Home Blog Page 558

ताहिर राज भसीनचा हिट शो : ‘ये काली काली आंखें 2’ 10 देशांत गाजतोय

प्रेक्षकांना आता सिझन ३ ची प्रतीक्षा – २ आणायला किती उशीर केला अशीही तक्रार

गेल्या शुक्रवारी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला ‘ये काली काली आंखें’ सीझन 2 ..

गुन्हा, प्रेम, वेड आणि हत्येच्या जबरदस्त मिश्रणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. सध्या हा शो भारत, बहरेन, मालदीव, मॉरिशस, यूएई, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, कतर आणि ओमान अशा 10 देशांत ट्रेंडमध्ये आहे, जे याच्या जागतिक लोकप्रियतेचे आणि कथानकाच्या तीव्रतेचे द्योतक आहे.

या शोच्या केंद्रस्थानी ताहिर राज भसीन याचा दमदार अभिनय आहे, जो एका अशा व्यक्तीची भूमिका साकारतो, जो सतत धोके आणि असहायतेचा चक्रात अडकलेला असतो. त्याच पात्र एक सामान्य व्यक्तीच्या आतून बदल होत जाण्याचा त्रासदायक प्रवास दाखवतो, जो बाहेरील धोके आणि अंतर्गत संघर्षामुळे ग्रस्त आहे. जसजसे प्रसंग गंभीर होतात आणि प्रेम व वेडामध्ये सीमारेषा अस्पष्ट होतात, तसतसे प्रेक्षकांना थरारक, भावनांनी भरलेला आणि अनपेक्षित वळणांचा प्रवास अनुभवायला मिळतो.

ताहिर म्हणतो, “पहिल्या सीझनच्या प्रचंड यशानंतर, ज्याने जागतिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले, दुसऱ्या सीझनला 10 देशांमध्ये अधिक प्रेम आणि कौतुक मिळणे हे माझ्यासाठी कलाकार म्हणून अत्यंत सन्मानजनक आहे. दुसरा सीझन बनवताना, पहिल्या यशाच्या अपेक्षांना सामोरे जाण्याचा ताण असतो, पण आम्हाला आनंद आहे की आम्ही सीझन 2 च्या ‘कर्स’ ला तोडले आणि आमच्या चाहत्यांचे उत्तम मनोरंजन केले. या सिक्वेलसाठी मिळालेला प्रचंड प्रतिसाद खूप उत्साहवर्धक आहे.”

तो पुढे म्हणाला,
“माझ्या सहकलाकारांचे आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार, ज्यांच्या मेहनतीमुळे हा प्रवास अविस्मरणीय झाला. हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत समृद्ध करणारा होता, आणि भविष्यात आणखी दमदार कथा सादर करण्याची संधी मिळण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”

सीझन 2 पात्रांच्या गुंतागुंतींना आणखी खोलवर नेतो. ताहिरचा अभिनय भीती, अस्तित्वासाठी संघर्ष, आणि भ्रष्टाचार व फसवणुकीने भरलेल्या जगात घेतलेल्या निर्णयांचे परिणाम या सर्वांचा प्रभावी प्रवास दर्शवतो. या शोची गडद थीम इतक्या तीव्रतेने मांडण्याची क्षमता याला क्राइम थ्रिलर श्रेणीत वेगळं स्थान मिळवून देते आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवते.

सिझन १ आणि २ चे सर्व भाग एकाच वेळी लागोपाठ लोकांनी पहिले आणि आता सिझन ३ ची देखील प्रतीक्षा करत आहेत . मुळात लोकांना सिझन २ साठी खूपच प्रतीक्षा करावी लागली .. आता ३ तरी कधी आणणार असा लोकांचा सवाल आहे.

(Sharad Lonkar)

EVM हॅक करण्याचा दावा करणाऱ्यावर FIR:आरोपी म्हणाला होता – 53 कोटी द्या, महाराष्ट्रात 63 जागांवर EVM हॅक करू

मस्क म्हणाले होते- ईव्हीएम हॅक होऊ शकते

राहुल गांधी म्हणाले होते – भारतातील ईव्हीएम ब्लॅक बॉक्ससारखे

मुंबई-इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) हॅक केल्याचा दावा करणाऱ्या सय्यद शुजाविरोधात निवडणूक आयोगाने एफआयआर दाखल केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी दक्षिण मुंबईतील सायबर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) आणि IT कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.14 नोव्हेंबरला सय्यद शुजाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये तो महाराष्ट्र निवडणुकीत वापरण्यात येणारे ईव्हीएम हॅक करू शकतो, असा दावा करत होता. 53 कोटी रुपये दिले तर 63 जागांचे ईव्हीएम हॅक करू, अशी ऑफरही त्यांनी नेत्यांना दिली होती.सय्यद शुजा हैदराबाद येथील सायबर सुरक्षा संशोधक आहेत. सध्या तो कॅनडामध्ये आहे.

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) म्हणाले की, ईव्हीएम हॅकिंगचे दावे निराधार, खोटे आणि अप्रमाणित आहेत.महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान सय्यद शुजा यांनी निवडणूक जिंकण्यासाठी काही नेत्यांशी संपर्क साधला होता. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तो ईव्हीएम हॅक करू शकतो, असा दावा त्याने केला होता. त्यासाठी तो पैसे घेईल. तो अमेरिकेच्या संरक्षण खात्यात कंत्राटावर काम करत असल्याचेही शुजाने सांगितले होते.सय्यद शुजा यांनी 21 जानेवारी 2019 रोजी लंडनमध्ये इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन (IJA) च्या पत्रकार परिषदेतही असाच दावा केला होता. आपण 2009 ते 2014 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ICIL) मध्ये काम केल्याचे शुजाने सांगितले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन बनवणाऱ्या टीमचा तो एक भाग होता. एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा वापर करून या मशीन्समध्ये छेडछाड केली जाऊ शकते, असे त्याने सांगितले होते.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आले हाते आणि त्यावरच भाजपने विजय मिळवला होता, असा दावा शुजा याने केला होता. काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी या दाव्यांचा मुद्दा बनवून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले होते.2019 मध्येही निवडणूक आयोगाने शुजाविरोधात दिल्लीत एफआयआर दाखल केला होता. मात्र, त्यानंतर या प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. तर, ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असून वायफाय किंवा ब्लूटूथसह कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट केले जाऊ शकत नाहीत, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते

मस्क म्हणाले होते- ईव्हीएम हॅक होऊ शकते
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांनी 15 जून रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉर्म एक्सवर लिहिले होते – ईव्हीएम रद्द केले पाहिजे. हे मानव किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका आहे. हा धोका कमी असला तरी तो खूप जास्त आहे. अमेरिकेत यातून मतदान होऊ नये.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मस्क यांच्या पोस्टला रिपोस्ट करत म्हटले होते की, भारतातील ईव्हीएम ब्लॅक बॉक्ससारखे आहेत. त्याची चौकशी करण्याची कोणालाही परवानगी नाही. आमच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही एक ढोंग बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते.

सर्वोच्च न्यायालय आणि सत्ताधारी यांनी भारतातील EVM वर अनेक वेळा विश्वास व्यक्त केला भाजप नेते आणि माजी आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, मस्कच्या मते, कोणीही सुरक्षित डिजिटल हार्डवेअर बनवू शकत नाही, हे चुकीचे आहे. त्यांचे विधान यूएस आणि इतरत्र लागू होऊ शकते, जिथे ते इंटरनेट-कनेक्टेड मतदान यंत्रे तयार करण्यासाठी नियमित संगणकीय प्लॅटफॉर्म वापरतात.भारतीय ईव्हीएम सुरक्षित आहेत आणि कोणत्याही नेटवर्क किंवा मीडिया पेक्षा वेगळे आहेत. त्याला कोणती कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ, वायफाय, इंटरनेट नाही. त्यामुळे त्याला हॅक करायचा कोणताही मार्ग नाही. फॅक्टरी प्रोग्राम केलेले नियंत्रक असतात, जे पुन्हा प्रोग्राम केले जाऊ शकत नाहीत. ईव्हीएमची रचना भारतात तशीच केली आहे. भारतात ते हॅक करणे शक्य नाही.या वर्षी एप्रिलमध्ये, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) मते आणि व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) स्लिप्सच्या 100% क्रॉस-चेकिंगच्या मागणीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या मागणीशी संबंधित याचिका सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आल्या. याशिवाय अनेक राजकीय पक्षांशी संबंधित लोक ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळा ईव्हीएमवर विश्वास व्यक्त केला आहे.

उरी पेक्षा मोठ्या गोष्टी करणे भारताला शक्य: निंभोरकर

पुणे :

मनुष्यबळ विकास (एचआर)आणि व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘ओएचआर फाउंडेशन ‘च्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्या ‘अनटोल्ड स्टोरी: सर्जिकल स्ट्राईक – उरी’ या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.निंभोरकर हे उरी सर्जिकल स्ट्राईकमधील नेतृत्वासाठी प्रसिद्ध आहेत.

हे व्याख्यान शनिवार,दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता, काळे सभागृह, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, बीएमसीसी रस्ता, (डेक्कन, पुणे)येथे झाले.प्रवेश मोफत होता.फाउंडेशनतर्फे वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी प्रेरक व्याख्यानांचे आयोजन केले जाते.

जितेंद्र पेंडसे यांनी प्रास्ताविक केले, उपक्रमांची माहिती दिली. महेश करंदेकर,मिलिंद काळे, बिपीन घाटे ,प्रशांत इथापे, विश्वस्त उपस्थित होते. सुक्रीती छेत्री यांनी सूत्रसंचालन केले.

राजेंद्र निंभोरकर म्हणाले,’उरी सर्जिकल स्ट्राईक पहाटे करताना भारतीय सैन्यदलाने अचूक नियोजनाचा कळस करून दाखविला.अशा कामगिरीच्या वेळी सर्व प्रकारच्या हानी बरोबरच देशाची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते.मनोहर पर्रीकर यांच्यासारखा संरक्षणमंत्री असल्याने उरी सर्जिकल स्ट्राईक करणे हे शक्य झाले.त्या हल्ल्याचे थर्मल कॅमेर्‍याने चित्रीकरण केल्याने तो स्ट्राईक फर्जिकल नव्हता,हे सिद्ध करता आले. भारताने ही कामगिरी यशस्वी केल्याने जगात मान उंचावली. त्यानंतर २६/११ सारखे प्रकार झाले नाहीत.उरी पेक्षा मोठ्या गोष्टी करणे भारताला शक्य आहे.पण,त्या कोणत्या हे कोणीही सांगू शकत नाही.

मनुष्य बळ विकास हे अतिशय अवघड काम आहे.ते कौशल्यपूर्ण पद्धतीने करावे लागते. आपल्याकडील संसाधने वाचवावी लागतात. युद्धपरिस्थितीत नेत्यालाच चांगले निर्णय सुचतात, असे नाही,तर हाताखालील कनिष्ठ देखील निर्णयप्रक्रियेत मदत करतात. नेतृत्व करणे कोणत्याही क्षेत्रात सोपे नसते.शत्रूला बेसावध ठेवणे,चकित करणे महत्वाचे असते.वेळ साधणे महत्वाचे असते,असेही ते म्हणाले.

सैन्य दलाइतकी धर्मनिरपेक्ष व्यवस्था दुसरी कोणतीही नाही.आपण आपल्या सैन्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. त्यांच्या कामगिरी बदल प्रश्न उपस्थित करणे योग्य नसते.शाबासकीचा हात पुरेसा असतो,पारितोषिकांची गरज नसते,असे निंभोरकर यांनी नमूद केले.

भूदलाने सप्टेंबर २०१६मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे निंभोरकर हे मुख्य नियोजनकर्ता होते, तो हल्ला त्यांच्याच नेतृत्वात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर या व्याख्यानात त्यांनी देशाच्या लष्कराने लढलेले युद्ध व त्याची फलनिष्पत्ती, देशाच्या शस्त्रसामग्रीची सज्जता व उत्पादन स्थिती, सर्जिकल स्ट्राइकनंतर बदललेली मानसिकता यावर त्यांनी भाष्य केले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय सैन्य दलाविषयी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.निंभोरकर यांचा आयोजकानी सत्कार केला.
ओएचआर फाउंडेशन ११ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या दशकभरापासून, हे ज्ञानवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरले आहे, जे एचआर व्यावसायिक, कार्यकारी नेतृत्व आणि प्रतिष्ठित योगदानकर्त्यांना एकत्र आणते. २०१३ मध्ये स्थापनेपासून, ओएचआर फाउंडेशनने व्यावसायिक प्रगती आणि ज्ञानविनिमयाला प्रोत्साहन देण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवली आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम एचआर व्यावसायिक, प्रायोजक आणि कार्यकारी टीम सदस्यांच्या सातत्यपूर्ण योगदानातून साकार होत आहे. दोन हजाराहून अधिक सदस्य आहेत,अशी माहिती देण्यात आली.

55 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाची शानदार सोहळ्याने सांगता


आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये विक्रमी प्रतिनिधी संख्या, 28 देशांच्या परदेशी प्रतिनिधींचा सहभाग

फिल्म बझार मध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधींची  आतापर्यंतची  सर्वोच्च संख्या,  या उपक्रमाअंतर्गत 500  कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय प्रस्ताव सादर,  यंदाच्या महोत्सवाचे हे एक लक्षवेधी यश

मास्टरक्लास, आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच इंडियन  पॅनोरमा अंतर्गत चित्रपट प्रदर्शनाला हाउसफुल प्रतिसाद  

(Sharad Lonkar)

पणजी – प्रत्येक चांगल्या गोष्टीलाही अखेर असतेच, याच तत्वाला अनुसरून यंदा गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा, गोव्यातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडीयम मध्ये  28 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या शानदार आणि रंगतदार सोहळ्याने समारोप झाला. पण अर्थातच या महोत्सवाने आणि त्यांच्या रंगतदार सांगता सोहळ्याने सिनेमाची जादू आणि कथात्मक मांडणीची अतिव ओढ साजरी करण्याच्या भावनेवर स्वतःची अमिट छापही सोडली आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातील भविष्यातील उदयोन्मुख व्यक्तिमत्वांसाठीही या क्षेत्राचे अनेक प्रशस्त करण्याबाबतही आश्वस्त केले. यंदा झालेल्या आंतरराष्ट्रीय  भारतीय चित्रपट महोत्सवाच्या 2024 च्या पर्वात सुमारे 11,332 प्रतिनिधी सहभागी झाले होते. हे प्रमाण 2023 ला झालेल्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या प्रतिनिधींच्या तुलनेत तब्बल 12% नी जास्त आहे. या महोत्सवात भारतातील 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून आलेल्या प्रतिनिधींसह, विविध 28 देशांमधले  आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

या महोत्सवाच्या फिल्म बझार या उपक्रमात मागच्या वर्षी सहभागी झालेल्या प्रतिनिधींची संख्या 775 होती, या तुलनेत यंदाच्या महोत्सवात फिल्म बझार या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रतिनिधींच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आणि ती 1,876 वर पोहोचली. या उपक्रमात यंदा विविध 42 देशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विदेशी प्रतिनिधीही सहभागी झाले होते. यंदाच्या महोत्सवात फिल्म बझार  उपक्रमाअंतर्गत 500  कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय प्रस्ताव सादर झाले असून   यंदाच्या महोत्सवाचे हे एक लक्षवेधी यश आहे.  यावर्षीच्या महोत्सवात सहभागी झालेल्या प्रतिनिधींसाठी  टेक पॅव्हेलियन हा उपक्रमही एक वेधक उपक्रम ठरला. या उपक्रमाअंतर्गत 15 उद्योग भागीदार सहभागी झाले होते, या उद्योग भागीदारांकडून सुमारे 15.36 कोटी रुपयांचे प्रायोजकत्वही प्राप्त झाले.

यंदाच्या 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील महत्त्वाच्या घटनांचा ठळक सारांश खाली मांडला आहे.

उद्घाटन आणि समारोप सोहळा

या महोत्सवाच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याला भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय चंदेरी जगतातल्या अनेक नामवंत  कलाकारांनी हजेरी लावली होती. उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमासृष्टीला शताब्दी वर्षानिमीत्त तसेच भारतीय सिनेमाच्या समृद्ध वैविध्याला मानवंदना दिली  गेली. समारोप सोहळ्यात  संगीत आणि नृत्याची शानदार मैफल सजली होती. यावेळी उल्लेखनीय अपवादात्मक कारकिर्दिचा गौरव करताना फिलिप नॉयस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानीत केले गेले, तर अभिनेता विक्रांत मॅस्सी यांना वर्षातील भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्वाचा अर्थात इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करून गौरवले गेले.

समारोप सोहळा : अभिनेता विक्रांत मॅस्सी यांना वर्षातील भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्वाचा अर्थात इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार प्रदान केला गेला

आंतरराष्ट्रीय चित्रपट

यंदाच्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात  ‘इफ्फी’मध्ये 189 चित्रपटांची निवड केली  गेली होती. यासाठी सुमारे , 1,800 पेक्षा जास्त प्रवेशिका  आल्या होत्या, त्यातून हे चित्रपट निवडले गेले होते. यात 16 जागतिक प्रीमिअर, 3 आंतरराष्ट्रीय प्रीमिअर, 44 आशियायी प्रीमियर आणि 109 भारतीय प्रीमिअर्सचा समावेश होता.

या महोत्सवासाठी निवडल्या गेलेल्या 81 देशांमधील चित्रपटांनी विविध प्रकारच्या संस्कृती, त्यांचे विचार – तत्वे – मते आणि दृष्टीकोनाचे दर्शन घडवले. यंदाच्या महोत्सवातला स्पर्धात्मक विभागही खूपच रोमांचक होता. या विभागाअंतर्गत प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा पुरस्कारासाठी 15 चित्रपटांमध्ये स्पर्धा रंगली होती, तर युनेस्कोच्या   आंतरराष्ट्रीय  चित्रपट, दूरचित्रवाणी आणि दृकश्राव्य संवाद परिषदेच्या (International Council for Film, Television, and Audio-visual Communication – ICFT)  गांधी पदक विभागात 10 चित्रपटांमध्ये आणि दिग्दर्शक श्रेणीद्वारे सर्वोत्कृष्ट पदार्पणीय कथात्मक चित्रपटासाठी 7 चित्रपटांमध्ये अटितटीची स्पर्धा रंगली होती.

यंदाच्या महोत्सवात ऑस्ट्रेलियाचा समावेश विशेष लक्षवेधी देश म्हणून केला गेला होता. त्यामुळे या महोत्सवात दाखवल्या गेलेल्या चित्रपटांना वेगळीच झळाळी   मिळवून दिली. या विभागाअंतर्गत स्क्रीन ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या परस्पर सहकार्य विषयक कराराच्या अनुषंगाने सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन चित्रपटांचे खेळ दाखवले गेले. त्यानुसारच  या सोहळ्याचा उद्घाटनीय सिनेमा मायकेल ग्रेसी दिग्दर्शित बेटर मॅन हा ऑस्ट्रेलियायी चित्रपटाचा खेळ दाखवला गेला.

टॉक्सिक’ या लिथुआनियन चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा  सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला, रोमानियन दिग्दर्शक बोगदान मुरेसानु यांनी ‘द न्यू इयर दॅट नेव्हर केम’ साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार पटकावला

गाला प्रिमियर्स आणि रेड कार्पेट्स

पणजीत आयनॉक्स येथे आंतरराष्ट्रीय विभागातील 100 हून अधिक रेड कार्पेट इव्हेंट्स, इंडियन पॅनोरमा, गोवन सेक्शन आणि बियॉन्ड इंडियन पॅनोरमा प्रदर्शित करण्यात आले.

उद्घाटन समारंभात रेड कार्पेटवर आंतरराष्ट्रीय सिनेमा ज्युरी

55 व्या इफ्फीच्या उद्घाटन समारंभासाठी रेड कार्पेट

स्नो फ्लॉवरचे कलाकार आणि पथकाचे रेड कार्पेट

इंडियन पॅनोरमा

यावर्षी, इंडियन पॅनोरमा 2024 चा भाग म्हणून 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन-फीचर फिल्म्सची त्यांच्या चित्रपट विषयक उत्कृष्टतेमुळे निवड केली गेली. निवड प्रक्रिया संपूर्ण भारतातल्या सिनेसृष्टीतील नामवंत व्यक्तींच्या पॅनेलद्वारे आयोजित केली जाते ज्यात  फीचर फिल्म्ससाठी बारा ज्युरी सदस्य आणि नॉन फीचर फिल्म्ससाठी सहा ज्युरी सदस्य होते  त्यांच्या संबंधित अध्यक्षांनी प्रत्येकाचे नेतृत्व केले.

सृजनशीलतेच्या भवितव्याला आकार देण्यासाठी युवकांची  क्षमता ओळखून त्याला आकार देण्यासाठीच्या  माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या दृष्टीकोनाला  अनुसरून, ‘यंग फिल्ममेकर्स’” ही इफ्फीची संकल्पना आहे.इफ्फीची संकल्पना “तरुण चित्रपट निर्माते” वर केंद्रित आहे, क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो व्यासपीठाची योजना मागील आवृत्त्यांमधील 75 संख्येच्या तुलनेत  यंदा 100 तरुण प्रतिभांना समर्थन देण्यासाठी करण्यात आला.  मंत्रालयाने देशभरातील विविध चित्रपट शाळांमधील सुमारे 350 तरुण चित्रपट विद्यार्थ्यांना इफ्फीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले  होते. भारतातील तरुण चित्रपट निर्मिती प्रतिभेला ओळखण्यासाठी एक नवीन विभाग आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण भारतीय दिग्दर्शकाचा पुरस्कार स्थापित करण्यात आला आहे. तरुण निर्मात्यांसाठी मास्टरक्लास, पॅनल चर्चा, फिल्म मार्केट आणि फिल्म पॅकेजेस सर्व तयार केले गेले आहेत. इफ्फीएस्टा हे तरुणांचा सक्रीय सहभाग वाढवण्यासाठी एक मनोरंजन क्षेत्र सुरू केले आहे.

इफ्फीएस्टा

इफ्फीएस्टाने झोमॅटोच्या सहकार्याने, व्हेन चाय मेट टोस्ट आणि असीस कौर यांच्या कलाकृतींसह खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि खास समाविष्ट केलेल्या अदाकरीचा अनोखा संयोग घडवून आणणारे  “डिस्ट्रिक्ट” नावाचे एक झळाळते मनोरंजन क्षेत्र तयार केले आहे. या क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे जे भारतीय चित्रपट सृष्टीचा समृद्ध इतिहास दर्शविणारे सफरनामा नावाने उभे केलेले खास प्रदर्शन, याव्यतिरिक्त, केंद्रीय संप्रेषण विभागाने एका विशेष अनुभव क्षेत्रात उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव प्रदान केला, ज्यामुळे ते कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण बनले. 6000 विद्यार्थ्यांसह एकूण 18,795 अभ्यागतांनी इफ्फीएस्टाचा आनंद घेतला.

इफ्फीएस्टामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही करण्यात आला.

