एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित १० व्या जागतिक विज्ञान, धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेच उद्घाटन
पुणे दि. ३ ऑक्टोबर ः” जागतिक शांतता दिवस साजरा करीत असताना दुसरीकडे अनेक देशात युद्धाचे सावट पसरले आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर येऊन जगात शांतता नांदावी. यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालावी लागणार आह.” असे विचार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे आयोजित जगातील सर्वात मोठ्या शांती घुमटात १० व्या जागतिक विज्ञान, धर्मे/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रसंगी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, द पॉवर ऑफ वर्ल्डस फाउंडेशनच्या संस्थापक देबोरा सवाफ, डॉ डीनीस क्वॉर्डा, जैन धर्मगुरू आचार्य लोकेश मुनी, प्रा. रूझान पश्चू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ.मंगेश तु. कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, संसदेचे मुख्य समन्वयक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पाडे उपस्थित होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, ” जागतिक शांततेच्या दिनी इराणहून इस्त्राइलवर २०० मिसाईल डागण्यात आले. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत जागतिक शांतता दिवस कसा साजरा करू शकतो. तसेच उच्च शिक्षणात व्यावसायिक अभ्यासक्रमाला अधिक देण्यात आले आहे. यामध्ये विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणे कठीण झाले आहे. अशवेळेस विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून नवी पिढी घडवू शकतो. अध्यात्म हे अनुभवांकर आधारित असून आत्मिक आणि मानसिक शांतता मिळते. वर्तमान काळात दलाई लामा, नेल्सन मंडेला,य मार्टिन ल्युथर किंग, म.गांधी यांच्याकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे.”
डॉ.विजय भटकर म्हणाले, ” २१ व्या शतकात शांततेने जगू शकू का हा प्रश्न सातत्याने निर्माण झाला आहे. सध्याच्या काळात मशीन आणि मनुष्या अशी जोडी भयानक वाटत आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय झाला. त्यामुळे भविष्यात शांततेबाबत चिंता वाटते. डॉ. कराड यांनी जागतिक संसदेच्या माध्यमातून सुरू केलेले प्रयत्न, नक्कीच शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” जगात शांतता नांदावी ही आता काळाची गरज आहे. जगाची परिस्थितीकडे आपण पाहिल्यास संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, महात्मा गांधी यांचे विचार अंमलात आणावे. आपल्या विचारातून आळंदी, अयोध्या, अजमेर या शहरांना जोडावे लागणार आहे. त्यासाठी आपल्याला वर्ल्ड पीस डोममध्ये सुरू असलेल्या, संसदेचा नक्कीच फायदा होणार आहे. ”
देबोरा सवाफ म्हणाल्या,” शांतता आणि एकात्मिकता प्रस्थापित करणे सर्वांची जवाबदारी आहे. तसेच मुलांना शाळांमधून ’इमोशनल इंटेलिजन्स’ शिकवण्याची गरज आहे. त्याशिवाय आपण प्रगती करू शकणार नाही. संस्कृती, अध्यात्म, विज्ञानाला ’इमोशनल इंटेलिजन्स’, ’इमोशनल कोशंट’ची जोड दिल्यास, आपण उत्कृष्ट युवा पिढी आणि जागतिक नेते नक्कीच घडवू शकू.”
डॉ. डीनीस क्वॉर्डा म्हणाले,” विज्ञान, तंत्रज्ञान, मानवता मूल्ये आणि धर्माच्या माध्यमातून जगात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. युद्धाच्या छायेत जगणारे व्यक्तींना आता तंत्रज्ञान आणि अध्यात्माच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर विचार करावा.”
राहुल कराड म्हणाले,” विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वक्षमता विकसित करायची आहे. यामध्ये शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्याला वाईट प्रवृत्तींकडून चांगल्याकडे जाण्याचा प्रयत्न अशा संसदेतून करायचा आहे.”
या नंतर ज्येष्ठ खासदार डॉ. करण सिंह आणि डॉ. टोड क्रिस्तोफरसन यांनी व्हिडिओया माध्यमातून शांतते संदर्भात विचार मांडले.
डॉ. आर.एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
सूत्रसंचालन डॉ. गौतम बापट यांनी केले.
युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड हवी : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे विचार
हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान तर्फे नंदकुमार सातुर्डेकर व शिरीष महाराज मोरे यांना पुरस्कार जाहीर
पिंपरी, पुणे (दि. ३ ऑक्टोबर २०२४) हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा स्व. प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार शिवशंभो विचार मंचचे प्रांत संयोजक हभप शिरीष महाराज मोरे यांना तर स्व. संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कार पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांना जाहीर झाला आहे.
हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सव व विजयादशमीनिमित्त येत्या रविवारी (दि.६) सायंकाळी पाच वाजता, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पुरस्कार वितरण होणार आहे अशी माहिती हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे सचिव उत्तम दंडीमे व कार्यक्रमाचे संयोजक सुहास पोफळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲड. अश्विनी कुमार उपाध्याय (नवी दिल्ली) यांचे ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ या विषयावर प्रबोधन पर व्याख्यान होईल. प्रमुख पाहुणे म्हणून गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये उपस्थित राहणार आहेत, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल भूषवणार आहेत.
कार्यक्रमासाठी उत्तम दंडीमे, सुहास पोफळे, राजाभाऊ गोलांडे, कैलास बारणे, दत्तात्रय सूर्यवंशी, अतुल आचार्य, कुमार जाधव, नामदेव शिंत्रे विजय गुंजाळ, दिगंबर रिद्धीवाडे, मनोज बोरसे, शिवाजी रेड्डी, मनोज गोबे दिलीप कुलकर्णी, रमेश अर्धाले आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला आहे.
पीएमआरडीएने अनधिकृत बांधकामे करणारांच्यावर पोलिसात नोंदवले गुन्हे : नोटीसचे अनुपालन न करणे भोवले
पुणे / पिंपरी (दि.३) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) मौ. हिंजवडी आणि मांजरी भागातील अनधिकृत बांधकाम धारकावर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. तत्पुर्वी संबंधितांना अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत नोटीस बजावली होती. पण त्या नोटीसचे अनुपालन न केल्याने शेवटी दोघांवर पीएमआरडीएकडून गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.
मंगळवारी (दि.1) हिंजवडी ता. मुळशी येथील स.नं.258/1/3/ह.पै. सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम करणारे श्रीकांत भानुदास नवले (रा. हिंजवडी ता. मुळशी) यांचे विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशन तर मांजरी ता. हवेली येथील सर्व्हे नं.153 पै. मधील अनधिकृत बांधकाम करणारे दिपाली विजय भाडाळे (रा.हडपसर,पुणे) यांचेविरूध्द हडपसर ठाण्यात गुन्हा दाखल केला. संबंधित बांधकामधारकांना पीएमआरडीएकडून वेळोवेळी अनधिकृत बांधकाम थांबविणेसाठी नोटीसद्वारे कळवले होते. पण बांधकामधारक यांनी प्राधिकरणाच्या नोटीसचे अनुपालन न केल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 कलम 54(2) अन्वये हिंजवडी आणि हडपसर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील मालमत्ताधरकांनी परवानगी घेवूनच आपली बांधकामे करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. यासह सुरु असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत. अन्यथा संबंधितांवर उक्त नियमाप्रमाणे कारवाई करणार असल्याचे पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी स्पष्ट केले. सदरचे गुन्हे दाखल करण्याची कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन मस्के, रविंद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता गणेश जाधव, विष्णुदास आवाड यांनी केली.
पहिल्यांदाच नोंदवला या कलमान्वये गुन्हा
सदर तरतुदीच्या अनुषंगाने हिंजवडी व मांजरी येथील अनधिकृत बांधकामधारक अनुक्रमे श्रीकांत नवले आणि दिपाली भाडाळे यांचेवर पहिल्यांदाच या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 नुसार अनधिकृत बांधकाम धारकास अनधिकृत बांधकाम थांबविणेची नोटीस दिल्यानंतर सदर बांधकाम न थांबविलेस तीन वर्षापर्यंतची शिक्षा किंवा पाच हजार रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.
बदलापूरच्या घटनेनंतरही गृहमंत्री ढिम्म:पोलिसांनो तुम्ही तरी जागरूकता दाखवा -प्रशांत जगताप
पुणे- बदलापूरच्या घटनेनंतर देखील ढिम्म बसलेले गृहमंत्री दिसत असले तरी पोलिसांनो तुम्ही तरी जागरूकता दाखवा आणि लैंगिक अत्याचाराविरोधात कठोर पावले उचला असे आवाहन आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी येथे केले आहे. आज पुणे शहरातील कोंढवा येथील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेच्या दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर स्कूल बसच्या ड्रायव्हरनेच लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे.प्रशांत जगताप यांनी वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पतंगे तसेच, विभागाचे पोलीस उपायुक्त श्री. राजा यांची भेट घेऊन या प्रकरणातील दोषींवर जास्तीत जास्त कलमे लावण्यात यावीत तसेच हे दुष्कृत्त करणाऱ्या नराधमांना फाशी व्हावी अशी मागणी केली.तसेच, बदलापूर प्रकरणात ज्याप्रमाणे काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणेकडून झाला तसा प्रकार पुण्यातील घटनेबाबत करू नये अशी विनंती ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली.
जगताप म्हणाले,’राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने या दुर्दैवी घटनेचा निषेध व्यक्त करत नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अशी घटना उघडकीस येणे ही अत्यंत शरमेची बाब आहे .बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतरही सरकारने विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कोणतीही धोरणात्मक भूमिका स्पष्ट न केल्याने अत्याचारांची ही मालिका अजूनही सुरूच आहे.
राहुल गांधी शुक्रवारपासूनदोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर
कोल्हापूर: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार 4 ऑक्टोबर व शनिवार 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.
राहुल गांधी हे 4 व 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे.
5 ऑक्टोबर रोजी खासदार राहुल गांधी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहतील अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.
खासदार राहूल गांधी यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल. 4 ऑक्टोबर सायं.5.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन आणि कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमाकडे प्रस्थान, प्रवासाचा मार्ग : कोल्हापूर विमानतळ – शाहू नाका – शिवाजी विद्यापीठ – कावळा नाका – धैर्यप्रसाद चौक – एस.पी. ऑफीस चौक – भगवा चौक, कसबा बावडा, सायं.6 वाजता – कसबा बावडा येथील समारंभ संपल्यानंतर हॉटेल सयाजीकडे प्रयाण आणि मुक्काम, 05 ऑक्टोबर
दु.1 वाजता – हॉटेल सयाजी येथून राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाकडे प्रस्थान, प्रवासाचा मार्ग : हॉटेल सयाजी – कावळा नाका – दाभोळकर कॉर्नर – व्हिनस कॉर्नर – दसरा चौक – राजर्षि छत्रपती
शाहू महाराज समाधी स्थळ, दु.1.30 वाजता – राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ येथे आगमन व अभिवादन, त्यानंतर संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : राजर्षि छत्रपती शाहू महाराज पॅव्हेलियन, हॉटेल सयाजी, कोल्हापूर , सायं.4 वाजता – हॉटेल सयाजी येथून कोल्हापूर विमानतळकडे प्रयाण असा त्यांचा दौरा कार्यक्रम असेल अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी शासनमान्य ग्रंथालयांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
पुणे दि. ३: भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेचा लाभ घेण्याकरिता २०२४-२५ साठी शासनमान्य ग्रंथालयांनी विहित नमुन्यातीत प्रस्ताव ३० नोव्हेंबरपर्यंत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे.
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी समान व असमान निधी योजना राबवण्यात येते. या योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्यासंदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या http://rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेंतर्गत 25 लाख रुपये निधी देय आहे. समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत.
असमान निधी योजनेअंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. यामध्ये फर्निचर खरेदीसाठी ४ लाख रूपये व इमारत बांधकामासाठी १० ते १५ लाख रुपये अर्थसहाय्य देय आहे.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी २ लाख ५० हजार रूपये, विशेष आधुनिकीकरणासाठी २ लाख रुपये, ५०, ६०, ७५, १००, १२५, १५० अशी महोत्सवी वर्षे साजरे करण्यासाठी ६ लाख २० हजार रूपये, इमारत विस्तारासाठी १० लाख रूपये, राष्ट्रस्तरीय चर्चासत्रासाठी १ लाख ५० हजार, कार्यशाळेसाठी २ लाख ५० हजार, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रमासाठी ३ लाख तर बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय ‘बाल कोपरा’ स्थापन करण्याकरीता ६ लाख ८० हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते.
ग्रंथालयांनी योजनेसाठीचा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सादर करावा, अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी कळविले आहे.
पेट्रोल दरवाढ सहन करणाऱ्या पुणेकरांना सलाम!
काँग्रेसच्या गांधीगिरी आंदोलनाला प्रारंभ-माजी आमदार मोहन जोशी
पुणे – पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या, पेट्रोलची दरवाढ सहन करणाऱ्या पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम या गांधीगिरी आंदोलन सप्ताहाला पहिल्याच दिवशी आज (गुरुवारी) पुणेकरांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
महात्मा गांधी यांनी शांततामय मार्गाने आंदोलन करून ब्रिटिश सरकारला येथून घालविले. आपणही गांधीजींच्या मार्गानेच आंदोलन करून मोदी सरकारला भाग पाडू, असे मोहन जोशी यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले.
गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ३२.५ टक्क्यांनी घसरल्या. परिणामी देशातील पेट्रोल आणि डिझेल च्या किमती लिटरमागे २०ते२५ रूपयांनी कमी व्हायला हव्या होत्या. परन्तु, तसे झाले नाही. तेल कंपन्या आणि मोदी सरकारने देशातील जनतेची सुमारे ३५लाख कोटी रूपयांची लूट केली. त्या लुटीचा जाब जनतेनी मोदी सरकारला विचारायला हवा, असे आंदोलकांसमोर बोलताना रमेश बागवे यांनी सांगितले.
गांधीगिरी आंदोलन सप्ताहाचा प्रारंभ लक्ष्मी रस्त्यावरील कुलकर्णी पेट्रोल पंप येथे सकाळी ११ वाजता करण्यात आला. ‘पेट्रोल दरवाढ सहन करणाऱ्या पुणेकरांना सलाम’, ‘तेल कंपन्या-मोदी सरकार झाले मालामाल, जनता झाली बेहाल’, पेट्रोलची झाली दरवाढ, मोदी सरकार करते ग्राहकांची लूट’ अशा घोषणा लिहीलेले फलक हातात घेऊन कार्यकर्ते उभे राहिले होते. पंपावर येणाऱ्या वाहन चालकांना पेट्रोल चे दर पत्रक आणि एक गुलाबाचे फूल भेट देण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि सप्ताहाचे संयोजक, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, सुनील मलके, रमेश अय्यर, प्रथमेश आबनावे, ॲड.शाबीर खान, सौरभ अमराळे, सुरेश कांबळे, चेतन अगरवाल, स्वाती शिंदे, प्राची दुधाने, मोनिका कलाने, अनिता मकवाना, आयुब पठाण, प्रविण करपे, महेश अराळे, खंडू लोंढै, बाळासाहेब मारणे, किशोर मारणे, समीर गांधी, अनील आहेर, विनोद रणपिसे, रामदास मारणे, डॉ. अनुप बेदी, दत्ता डुरे, गोरख पळसकर, उमेश कांची, अनिकेत सोनवणे, साजीद शेख, सुरेश नांगरे, प्रथमेश लबडे, अक्षय सोनवणे, नरेश धोत्रे, साहील राऊत, चिलेश मोता, दिलीप लोळगे, किरण म्हात्रे, रोहन थोरात, अथर्व सोनार, किशोर वाघेला, राजाभाऊ नखाते, शोभा परभाने, सविता माळवे, ममता नेरळ, आदी आंदोलनात सहभागी झाले होते.पेट्रोल दरवाढीच्या विरोधातील या आंदोलनाला पुणेकरांचा प्रतिसाद मिळाला, विधानसभेच्या आठही मतदारसंघात हे आंदोलन होईल, त्यालाही पुणेकर चांगला प्रतिसाद देतील, असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला.
सवलतीत मिळत आहेत Alexa चा समावेश असलेली ही उपकरणे; तुमचे जीवन करा अधिक स्मार्ट
पुणे-
– 03 October, 2024 : Amazon ने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सुरू केला असून, ग्राहक या संधीचा वापर करून काही उत्तम डील मिळवू शकतात आणि त्यांची घरे अधिक स्मार्ट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकतात. Echo Smart स्पीकर आणि Fire TV उपकरणांवर ५५% सूट मिळविण्यासह सवलतींचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी व सणासुदीची तयारी करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे.
आपले घर स्मार्ट करण्यासाठी सुसंगत डिव्हाइसला Alexa जोडणे आणि इंग्रजी, हिंदी किंवा हिंग्लिशमध्ये व्हॉइस कमांड वापरणे सोपे आहे. या सणासुदीच्या हंगामात Echo Smart Speaker आणि सुसंगत Smart Bulb यांचा समावेश असलेले आकर्षक Alexa Smart Home कॉम्बोज घरी आणून ग्राहक केवळ ₹3,249 पासून त्यांचे स्मार्ट होम सेटअप करण्यास सुरुवात करू शकतात. जर टीव्ही स्ट्रीमिंग अनुभव अधिक जलद आणि उत्कृष्ट बनवायचा असेल, तर ग्राहक त्याचा लाभ घेऊ शकतात. फ्लॅट 56% सूट मिळवत सर्वोत्तम Fire TV Stick फक्त ₹2,199 मध्ये घेऊ शकतात.
Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलच्या दरम्यान Echo आणि Fire TV खरेदीसाठी येथे सर्वोत्तम ऑफर आहेत:
Echo Smart Speaker आणि Alexa Smart Home कॉम्बोवर उत्तम डील्ससह स्मार्ट लिव्हिंगचा पर्याय निवडा:
Amazonचे Alexa असलेले Echo Smart Speaker आणि Echo Show Display दैनंदिन कामांमध्ये सहजपणे सहभागी होतात, ज्यामुळे तुम्हाला गाणी सुरू करणे, सुसंगत स्मार्ट होम अप्लायन्सेस नियंत्रित करणे, रिमायंडर्स आणि अलार्म सेट करणे, माहिती मिळविणे व बरेच काही करणे शक्य आहे, तेही साध्या व्हॉइस कमांडद्वारे. त्यामुळे उत्सवाची तयारी असो किंवा घरी प्रियजनांचे मेजवानी असो, तुमच्या आवाजाने गोष्टी पूर्ण करण्याच्या सोयीचा अनुभव घेण्यासाठी फक्त विचारा, “Alexa, प्ले भजन” किंवा Alexa, दिवाली lights ON कर दो” किंवा Alexa, काजू कतली की recipe बताओ?” .
● वर्षातील सर्वात कमी किंमत – Alexa Smart Home कॉम्बोवर फ्लॅट 37% सूट – Echo Dot (5th Generation) + विप्रो सिंपल सेटअप 9W एलईडी स्मार्ट बल्ब. तेही फक्त ₹४,७४९ मध्ये मिळवा.
● Echo Pop वर फ्लॅट ४१% सूट – फक्त ₹२,९४९ मध्ये मिळवा.
● Alexa Smarth Home कॉम्बोवर फ्लॅट 54% सूट – Echo pop + विप्रो सिंपल सेटअप 9W एलईडी स्मार्ट बल्ब. ते फक्त ₹३,२४९ मध्ये मिळवा.
● वर्षातील सर्वात कमी किंमत – Echo Dot (5th Generation) वर फ्लॅट १९% सूट. ते फक्त ₹४,४४९ मध्ये मिळवा येईल.
● वर्षातील सर्वात कमी किंमत – Echo Show5 (2nd Generation) वर फ्लॅट 55% सूट. ते फक्त ₹३,९९९ मध्ये मिळवा.
● वर्षातील सर्वात कमी किंमत – Echo Shwo 8 (5th Generation) वर फ्लॅट 35% सूट. ते फक्त ₹८,९९९ मध्ये मिळवा.
फायर टीव्ही उपकरणांवर न चुकता येणाऱ्या डीलसह नवीनतम OTT सामग्री प्रवाहित करा:
तुम्ही तुमचा नॉन-स्मार्ट टीव्ही स्मार्ट बनवू इच्छित असाल किंवा तुमच्या स्लो टीव्हीची कार्यक्षमता वाढवू इच्छित असाल, तर ही तुमच्यासाठी एक आदर्श ऑफर आहे! Fire TV Stick सह तुमच्या टीव्हीला स्मार्ट अपग्रेड द्या. सोबत असलेला Alexa व्हॉइस रिमोट तुम्हाला व्हॉइस कमांडसह सामग्री शोधण्यात आणि नेव्हिगेट करण्यात आणि सुसंगत स्मार्ट होम अप्लायन्सेस नियंत्रित करण्यात मदत करतो.
● वर्षातील सर्वात कमी किंमत – फ्लॅट 56% सूट मिळवून Amazon च्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Fire Tv Stcik वर मोठी बचत करा. ते फक्त ₹२,१९९ मध्ये मिळवा.
● वर्षातील सर्वात कमी किंमत – Fire TV Stick Lite वर फ्लॅट 50% सूट. फक्त ₹१,९९९ मध्ये मिळवा.
● वर्षातील सर्वात कमी किंमत – Fire TV Stick 4K वर फ्लॅट 42% सूट. ते फक्त ₹३,९९९ मध्ये मिळवा.
● Fire Tv सह असलेल्या Smart TV वर ५०% पर्यंत सूट.
त्यामुळे Fire TV उपकरणांसह घरातील मनोरंजनाचा अनुभव वाढविणे असो किंवा Echo Smart Speaker सह दैनंदिन कामे सुलभ आणि स्मार्ट बनविणे असो, प्रत्येकासाठी काहीतरी आहे.
ध्यानामुळे माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो – सरश्री
प्रत्येकाने आंतरिक मनापासून ध्यान करायला शिकले पाहिजे – सरश्री
ध्यानाच्या अंतरंगात डुबकी मारून आनंद घेता येतो – सरश्री
पुणे-सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकजण तांत्रिक साधनात स्वतःचा शोध मोबाईल, इंटरनेट, संगणक येथे घेत बसला आहे. याच तांत्रिक साधनात तो अडकल्याने प्रत्येकजण स्वतःला विसरून गेला आहे. स्वतःचा शोध हा स्वतःमध्ये सापडणार आहे. त्यासाठी ध्यान करने अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रख्यात वक्ते आणि लेखक सरश्री यांनी तेजज्ञान फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या ध्यान के गुलिस्तान से सफल इन्सान कैसे बने ‘या कार्यक्रमात केले. हा कार्यक्रम सिंहगड रोड येथील मनन आश्रम येथे पार पडला.
