Home Blog Page 633

निवडणूक आयोग भाजपचा हस्तक बनलाय : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा हल्लाबोल

देशातील लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष पद्धतीने व्हायला हव्यात. संविधानाने ती जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर दिली आहे, पण निवडणूक आयोग कर्तव्य भावनेने काम करण्यापेक्षा भाजपचे हस्तक म्हणून काम करीत आहे. मतदारांची नावे यादीतून गायब करण्याचे उद्योग सुरू आहेत व त्या अपराधात निवडणूक आयोगाने सामील व्हावे हे देशविघातक कृत्य आहे. आयोग संविधानाच्या खुर्चीवर बसून अशा देशविरोधी कृत्यास पाठबळ देत असेल तर हा देश महान राहिलेला नाही. देशाचे महानपण संपविण्यात न्यायालयांबरोबरच निवडणूक आयोगाने भूमिका बजावली याची नोंद काळ्याकुट्ट अक्षरांत करावी लागेल. निवडणूक आयोग झोपला असेल तर ठीक, पण झोपेचे सोंग घेऊन पडला असेल तर ते सोंग उतरवावे लागेल. प्रश्न देशहिताचा व संविधान रक्षणाचा आहे म्हणून हा प्रपंच. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगावर टीका केली आहे. ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या माध्यमातून ही टीका केली आहे.

सामना अग्रलेख – वाचा जसाच्या तसा ….

निवडणूक आयोग झोपलाय काय?

देशातील लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष पद्धतीने व्हायला हव्यात. संविधानाने ती जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर दिली आहे, पण निवडणूक आयोग कर्तव्य भावनेने काम करण्यापेक्षा भाजपचे हस्तक म्हणून काम करीत आहे.

मतदारांची नावे यादीतून गायब करण्याचे उद्योग सुरू आहेत व त्या अपराधात निवडणूक आयोगाने सामील व्हावे हे देशविघातक कृत्य आहे. आयोग संविधानाच्या खुर्चीवर बसून अशा देशविरोधी कृत्यास पाठबळ देत असेल तर हा देश महान राहिलेला नाही. देशाचे महानपण संपविण्यात न्यायालयांबरोबरच निवडणूक आयोगाने भूमिका बजावली याची नोंद काळ्याकुट्ट अक्षरांत करावी लागेल. निवडणूक आयोग झोपला असेल तर ठीक, पण झोपेचे सोंग घेऊन पडला असेल तर ते सोंग उतरवावे लागेल. प्रश्न देशहिताचा व संविधान रक्षणाचा आहे म्हणून हा प्रपंच.

देशाच्या सरन्यायाधीशांनी न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्याचा आंधळा कार्यक्रम केला आहे. पट्टी काढली तरी आजही न्यायदेवता मोदी-शहांची गुलामच बनून उभी आहे. संवैधानिक पदावर बसलेले न्यायाधीश असोत किंवा इतर लोक, ते सर्व धृतराष्ट्र, गांधारीप्रमाणे डोळय़ांवर कमळछाप मखमली पट्ट्या बांधून बसले आहेत आणि लोकशाहीची हत्या उघडय़ा डोळय़ांनी पाहत आहेत. भारताचा निवडणूक आयोगही त्यास अपवाद नाही. आपला निवडणूक आयोग हा निष्पक्ष व स्वतंत्र बाण्याचा राहिलेला नसून बजरंग दल किंवा तथाकथित गोरक्षा समितीप्रमाणे भाजपचा हस्तक म्हणून काम करीत आहे हे लपून राहिलेले नाही. आता निवडणूक आयोगाच्या संगनमताने भाजपने नवा खेळ सुरू केला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक हरण्याच्या भीतीने सुमारे 150 मतदारसंघांतील मतदार याद्यांत घोटाळे करण्याचे काम भाजपने सुरू केले आहे. भाजप लढवत असलेल्या साधारण 150 मतदारसंघांतली मतदार याद्यांची छाननी करून महाविकास आघाडीस पडू शकतील अशी दहा हजार मतदारांची नावे वगळायची व तेवढीच बोगस नावे त्या यादीत समाविष्ट करायची असा कार्यक्रम सुरू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात उघडकीस आलेल्या एका गैरप्रकाराने या गोष्टीला बळकटीच मिळाली आहे. मतदारांच्या ऑनलाइन नोंदणीदरम्यान सुमारे 6 हजार 853 बोगस नावे या ठिकाणच्या मतदार यादीत घुसविण्याचा प्रयत्न झाला. प्रशासनाने तो आता फोल ठरविला असला तरी मतदार याद्यांत बोगस नावे घुसविण्याचे भाजपचे प्रयत्न कुठल्या स्तरावर सुरू आहेत, हेच या घटनेने समोर आले आहे. एवढेच नव्हे तर छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील मतदारांचे आधारकार्ड जोडून ही हजारो बोगस नावेदेखील महाराष्ट्रातील मतदार यादीत घुसडली जात आहेत. या कामी भाजपने प्रत्येक मतदारसंघानुसार काम करणाऱ्या पगारी टोळ्या नेमल्या व मतदार यादीत हा घोटाळा कसा करायचा यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले. महाराष्ट्रात भाजप जिंकेल असे वातावरण नाही. शिवसेनेशी हिमतीने लढण्याची छातीही त्यांच्यापाशी नाही. त्यामुळे मतदार याद्या व ईव्हीएमचे घोटाळे करून निवडणूक जिंकण्याचे हे षड्यंत्र सुरू आहे. या सर्व घोटाळय़ांचे पुरावे विरोधी पक्षांनी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाकडे सादर केले, पण आयोग मूक, बधिर व आंधळा होऊन खुर्चीवर बसला आहे. भाजपचे पुढारी सांगतील तशाच बेडूक उड्या मारणे व त्याबरहुकूम ‘डराव डराव’ करणे हेच निवडणूक आयोगाचे काम उरले आहे. महाराष्ट्रात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. 2019 च्या निवडणुकीत व नंतर फडणवीस विरोधकांचे फोन ‘टॅप’ करण्यात त्या आघाडीवर होत्या. आमदारांना धमक्या देणे व फडणवीसांच्या मागे उभे रहा यासाठी आमिषे दाखविण्याचे काम या रश्मीबाईंनी केले. याबाबत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, पण फडणवीस पुन्हा गृहमंत्री होताच बाईसाहेबांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांना सन्मानाने पोलीस महासंचालकपदी बसवले गेले. त्यामुळे या निवडणुकीत त्या निष्पक्ष वागणार नाहीत व फडणवीस वगैरे लोकांच्याच पालख्या वाहणारहे कोणीही सांगेल. रश्मी शुक्लांची बदली करा असे निवडणूक आयोगाला महाविकास आघाडीतर्फे विनवण्यात आले, पण महासंचालकांची बदली करण्याची ‘पॉवर आम्हाला नाय,’ असे सांगून आयोगाने थापेबाजी केली. त्याच वेळी झारखंडच्या पोलीस महासंचालकांची बदली तेथील निवडणूक आयोगाने केली ती भाजपच्या तक्रारीवरून. महाराष्ट्र व झारखंडच्या आचारसंहितेत व निवडणूक नियमावलीत फरक आहे काय? अनेक मतदारसंघांतील बोगस मतदार नोंदणीची प्रकरणे समोर येऊनही निवडणूक आयोग मूकस्तंभ बनून उभा आहे. कसला न्याय व कसले संविधान? भाजपवाले हे अनीतीच्या कौरवी मार्गाने निवडणुका लढत आहेत व निवडणूक आयोग भीष्माप्रमाणे अधर्माच्या बाजूने उभा आहे. देशातील लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष पद्धतीने व्हायला हव्यात. संविधानाने ती जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर दिली आहे, पण निवडणूक आयोग कर्तव्य भावनेने काम करण्यापेक्षा भाजपचे हस्तक म्हणून काम करीत आहे. मतदारांची नावे यादीतून गायब करण्याचे उद्योग सुरू आहेत व त्या अपराधात निवडणूक आयोगाने सामील व्हावे हे देशविघातक कृत्य आहे. आयोग संविधानाच्या खुर्चीवर बसून अशा देशविरोधी कृत्यास पाठबळ देत असेल तर हा देश महान राहिलेला नाही. देशाचे महानपण संपविण्यात न्यायालयांबरोबरच निवडणूक आयोगाने भूमिका बजावली याची नोंद काळ्याकुट्ट अक्षरांत करावी लागेल. निवडणूक आयोग झोपला असेल तर ठीक, पण झोपेचे सोंग घेऊन पडला असेल तर ते सोंग उतरवावे लागेल. प्रश्न देशहिताचा व संविधान रक्षणाचा आहे म्हणून हा प्रपंच.

