मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोनवरून आदेश देताना व्हिडीओ प्रसारित करण्यावरून , ‘मी पण काम करत होतो,थेट अधिकाऱ्यांना फोन लावत होतो, पण फोन चालू असताना कधी कोणाला कॅमेरा लावायला सांगितला नाही असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे. .दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये ते पंढरपूरच्या वारीतील आजारी वारकऱ्याची चौकशी करताना दिसत आहेत. त्यांच्यावर चांगला उपचार करा, आणि शक्य नसेल तर खासगी मोठ्या रूग्णालयात हलवा मी त्यांचा सगळा खर्च करतो असं ते म्हणताना दिसतात. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ते एका अधिकाऱ्याला फोन लावून पूराची माहिती घेत आहेत. तर सदर अधिकाऱ्याला उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश देताना दिसत आहेत. यानंतर त्यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर दिसत आहेत.यानंतर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, मी पण अधिकाऱ्यांना फोन लावायचो आणि आदेश द्यायचो पण कधी फोन चालू असताना कॅमेरा चालू करायला लावला नाही अशी टीका पवार यांनी केली आहे. कुठलंही काम माझ्याकडे आलं तर मी लगेच फोन करायला लावतो पण लगेच कॅमेरा पण लाव असं कधी म्हणत नाही असं अजित पवार म्हणाले आहेत.
मी पण अधिकाऱ्यांना थेट फोन लावतो , पण त्यावेळी कधी कोणाला माझ्यावर कॅमेरा लाव म्हटले नाही – अजित पवार
Date:

