Home Blog Page 650

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जनता बँकेचा अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारोह शनिवारी


पुणे : जनता सहकारी बैंक लि., पुणे या बँकेची स्थापना १८ ऑक्टोबर १९४९ रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर रा.स्व. संघाच्या प्रेरणेतून आणि श्रध्येय मोरोपंत पिंगळे यांच्या संकल्पनेतून झाली. बँकेचे हे ७५ वे वर्ष असून अमृत महोत्सवी वर्ष असून अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभ, शनिवार, दि. २२ फेब्रुवारी, २०२५  दुपारी ०२.०० वाजता स्व. विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह, माळवाडी, हडपसरयेथे आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितभाई शहा असणार आहेत, अशी माहिती बँकेचे  अध्यक्ष रवींद्र हेजीब यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पत्रकार परिषदेला बँकेच्या उपाध्यक्ष अलका पेटकर, संचालक मकरंद अभ्यंकर, मंदार फाटक, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप, उपमहाव्यवस्थापक निलेश देशपांडे आदी उपस्थित होते. 
सांगता समारोह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. 
अमृत महोत्सवी शुभारंभ कार्यक्रम दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र‌ फडणवीस, उच्च तंत्रज्ञान व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व सज्जनगड पूज्यनीय भुषण स्वामीजी यांच्या उपस्थित संपन्न झाला होता. 

महाराष्ट्रातील १३ जिल्हे व गुजरात मधील जिल्हा येथे आजमितीस बँकेच्या एकूण ७१ शाखा व २ विस्तारीत कक्ष कार्यरत आहेत. बँकेच्या एकूण ठेवी रु. ९६२६ कोटी व कर्जे रु. ५६६४ कोटी एवढी असून एकूण मिश्र व्यवसाय १५,२९० कोटी एवढ़ा झालेला आहे. बँकेचा सीआरएआर १४.२७% एवढा आहे तसेच अग्रक्रम व दुर्बल क्षेत्रातील कर्ज पुरवठा अनुक्रमे ६६.८८% व ७.०४% एवढा आहे.

बँकेच्या संचालक मंडळावर १७ संचालक असून त्यामध्ये चार्टर्ड अकाऊंटंट, निवृत्त बैंकर, कायदेतज्ञ, शेती, सहकार इ. विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. संचालक मंडळात ९४% पेक्षा जास्त प्रोफेशनल डायरेक्टर्स कार्यरत आहेत. नागरी सहकारी बँक क्षेत्रात १९७८ साली बँकेने देशात सर्वप्रथम रत्नागिरी अर्बन कॉ. ऑपरेटीव्ह बँक या नागरी बँकेचे विलीनीकरण करून रत्नागिरी जिल्ह्यातील ठेवीदारांचा सहकारी बँकिंग वरील विश्वास कायम ठेवण्यात यश मिळवले, यानंतर बँकेने अनेक बँकांचे विलीनीकरण समाधानकारकरित्या पूर्ण केले.

सन १९८८ मध्ये रु. १०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करून बँकेला शेड्युल्ड दर्जा प्राप्त झाला. संपूर्ण देशामध्ये नागरी सहकारी बँक म्हणून सन १९९८ पासून डीपॉजीटरी सेवा देण्यास सर्व प्रथम प्रारंभकेला. आजमितीस सीडीएसल आणि एनएसडीएल या दोन्ही डीपी संदर्भात डीपॉजीटरी सेवा बँक देत आहे. बँकेने सन २००३ पासून स्वतःचे अद्‌यावत डेटा सैंटर सुरु केले आहे. त्यास आय.एस.ओ. २००१ व २५००१ ही मानांकने प्राप्त केलेली आहेत.
त्यांनतर सन २०१२ मध्ये बँकेने गुजरात राज्याच्या साबरकांठा जिल्ह्‌यातील खेडब्रम्हा नागरी सहकारी बँकेचे विलीनीकरण करून जनता बँकेने मल्टीस्टेट बँकेचा दर्जा प्राप्त केला. पारंपारिक बैंकिंग सेवांबरोबरच बैंक सर्व प्रकारच्या टेक्नो बेस सव्हींसेस ग्राहकांना देत आहे. यामध्ये इंटरनेट बैंकिंग, मोबाईल बैंकिंग, भौम जेट पे, डी-मॅट, मुच्युअल फंड, ट्रेजरी, डीजीटल बँकिंग, विदेश विनिमय व्यवहार, इन्शुरन्स सेवा, अटल पेन्शन योजना व प्रधान मंत्री सुरक्षा व जीवनज्योती विमा योजना इ. विविध सरकारी योजना सेवांचा समावेश आहे.

सध्याच्या परिस्थितीत जनता बँकेच्या एकूण व्यवहारापैकी ५०% व्यवहार है डिजीटल व्यवहारातून होत आहेत. बँकेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात, अर्थमंत्रालय‌द्वारा अटल पेन्शन योजना अंतर्गत संपूर्ण भारतात (in Urban Co-operative Bank Category) सर्वाधिक खाते उघडण्यासाठी बँकेच्या CEO ना वित्त मंत्रालयाने जनता बँकेला केंद्र सरकारच्या पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅन्ड डेवलपमेंट ऑथोरिटी (PFRDA) द्वारे उत्कृष्ट नेतृत्वाचा (Excellent Leadership) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आणि त्यासोबतच, जजता मध्ये Beat the Best and Be the Best पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच जनता बँकेला CIBIL (क्रेडीट इन्फोर्मेशन कंपनी) कडून सर्वोत्कृष्ट डेटा गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

बँकेच्या भविष्यकालीन पथ मार्गक्रमणामध्ये मुख्यता AI चा उपयोग करून तंत्रज्ञानाची सुधारणा करणे, वित्तीय सामावेशनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या “हर घर विकास” या स्वप्नाचा साकार होण्यात योगदान देणे, अप्रयुक्त बैंकिंग क्षेत्रांमध्ये बँकिंग सेवा उपलब्ध करणे, सुलभ बैंकिंग, सामाजिक जबाबदारीची भावना जपून, तसेच उच्चत्तम पारदर्शकता आणि उत्कृष्ट व्यावसायिक वाढ सुनिश्चित करणे याचा समावेश आहे.