धंगेकरांच्या विरोधात भाजपाची पोलिसात तक्रार, पोलीस ठाण्यात नेल्यावर धंगेकर म्हणाले…

पुणे:

रविंद्र धंगेकरांकडून वाटप करण्यासाठी निघालेला दिवाळी फराळाचा टेम्पो भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडविला आहे. त्यानंतर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात हा फराळाचा टेम्पो नेण्यात आला आहे.
भाजपने तक्रार केल्यानंतर आमदार रविंद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. रविंद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल असं पोलीस उपायुक्त संदीप गील यांनी स्पष्ट केलं होतं. रविंद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानच्या वतीनं दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येत होते. यानंतर भाजपने ही बाब निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिल्याची माहिती पुण्याचे भाजप प्रवक्ते पुष्कर तुळजापुरकर यांनी दिली.आचारसंहितेचा भंग होत असल्याचे विद्यमान आमदारांना समजत नाही का? असा सवालही तुळजापुरकर यांनी केला आहे. बिनधास्त तुम्ही दिवाळी फराळ वाटत आहेत. तुम्ही पडणार आहेत, म्हणून तुम्ही हे सगळं करताय का? असा सवालही तुळजापुरकर यांनी केला आहे.

आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले

नागरिकांच्या दिवाळीत सहभागी व्हावे म्हणून दरवर्षी माझा मित्रपरिवार ‘आनंदाची दिवाळी’ नागरिकांना भेट म्हणून देतो. त्याप्रमाणे यंदाही ‘आनंदाची दिवाळी’ माझा मित्रपरिवार देत असावा. सर्वांच्या आनंदात सहभागी होणे, या भावनेने मित्रपरिवार दरवर्षी हा उपक्रम घेतो.

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम 15 ऑक्टोबर, 2024 रोजी घोषित केला आहे. याची मला पूर्ण जाणीव आहे. कुठल्याही प्रकारच्या वस्तूचे वाटप करण्यात माझा व्यक्तीश: सहभाग नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. मी अजून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो नाही. तरीपण माझा विजय पक्का असल्याने विरोधकांच्या छातीत आत्तापासूनच धडकी भरल्याचे चित्र स्पष्ट जाणवत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांमधून विविध वस्तूंचे वाटप पुण्यात सुरू आहे. त्यांनी जरूर वाटप करावे. पण जर माझा मित्र परिवार ‘आनंदाची दिवाळी’ वाटप करतोय म्हणून त्यांना रोखत असाल तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांमधून होणाऱ्या वस्तूंचे वाटप कोण रोखणार ? माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावरही नक्कीच होवू शकतो.

मंडई मेट्रो स्टेशन वर किरकोळ आग: तातडीने 5 बंब दाखल अन आग विझवली.

मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा निर्वाळा

पुणे: रविवारी रात्री साडेअकरा वाजता मंडई मेट्रो स्टेशन वर किरकोळ आग लागल्याने तातडीने अग्निशामक दलाने 5 बंब पाठवून तातडीने आग विझवली.

अधिक माहिती अशी समजते की, जिथे कन्स्ट्रक्शन चेच काम सुरू आहे तिथे वेल्डिंग काम सुरू असताना फोम च्या साठ्यात ठिणगी उडाली आणि धूर पसरला, धूर बाहेर जाण्यास फारशी जागा नसल्याने तो साठला. मात्र तिथे प्रवासी येत जात नाही असे सांगण्यात आले.

पोलीस उपायुक्त संदीप गिल

या संदर्भात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे की, मंडई मेट्रो स्टेशनची आग नियंत्रणात आली आहे, सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही , मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार काही वेळापूर्वी घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.सदरील घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली होती. मेट्रो स्टेशनच्या भागात वेल्डिंगची काम सुरू असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालक श्री. श्रवण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असून या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजीत गौरी गणपती स्पर्धेचे बक्षीसाचे दिमाखात वाटप..