चित्रपटांशी संबंधित आयकॉन्स साजरे करणे: इफ्फी 2024 मध्ये शताब्दी श्रद्धांजली

नोव्हेंबर 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेला 55 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) हा भारतीय चित्रपटसृष्टीतील चार दिग्गज व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करणारा ऐतिहासिक उत्सव होता: अक्किनेनी नागेश्वर राव (ANR), राज कपूर, मोहम्मद रफी आणि तपन सिन्हा. त्यांच्या उल्लेखनीय वारशाची शताब्दी साजरी करून, या महोत्सवाने त्यांचे अतुलनीय योगदान बारकाईने रचण्यात आलेले कार्यक्रम, स्टॅम्प प्रकाशन, चित्रपट प्रदर्शन आणि अदाकारीद्वारे पुन्हा सादर केले.

पुनर्रचित क्लासिक्स

इफ्फी 2024 मध्ये NFDC अर्थात नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाद्वारे सादर केलेल्या पुनर्रचित क्लासिक्स विभागात, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने, राष्ट्रीय फिल्म हेरिटेज मिशनचा एक भाग म्हणून NFDC-NFAI ने हाती घेतलेल्या चित्रपटांची डिजिटल पुनर्रचना केली आहे. हा विभाग NFDC-NFAI च्या भारतीय सिनेमाचे डिजिटायझेशन आणि पुनर्रचना करण्याच्या कामावर लक्ष केंद्रित करून त्यांचे  जतन करण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न अधोरेखित करतो. प्रदर्शित केलेल्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये पुढील कलाकृतींचा समावेश होता:

1. कालिया मर्दन (1919), – दादासाहेब फाळके यांचा मूक    चित्रपट. थेट विशेष ध्वनीसह

2. शताब्दी सोहळ्यासाठी:

a राज कपूर यांचा  आवारा (1951)

b ए एन आर चा देवदासू (1953)

c रफीच्या गाण्यांसह हम दोनो (1961)

d तपन सिन्हा यांचा हार्मोनियम’(1975).

3. सत्यजित रे यांचा सीमाबद्ध (1971).

उद्याची सर्जनशील मने

इफ्फी च्या 2024 या आवृत्तीत प्रभावी अदाकारी असलेल्या सहभागींची निवड झाली, ज्यात भारतातील 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून (UTs) चित्रपट निर्मितीच्या 13 श्रेणींमध्ये विभागलेले 1,070 अर्ज प्राप्त झाले. यामधून 71 पुरुष आणि 29 महिलांसह एकूण 100 सहभागींच्या निवडीचा समावेश आहे (वर्ष 2023 मध्ये सहभागी झालेल्या 16 महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ). या सहभागींनी 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व केले आणि कार्यक्रमात विविध प्रकारच्या अभिव्यक्ती आणि अनुभव आणले.

माहिती व प्रसारण सचिव संजय जाजू आणि सीबीएफसी अध्यक्ष प्रसून जोशी यांच्यासह सीएमओटी ज्यूरी सदस्य 

महोत्सवा दरम्यान, प्रत्येकी 10 सहभागींच्या संघांनी 48 तासांत पाच लघुपटांची निर्मिती केली. यात हिंदीमध्ये गुल्लू (दिग्दर्शक: अर्शली जोस), कोंकणी आणि इंग्रजीमध्ये द विंडो (दिग्दर्शक: पियुष शर्मा), इंग्रजीमध्ये वुई कॅन हिअर द सेम म्युझिक (दिग्दर्शक: बोनिटा राजपुरोहित), लव्हफिक्स सबस्क्रिप्शन (दिग्दर्शक: मल्लिका जुनेजा) इंग्रजी आणि हिंदी/इंग्रजीमध्ये हे माया (दिग्दर्शक: सुर्यांश देव श्रीवास्तव) यांचा समावेश होता. या चित्रपटांचे परीक्षण करणाऱ्या ग्रँड ज्युरीने पुढीलप्रमाणे विजेत्यांची घोषणा केली. सर्वोत्कृष्ट चित्रपट – गुल्लू (अर्शली जोस), प्रथम उपविजेता – वुई कॅन हिअर द सेम म्युझिक (बोनिटा  राजपुरोहित), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अर्शली जोस (गुल्लू), सर्वोत्कृष्ट पटकथा – अधिराज बोस (लव्हफिक्स सबस्क्रिप्शन), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – विशाखा नाईक (लव्हफिक्स सबस्क्रिप्शन), आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता – पुष्पेंद्र कुमार (गुल्लू).

48 तासांत फिल्म मेकिंग चॅलेंजमध्ये कार्यमग्न असलेले विद्यार्थी

मास्टर क्लासेस

इफ्फीने आठवडाभरात 30 मास्टर क्लास , चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजित केले. त्यात चित्रपटसृष्टीतील मान्यवर सहभागी झाले होते. फिलिप नॉयस, जॉन सील, रणबीर कपूर, ए.आर. रहमान, ख्रिस किर्शबॉम, इम्तियाज अली, मणिरत्नम, सुहासिनी मणिरत्नम, नागार्जुन, फारुख धोंडी, शिवकार्तिकेयन, अमिश त्रिपाठी आणि इतर अनेकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

22 नोव्हेंबर रोजी झालेल्या मणिरत्नम यांच्या सत्रात सर्वाधिक 89% उपस्थिती होती  आणि सभागृह खचाखच भरले होते, तर त्या खालोखाल रणबीर कपूरच्या सत्रात 83% लोक सहभागी झाले.