“आपली पीएमपीएमएल” या मोबाईल अॅपच्या बनावट अॅप पासूनसावध रहाः पीएमपीएमएल चे प्रवाशांना आवाहन

पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या “Apli PMPML” या मोबाईल अॅपच्या बनावट अॅप ची जाहिरात यु-
ट्युब वरील काही चॅनल्स, टेलिग्राम, फेसबुक, इन्स्टा या समाजमाध्यमांवर काही अपप्रवृत्तीच्या व्यक्तींकडून
पीएमपीएमएल प्रवाशांची दिशाभूल व आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केला जात आहे.त्यांच्या पासून प्रवाशांनी सावध राहावे असे आवाहन PMPMLने केले आहे. या संदर्भात PMPML असे सांगितले कि,’ “Apli PMPML” या मोबाईल
अॅपच्या बनावट अॅप ची जाहिरात करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरूद्ध पोलीस प्रशासनाच्या सायबर सिक्युरिटी सेल
विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. सायबर सिक्युरिटी सेल व पीएमपीएमएल ची तांत्रिक विश्लेषण टीम
बनावट अॅपच्या जाहिरातींवर बारीक लक्ष ठेवत असून यामध्ये दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर आय.टी. अॅक्टनुसार कडक
कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.यु-ट्युब, टेलिग्राम, फेसबुक, इन्स्टा या समाजमाध्यमांवर बनावट अॅप ची जाहिरात करणाऱ्या अपप्रवृत्तीच्या
व्यक्ती, आम्ही तुम्हाला “Apli PMPML” चे बनावट अॅप देतो त्यावरून तुम्ही पैसे न देता पास काढू शकता अशा
भूलथापा देवून बनावट अॅप ची विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे पीएमपीएमएल प्रवाशांची आर्थिक
फसवणूक होण्याची शक्यता आहे. तरी प्रवाशी नागरिकांनी समाजमाध्यमांवरील “Apli PMPML” या मोबाईल
अॅपच्या बनावट अॅपच्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.
तसेच पीएमपीएमएल चे बनावट अॅप वापरताना कोणी आढळल्यास अशा व्यक्तींविरूद्ध देखील कडक कायदेशीर
कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.

भाषिक नाट्य महोत्सवांची गरज – दिग्दर्शक वामन केंद्रे

१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात

पुणे-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. दीप प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नतमस्तक होत या महोत्सवाचा शुभारंभ झाल्याची  घोषणा करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक.वामन केंद्रे, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांसोबत नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे तसेच कार्यकारिणी सदस्य आणि नियामक मंडळ सदस्य उपस्थित होती. नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे, शशी प्रभू यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देत सन्मान करण्यात आला.‘मराठी व्यतिरिक्त इतर भाषेत वावर असणारे दिग्दर्शक वामन केंद्रे, अभिनेते मोहन आगाशे,अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांसारख्या मान्यवरांचा वावर या नाट्य महोत्सवात असणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी यावेळी सांगितले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून त्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, असा आशावाद अजित भुरे यांनी व्यक्त केला. 

‘या नाट्यमहोत्सवाचा भाग होता आल्याचा आनंद नक्कीच आहे. मराठी नाटकाशी असलेल्या नात्याचा मला अभिमान आहेच. इतरत्र काम करताना मराठी नाटकाच्या समृद्ध वारसाकडे आदराने पहिले जाते तेव्हा मन खऱ्या अर्थाने सुखावते, अशी भावना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली. मंचावर असलेली मान्यवर मंडळी प्रेरणास्त्रोत आहेत, त्यांच्यासोबत आज मला येथे उपस्थित राहायला मिळतंय हे खरंच भारावून टाकणार आहे. मी यापुढेही कायम रंगभूमीची सेवा करत राहणार, असं प्रतिपादनही सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी केलं.

याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे म्हणाले की, ‘आज एवढ्या वर्षानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या प्रयत्नांमुळे मराठी भाषेव्यतिरिक्त एवढा मोठ्या नाट्यमहोत्सवाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले हे खरंच कौतुकास्पद आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आपल्या ध्येयाच्या दिशने ज्या पद्धतीने एक एक पाऊल पुढे टाकते आहे, त्यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजॆ. जग झपाट्याने बदलत चाललं आहे  त्यासाठी नाटकाच्या माध्यमातून मराठीच्या बाहेर जाऊन बघण्याचा प्रयत्न तितक्या गांभीर्याने आजवर झाला नाही. वेगवेगळ्या भाषेच्या नाटकाच्या माध्यमातून दृष्टिकोन बदलण्याची सुरवात करता येऊ शकते. त्यासाठी अशा नाट्यमहोत्सवाची अत्यंत गरज होती, ही सुरुवात आहे. संघटनेत वेगवेगळ्या विचारधारेची माणसं एकत्र आली की  बदल घडायला  सुरुवात होते.  हे बदल आज एवढ्या वर्षाने प्रकर्षाने दिसू लागले आहेत त्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित होणाऱ्या प्रत्येक उपक्रमाचं कौतुक झालं पाहिजे.

कार्यक्रमाच्या अखेरीस नाट्य परिषदेचे सहकार्यवाह दिलीप कोरके यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि रसिकांचे आभार मानले. अक्षरिक (बंगला) अनीक  थिएटर, कोलकता या नाटकाने या महोत्सवाची सुरुवात झाली. २० फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत भारतीय भाषांमधील हा नाट्य महोत्सव यशवंत नाट्य मंदिर, जयश्री आणि जयंत साळगांवकर प्रायोगिक रंगमंच, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह  या ठिकाणी रंगणार आहे. बंगाली, तामिळ, इंग्रजी, मराठी अशा वेगवगळ्या भाषांमधल्या नाटकांचं सादरीकरण या विशेष नाट्य महोत्सवात होणार आहे.

मुंढव्यातील महात्मा फुले चौकात उड्डाण पुलासाठी तरतूद करा …आयुक्तांना साकडे

पुणे-महात्मा फुले चौक, मुंढवा येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पूर्णतः तरतूद करावी अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे,तसेच समीर तुपे,दिलीप व्यवहारे,गिरीष गायकवाड यांनी केली आहे.
महात्मा फुले चौक, मुंढवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सतत वाहतूक कोंडी होत असते. यामुळे वारंवार अपघात होउन शेकडो लोक जखमी झाले, आणि अनेक लोक मुत्युमुखी पडले आहेत. तसेच सदर महात्मा फुले चौक, मुंढवा येथून १०० मी अंतरावर लोणकर माध्यमिक विद्यालय व १५० मी अंतरावर राजर्षी शाहू महाराज विद्यालय आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला तेथील विद्यार्थ्यांना महात्मा फुले चौक पार करण्यासाठी जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. पालकही मुले घरी येईपर्यंत तणावाखाली असतात. त्याचप्रमाणे केशवनगर मधील रहिवाशी किंवा खराडी येथील रहिवासी यांची अडचण तसेच नगर रोडवरील वाहतूक सोलापूर रोडकडे जाण्यासाठी याच चौकामधून जात असल्याने येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यांना अर्धा तास महात्मा फुले चौकातील सिग्नलला थांबणे अनिवार्य आहे.यासर्व समस्यांवर उपाय म्हणजे याठिकाणी वाहनांसाठी उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. तसेच पादचाऱ्यांसाठी व्यवस्थित रित्या मार्गक्रमण होण्यास तशी सोय यामधे उपलब्ध असणे अतिशय गरजेचे आहे. महापालिकेच्या सन 2025 -26 च्या अंदाजपत्रकामधे जनतेच्या आग्रहास्तव तरतूद करण्यात यावी. अशी मागणी करीत आहोत. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतून पुणे महानगरपालिकेला वेळेवर मिळकतकर भरणार्‍या नागरिकांची सुटका करावी हि विनंती. अन्यथा वर्षानुवर्ष त्रास सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसेल याची नोंद घ्यावी.