पुणे/सोमेश्वरवाडी :

ऑगस्ट महिन्यात गणपती उत्सवानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून घरगुती गणपती, गौरी गणपती सजावट व सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महिलावर्गाने उत्तम प्रतिसाद दिला होता. या स्पर्धेतीत विजेत्यानां आज आज सोमेश्वर वाडी येथील झुंज बंगल्यावर पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील औंध, बोपोडी, भिलारेवाडी, खैरेवाडी, शिवाजीनगर, गोखलेनगर, खडकी अशा सात विभागवार हि स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये प्रत्येक विभाग वार पाच क्रमांक काढत बक्षिसे देण्यात आली. सात विभागातून शिवाजीनगर विधानसभा भागातील प्रचंड उत्साहात नागरिकांनी सहभाग घेतला.

गणपतीसाठी अनुक्रमाने प्रथम क्रमांक एल ई डी, दुसरे- शेगडी , तिसरे- कुलर, चौथे- होम थीएटर , पाचवे – मिक्सर तर गौरी साठी अनुक्रमे प्रथम- एल ई डी, दुसरे – ओव्हन , तिसरे – फूड प्रोसेसर , चौथे – इंडक्शन , पाचवे – रोटी मेकर
याशिवाय सेल्फी टॅब बाप्पा साठी अनुक्रमाने पहिले- सायकल, दुसरे- टॅब, तिसरे क्रिकेट कीट, चौथे – ट्रक सूट , पाचवे – स्कूल बॅग

कार्यक्रमासाठी सनी दादा निम्हण, स्वातीताई निम्हण, वनमालाताई कांबळे, मधुरावहिनी निम्हण, मधुराताई निम्हण वाळंज, गायत्रीताई निम्हण कदम, अमित मुरकुटे, गणेश जावळकर, रोहित कदम, राम निम्हण, अजित निम्हण, गणेश शिंदे, तुषार भिसे, अनिश साठे, दत्ता शिरसाठ, अभिषेक परदेशी, टिंकू दास, संजय माझिरे, संजय तरडे, प्रमोद कांबळे, सचीन मानवतकर, मधु निम्हण, देवा देवकर, संतोष ओरसे, इम्रान तांबोळी, यांच्यासह शिवाजीनगर मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महेंद्र बामगुडे यांनी बक्षीस विजेत्यांची नावे घोषित केली.

यावेळी सेल्फी विथ बाप्पा चे ५ बक्षिसे काढण्यात आली.

सेल्फी विजेते :

  1. वैशाली केदारी
  2. कविता अंगिर
  3. शिवांश मोरे
  4. ज्योती गायकवाड
  5. शर्वरी आंजर्लेकर

गणपती स्पर्धा विजेते
औंध विभाग –

  1. ललिता इंगोले
  2. रोहिणी पवार
  3. निर्मला गोरडे
  4. प्रतीक्षा खोंड
  5. निकिता गायकवाड
    बोपोडी–औंध रोड
  6. प्रज्ञा बहिरट
  7. रेखा धेंडे
  8. जूई स्पेलिंग
  9. ज्योती जाधव
  10. संगीता चव्हाण
    खिलारेवाडी – डेक्कन
  11. कल्याणी सणस
  12. अलका चव्हाण
  13. स्नेह साठे
  14. भारती सुतार
  15. पार्वती सातपुते
    खैरेवाडी –न.ता.वाडी
  16. दिपाली वाघाळे
  17. स्वाती मावालकर
  18. वैशाली गाडे
  19. कविता काकडे
  20. सीमा वंजारी
    शिवाजीनगर–डेक्कन
  21. आदिता जाधव
  22. यशोदा बांदल
  23. श्रद्धा चचने
  24. उषा वाघिरे
  25. निशा श्रावण
    खडकी साप्रस रेंजहिल्स संगमवाडी पाटील इस्सेट
  26. केतकी जेऊर
  27. जयश्री राठी
  28. सुषमा कोल्लम
  29. मोहिनी जुन्जाम
  30. प्रिया गायकवाड
    गोखलेनगर – वडारवाडी
  31. अनिता जाधव
  32. सुलभ रायपुर
  33. माधुरी दळवी
  34. मनिषा पवार
  35. गीता पवार

गौरी स्पर्धा विजेते
औंध विभाग

  1. राजेश सबाने
  2. विश्व्तेज देसाई
  3. योगिता जुनावने
  4. वेदांत चोंधे
  5. अभिषेक सुपेकर
    बोपोडी –औंध रोड
  6. अनघा साठे
  7. सुरेखा तारू
  8. सुलक्षणा कोरडे
  9. शोभा मुरकुटे
  10. सुवर्ण जाधव खिलारेवास्ती, डेक्कन
  11. जोत्स्ना उत्तेकर
  12. काजल अभंगे
  13. हीना अभंगे
  14. निकिता मांडवकर
  15. संजय बचवडे

खैरेवाडी, न.ता.वाडी

  1. मनिषा मोरे
  2. प्रतीक्षा पासलकर
  3. शुभांगी मोरे
  4. जयश्री खैरे
  5. स्वाती पवार

शिवाजीनगर-डेक्कन

  1. तृप्ती भारती
  2. संगीता पाटोळे
  3. विद्या मोरे
  4. पूजा ढाकणे
  5. सुजाता पवार
    खडकी साप्रस रेंजहिल्स संगमवाडी पाटील इस्सेट
  6. वैदेही ठोंबरे
  7. कविता फाळके
  8. दिपाली गायकवाड
  9. चित्रा क्षीरसागर
  10. नवनाथ सुरवसे
    गोखलेनगर – वडारवाडी
  11. नेहा येले
  12. पूजा मेढेकर
  13. दुर्गा भोसले
  14. अनिता मोरे
  15. शीतल पवार

