडन येथील जॉर्गन बुडल्स मधील एक्झिक्युटिव्ह शेफ

●    शेफ कार्ल गुग्गनमोस- युनिव्हर्सिटी ऑफ कुलिनरी एज्युकेशन चे माजी डीन, जॉन्सन ॲन्ड वेल्स युनिव्हर्सिटी

●    शेफ हेन्री ब्रोसी- डॉर्चेस्टर चे माजी शेफ आणि फोर सिझन हॉटेल, लंडन येथे कार्यरत असलेले एक्झिक्युटिव्ह शेफ

●    शेफ मारिओ पेरेरा- एक्झिक्युटिव्ह शेफ डोरशेस्टर कलेक्शन, लंडन

●    शेफ गारथ स्ट्रोएबेल- दक्षिण अफ्रिकेतील सेलिब्रेटेड मास्टरशेफ

●    शेफ जॉन विल्यम्स- रिट्झ मधील एक्झिक्युटिव्ह शेफ

●    शेफ साराह हार्नेट्ट- पेस्टरी शेफ आणि चॉकलेटिअर

●    शेफ मंजुनाथ मुरल – सिंगापूर येथील मिशलिन स्टार शेफ

●    शेफ एरिक निओ- ‍सिंगापूर शेफ्स असोसिएशन चे अध्यक्ष आणि एक्झिक्युटिव्ह शेफ

●    शेफ जॉर्गेन लिंध- चीफ फॅकल्टी, विरगिंस्का जिम्नॅसिएट, स्विडर्न आणि शेफ ऑस्कर गुट्टीरेझ- सेलिब्रिटी शेफ, मेक्सिको

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...