ओवी, अभंग, आर्या आणि तरुणाईचे रॅप.. महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये सुरू आहे मराठी साहित्ययात्री संमेलन

0


महादजी शिंदे एक्सप्रेसमधून (पुणे ते दिल्ली साहित्ययात्रा) : संत ज्ञानेश्वर महाराज यांची ओवी, संत तुकाराम महाराज यांचे अभंग, मोरोपंतांची आर्या, आणि तरुणाईची आधुनिक मराठी गीते, मराठी रॅप अशा विविधांगी कार्यक्रमांनी महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये उल्हासित वातावरण आहे.
98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निघालेल्या पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून संमेलनाचा आजचा दुसरा दिवस आहे.
देवा चांगभलं रं…, जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीतापासून गण, गवळण, अभंग, भक्तीगीते, भावगीते, लावणी, हिंदी चित्रपट गीते आणि अगदी मंगलाष्टकांपर्यंत विविध प्रकारांचे सादरीकरण सुरू आहेे. मोठ्या उत्साहात साहित्यिक आणि साहित्य रसिक या फिरत्या चाकांवरील संमेलनात सहभागी झाले आहेत. साहित्य संमेलनात महाराष्ट्र आणि साहित्य या संदर्भात घ्यायच्या प्रश्नमंजुषेची तयारी देखील उत्साहात सुरू आहेत.
ओळख अहिल्याबाईंची..
साताऱ्याहून खास संमेलनासाठी आलेल्या जयश्री माजगावकर यांनी अहिल्याबाई होळकर यांची वेशभूषा साकारली आहे. येणाऱ्या पिढीला अहिल्याबाईं होळकर यांच्या कार्याची ओळख व्हावी या उद्देशाने ही वेशभूषा साकारली असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेत साहित्यिक आणि साहित्य रसिक विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करत आहेत; ज्यामुळे प्रवास सुकर होत असल्याची भावना प्रवासी व्यक्त करीत आहेत.
हवामानाचा ठोसा
अंघोळीची गोळी आणि खिळे मुक्त झाडे या अभियानाचे प्रमुख माधव पाटील यांच्या ‌‘हवामानाचा ठोसा‌’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण विविध साहित्यिक आणि रसिकांच्या हस्ते या प्रवासात करण्यात येत आहे. हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी आपण छोट्या-छोट्या कृती स्वत: करून सुधारणा करू शकतो या भावनेने हवामान बदलावर करता येणारे उपाय या विषयी ‌‘हवामानाचा ठोसा‌’ हा उपक्रम राबविला जात असल्याचे माधव पाटील यांनी यावेळी सांगितले.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा…
महादजी शिंदे एक्स्प्रेसमध्ये नव साहित्यिकांचा उत्साह आणि ज्येष्ठ साहित्यिकांचे अनुभवविश्व यांचा सुरेख मेळ साधला गेला आहे. चारोळी ते कीर्तन आणि अभिजात ते संस्कृतीरक्षण अशा विविध विषयांना हात घालत होता. फिरत्या चाकांवरचे संमेलन दिल्लीच्या दिशेने पुढे चालले आहे. 16 डब्यांच्या रेल्वेत प्रत्येक डब्यात छोट्या-मोठ्या समुहांद्वारे स्वतंत्र उपक्रम सुरू आहेत. पुण्याच्या अनुबंध प्रकाशनच्या अस्मिता कुलकण, साहित्य प्रेमी भार्गवी कुलकण, डॉ. हनुमंत जाधवर, वसंतराव जाधवर आदींनी स्वरचित कवितांची मैफल रंगविली. औदुंबर येथील 8-9 भावंडांच्या जोशी कुटुंबांचे सदानंद साहित्य मंडळ प्रकाशन संस्थेत कार्यरत आहे. त्यातील चार-पाच भावंडांनी सहकुटुंब या संमेलनाच्या प्रवासात सहभाग घेत कथा-कथन, कविता वाचन आदींचा जागर केला आहे.
लोगो साकारणारे प्रसाद गवळी यांचा कुटुंबियांसह संमेलनात
लोणी काळभोरहून निघालेल्या प्रसाद गवळी यांनी साहित्य संमेलनाचा लोगो डिझाईन केला आहे. त्यांचा विशेष सन्मान या संमेलनाच्या निमित्ताने होणार आहे. हा सन्मान स्वीकारायला गवळी यांच्या कुटुंबियांसह त्यांचे 14 महिन्यांंचे बाळही आहे. तबला-पेटीच्या संगतीने वामनदादा कर्डकांच्या पोवाड्यापासून अगदी हिंदी चित्रपट गीतांच्या गाण्यांपर्यंत येऊन रंगतो आहे. महाराष्ट्राच्या विविध गावातून सहभागी झालेल्यांमध्ये लेखक, प्रकाशकांसह, युवा साहित्य प्रेमींचा उत्साह दांडगा आहे.
उत्साह आणि उत्सुकता
दिल्लीतील संमेलनाच्या उद्घाटन सत्रात नृत्य सादरीकरणासाठी पुण्याच्या मराठी भाषा संवर्धन समुहाच्या 18 ते 22 वर्षे वयोगटातील 30 मुलांचा सहभाग आहे. त्यांनाही सादरीकरणाची उत्सुकता आणि उत्साह असल्याचे जाणवले. नाशिकच्या ‌‘गोदावरी‌’ समुहाच्या पाचवी ते आठवीतील आठ मुली नृत्य सादरीकरणासाठी रेल्वेमध्येच हातांवर मेहंदीची नक्षी काढण्याचा गर्क आहेत.
सोयी-सुविधांबाबत संजय नहार यांच्याविषयी कृतज्ञता
महादजी शिंदे रेल्वेने पुणे ते दिल्ली प्रवास करणाऱ्या साहित्यिकांनी व साहित्य रसिकांनी रेल्वेत ठेवलेल्या बडदास्तीविषयी समाधान व्यक्त केले आहे. संमेलनाचे आयोजन सरहदचे संस्थेचे संजय नहार आणि त्यांच्या सर्व मदतनीसांची सर्वांनीच मुक्तकंठाने स्तुती करत त्यांच्या विशेषी कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.