विद्यार्थी चित्रपट निर्माता कार्यक्रम

या कार्यक्रमात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटी आयआय), सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय), एसआरएफटीआय अरुणाचल प्रदेश, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी)  यासारख्या 13 नामांकित चित्रपट प्रशिक्षण संस्थांचे 279 जण आणि इतर राज्य सरकारी तसेच खाजगी संस्थांचे मिळून एकूण 345 विद्यार्थी सहभागी झाले.

त्याचबरोबर ईशान्येकडील राज्यांतील 66 विद्यार्थी आणि युवा चित्रपट निर्मात्यांची निवड या सत्रासाठी करण्यात आली होती.

इफ्फीच्या वार्तांकनासाठी मान्यता मिळावी म्हणून पत्रसूचना कार्यालयाकडे (पीआयबीकडे) देशभरातून प्रसारमाध्यमांनी जवळपास 1,000 अर्ज केले होते. त्यापैकी 700 हून अधिक पत्रकारांना ही मान्यता (अक्रिडेशन) मिळाली. ज्या पत्रकारांना अधिक रूची होती त्यांच्यासाठी एफटीआयआयच्या सहकार्याने एक दिवसीय फिल्म ॲप्रिसिएशन कोर्स उपलब्ध करण्यात आला.

इफ्फी 2024 ला वेगवेगळ्या व्यासपीठांवर व्यापक प्रसिद्धी मिळाली.

फक्त मुद्रित माध्यमाचा विचार केला तर टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाईम्स, मिडडे, इंडियन एक्स्प्रेस, द हिंदू आणि इतर अनेकांसह आघाडीच्या राष्ट्रीय नियतकालिकांमध्ये इफ्फीबद्दल 500 हून अधिक लेख प्रसिद्ध झाले. यावरून या चित्रपट महोत्सवाचे  महत्त्व लक्षात येते. इफ्फीबद्दल मोठ्या प्रमाणावर डिजिटल प्रसारही करण्यात आला.

बॉलीवूड हंगामा, पिंकविला सारखी प्रमुख मनोरंजन संकेतस्थळे तसेच लाइव्हमिंट  आणि इकॉनॉमिक टाइम्स सारख्या व्यवसायिक प्लॅटफॉर्मवर 600 हून अधिक ऑनलाइन लेख प्रकाशित झाले. त्याशिवाय इफ्फीची पोहोच वाढवण्यासाठी समाजमाध्यमांवर पकड असलेल्या 45 वापरकर्त्यांनी MyGov द्वारे इफ्फीची लोकप्रियता वाढवण्याचे काम केले. त्यामुळे विविध डिजिटल व्यासपीठांवरही इफ्फीविषयी डंका वाजला.

पीआयबीच्या माध्यमातून इंग्लिश आणि सहा परदेशी भाषांमध्ये अधिकृत हँडलवरून 26 देशांना इफ्फीची माहिती दिली जात होती. हे परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर इफ्फीने व्हरायटी आणि स्क्रीन इंटरनॅशनलशी भागीदारी केली. त्यांच्या जागतिक सदस्यांना तीन ई-दैनिके पाठवण्यात आल्यामुळे इफ्फी महोत्सव गाजला.

प्रसारमाध्यम प्रतिनिधींची ‘फिल्म बझार’ला भेट

ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार आणि ‘अमार बॉस’ या चित्रपटाच्या दिग्दर्शक जोडीने पत्रकार परिषदेला संबोधित केले.

भारत आणि कंबोडिया यांच्यात सिनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाला पुण्यात प्रारंभ

पुणे : 01 DEC 2024

भारतीय लष्कर आणि कंबोडियाचे लष्कर  यांच्यात सीनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाला आज पुण्यात फॉरेन ट्रेनिंग नोड येथे प्रारंभ झाला. . हा सराव 1 ते 8 डिसेंबर 2024 दरम्यान चालेल.  कंबोडियन लष्कराच्या तुकडीमध्ये 20 जवान असतील आणि भारतीय लष्कराच्या तुकडीत इन्फंट्री ब्रिगेडच्या 20 जवानांचा समावेश असेल.