सरश्रींनी ध्यानाचे महत्व अधोरेखित करताना पुढे म्हणाले की, महान शास्त्रज्ञ थॉमस एडिसनने एकाग्रतेने कार्य केल्याने त्यांना विजेचा शोध लावता आला. त्याप्रमाणे प्रत्येकाने आंतरिक मनापासून ध्यान करायला शिकले पाहिजे. ध्यानाच्या अंतरंगात डुबकी मारून आनंद घेता येतो तो आनंद स्थायी स्वरुपात असतो. सर्वसामान्यपणे माणूस डाव्या मेंदूचा अधिक उपयोग करतो परंतु ध्यानामुळे डाव्या आणि उजव्या मेंदूचा समतोल साधून रचनात्मक कार्य करता येते. आणि यामुळे आपल्या कार्यात सुंदरता आणि गुणवत्ता येते.
प्रत्येक व्यक्तीची त्याच्या कामावरून काम करणाऱ्यााची ओळख होते. त्यामुळे गुणवत्तापूर्ण काम महत्वाचे आहे. ध्यानामुळे माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. त्यामुळे तो व्यक्तिगत लोककल्याणाचे कार्य करू शकतो. ती आज काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने आजकालच्या धकाधकीच्या जीवनात रोज ध्यान करने अत्यंत गरजेचे आहे. सदरील कार्यक्रमात ऑनलाईन व ऑफलाईन प्रणालीद्वारे जवळपास दहा हजार पेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते.
श्री महालक्ष्मी मंदिरात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते घटस्थापना
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव
पुणे : माता माता की जय… श्री महालक्ष्मी माता की जय… च्या नामघोषात सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सपत्नीक घटस्थापना केली. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ घटस्थापनेने झाला. यानिमित्ताने मंदिराला आकर्षक सजावटीसह विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे.
घटस्थापनेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आदी उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. घटस्थापनेचे पौरोहित्य मिलिंद राहुरकर यांनी केले.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती व त्यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव’ महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे.
याशिवाय ढोल-ताशा वादनसेवा, पुणे मनपा महिला कर्मचारी सन्मान, नामांकित कंपन्यांमधील महिला एचआर यांचा सन्मान, महिला न्यायाधिशांचा सत्कार, लेखिका-कवयित्री सन्मान, पुणे मनपा स्वच्छता कर्मचारी सत्कार, कन्यापूजन, विविध शाळांतील शिक्षकांद्वारे भोंडला, वीरमाता-वीरपत्नी सन्मान, नारी तू नारायणी सन्मान सोहळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये शिव-पार्वती विवाह सोहळा, कथकली नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटय व पोवाडा सादरीकरण, सामुहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम हे यंदाचे वैशिष्टय आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
श्री देवी चतुःशृंगी मंदिरात घटस्थापना
पुणे-श्री देवी चतुःशृंगी मंदिरात घटस्थापना आज सकाळी 9.00 वाजता घटस्थापना करण्यात आली.
मंदिर व्यवस्थापक देवेंद्र देवदत्त अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. श्रीराम नारायण कानडे गुरूजी यांनी पौरोहित्य केले. अभिषेक, रूद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात आली शंखनाद करण्यात आला. मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.
गो. बं. देगलुकर यांना जीवनगौरव पुरस्कार
मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी
पुणे : मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दि. 8 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. डेक्कन अभिमत महाविद्यालयाचे माजी कुलसचिव गो. बं. देगलुरकर यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. खंडेराव कुलकर्णी (शिक्षकरत्न पुरस्कार), रमेश अंबरखाने (उद्योग रत्न पुरस्कार), प्रदीप नणंदकर, (आदर्श पत्रकारिता पुरस्कार), रमाकांत जोशी (आरोग्यरत्न पुरस्कार), धनंजय गुडसुरकर (साहित्यरत्न पुरस्कार), सुधाकर जाधवर (शिक्षणरत्न पुरस्कार), मंगेश बोरगावकर (संगीतरत्न पुरस्कार), दिनेश वैद्य (औद्योगिक सुरक्षा पुरस्कार), गौतम बनसोडे (उद्योगरत्न पुरस्कार), संदीप पंचवाटकर (कलारत्न पुरस्कार), परमेश्वर पाटील (उद्योगरत्न पुरस्कार) यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती मराठवाडा सेवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिनकर चौधरी, उपाध्यक्ष दिनेश सास्तुरकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पुरस्काराचे वितरण केंद्रीय विमुक्त भटक्या व अर्ध भटक्या जमाती विकास मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री भिकुजी (दादा) इदाते यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेक्कन अभिमत महाविद्यालयाचे माजी कुलसचिव गो. बं. देगलुरकर असणार आहेत. मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
श्री कोटेश्वर देव विश्वस्त मंडळ,सेवा आरोग्य फाऊंडेशन व सेवा भारती यांच्या संयुक्त विद्यमानेनेत्र तपासणी शिबिर संपन्न
पुणे(प्रतिनिधी)-येथील सेवा आरोग्य फाऊंडेशन,सेवा भारती सातारा व श्री कोटेश्वर देव विश्वस्त मंडळ,गोवे यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील गोवे या गावामध्ये नुकतेच नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.