माणिकराव कोकाटे व धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा: हर्षवर्धन सपकाळ.

मुंबई, दि. २० फेब्रुवारी २५
भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार करताना सर्व मर्यादा सोडल्याचे उघड झाले आहे. आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

संदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना केलेल्या घोटाळ्याचा दररोज पर्दाफाश होत आहे. मुंडे यांच्या भ्रष्ट कारभाराने महाराष्टाच्या नावाला कलंक लागला आहे. आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. यातून काही बोध घेऊन तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंना बरखास्त करायला हवे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची धमक नाही.

भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्टाचार करुन जनतेच्या पैशाची लुट करत आहे. एकीकडे राज्यातील शेतकरी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या करत असताना राज्यातील मंत्री मात्र कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही. मुंडे व कोकोटे हे दोन्ही मंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत पण उपमुख्यमंत्री अजित पवार या भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी हिम्मत दाखवून भ्रष्ट मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना एका बोगस प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा झाली होती तेव्हा वायुवेगाने चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द केली व घर काढून घेतले होते त्याच वेगाने कोकाटे यांच्यावर कारवाई कधी होणार असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

आता न्यायालयाऐवजी रस्त्यावरची लढाई लढू ; आमदार सतेज पाटील…

कोल्हापूर-शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून, हा महामार्ग रद्द व्हावा या मागणी करिता12 मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केलं. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकित ते बोलत होते..

शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाली. यावेळी बोलताना त्यांनी, शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
राज्यात सत्तेत असणाऱ्या लोकांना कोल्हापूरची मोठी धास्ती होती, म्हणून कोल्हापुर पूर्ता महामार्ग रद्दचा निर्णय सत्तेतील काही मंत्र्यांनी जाहीर केला. मात्र याला कायदेशीर आधार नाही. सरकार मध्ये राहायचं, आणि त्यांच्याच मंत्र्यांनी आणि आमदारानी
वेगवेगळी स्टेटमेंट करायचं हे सरकारच षडयंत्र असल्याची टिकाही आमदार सतेज पाटील यांनी केली.
गोव्याकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्या असताना सुद्धा शक्तीपिठ का लादला जातं आहे.. 86 हजार कोटीचा हा प्रकल्प असल्याचं सांगण्यात येत आहे. एवढी मोठी रक्कम पाहता
एका किलो मीटरला, 110 कोटींचा खर्च येणार आहे…शक्तिपीठ मध्ये कोण फित्तुर होऊ नये यासाठी काळजी घेऊया..न्यायालयात जाण्याऐवजी ही लढाई रस्त्यावर करुया.. असंही त्यांनी सांगितलं. येणाऱ्या अधिवेशनात महाविकास आघाडी म्हणुन आम्ही सर्व जण ताकतीने प्रश्न मांडू.. आपापल्या जिल्हयातील आमदारांचे शक्तीविरोधाबाबत पत्र घ्या. शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा हा प्रकल्प असुन अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात 12 मार्चला
भव्य मोर्चा काढण्याचही आम. सतेज पाटील यांनी जाहिर केल. शेतकऱ्यांची ताकत सरकारला दाखऊन देऊ.. मोठया संख्येने या मोर्चात सहभागी व्हा. असं आवाहनही त्यांनी केलं.
ठाकरे गटाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी, शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्याच्या भावना तीव्र आहेत. आता या लढ्याला कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे.
कोणत्याही अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत राज्य, महायुती सरकारला चालवायचं होतं. मात्र शेतकऱ्यावर अन्याय सुरू आहे. हे सरकार गोरगरीब लोकांना मदत करणारे नाही. कधीही पोट न भरलेली, माणस मंत्री मंडळात आहेत. त्यांना सर्व सामान्यांशी देणंघेणं नाही. अशी टिकाही त्यांनी केली.शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी, सामाजिक न्यायासाठी कोल्हापूर भूमी ओळखले जाते..शक्तीपीठालां होणारा विरोध पाहून सत्ताधिस हादरले आहेत.
राज्यातील दहा जिल्हातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे.एकाही आमदार बरोबर बैठक झाले नसताना बैठक झाल्याचे मुख्यमंत्री खोटे सांगत असून शेतकर्यांचे शेतजमिनी काढून घेण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप केला. भाजपचे कोण कंत्राटदार आहेत त्यांच्या नावा निशी त्यांचा भांडा फोड करण्याचा इशाराही गिरीश फोंडे यांनी दिला. लातूर जिल्हयातील गजेंद्र यळकर यांनी, शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या जात आहेत. नदीजोड सारखे प्रकल्प द्या बागायती जमिनीवर आरक्षण टाकणारे प्रकल्प नको. अशी मागणी केली.
सोलापूर येथील शेतकरी विजयकुमार पाटील यांनी, कोल्हापूर जिल्हा सोडुन इतर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध नसल्याच भासवण्यात येत आहे. मात्र सोलापूर जिल्हातूनही आमचा शक्ती पिठाला विरोध आहे. त्यामुळं सरकारनं दिशाभूल करू नये. असं सांगीतल.
आमच्या जमिनी आमदारांच्या बापाच्या आहेत काय. असा परखड सवालही त्यांनी केला..परभणी येथिल शेतकरी शांतिभूषण कचवे यांनी, शक्तिपीठ लादू नका अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल. असा इशारा दिला. सांगली येथिल घनशाम नलवडे यांनी, शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हा महामार्ग असल्याचं सांगितलं.हिंगोली येथिल सूरज माळवाड यांनी, देखिल हिंगोली जिल्ह्यातून आमचा विरोध असल्याच सांगीतल. नांदेड येथील कचरू मुढळ यांनी, शक्तिपीठ महामार्ग लादल्यास आम्हीं प्राणाचं बलिदान देऊ. असा इशारा दिला. धाराशिवनगर येथिल संभाजी फडतारे यांनी, आम्ही आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नाही. शक्तिपीठ रद्द करा. अशी मागणी केली. यावेळी धाराशिवनगर येथिल सुदर्शन पडवळ, कणेरीवाडी येथील आनंदराव भोसले या शेतकऱ्यांनीही मनोगत व्यक्त केल. या बैठकीला, आमदार जयंत आसगावकर, कॉम्रेड शिवाजी मगदूम,शेतकरी संघाचे संचालक सर्जेराव देसाई, बीडचे शेतकरी लालासाहेब शिंदे, हिंगोलीचे बापूराव ढेरे , नांदेडचे सुभाष मारेलवर, विक्रांत पाटील किणीकर, गोकुळ संचालक प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, बिद्री कारखान्याचे संचालक आर एस कांबळे, उत्तम सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

डॉ. कुमार सप्तर्षी यांना बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार.