विदर्भातील माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले , विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार , विदर्भ काँग्रेसचे नेते आमदार सुनील केदार , मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश
महाराष्ट्राच्या राजकारणात माळी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे . माळी समाजाचे विदर्भात जवळपास पंचवीस लाख मतदान आहे . माळी समाजाला सत्ताकारणात सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्षित ठेवले. एक छगन भुजबळ वगळता एकही नेता माळी समाजातून राजकारणात स्वीकारला गेला नाही. छगन भुजबळ यांचे राजकारणही माळी समाजाऐवजी स्वकेंद्रित आणि स्वकुटुंब केंद्रित राहिले . छगन भुजबळ यांची विदर्भातील बाहुबली म्हणून ओळखले जाणारे किशोर कन्हेरे यांनी आपल्या समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी आज अखेर काँग्रेस पक्षात प्रवेश केला . मध्यंतरी त्यांनी जवळपास बारा वर्ष शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते म्हणूनही कार्य केले. शिवसेनेत विदर्भात फार लक्ष दिले जात नसल्याने आणि माळी समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी राष्ट्रीय पक्ष सोबत असण्याची आवश्यकता लक्षात घेऊन किशोर कन्हेरे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला . माळी समाजासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याची मनोकामना त्यांनी यावेळी व्यक्त केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आणि आपल्या समाजाला निश्चित न्याय देण्यात येईल याबाबत आश्वस्थ केले. महाराष्ट्रातील नेत्यांनी किशोर कन्हेरे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेसला विदर्भात निश्चित खूप फायदा होईल आणि माळी समाजाला किशोर कन्हेरे यांच्या नेतृत्वात निश्चितपणे न्याय देण्यात येईल याबाबत खात्री व्यक्त करून किशोर कन्हेरे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत आनंद व्यक्त केला.

ॲलन वॉकर लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ३६ मोबाईल चोरी, मुंबई टोळीला अटक

पुणे: खराडीत ब्रिटिश गायक ॲलन वॉकर यांच्या संगीत रजनीमध्ये (लाइव्ह कॉन्सर्ट) गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ३६ जणांचे मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी मुंबई आणि हैदराबादमधील चोरट्यांच्या टोळीतील चौघांना अटक केली.सय्यद महम्मद इद्रिस शेख (वय २१, रा. मुंबई), अखिल व्यंकटरमणा गोदावरी (वय २४, रा. हैदराबाद), लोकेश हनुमंत पुजारी (वय ३१, रा. मुंबई) आणि पप्पू भागीरथी वैश्य (वय २४ रा. मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.खराडीतील न्यू इंग्लिश फिनेक्स स्कूलच्या मैदानावर १८ ऑक्टोबर रोजी रात्री लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चार लाख ८७ हजार रुपये किमतीचे ३६ मोबाईल चोरून नेले. याबाबत नागरिकांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणाचा तपास करीत पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली

गुणीजान बंदिश राष्ट्रीय स्पर्धेत महिला गटात तेजस्वीनी वेर्णेकर तर पुरुष गटात मेहेर परळीकर विजेते

पुणे : गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे (ग्रेस) प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त देशपातळीवर घेण्यात आलेल्या गुणीजान बंदिश स्पर्धेच्या महिला गटात वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील तेजस्वीनी वेर्णेकर हिने तर पुरुष गटात पुणे (महाराष्ट्र) येथील मेहेर परळीकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. प्रथम क्रमांक विजेत्यास प्रत्येकी एक लाख 25 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

गुणीजान बंदिश स्पर्धेचा निकाल रविवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. महिल गटात द्वितीय सोमदत्ता चॅटर्जी (24 परगणा, पश्चिम बंगाल), तृतीय युगंधरा केचे (संभाजीनगर, महाराष्ट्र) तर पुरुष गटात द्वितीय दर्शन मेलवंकी (विजापूर, कर्नाटक), तृतीय क्रमांक अथर्व वैरागकर (नाशिक, महाराष्ट्र) यांना मिळाला. विजेत्या स्पर्धकांना ज्येष्ठ गायिका अभिनेत्री विदुषी निर्मला गोगटे, पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, पंडित सुहास व्यास यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ग्रेस फाऊंडेशनचे अध्यक्ष शशी व्यास आणि स्पर्धेच्या संकल्पक प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर उपस्थित होत्या. द्वितीय क्रमांकास प्रत्येकी 75 हजार तर तृतीय क्रमांकास प्रत्येकी 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे (ग्रेस) प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त देशपातळीवर घेण्यात आलेल्या गुणीजान बंदिश राष्ट्रीय स्पर्धेची उपउपांत्य, उपांत्य आणि अंतिम फेरी डॉ. श्रीराम लागू रंगावकाश, हिराबाग, पुणे येथे घेण्यात आली. अंतिम फेरीतील स्पर्धेसाठी महिला गटात आद्या मुखर्जी, सोमदत्ता चॅटर्जी, युगंधरा केचे, नंदिनी गायकवाड, स्वाती तिवारी, तेजस्विनी वेर्णेकर तर पुरुष गटात इशान घोष, अथर्व वैरागकर, ऋषिकेश करमरकर, मेहेर परळीकर, दर्शन मेलवंकी, चैतन्य परब यांची निवड करण्यात आली होती.

स्पर्धेविषयी बोलताना परीक्षक तालयोगी पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, तालाचा छंद होतो आणि रागाची धून होते या छंद आणि धून मधून बंदिशीची निर्मिती होते, जी ठोस विधानाकडे जाते. अमूर्ताकडून मूर्ताकडे जाताना मूळ बंदिशीचे भान असणे ही तारेवरची कसरत असते. स्पर्धकांनी पुढील सांगीतिक वाटचालीत बंदिश सादर केली तर या स्पर्धेचे सार्थक झाल्यासारखे होईल. या स्पर्धेचे आयोजन म्हणजे पंडित सी. आर. व्यास यांना खऱ्या अर्थाने दिलेली मानवंदना आहे.

पंडित सी. आर. व्यास यांचे ज्येष्ठ पुत्र आणि परीक्षक पंडित सुहास व्यास म्हणाले, स्पर्धकांनी आपल्या गुरूंकडून पारंपरिक बंदिशी शिकणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक बंदिश ही परंपरेतूनच आलेली असते. पंडित सी. आर. व्यास यांच्या बंदिशी या त्यांच्या गुरूंची कृपा, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि आध्यात्मिक बैठकीतून आकारास आल्या आहेत. मैफलीत बंदिशींचे सादरीकरण करताना त्या पाठ असणे आणि त्यांचे आवर्तन बांधता येणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

स्पर्धेविषयी बोलताना अपर्णा केळकर म्हणाल्या, सांगीतिक विचारांची देवाण-घेवाण व्हावी तसेच पंडित सी. आर. व्यास यांच्या बंदिशींमधील रागविचार, सांगीतिक आणि साहित्यिक मूल्य पुढील पिढीपर्यंत पोहोचावे या करीता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचे संयोजक आणि ग्रेस फाऊंडेशनचे अध्यक्ष शशी व्यास स्पर्धेच्या आयोजनामागील प्रवास उलगडगला. आभार गेयता व्यास यांनी मानले.