गावातील २६२ घरांशी संपर्क करण्यात आला होता.त्यांची नेत्र तपासणी व विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.१९७ व्यक्तींमध्ये दृष्टी दोष आढळले.८५ जणांना माफक दरामध्ये चष्मे वाटप करण्यात आले.४७ जणांना मोतीबिंदू
आढळल्याने त्यापैकी ४० व्यक्तींचे पुण्यातील संजीवनी रुग्णालयात माफक दरात ऑपरेशन करण्यात आले.
सेवा आरोग्य फाऊंडेशनचे स्वयंसेवक व कार्यकर्ते,सेवा भारती सातारा मंडळ,श्री कोटेश्वर देव विश्वस्त मंडळ,कोटेश्वर शिक्षण प्रसारक मंडळी,रेणुका नेत्रालयचे डॉक्टर्स,सेवक मंडळी,संजीवनी रुग्णालय व तेथील डॉक्टर्स,सेवक यांच्या पुढाकाराने हे नेत्र शिबिर यशस्वी झाले. हे नेत्रशिबिर यशस्वितेसाठी गोवे येथील श्री कोटेश्वर देवस्थान तर्फे आर्थिक मदतही देण्यात आली.
हे शिबिर यशस्वितेसाठी प्रदीप कुंटे, सुधीर जवळेकर,विष्णू आपटे यांनी पुढाकार घेतला.
योगासन स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल ला ९ पदकेअद्विका जाधव २, मेधांश, महिका, सई व सानवीला १-१ सुवर्णपदक
पुणे, दि ३ ऑक्टोबरः जिल्हा परिषद, मुळशी तालुका शालेय क्रीडा योगासन स्पर्धेत १४ ते १७ वर्षाखालील वयोगटातील मुला- मुलींनी सादर केलेली योगासनांची एका पेक्षा एक प्रात्यक्षिके पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी निर्विवादपणे आपले वर्चस्व गाजवत ९ पदके मिळविले. यामध्ये ६ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कास्य पदकांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद, मुळशी तालुका शालेय क्रीडा योगासन स्पर्धा इनडोअर स्टेडीयममध्ये रंगली. या मध्ये जिल्ह्यातील योगापटूंनी सहभाग नोंदविला होता. तसेच १४ वर्षा वयोगटातील खेळाडूंची संख्या मोठी होती. यामध्ये विविध प्रकारच्या अवघड व अति अवघड आसनांचे सादरीकरण करण्यात आले.तसेच हि स्पर्धा पारंपारिक योगासने , रिदमिक व अर्टिस्टिक या तीन प्रकारत पार पडली.
१४ वर्षाखालील मुलांमध्ये मेधांश बहादुर यांनी रिदमिक योगासन प्रकारात सुवर्ण पदक तर मुलींमध्ये अद्विका जाधव ला २ सुवर्ण पदक मिळाले. तसेच ऐशानी बाहेतीला रौप्य तर रेवा भिसे ला कांस्य पदक मिळाले आहेत.
१७ वर्षाखालील मुलींमध्ये महिका पटवर्धनला सुवर्णपदक आणि १९ वर्षाखालील मुलीं मधील स्पर्धेत सई कुलकर्णी हिला १ सुवर्णपदक तर १ कांस्यपदक मिळाले तसेच सानवी अमेसुर हिला १ सुवर्णपदक मिळाले आहे.
या खेळाडूंच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी शुभेच्छा दिल्यात.
ध्रुव ग्लोबल स्कूलचे प्रशिक्षक वैष्णवी आद्रे, प्रगती देशमुख आणि वैष्णव कोरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
कुटुंब व्यवस्था ढासळल्यामुळे भारतीय संस्कृती लोप पावत आहे-पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महेंद्र महाजन यांचे मत
नांदेड सिटीत सासू सून कौटुंबीक जबाबदारी स्नेह मिलन कार्यक्रम
जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा आणि सत्र न्यायालय पुणे आणि भारतीय स्त्रीशक्ती , नांदेड सिटीच्या वतीने ‘महिलांचे हक्क- मध्यस्थ केंद्रांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र
पुणे : पूर्वी ‘ उत्तम कुटुंब व्यवस्था’ ही जागतिक स्तरावर भारताची ओळख होती, परंतु बदलत्या परिस्थितीमुळे कुटुंबे छोटी होत आहेत,त्याचे परिणाम मुलांवर संस्कार होण्यावर होत आहेत. कुटुंब व्यवस्था टिकली तरच खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती टिकू शकेल. परंतु वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे निर्माण होणारे कलह यामुळे कुटुंब व्यवस्था ढासळत असून त्यामुळे एक प्रकारे भारतीय संस्कृती लोप पावत असल्याची खंत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी व्यक्त केली.