२३ फेब्रुवारी  रोजी  गांधी भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा 

पुणे:बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे दिला  जाणारा ‘बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर झाला असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव डॉ.अशोक बेलखोडे, समन्वयक डॉ.सोमनाथ रोडे यांनी पत्रकाद्वारे दिली.हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार,दि.२३ फेब्रुवारी  रोजी  सायंकाळी  ४ वाजता गांधी भवन (कोथरूड, पुणे) येथे होणार आहे. 
जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक जी.जी.पारीख आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुहिता थत्ते, रुकय्या जोशी यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक डॉ.अच्युत गोडबोले यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे. महारोगी सेवा समिती, आनंद वन चे अध्यक्ष डॉ विकास आमटे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
याच  कार्यक्रमात ‘बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार’ देवून ओरिसा येथील सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन दास आणि कोल्हापूर येथील हसन फत्तेखान देसाई यांना संयुक्तपणे गौरविण्यात येणार आहे.  देसाई हे बाबा आमटे यांच्या दोन्ही भारत जोडो सायकल अभियानातील सायकल यात्री आहेत.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,विचारवंत, युवक क्रांती दलाचे संस्थापक  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सप्तर्षी यांनी अनेक दशके महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य केले आहे.  ते ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ या संस्थेचे अध्यक्ष असून ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे ते संपादक आहेत. तसेच दास हे प्रसिद्ध गांधीवादी ‘एस. एन. सुब्बाराव’ यांच्या पासून प्रेरित ‘राष्ट्रीय युवा योजना’ या संघटनेचे संचालक आहेत तर देसाई हे राष्ट्र सेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते आणि समाजसेवक आहेत.

पुण्यात गोदरेज एडन इस्टेट येथे भारतातील पहिला 3D-प्रिंटेड G+1 व्हिला सादर

पुणे-भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (GPL) ने  त्वस्ता इंजिनिअरिंगच्या सहकार्याने पुण्यातील माण हिंजवडी येथील गोदरेज एडन इस्टेटमध्ये भारतातील पहिला 3D-प्रिंटेड G+1 व्हिला सादर केला आहे. अत्याधुनिक 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा लाभ घेत, कंपनीने डिझाइन, कार्यक्षमता आणि शाश्वततेमध्ये नवीन मापदंड प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक मोठे यश संपादन केले असून रिअल इस्टेट उद्योगासाठी परिवर्तनात्मक पाऊल ठरले आहे.

अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्राचा वापर करून उभारलेले हे व्हिला 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून गृहनिर्माणामध्ये क्रांती घडविण्याची क्षमता दर्शवते. जून 2024 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाची पूर्णता केवळ चार महिन्यांत झाली. यावरून बांधकामात 3D प्रिंटिंगच्या गती आणि कार्यक्षमतेचा प्रत्यय येतो. संगणक-निर्मित डिझाइनचा वापर करून विशेष साहित्याद्वारे संरचना स्तरानुसार उभारण्यात आली. त्यामुळे अचूकता आणि टिकाऊपणा सुनिश्चित करत बांधकामाचा कालावधी, साहित्याचा अपव्यय आणि श्रमखर्च मोठ्या प्रमाणावर कमी झाला. या वास्तुशास्त्रीय नवकल्पनेने आधुनिक सौंदर्यशास्त्र आणि शाश्वत डिझाइन यांचा मिलाफ साधत समकालीन निवासी जागांची पुर्नभाषा करणारे घटक सादर केले आहेत.

3D-प्रिंटेड व्हिलाची मुख्य वैशिष्ट्ये:

• प्रगत अल्गोरिदमचा वापर करून व्हिलाची ऑर्गनिक आणि प्रवाही रचना तयार करण्यात आली असून त्यामुळे रचनात्मक अखंडता आणि दृश्यात्मक आकर्षण वाढते.

• नैसर्गिक प्रकाश अधिकाधिक वापरण्यासाठी तयार केलेले वैशिष्ट्य. त्यामुळे ऊर्जा वापर कमी होतो आणि मोकळेपणा व विस्ताराची अनुभूती मिळते.

• पारंपरिक सरळ जिन्यांना पर्याय म्हणून हे शिल्पाकृती घटक घराच्या अंतर्गत सजावटीत कलात्मक आणि प्रभावी छाप सोडतात.

• निसर्गाने प्रेरित व्हीलाच्या प्रवाही रचना आपल्या आजूबाजूच्या परिसरासोबत सहज एकरूप होऊन सौहार्द आणि कल्याणाची भावना निर्माण करतात.

• 3D प्रिंटेड आर्किटेक्चरची खासियत असलेला स्तरीय बाह्य नमुना तंत्रज्ञानाच्या अचूकतेचे प्रदर्शन करतो आणि संरचनेस अनोखा वैशिष्ट्यपूर्ण आणि भविष्यकालीन लुक प्रदान करतो.

हे यश भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात 3D प्रिंटिंगच्या व्यापक स्वीकृतीसाठीचा मार्ग मोकळा करते आणि अधिक स्मार्ट, अधिक शाश्वत शहरांच्या विकासाला गती देते. प्रगत डिझाइन तत्वे आणि पर्यावरणपूरक बांधकाम तंत्र यांचे एकत्रीकरण करून गोदरेज प्रॉपर्टीज आधुनिक जीवनशैलीच्या संकल्पना पुन्हा परिभाषित करत आहे आणि भारतातील गृहनिर्माण क्षेत्राचे भविष्य घडवत आहे.

या ऐतिहासिक टप्प्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना गोदरेज प्रॉपर्टीजचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर विकास सिंघल म्हणाले, “गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये आम्ही रिअल इस्टेटमध्ये नाविन्यपूर्णता  आणि शाश्वततेच्या सीमा सतत पुढे नेण्यास वचनबद्ध आहोत. गोदरेज एडन इस्टेट येथे भारतातील पहिले 3D-प्रिंटेड व्हिला सादर करणे हे भविष्यकालीन, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींच्या दिशेने असलेल्या आमच्या दृष्टीकोनाची पावती आहे. 3D प्रिंटिंग मध्ये गृहनिर्माण क्षेत्रात वेगवान, अधिक अचूक, लक्षणीयरित्या अधिक शाश्वत आणि ऊर्जा कार्यक्षम वैशिष्ट्यांचा समावेश करून प्रकल्पाचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्याची क्षमता आहे. भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात या तंत्रज्ञानाची ओळख करून देताना आम्हाला अभिमान वाटतो आणि भविष्यात त्याच्या आणखी उपयोजनांचा शोध घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना मातृशोक

 बीव्हीजी परिवार हळहळला

पुणे (प्रतिनिधी) : बीव्हीजी इंडियाचे चेअरमन हणमंतराव गायकवाड व त्यांना साथ देणारे बंधु डॉ. दत्तात्रेय गाकवाड यांच्या मातोश्री सिताबाई रामदास गायकवाड (वय ७०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने गायकवाड परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उद्या दि. २१ रोजी सकाळी ८:३० वा. पिंपळे गुरव स्मशान भुमी येथे त्यांचा तिसरा विधी संपन्न होणार आहे.