स्पर्धेच्या निमित्ताने बंगळुरू येथील युवा गायक सिद्धार्थ बेलमन्नू यांचे शास्त्रीय गायन झाले. अजिंक जोशी (तबला), निलय साळवी (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

चित्तथरारक एअर शो द्वारे फ्रान्सच्या कलाकारांनी जिंकली पुणेकरांची मने

पॅरिस 2024 ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनातही `रोझेओ’(RoZéO) एअर शो ने दिला होता अविस्मरणीय अनुभव

पुणे : मैदानात रोवलेले तीन लवचिक खांब… त्यावर संगीताच्या तालावर चपळतेने चढून काळजाचा ठोका चुकवणा-या कसरती करणारे कलाकार… वेगवेगेळ्या चित्तथरारक करसतींना मिळणारी प्रेक्षकांची उत्फूर्त दाद…. फ्रान्सच्या कलाकारांनी हवेतील वेगवेगळ्या कसरतींद्वारे दाखवलेल्या अचूकतेची आणि उत्कृष्टतेची एक झलक पाहून पुणेकर प्रेक्षक अक्षरश: थक्क झाले. पुणेकरांना हा अनोख्या कसरतींचा एअर शो रविवारी अनुभवला. निमित्त होते दी फ्रेंच इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया, अलायन्स फ्राँसेज नेटवर्कच्या साथीने पुणेकरांसाठी एक चित्तथरारक अनुभव देणार-या ‘rozeo’ (रोझेओ) हवाई शोचे.

हडपसरमधील अॅमोनोरा माॅल येथे रविवारी सायंकाळी प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत रंगलेल्या या शोचे आयोजन स्टेफान जेरार्ड आणि अलयांस फ्राँसेज पुणेच्या संचालिका आमेली विजल यांनी केले होते. फ्रेंच संस्कृतीची झलक दाखविणाऱ्या या हवाई शो ने नुकतेच पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिक 2024 स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात आपल्या सादरीकरणाने चार चांद लावले होते.

RoZéO(रोझेओ),हे स्तेफान जिरार्ड आणि कॅमिए बोमिए यांनी पॉलीन फ्रेमोच्या रचना आणि आन जोनाथनच्या कलाकृतींसह तयार केलेली एक अद्वितीय जिवंत प्रस्तुती आहे ज्यामुळे उपस्थित प्रेक्षक प्रफुल्लित झाले. आकाशाच्या पटलावर हा शो जिवंत करण्यासाठी कलाकारांनी काव्यात्मक पद्धतीने आणि नाजूक हालचाली करीत कलाकुसरीने सादरीकरण केले. किमान ६ मीटर उंचीच्या धातूच्या खांबांवर हलक्या हाताने डोलणाऱ्या आकृत्या, कॅमर्ग्यूच्या रीडबेडवर जागृत केल्या. संगीताच्या लयबद्ध तालीवर इलेक्ट्राॅनिक्स आणि फिल्ड रेकाॅर्डिंग व साऊंडस्केपसह ४२ मिनिटांची ही सुंदर प्रस्तुतीने प्रेक्षकांमध्ये एक चिंतनशील वातावरणाची निर्मिती केली. कलाकारांच्या या प्रस्तुतीदरम्यान कला आणि निसर्ग एकमेकांशी समरूप झाल्याचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला. तसेच कलाकारांना टाळ्यांच्या कडकडाटांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

जगभरात काही मोजक्याच शहरांत या शोचे आयोजन करण्यात आले. भारतातील पाच शहरांत हा शो आयोजित केला जात आहे. यात पुण्याचाही समावेश होता. ‘RoZeo’ आणि इतर रोमांचक विविध सांस्कृतिक प्रस्तुतींसह अलायन्स फ्रँन्सासेस नेटवर्क भारत आणि फ्रान्स या दोन देशांमधील कलात्मक देवाणघेवाण आणखी मजबूत करीत आहे. ही नाविन्यपूर्ण निर्मिती आमच्या कलात्मक समुदायांना जोडणारे एक बंधन म्हणून काम करेल. अन् फ्रान्सच्या कलाकृतीचे दर्शन घडवेल. असे कार्यक्रमाच्या संयोजिका स्टेफान जेरार्ड आणि अलयांस फ्राँसेज पुणेच्या संचालिका आमेली विजल यांनी यावेळी सांगितले.

रोझियोचा 2023 मध्ये प्रीमियर झाला तसेच त्याच्या ऑलिम्पिक कामगिरीनंतर, कलात्मक दिग्दर्शक थॉमस जॉली यांनी तयार केलेल्या उद्घाटन कार्यक्रमाचा भाग म्हणून, त्यांच्या स्वप्नवत नृत्यदिग्दर्शनासाठी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली आहे.

चंद्रकांतदादा पाटील म्हातोबाच्या चरणी लीन

कोथरूडमध्ये भाजपा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष

पुणे:

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोथरुडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नामदार पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, रिपाइंचे ॲड. मंदार घाटे, भाजपा कोथरूड दक्षिण अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुनीत जोशी, गणेश कळमकर, सुशील मेंगडे, गिरीश भेलके, लहू बालवडकर, प्रल्हाद सायकर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा कांचन कुंबरे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी नेहमीच पात्र राहत आलो आहे. मला उमेदवारी दिल्याबद्दल माननीय नरेंद्र मोदी, अमितभाई शाह, जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह सर्वांचे मनापासून आभार मानतो. कोथरूड विधानसभा मतदारसंघामधील सर्व मतदारांनी भारतीय जनता पक्ष महायुतीवर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. लोकसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना ७५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले. विधानसभा निवडणुकीत ही कोथरूडची जनता भारतीय जनता पक्ष महायुतीला भरभरून आशीर्वाद देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, आपल्या पक्ष नेतृत्वाने चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एक लाखाच्या मताधिक्याने दादांना विजयी करायचं आहे. आजपासून प्रत्येक मिनिट आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा आहे. भारतीय जनता पक्ष महायुयीचे सैन्य आपल्या सेनापतीला विजयी केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्प यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

