Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आज विक्रम गोखलेंनी फोडले फटाके -म्हणाले, होय भिक मागूनच मिळालेय स्वातंत्र्य:

Date:

75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला

पुणे-कंगना रणौतच्या विधानावर प्रतिक्रिया देताना विक्रम गोखले म्हणाले, “खरंय, कंगना रणौत जे म्हणालेली आहे, ते की ते भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलेलं गेलं आहे बरं का. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही त्यांनी. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहत आहेत, हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही, असेही लोक केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे मी.”

तसेच, “ज्यांनी बलिदान दिलं त्यांचा हा अवमान नाही का? असं प्रश्न विचारला गेला असता विक्रम गोखले म्हणाले, आहेच, पण हे आपण सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे. आपण म्हणजे कोण आपण सरकार देतो. हा आपला अधिकार आहे. आपण सरकारला जाब विचारलाच पाहिजे, की तुम्ही हे काय करत आहात? मी तर म्हणेण की यापुढे होणार कुठलाही मोठा खर्च त्याबद्दलचं ऑडीट हे जनतेला माहिती असलं पाहिजे, की आम्ही पैसे भरतो आहोत. आम्ही देशातून पैसा चोरून बाहेर स्वीस बँकेत नेवून ठेवत नाही. कर भरतो हा सामान्य माणूस कर भरतोय त्याचा प्रत्येक ठिकाणी हक्क आहे. त्यांनी विचारलं पाहिजे की तुम्ही आमच्या पैशांचं काय करत आहात? कंगनाच्या विधानाशी सहमत आहे, भीक मागूनच मिळालेलं आहे ते. मतपेटीचं राजकारण सुरू झाल्यापासून वादला काही कमी नाही. कुठल्याही अगदी फडतूस कारणावरून वाद निर्माण होतात. यामध्ये सगळे आले, एकही पक्ष असा नाही की जो वादात पडत नाही.” असंही यावेळी विक्रम गोखले यांनी बोलून दाखवलं.

शिवसेना आणि भाजप एकत्र यायला हवे अशी इच्छा व्यक्त करत विक्रम गोखले म्हणाले की, ज्या कारणाने बाळासाहेब यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. हे गणित चुकलेले आहे हे सुधारायचे असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. माझे प्रयत्न चालू आहेत असे गोखले म्हणाले.शिवसेना भाजप पुन्हा एकत्र आले पाहिजे, याबाबत मी पुढाकार घेतला आहे. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा ‘चूक झाली’ असं उत्तर फडणवीसांनी दिलं,” असे गोखले म्हणाले. ”मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विक्रम गोखले म्हणाले, ”कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही, ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे काय चाललंय हे ? माझ्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकर या देशाला कळले नाही, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही,”

लाल बहादूर शास्त्री सोडून मी देशातील सर्व पंतप्रधानांना शंभराच्या खाली मी गुण देतो, पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबर ला येते, ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो.किती वर्षे कारस्थान आहे ? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे,” असे गोखले म्हणाले.

”देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्देव आहे. त्यापूर्वी कोणी नव्हते का? या देशाकरीता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाहीमी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही, नव्हतो आणि नसेन,” असे विक्रम गोखले यांनी स्पष्ट केलं.

आर्यन हिरो नाही, शाहरुख…
यावेळी त्यांनी आर्यन प्रकरणावरही भाष्य केले. मी अत्यंत स्पष्ट सांगतो. शाहरुख खान आणि आर्यन माझे काहीही वाकडे करू शकणार नाही. देशाच्या बॉर्डरवर 21 वर्षाचा जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो असतो. आर्यन हिरो नाही, असे त्यांनी सांगितलं.

महागाई काय पंतप्रधान मोदींनी वाढवली का? असा उलट प्रश्न ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केला आहे. त्यांनी महागाईवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत हा उलट प्रश्न केला आहे.

विक्रम गोखले यांनी महागाईच्या प्रश्नावर म्हटले की, अनेकजण हॉटेलमध्ये जाऊन एकाच वेळी 10 हजार रुपये खर्च करतात. ओपेकमध्ये तेलाचे दर किती झाले हे माहित आहे का? एक माणूस 70 वर्षांची साचलेली घाण साफ करत आहे हे दिसत नाही का, अशा वेळी त्याच्या पाठिशी उभे राहायला हवे. पंतप्रधान मोदी देशासाठी काम करतात तेव्हा पाठिंबा आहे. मात्र, पक्षासाठी करत असतील तर पाठिंबा नाही. असे विधान विक्रम गोखले यांनी केले आहे.

विक्रम गोखले (Vikram Gokhale) म्हणाले, मी एकेकाळी एसटी महामंडळाचा ब्रँड अँबेसिडर होतो. त्यावेळी एसीटवर मी बराच अभ्यास केला.
एसटीच्या एकूण अर्थशास्त्रावरती माझा लेख ही प्रसिद्ध झाला होता.
त्यावर एवढा अभ्यास एसटी महामंडळातील सर्वोच्च अधिकाऱ्यांनीही केलेला नाही, अशा प्रतिक्रिया विद्वान लोकांनी दिल्या होत्या.
एसटीला, एअर इंडियाला (Air India) गाळात घालण्याचे काम राजकीय लोकांनी केलं आहे.
एअर इंडिया जगातील एकमेव एअरलाईन होती जी 60 हजार कोटी रुपयांच्या फायद्यात होती.
ती आता 40 हजार कोटींच्या तोट्यात आहे. याचे कारण फक्त राजकीय लोक (Political people) असल्याचे ते म्हणाले.

गोखले पुढे म्हणाले, एसटी दारोदारी जाणारी आहे, ती काय कुठली ट्रॅव्हल कंपनी नाही.
एसटी रस्त्यात बंद पडली तर दुसरी एसटी मागून ताबडतोब मागवून घेतात.
एसटी महामंडळासारखी 18 हजार बसेसची ताकद आहे का कोणाकडे? जगातील एक नंबरची बस यंत्रणा आहे. या यंत्रणाची राजकारण्यांनी वाट लावली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...