गायकवाड परिवारासाठी मोठा धक्का

सिताबाई गायकवाड यांचे निधन हे गायकवाड परिवारासाठी मोठा  भावनिक धक्का आहे. पुणे महानगर पालिकेच्या शिक्षण मंडाळामध्ये सिताबाईंनी प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवा बजावली होती. पती रामदास यांच्या निधनानंतर अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी मोठा मुलगा हणमंतराव यांना अभियांत्रिकी विभागाचे शिक्षण दिले. धाकटा मुलगा दत्तात्रेय  यांना डॉक्टर बनवले होते. आईच्या मार्गदर्शनामुळे भारत विकास गृप (बीव्हीजी) हा १ लाख नागरिकांना रोजगार देण्यात यशस्वी ठरल्याचे हणमंतराव गायकवाड नेहमी त्यांच्या भाषणाद्वारे सांगत असतात. आईच्या निधनानंतर बीव्हीजी परिवाराने हळहळ व्यक्त केली आहे.

सांप्रदायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य

सेवा निवृत्तीनंतर पिंपळे गुरव परिसरात सिताबाई या सांप्रदायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत होत्या. महिला भजन  मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सुधारणावादी उपक्रम राबवले. सांगवी परिसरातील बहुसंख्य नागरिकांना अयोध्येतील प्रभू श्री राम मंदीराचे दर्शन स्व:खर्चाने घडवले होते.

विविध क्षेत्रातून श्रद्धांजली

देश विदेशातील उद्योग, आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी गायकवाड कुटूंबीयांना आधार देण्यासाठी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

वीजदर निश्चितीकरणासाठी पुण्यात दि. २७ ला जाहीर ई-सुनावणी

पुणे, दि. २० फेब्रुवारी २०२५:एकूण महसूली गरज व प्रस्तावित वीजदराच्या निश्चितीकरणासाठी महावितरण कंपनीने दाखल केलेल्या बहुवर्षीय वीजदर याचिकेवर मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वतीने गुरूवारी, दि. २७ फेब्रुवारीला पुणे येथील महाराष्ट्र शासकीय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (सीओइपी) मुख्य सभागृहात (ई-सुविधा केंद्रात) जाहीर ई-सुनावणी होणार आहे. या सुनावणीला सकाळी १०.३० वाजता प्रारंभ होईल.

       महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण कंपनी) आर्थिक वर्ष २०२२-२३ व आर्थिक वर्ष २०२३-२४ चे अंतिम अचूक समायोजन, आर्थिक वर्ष २०२४-२५ चे तात्पुरते समायोजन व आर्थिक वर्ष २०२५-२६ ते आर्थिक वर्ष २०२९-३० या पाचव्या नियंत्रण कालावधीसाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर दाखल केलेल्या बहुवर्षीय वीजदर याचिकेवर ही जाहीर ई-सुनावणी होणार आहे.

प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करण्याचा शिवरायांचा आदर्श प्रत्येकासाठी मार्गदर्शक

पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांचे प्रतिपादन

पुणे, दि. २० फेब्रुवारी २०२५:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी प्रत्येक वेळी ती स्थिती अनुकूल केली आणि एकाच वेळी विविध संकटांवर मात करीत रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले. शिवरायांचा हा आदर्श प्रत्येकाच्या जीवनासाठी मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी बुधवारी (दि. १९) केले.

महावितरण व महापारेषणच्या वतीने रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. भुजंग खंदारे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (महावितरण) व अनिल कोलप (महापारेषण) यांची उपस्थिती होती. यावेळी शिवचरित्रावरील प्रबोधनात्मक पोवाड्याचा कार्यक्रम झाला. वडूज (सातारा) येथील शिवशाहीर श्री. राजेंद्र सानप तडवळेकर व सहकाऱ्यांनी पोवाडे सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

पुणे प्रादेशिक संचालक श्री. खंदारे म्हणाले की, स्वराज्य स्थापनेसाठी जाती, पंथ, धर्मापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी सहकाऱ्यांच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले. संधी देऊन त्यांच्या क्षमतेचा विकास केला. आत्मविश्वास निर्माण केला. शूरवीर माणसं घडवली. यासोबतच रयतेसाठी निर्माण केलेल्या स्वराज्याला माणूसकीच्या मूल्यांचे अधिष्ठान दिले. लोकाभिमुख व सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या प्रशासनाचा आदर्श शिवाजी महाराज यांच्या प्रशासकीय यंत्रणेतून आपल्याला मिळतो. तो आदर्श समोर ठेऊन वीजग्राहकांना सेवा देण्याचे आवाहन श्री. खंदारे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विनोद रणदिवे यांनी तर सूत्रसंचालन श्री. बाबा शिंदे यांनी केले. श्री. शिवाजी शिवनेचारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण, महापारेषणमधील अभियंते, अधिकारी, कर्मचारी व सर्व संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. आयोजनासाठी सर्व कर्मचारी संघटनांच्या संयुक्त आयोजन समितीने पुढाकार घेतला.

अल्टो कारमधून हातभट्टी दारुची वाहतुक लोणी काळभोर पोलीसांनी पकडली

२,७८,०००/- रु चा मुद्देमाल जप्त.