लाचेची मागणी करणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी- पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर

बारामती, दि. 20: लोकसेवकाने कामे करण्याकरिता नागरिकांकडे लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064 किंवा पुणे कार्यालयाच्या 020-26132802, 26122134 तसेच 7875333333 या व्हॉटस्अप क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभागृह इंदापूर येथे आयोजित जनजागृती मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

नागरिकांना भ्रष्टाचाराच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार करता येते, असे सांगून श्री. निंबाळकर म्हणाले, नागरिकांना विभागाच्या कामकाजाविषयी माहिती होण्याकरीता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी लाच लुचपत विभागाची रचना व कार्यपद्धती विषयी माहिती दिली. अशा प्रकारच्या मेळाव्यामुळे ‌लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व नागरिकांमधील दरी कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांमध्ये विभागाविषयी असलेले गैरसमज, शंकाचे त्यांनी निराकरण केले.

विभागाकडे तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तसेच त्या प्रकरणाच्या अनुषंगाने संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. निंबाळकर म्हणाले.

विभागाच्यावतीने तालुक्यात सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी, शासकीय कार्यालय, शाळा व महाविद्यालय, बाजारपेठ आदी ठिकाणी जनजागृतीच्या अनुषंगाने हस्तपत्रिका, भिंतीपत्रके वितरीत करण्यात आल्या.
0000

जनतेचा आशिर्वाद भाजपा नेत्यां च्या शुभेच्छा यामुळेच मला पुन्हा उमेदवारी :सिध्दार्थ शिरोळे

पुणे- जनतेचा. ज्येष्ठांचा आशिर्वाद ,भाजपा नेत्यांच्या शुभेच्छा यामुळेच भाजपने मला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातून उमेदवारी दिली आहे उमेदवारी हा देखील मी माझा सन्मान मानतो त्यामुळे या दोहोंच्या विश्वासाला मी कधी तडा जाईल असे काहीही करणार नाही त्यांचा विश्वास जपण्याचे काम करून त्यांचे जीवनमान कसे सुरळीत राहून उंचावेल या साठी प्रयत्न करत राहील असे सिद्धार्थ शिरोळे यांनी म्हटले आहे.भाजपच्या पहिल्या ९९ उमेदवारांच्या यादीत शिरोळे यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले कि , पुण्याच्या छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातून मला पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचा मनापासून आभारी आहे. शिवाजीनगरच्या रहिवाश्यांचा आशीर्वाद व पाठींबा, तसेच गेल्या ५ वर्षात माझ्या कार्यसमुहाने दिलेल्या सातत्यपूर्ण सेवेमुळे मला शिवाजीनगर मतदार संघाचे मतदार पुन्हा एकदा आर्शिवाद देवून त्यांचे प्रतिनिधित्व करण्यास विधानसभेत पाठवतील असा मला विश्वास आहे. 

मी रडणारा नाही लढणारा कार्यकर्ता – उमेदवारी नाकारल्यावरही भिमालेंचा तोच पवित्रा ?

पुणे- भाजपचे निष्ठावंत आणि आक्रमक नेते म्हणून गणना होत असलेले पुण्यातील श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या बाबत दाखविलेला विश्वास … आज फोल ठरल्याचे स्पष्ट झाले. पर्वती विधानसभा मतदार संघातून भिमाले यांनी दंड थोपटले होते आणि त्यांच्या प्रबळ आत्म विश्वासामुळे त्यांच्या मागे कोणी बडा नेता असल्याचे अनेकांना वाटू लागले होते . परंतु आज विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना पक्षाने चौथ्या वेळी देखील पक्षाच्या वतीने उमेदवारी देऊन लढण्याची संधी दिली आणि भिमालेना संधी नाकारली .यामुळे ,रिक्षावाले, मोल मजुरी करणारे , मध्यमवर्गीय तसेच व्यापारी अशा विविध स्तरावर मतदार संघात पूर्णतः पोहोचलेले भिमाले आता काय करणार ? असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांनी मी रडणारा नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे असे सांगून … कार्यकर्ते आणि नागरिक यांच्याशी बोलून निर्णय घेण्यासाठी २ दिवसांचा अवधी ठेवला आहे त्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत .

चिंचवडमधून विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्या ऐवजी शंकर जगताप यांना उमेदवारी -पहा भाजपच्या पहिल्या यादीतले 99 उमेदवार

पुणे-पुण्यातील चिंचवडमधून विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांना तिकीट नाकारून, तिथे शंकर जगताप यांना तिकीट देण्यात आलीय. अश्विनी जगताप या पती लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या.

भाजपच्या पहिल्या यादीतले 99 उमेदवार :

