कलाकारांची कमाई सुरू व्हावी या साठी आय. सी. सी. आर. चे ‘ कला विश्व’ !

Date:

मुंबई, 18 जुलै 2021

भारतातील परदेशी विद्यार्थ्यांसाठीच्या मासिक सांस्कृतिक कार्यक्रमांबाबतच्या तरतूदीचा लाभ घेऊन आता भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद महाराष्ट्रासह देशांतील अनेक राज्यांमधून भटक्या विमुक्त समाजासह अन्य उपेक्षित वर्गांमधील विखुरलेल्या कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. कला विश्व या नावाने सुरू होत असलेल्या या कार्यक्रम मालिकेचे उद्‌घाटन परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत रविवारी बी. के. सी. परिसरातील विदेश भवनात झाले.

देशभरात 17 कार्यालयाद्वारे आणि आणि शिष्यवृत्ती पुरवून भारतीय सांस्कृतिक संबंध  परिषद जवळपास 1 लाख परदेशी विद्यार्थ्यांची देखभाल करणे तसेच त्यांना भारतीय संस्कृतीशी ओळख करून देणे हे कार्य पार पडते.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद किंवा आय. सी. सी. आर. या संस्थेचे काम मुख्यतः परदेशात भारतीय संस्कृतिची ओळख करून देण्याचे आहे. भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही भारतीय संस्कृती नीट समजून घेता यावी यासाठीही आय. सी. सी. आर. प्रयत्न करीत असते.

वाघ्या मुरळी, गोंधळ, वासुदेव किंवा दशावतार यांसारख्या पारंपारिक कलांची जोपासना करणाऱ्या कलाकारांना  कोरोनाच्या काळामध्ये त्यांची कला सादर करता यावी हा विचार  डोळ्यासमोर ठेवून भारतीय संस्कृती संबंध परिषदेने  कलाविश्व कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

दशावतार, तसेच इतर विविध कालांद्वारे भारताची समृद्ध विविधता तिच्या एकसंधपणाचे एक रूप बनून आपल्या समोर येत असते. देशाच्या 17 केंद्रांमधून दर महिन्याला 2 किंवा 3 कार्यक्रम आभासी पद्धतीने सादर केले जातील. आज मुंबई, पुणे आणि गोवा केंद्राद्वारे या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. ह्यातून एका बाजूला परदेशी विद्यार्थ्यांसमोर आपली कला सादर होईल तर दुसरीकडे उपेक्षित कलाकारांना मदत मिळेल असे आयसीसीआर चे अध्यक्ष आणि शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच युवा आणि क्रीडा विषयावरील संसदीय समितीचे अध्यक्ष  श्री विनय सहस्त्रबुद्धे यावेळी बोलताना  म्हणाले.

कणकवलीला राहणारे आणि ‘दशावतार’ हा पारंपरिक कला प्रकार सादर करणारे ओमप्रकाश चव्हाण यांच्या कार्यक्रमाने या नव्या उपक्रमाची सुरूवात झाली. रविवार दि. 18 रोजी दुपारी हा कार्यक्रम प्रत्यक्ष आणि व्हर्च्यूअल अशा संमिश्र माध्यमातून सादर केला गेला. दशावतार कार्यक्रमाचे बालगंधर्व म्हणवले जाणारे आणि 3 दशकांहून अधिक काळ कला सादर करणारे  ओम प्रकाश चव्हाण यांना आजवर बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे ज्यामध्ये आदित्य बिर्ला कलाकिरण पुरस्कार, पणजी कला अकादमी पुरस्कार आणि इतर पुरस्कारांचा समावेश आहे.आय. सी. सी. आर. च्या पुणे केंद्रातर्फे याच मालिकेअंतर्गत पारंपारिक भारूड सादर करणारे कलाकार लक्ष्मण महाराज राजगुरू तसेच ‘वाघ्या मुरळी कलावंत श्रीकांत शिवाजी रेणके यांची प्रस्तुतिकरणे होणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रम मालिकेचा उद्देश विदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती बद्दलची जाण विकसित करण्याचा असल्याने प्रत्येक कार्यक्रमाचे इंग्रजी समालोचनही त्या सोबत असणार आहे. या कार्यक्रमांचा आय. सी. सी. आर. च्या विभिन्न प्रादेशिक केंद्रांच्या फेसबुक पेज वरून रसिकांना आस्वाद घेता येईल. विनोद पवार आणि इतर मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...