नांदेड सिटी मध्ये सासू सून संमेलन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या चर्चा सत्रामध्ये महेंद्र महाजन बोलत होते.जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा आणि सत्र न्यायालय पुणे आणि भारतीय स्त्रीशक्ती , नांदेड सिटीच्या वतीने ‘महिलांचे हक्क- मध्यस्थ केंद्रांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.न्यायाधीश योगेश कोईनकर, भरोसा सेल पुणेच्या अनुराधा पाटील, न्यायाधीश सोनल पाटील, डॉ. अशोक वाकोडकर, अर्चना कौलगुड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
न्यायमूर्ती महेंद्र महाजन म्हणाले, समाज जरी पुढारलेला असला तरीही महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार थांबलेले नाहीत. आज फक्त त्या अन्याय आणि अत्याचारांचे स्वरूप बदलले आहे. या संदर्भात महिला जरी सुशिक्षित झाल्या असल्या, तरी त्या पूर्णतः आपल्या अत्याचाराबद्दल बोलत नाहीत, त्यामुळे त्याचे अधिक वाईट परिणाम होतात. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महिलांनी कायद्याबाबत अधिक जागरूक असले पाहिजे, असेही ते म्हणाले.
सोनल पाटील म्हणाल्या, महिलांच्या हक्काचे संरक्षण करणारे अनेक कायदे आज तयार झालेले आहेत ,अशा कायद्याची ओळख महिला वर्गाला व्हावी याकरताच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे .जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गतच मध्यस्थ केंद्र असून यामध्ये दोन्ही पक्षकारांना योग्य तो न्याय दिला जातो आणि नव्वद दिवसाच्या आत हे प्रकरण संपुष्टात येते.
त्यामुळे पक्षकारांच्या पैशाचा आणि वेळेचा अपव्यय होत नाही आणि मुख्य म्हणजे मनस्तापही होत नाही. समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून देखील आज शेकडो प्रकरणांचा निपटारा होत आहे. अशा या विविध योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
अनुराधा पाटील म्हणाल्या, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये अनेकदा महिलाच कारणीभूत असल्याचे दिसून येते. याचे मूळ कारण चुकीचा अहंभाव आणि आपल्या हातामध्ये असलेल्या सत्तेचा गैरवापर हे आहे. जर महिलांनी महिलांबद्दलच असणारे गैरसमज दूर केले तर कुटुंब व्यवस्था टिकून राहण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकेल.
योगेश कोईनकर म्हणाले, आज महिलांनी पारंपारिक शिक्षण घेऊन नोकरी करणे पुरेसे नाही तर त्यांनी आपल्या स्वसंरक्षणार्थ कायद्याचे ज्ञान घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या महिलांना कायद्याचे ज्ञान आहे, त्याच महिला खऱ्या अर्थाने सुरक्षित आहेत, अशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. कुटुंब कलह वाढण्यामध्ये नकारात्मक माध्यमांचाही मोठा वाटा आहे त्यामुळे माध्यमांचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होऊ नये यासाठीही आपण प्रयत्न केले पाहिजेत.
समुपदेशक प्रशांत लोणकर, भारतीय स्त्री शक्ती जागरण, पुणेच्या अध्यक्षा संध्या देशपांडे, शिवाय वैजयंती ढवळे, मेधा वैशंपायन, सुवर्णा चोरगे, प्रज्ञा अग्निहोत्री यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. मुग्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.अशोक वाकोडकर यांनी प्रास्ताविक केले. अर्चना कौलगुड यांनी भारतीय स्त्री शक्ती या संस्थेची व कार्याची माहिती दिली आणि आभार मानले. कार्यक्रमास नांदेड सिटी मधील जवळजवळ साडेतीनशे महिला उपस्थित होत्या.
नांदेड सिटी तील सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ पत्रकार प्रकाश गोरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांचा सन्मान केला. भरोसा सेल पोलीस विभाग प्रमुख अनुराधा पाटील यांचा सन्मान नांदेड सिटीचे प्रमुख विश्वस्त समीर जाधवराव यांनी केला. सोनल पाटील यांचा सन्मान अर्चना कौलगुड यांनी केला तर न्या.योगेश कोईनकर यांचा सन्मान स्वानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर काळकर यांनी केला कौन्सिलर प्रशांत लोणकर यांचा सन्मान उद्योजक रवी कल्याणी यांनी केला.