1) नागपूर दक्षिण पश्‍चिम – देवेद्र फडणवीस

2) कामठी – चंद्ररशेखर बावनकुळे

3) शहादा (आजजा) – राजेश पाडवी

4) नंदुरबार (अजजा) – विजयकुमार गावीत

5) धुळे शहर – अनुप अग्रवाल

6) शिंदखेडा – जयकुमार रावल

7) शिरपूर (अजजा) – काशिराम पावरा

8) रावेर – अमोल जावळे

9) भुसावळ (अजा) – संजय सावकारे

10) जळगांव शहर – सुरेश भोळे

11) चाळीसगाव – मंगेश चव्हाण

12) जामनेर – गिरीश महाजन

13) चिखली – श्वेता महाले

14) खामगांव – आकाश फुंडकर

15) जळगांव (जामोद) – डॉ. संजय कुटे

16) अकोला पूर्व – रणधीर सावरकर

17) धामणगांव रेल्वे – प्रताप अडसद

18) अचलपूर – प्रवीण तायडे

19) देवळी – राजेश बकाने

20) हिंगणघाट – समीर कुणावार

21) वर्धा – डॉ. पंकज भोयर

22) हिंगणा – समीर मेघे

23) नागपूर-दक्षिण – मोहन मते

24) नागपूर-पूर्व – कृष्णा खोपडे

25) तिरोडा – विजय रहांगडाले

26) गोंदिया – विनोद अग्रवाल

27) आमगाव (अजजा) – संजय पुराम

28) आरमोरी (अजजा) – कृष्णा गजबे

29) बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार

30) चिमूर – बंटी भांगडिया

31) वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार

32) राळेगांव – अशोक उइके

33) यवतमाळ – मदन येरावार

34) किनवट – भीमराव केराम

35) भोकर – श्रीजया चव्हाण

36) नायगांव – राजेश पवार

37) मुखेड – तुषार राठोड

38) हिंगोली – तानाजी मुटकुळे

39) जिंतूर – मेघना बोर्डीकर

40) परतूर – बबनराव लोणीकर

41) बदनापूर (अजा) – नारायण कुचे

42) भोकरदन – संतोष दानवे

43) फुलंब्री – अनुराधा चव्हाण

44) औरंगाबाद पूर्व – अतुल सावे

45) गंगापूर – प्रशांत बंब

46) बागलान (अजजा) – दिलीप बोरसे

47) चंदवड – डॉ. राहुल अहेर

48) नाशिक पूर्व – अॅड. राहुल ढिकाले

49) नाशिक पश्चिम – सीमा हिरे

50) नालासोपारा – राजन नाईक

51) भिवंडी पश्चिम – महेश चौघुले

52) मुरबाड – किसन कथोरे

53) कल्याण पूर्व – सुलभा गायकवाड

54) डोंबिवली – रवींद्र चव्हाण

55) ठाणे – संजय केळकर

56) ऐरोली – गणेश नाईक

57) बेलापूर – मंदा म्हात्रे

58) दहिसर – मनिषा चौधरी

59) मुलुंड – मिहिर कोटेचा

60) कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर

61) चारकोप – योगेश सागर

62) मलाड पश्चिम – विनोद शेलार

63) गोरेगाव – विद्या ठाकूर

64) अंधेरी पश्चिम – अमित साटम

65) विले पार्ले – पराग अळवणी

66) घाटकोपर पश्चिम – राम कदम

67) वांद्रे पश्चिम – अॅड. आशिष शेलार

68) सायन कोळीवाडा – आर. तमिल सेल्वन

69) वडाळा – कालिदास कोळंबकर

70) मलबार हिल – मंगलप्रभात लोढा

71) कोलाबा – अ‍ॅड. राहुल नार्वेकर

72) पनवेल – प्रशांत ठाकूर

73) उरण – महेश बाल्दी

74) दौंड – अ‍ॅड. राहुल कुल

75) चिंचवड – शंकर जगताप

76) भोसरी – महेश लांगडे

77) शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे

78) कोथरूड – चंद्रकांत पाटील

79) पर्वती – माधुरी मिसाळ

80) शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील

81) शेवगांव – मोनिका राजळे

82) राहुरी – शिवाजीराव कार्डिले

83) श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते

84) कर्जत जामखेड – राम शिंदे

85) केज (अजा) – नमिता मुंदडा

86) निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर

87) औसा – अभिमन्यू पवार

88) तुळजापूर – राणा जगजीतसिंह पाटील

89) सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख

90) अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी

91) सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख

92) माण – जयकुमार गोरे

93) कराड दक्षिण – अतुल भोसले

94) सातारा – शिवेंद्रराजे भोसले

95) कणकवली – नितेश राणे

96) कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक

97) इचलकरंजी – राहुल आवाडे

98) मिरज – सुरेश खाडे

99) सांगली – सुधीर गाडगीळ

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकृती

जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांचे पत्ते जाहीर

पुणे, दि. २०: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार २२ ऑक्टोबर २०२४ पासून संबंधित विधानसभा मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांचे पत्ते जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जाहीर केले आहेत.

निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी २२ ते २९ ऑक्टोबर असून या नामनिर्देशन पत्रांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी आहे. ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ही सर्व प्रक्रिया संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात केली जाणार आहे.

विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाचे पत्ते पुढीलप्रमाणे:

१९५- जुन्नर विधानसभा मतदार संघ- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पल्लवी घाडगे (भ्रमणध्वनी क्र. ९७६३७१५७९७), पंचायत समिती कार्यालय, जुन्नर, ई-मेल- aro195junnar@gmail.com), १९६- आंबेगाव विधानसभा मतदार संघ- निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे (मो. क्र. ९४२३११६६११) पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, आंबेगाव, ई-मेल- aro196ambegaon@gmail.com, aaro196ambegaon@gmail.com असा पत्ता आहे.

१९७- खेड आळंदी विधानसभा मतदार संघ- निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे (भ्र. ध्व. ९८५०७२२०३०), पत्ता- उपविभागीय अधिकारी दालन, पहिला मजला, उपविभागीय कार्यालय, खेड(राजगुरूनगर) ई-मेल- aro197khed@gmail.com, aaro197khed@gmail.com, १९८- शिरूर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता राजापूरकर (भ्र. ध्व. ९४०४६४१०२०), पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, जुना अहमदनगर-पुणे रस्ता, शिरूर ई-मेल ro198shirur@gmail.com असा पत्ता आहे.

१९९- दौंड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला (भ्र. ध्व. ७६२०४४८००१), पत्ता- तहसील कार्यालय, दौंड, ई-मेल sdodaund2023@gmail.com, २००- इंदापूर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे (भ्र.ध्व. ७०२१२९७४६३) पत्ता- तहसील कार्यालय, इंदापूर, ई-मेल slao1pune@gmail.com, २०१- बारामती विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर (भ्र.ध्व. ७४९९८१८४४७) पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, बारामती ई-मेल sdobaramati12@gmail.com असा पत्ता आहे.

२०२- पुरंदर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे (भ्र. ध्व. ८४०८०८९३७६), पत्ता- उपविभागीय अधिकारी दालन, उपविभागीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, सासवड, ता.पुरंदर ई-मेल sdopdp2013@gmail.com, २०३- भोर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी विकास खरात (भ्र.ध्व. ८८३०३३३७४८), पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, राजवाडा चौक, भोर, ई-मेल sdobhor@gmail.com) असा पत्ता आहे.