पुणे-अल्टो कारमधून होणारी हातभट्टी दारुची वाहतुक लोणी काळभोर पोलीसांनी पकडली असून मुबारक जाफर गड्डे वय ४३ रा. पाषाणकर गॅस एजन्सीजवळ, लोणी काळभोर, पुणे यास ताब्यात घेतले आहे .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेद्र पन्हाळे यांनी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर धडक कारवाई मोहिम सुरु केली आहे. या मोहिमे दरम्यान दि.२०/०२/२०२५ रोजी पहाटे ०५/०० वा.चे सुमारास १२ फाटा, पुणे सोलापुर माहामार्ग, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि.पुणे या ठिकाणी सार्वजनीक रोडवरुन अवैध गावठी दारुचे कॅन्ड पुण्याचे दिशेने वाहुन नेले जात असल्याची बातमी प्राप्त झाली.
त्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पो. उप निरीक्षक अनिल जाधव, पोलीस अमंलदर गाडे, कर्डीले यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन अवैध गावठी दारु वाहुन नेली जाणारी चारचाकी मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार पकडली. त्या गाडीमध्ये लोणी काळभोर पोलीसांना हातभट्टी गावठी दारु भरलेली एकुण ८ कॅन्ड, २८० लीटर दारु मिळुन आली सदर कारवाई दरम्यान अवैध गावठी हातभट्टी दारुचे कॅन्ड वाहुन नेणारे इसम नामे मुबारक जाफर गड्डे वय ४३ रा. पाषाणकर गॅस एजन्सीजवळ, लोणी काळभोर, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधि.क.६५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे. सदर कारवाई दरम्यान आरोपीं कडुन एकुण २,७८,०००/-रुपचे किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, अनुराधा उदमले यांचे आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणेचे राजेंद्र पन्हाळे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस अमंलदार गाडे, कर्डीले यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार अधिक प्रभावी व गतिमान करणार- डॉ. राजेश देशमुख यांनी सचिवपदाचा कार्यभार स्वीकारताना व्यक्त केला विश्वास

0

धाडसी निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी करणारं दूरदृष्टीचं नेतृत्वं या
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रतिमेस साजेसं काम करण्याचा प्रयत्न राहील
–उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख यांचा निर्धार

मुंबई, दि. 20 :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून डॉ. राजेश देशमुख यांनी आज कार्यभार स्वीकारला. डॉ. राजेश देशमुख हे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदासह उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही काम पाहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वं, कुशल मार्गदर्शनाखाली सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार अधिक गतिमान प्रभावी करण्यावर आपला भर असेल, असे डॉ. राजेश देशमुख यांनी कार्यभार स्विकारतानांच स्पष्ट केले आहे.

डॉ. राजेश देशमुख यांनी कार्यभार स्विकारताच उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच कोणतेही प्रकरण किंवा नस्ती प्रलंबित राहू नये, अशा सूचना सहकारी अधिकाऱ्यांना दिल्या. उपमुख्यमंत्री कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या आणि लोकहिताच्या प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्यात येईल. धाडसी निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी करणारं दूरदृष्टीचं नेतृत्वं ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा आहे. त्या प्रतिमेस साजेसं काम करण्याचा आपला प्रयत्न राहीला पाहिजे, असेही त्यांनी बैठकीत सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे नुकतीच उत्पादन शुल्क आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यासह आता उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवपदाची जबाबदारीही ते सांभाळणार आहेत. त्याआधी कोकण विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, साखर आयुक्त, हाफकीन इन्टिट्यूटचे संचालक म्हणून यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी सचिवपदाची सूत्रे स्विकारल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय प्रशासन अधिक गतिमान, सकारात्मक पद्धतीने काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. राजेश देशमुख यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर कार्यालयाचे प्रशासकीय सल्लागार सतीश मोघे, उपसचिव विनायक चव्हाण, डॉ. नवनाथ जरे, उपसचिव विकास ढाकणे, खाजगी सचिव डॉ. अमर भडांगे, अविनाश सोलवट, विशेष कार्य अधिकारी नरेश भैरी, विलास धाईजे, अवर सचिव सचिन बाभळगावकर, कक्ष अधिकारी विजय लिटे आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
—-०००००—

वाहनांसाठी “उच्च सुरक्षा पाट्यां “हा खंडणी वसुलीचाच प्रकार -मनसे सरचिटणीस अजय शिंदे म्हणाले ,’बंद करा हा उद्योग

पुण्यात तब्बल ७२ लाख वाहने,२०१९ पूर्वीच्या वाहनांना”उच्च सुरक्षा पाट्यां बसविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा, या पाट्या बसवल्या तर वाहन चोऱ्या थांबणार आहेत याची खात्री अगर चोरीस गेल्यास जबाबदारी कोणाची ठेकेदाराची कि सरकारची ?

पुणे- वाहनांसाठी “उच्च सुरक्षा पाट्यां “हा सरकारकडून होत असलेला खंडणी वसुलीचाच प्रकार असल्याचा आरोप करत मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी सरकारला तातडीने हा उद्योग बंद करण्याचा सल्ला दिला आहे. अगोदरच हेल्मेट सक्ती , विमा , पथकर, GST अशा विविध करांनी जनतेची आर्थिक पिळवणूक होत आहे तरीही सरकारचे पोट भरेना म्हणून अशी सक्तीची वसुली हा सरकारी खंडणी वासुलीचाच भाग असल्याची भावना जनतेत पसरते आहे. या पार्श्वभूमीवर अजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे कि,’

सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे वाहनांचे “आधार कार्ड” म्हणजेच ‘उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी”सर्व वाहनांसाठी बसवण्याचे आदेश केंद्र सरकारला एका प्रकरणात दिले होते. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रासह अनेक राज्यात सुरू झाली असून सर्व प्रकारच्या कोट्यावधी वाहनांना ते सक्तीचे करण्यात आले आहे. कोणी तरी उठतो न्यायालयात जातो आणि न्यायालय कायदेशीर निकषावर आधारित निर्णय घेऊन मोकळे होते असे याबाबत आपण म्हणू शकतो ,पण अशा निर्णयाची व्यवहार्यता तपासणे हि तितकीच गरजेची आहे असे का वाटत नाही न्यायालय असेल सरकार असेल यांनी काही निर्णय तपासले तर त्याच्या हि लक्षात हि बाब येईल हेल्मेट सक्तीचं भूत हे त्याचंच उदाहरण .

वाहन चोरीला आळा घालणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे वाहन चोरी थांबवणे यासाठी उपाययोजना काय तर ‘उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी” आता या पाट्या बसवल्या तर वाहन चोऱ्या थांबणार आहेत का ? याच उत्तर नकार्थी आहे कारण गेली पाच वर्ष तर याच पाट्या नवीन वाहनांना बसवल्या जात आहेत , त्या नंतरच त्या गाड्या शोरूम मधून बाहेर येतात आणि चोरी होणाऱ्या वाहनात मोठं प्रमाण नवीन वाहनांचे आहे . म्हणजे वाहन सुरक्षितता हा उद्देश दिखाऊ आहे का हा प्रश्न निर्माण होतो आणि वेगवेगळ्या दण्डात्मक वसुली सोप्पी जावी म्हणून घेतला गेलेला हा निर्णय आहे हे लक्षात येते पण हे वास्तव लपवताना पोलीस वाहनचोऱ्याना नियंत्रणात आणू शकत नाही असं या निर्णयातून मान्य केलं जात आहे याचा पोलीस दलावर विपरीत परिणाम होऊ शकतो हे सरकारच्या लक्षात येत नाही का . आणि ताकाला जाऊन भांड लपवण्याचा प्रयत्न का ? सरकारने सरळ सांगितले पाहिजे दंड वसुली साठी लावलेल्या कॅमेऱ्यात वाहनावरच्या पाट्या सहज टिपल्या जाव्यात म्हणून आम्ही हे करत आहोत.

सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड देणारा आणि त्याची काही चूक नसताना दंडरुपी खंडणी देण्यास भाग पडणारा हा निर्णय आहे . या मुळे भ्रष्टाचाराचे ‘नवे कुरण’ निर्माण तर होणारच आहे.त्याच बरोबर या पाट्या निर्माण करणाऱ्या काही व्यावसायिकाचा मोठ्या प्रमाणात फायदा करून देण्याचा हा प्रकार आहे . एक प्रकारे हा सर्वसामान्य नागरिकाला आर्थिक भुर्दंड देऊन केला जाणारा भ्रष्टाचारच आहे .देशातील सर्व प्रकारच्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स (एचएसएनपी) बसवण्याची सक्ती करण्यात आली असून त्यासाठी ३१ मार्च २०२५ अंतिम तारीख असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाचे जसे ‘आधार कार्ड’ आहे तसे प्रत्येक वाहनाचे ‘आधार कार्डाचे’ दुसरे रूप म्हणजे ही उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी आहे. वाहन कायद्याखाली याबाबतच्या तरतुदी केलेल्या असून वाहतूक पोलीस व आरटीओ यांच्या वतीने त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वास्तविक पाहता या उच्च सुरक्षा क्रमांक पाटीचा उद्देश वाहनांची चोरी रोखणे,खोट्या नंबर प्लेटचा प्रसार थांबवणे व चोरीला गेलेल्या वाहनांचा माग घेणे एवढाच मर्यादित आहे. तसेच या उच्च सुरक्षा क्रमांकाच्या पाटीमुळे वाहन मालकाची ओळख करणे किंवा तपासणे सहज सुलभ होणार आहे.वगैरे पण या सगळ्या साठी आरटीओ च पासबुक वाहनांचे चासी नंबर असतोच कि आणि जरी या पाट्या बसवल्या तरी चोरीला गेलेल्या वाहनाचा शोध या आरटीओ च पासबुक वाहनांचे चासी नंबर यासारख्या गोष्टी मुळेच लागणार आहे . पाट्या लावल्या मुळे वाहनचोऱ्या थांबल्या नाही थांबणार हि नाही देशातील वाहन चोरीची आकडेवारी पाहिली तर दररोज १०५ दुचाकी,चारचाकी, व अन्य वाहनांची चोरी होते. या उच्च सुरक्षित क्रमांक पाट्या लावल्यामुळे या चोरींचे प्रमाण कमी होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण या पाट्या सहजपणे तोडून टाकता येतात. बरं या पाट्यांमुळे रस्त्यावर दररोज होणाऱ्या अपघाताला काहीही पायबंद बसणार आहे का तर ते हि नाही. ते थांबवता येणार नाहीत. भारतात दररोज रस्त्यावरील वाहन अपघातात सरासरी ४७५ मृत्यू होतात. म्हणजे दर तीन मिनिटाला एक मृत्यू असे आपल्याकडचे प्रमाण आहे. या पाट्या लावल्यामुळे जे हजारो अपघात होत आहेत त्यात काहीही बदल होणार नाही. त्याला या उच्च सुरक्षा क्रमांकाच्या पाट्या रोखू शकणार नाहीत. कारण त्यांचा तो उद्देशच नाही

आज महाराष्ट्राचा एकूण विचार करता २०१९ पूर्वीची नोंदणीकृत रस्त्यावर असलेली कोट्यवधी वाहने आहेत नवीन निर्णय मुळे या सर्वाना मोठा फटका बसणार आहे यात मोठं प्रमाण दुचाकी वाहनांचे आहे आज च्या दिवसाला या वाहनांचे बाजार मूल्य प्रत्येकी पाच हजार ते आठ हजार एवढेच आहे.अशा वाहनांना ‘उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी” पाटी लावण्याचा खर्च करणे त्या वाहन मालकाला व्यावहारिक दृष्टिकोनातून परवडणारे नाहीच पण त्याच बरोबर येत्या काही वर्षात हे वाहन जर रस्त्यावर येण्याच्या दृष्टिकोनातून अयोग्य ठरले तर या वरचा केला जाणारा खर्च राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय ठरेल .म्हणा “जीएसटी” च्या रूपाने सरकारी संम्पत्ती वाढवण्याची तरतूद सरकार ने करून ठेवलेली आहे . ‘उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी” जर बसवल्या नाहीत तर किमान एक हजार ते पाच -दहा हजार रुपये अशी दंडाची आकारणी सरकार करणार आहेच . म्हणूनच केंद्र आणि राज्य शासना देखील ते सक्तीचे करण्या साठी कंबर कसते आहे .

महाराष्ट्र राज्याने मर्जीतील तीन संस्थांना याचे कंत्राट दिले आहे. त्यांचे निकष नियम अटी क्षमता सरकारला माहित . यातील महत्त्वाचा भाग असा की प्रत्येक राज्यात या पाट्यांचे डिझाईन आणि त्याचे वैशिष्ट्य वेगळे आहे. त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहने गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत अजूनही सर्वसामान्यांमध्ये प्रचंड अनभिज्ञता आहे. याबाबत शासकीय पद्धतीने दिलेल्या जाहिराती, परिपत्रकामुळे याबाबतचा गोंधळ वाढताना दिसत आहे. त्या पाट्या बसवण्यासाठी निर्माण केलेली ऑनलाइनची सुविधा अत्यंत सुमार दर्जाची आहे. अशी चर्चा आहे अगदी पुण्याची आकडेवारी पाहायची झाली तर पुण्यात तब्बल ७२ लाख वाहने आहेत. पुण्यात उद्यापासून दररोज एक लाख वाहनांची नव्या पाट्यांसाठी नोंदणी झाली तरी सुद्धा मार्च २०२५ अखेर पुण्यातील सर्व दुचाकी किंवा अन्य वाहनांना या पाट्या बसवता येणार नाहीत. सध्या हजार पाचशे दुचाकी वाहनांचीही नोंदणी होत नाही ही वस्तुस्थिती आहे.म्हणूनच जरी न्यायालयीन निर्णयाची ढाल सरकार करीत असेल तरी ‘उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी” २०१९ पूर्वीच्या वाहनांना सुद्धा बसवण्याच्या निर्णयाचा फेरविचार सरकारने करावा