२०४- मावळ विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले (भ्र.ध्व. ७०२००४६४६१), पत्ता- तहसील कार्यालय, वडगाव मावळ, ई- मेल sdomaval@gmail.com, २०५- चिंचवड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार (भ्र. ध्व. ९४२२९४३५४९), पत्ता- पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, थेरगांव, पुणे, ई-मेल 205chinchwadele@gmail.com, २०६- पिंपरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अर्चना यादव (भ्र.ध्व. ९७६७२१८९०१), पत्ता- डॉ. हेडगेवार भवन, सेक्टर नं. २६, निगडी, पुणे, ई-मेल 206pimpriac2014@gmail.com असा पत्ता आहे.

२०७- भोसरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे (भ्र. ध्व. ९०११०३३००७), पत्ता- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बहुउद्देशीय सभागृह, सेक्टर नं. १८, पूर्णानगर, चिखली, पुणे, ई-मेल 207bhosari2013@gmail.com, २०८- वडगांव शेरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर (मो. क्र. ९८२२८७३३३३), पत्ता- सहाय्यक आयुक्त कार्यालय, येरवडा-कळस-धानोरी झोनल कार्यालय, पुणे महानगरपालिका, पुणे, ई-मेल 208vadgaonsheri2024@gmail.com असा पत्ता आहे.

२०९- शिवाजीनगर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव (भ्र. ध्व. ९४२३३०७७११) पत्ता- साने गुरुजी ग्रंथालय, दुसरा मजला, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे, ई-मेल 209shivajinagar@gmail.com, २१०- कोथरूड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे (भ्र. ध्व. ८६६८४३७२५७), पत्ता- कै. अनुसयाबाई खिलारे शाळा, एरंडवणे, पुणे, ई-मेल aro210kothrud@gmail.com असा पत्ता आहे.

२११- खडकवासला विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने (भ्र. ध्व. ७३५०५३०३३३), पत्ता- पहिला मजला, एस.के.एन.एस.एस.बी.एम. इमारत, सिंहगड कॉलेज कॅम्पस, मध्यवर्ती ग्रंथालयाजवळ, आंबेगाव बुद्रुक, ता. हवेली, पुणे ई-मेल sdopune@gmail.com, २१२- पर्वती विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी मनोज खैरनार (भ्र. ध्व. ९४२३४६२५५५), पत्ता- दुसरा मजला, कै. बाबुराव सणस क्रीडांगण, सारसबागेजवळ, पुणे, ई-मेल ro212parvati@gmail.com असा पत्ता आहे.

२१३- हडपसर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे (भ्र. ध्व. ९१५८८६२९२७), पत्ता- पुणे महानगरपालिकेचे विठ्ठल तुपे पाटील ऑडिटोरियम, माळवाडी, हडपसर, पुणे, ई-मेल 213hadapsarac@gmail.com, २१४- पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे (भ्र.ध्व. ९५९५६५६५७७), पत्ता- भारतरत्न सर विश्वेश्वरैय्या सभागृह, पीडब्ल्यूडी उपविभाग क्र. ५, तिसरा मजला, असेरनल प्लॉट, सागर प्लाझा समोर, पुणे कॅम्प, पुणे, ई-मेल 214punecant@gmail.com, असा पत्ता आहे.

२१५- कसबा पेठ विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती स्नेहा किसवे-देवकाते (भ्र.ध्व. ९६०४१४६१८६) या निवडणूक निर्णय अधिकारी असून त्यांच्या कार्यालयाचा पत्ता गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेटजवळ, ई-मेल ero215kasba@gmail.com) असा आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मिनल कळसकर यांनी दिली आहे.
0000

चित्रपट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा-अभिनेता प्रसाद ओक

;  याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) वर्धापन दिन सोहळा ; प्रसाद ओक, मंदार आगाशे यांना यंदाचा युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार
पुणे : आज फिल्म इंडस्ट्री विकसित झाली आहे तरी त्याला उद्योगाचा दर्जा मिळत नाही. ताण-तणाव विसरण्यासाठी उद्योजक आमचा उपयोग करून घेतात पण तरीही सिने क्षेत्राला उद्योगाचा दर्जा नाही. या क्षेत्रालाही व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे, असे मत अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी व्यक्त केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या वर्धापनदिनानिमित्त टिळक स्मारक मंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कॉसमॉस बँकेचे सचिन आपटे,  सृजन आर्ट गॅलरीचे चारुहास पंडित, संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी व कार्यवाह श्रीकांत जोशी उपस्थित होते.
सोहळ्यांतर्गत सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार व स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार अनुक्रमे अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता प्रसाद ओक आणि सर्वत्र टेक्नॉलॉजीज प्रा. लि. चे संस्थापक, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मंदार आगाशे यांना प्रदान करण्यात आला.  सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रसाद ओक म्हणाले, कलाकारांना सुद्धा व्यावसायिक समजले गेले पाहिजे. त्यांचे कुटुंब त्यांच्या व्यवसायावर अवलंबून असते. व्यावसायिक कलाकार म्हणून दर्जा मिळण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत, असेही ओक यांनी सांगितले.
सचिन आपटे म्हणाले, जेव्हा मेहनतीचा पाया मजबूत असतो तेव्हाच यशाला चकाकी येते. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आपण आहोत. देशातील प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे तरच देशाचा विकास होईल.
मंदार आगाशे म्हणाले, व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा यूपीआय आणि कार्ड पेमेंट हे भारतात नवे होते. सुरुवातीचे सहा महिने लोकांनी केलेली टीका सहन केली. परंतु मी आणि माझ्या टीमने एक ध्येय ठेवले होते, त्यातूनच सर्वत्र टेक्नॉलॉजी नावारूपास आले.
चारुहास पंडित म्हणाले,  मराठी ब्राह्मण कुटुंबात कलेच्या प्रांतात जाणारे लोक कमी असतात आणि कलेच्या प्रांतात जाताना सर्वात जास्त विरोध घरातूनच होत असतो. कुठेतरी मुलांना एक स्फूर्ती मिळावी की कलेच्या प्रांतात पण बरच काही करता येऊ शकते आणि त्यांच्या आई-वडिलांना पण कुठेतरी आशा दिसावी की  यात करिअर होऊ शकते या दृष्टीने कलाक्षेत्रातील पुरस्कार देण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले. मंजुषा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. आशिष कुलकर्णी यांनी आभार मानले.