सीनबॅक्स सराव हा संयुक्त राष्ट्र चार्टरच्या अध्याय VII अंतर्गत दहशतवादविरोधी संयुक्त कारवाईच्या युद्धाभ्यासाच्या उद्देशाने आयोजित एक नियोजनात्मक सराव आहे. या सरावामध्ये दहशतवादविरोधी वातावरण निर्मितीसाठी कारवाईच्या नियोजनाबरोबरच गुप्तचर तत्परता, निगराणी आणि टेहळणीसाठी संयुक्त प्रशिक्षण कृतिदलाच्या स्थापनेशी संबंधित चर्चेवर भर दिला जाईल. याठिकाणी विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये युद्धविषयक सराव केला  जाईल आणि पारंपरिक कारवायांच्या उपप्रकारांमध्ये बल गुणकांच्या (फोर्स मल्टीप्लायर)ची संख्या वाढवण्यावर देखील चर्चा केली जाईल. या सरावात माहिती संचालन , सायबर युद्ध, हायब्रीड युद्ध, लॉजिस्टिक्स  आणि अपघात व्यवस्थापन, एचएडीआर मोहीम  इत्यादींवर चर्चा केली जाईल.

हा सराव तीन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेदरम्यान दहशतवाद विरोधी कारवायांसाठी सहभागींची तयारी आणि अभिमुखता यावर लक्ष केंद्रित करेल.  टप्पा-II मध्ये टेबल टॉप सराव आयोजित केला जाईल आणि टप्पा-III मध्ये योजनांना अंतिम रूप देणे आणि सारांश तयार करणे समाविष्ट असेल. यामुळे संकल्पना-आधारित प्रशिक्षणाच्या व्यावहारिक पैलूंबाबत माहिती मिळेल  आणि सहभागींना परिस्थिती-आधारित चर्चा आणि रणनीतिक अभ्यासाद्वारे कार्यपद्धती समजून घेण्यास सक्षम करण्याचा या सरावाचा हेतू आहे.

या सरावात ‘आत्मनिर्भरता’ आणि संरक्षण उत्पादनातील स्वदेशी क्षमतांना प्रोत्साहन देणारी भारतीय बनावटीची  शस्त्रे आणि उपकरणे देखील प्रदर्शित केली जातील.

पहिल्या सिनबॅक्स सरावात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये  विश्वास, सौहार्द वाढवणे आणि अपेक्षित स्तरावरील आंतरकार्यक्षमता साध्य करण्यावर भर दिला जाईल. शांतता राखण्याच्या मोहिमा हाती घेताना दोन्ही सैन्याच्या संयुक्त कार्यक्षमतेतही यामुळे वाढ होणार आहे.

चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी

१४ डिसेंबरला सादर होणार पहिला प्रयोग

(शरद लोणकर/Sharad Lonkar)

जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली. स्त्री- पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्री च्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली होती. नाटकातील संवेदनशील आणि सामाजिक संवादामुळे त्यावेळी हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले होते. मराठी रंगभूमीवरील ही महत्वपूर्ण कलाकृती सुमारे चाळीस वर्षांनंतर नाट्यप्रेमींना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. मोरया प्रॉडक्शन्स, भूमिका थिएटर्स, अथर्व थिएटर्स निर्मित, जाई काजळ प्रस्तुत ‘पुरुष’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाले असून येत्या १४ डिसेंबर रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे. राजन ताम्हाणे दिग्दर्शित, जयवंत दळवी लिखित या नाटकाचे शरद पोंक्षे, श्रीकांत तटकरे, समिता भरत काणेकर निर्माते आहेत. या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत दिसतील. या नाटकाला विजय गवंडे यांचे संगीत लाभले आहे.

स्त्री पुरुष समानता, स्त्रीची अस्मिता, समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेवर टीका, सामाजिक स्थितीवर भाष्य हे विषय या कथेच्या केंद्रस्थानी असून ते प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारे आहेत.

‘पुरुष’ हे नाटक परत रंगभूमीवर आणण्याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, ” आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषा ज्या असंख्य साहित्यिकांनी समृद्ध केली. त्यातील एक अजरामर नाव म्हणजे नाटककार जयवंत दळवी. आजवर त्यांनी विविध विषयावर नाटकं, कथा कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकीच एक ८० च्या दशकातील अतिशय गाजलेलं नाटक ‘पुरुष’. आज त्या नाटकाला ४० वर्षे उलटून गेली असून तेच नाटक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आम्ही पुन्हा रंगमंचावर आणत आहोत. या नाटकाचे केवळ ५० प्रयोग होणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात याचे प्रयोग होणार आहेत. त्यामुळे ही सुंदर कलाकृती आम्ही नाट्यप्रेमींसमोर घेऊन येण्यासाठी प्रचंड आतुर आहोत. हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आणण्याचे आणखी एक कारण म्हणजे आजही समाजात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे आणि ही स्थिती मला कायमच अस्वस्थ करते. हीच विचारसरणी बदलण्यासाठी आम्ही हे नाटक घेऊन आलो आहोत. ‘पुरुष’मध्ये केवळ सामाजिक प्रश्न हाताळण्यात आला नसून यात त्याचे उत्तरही दडलेले आहे.”

आस्था शुक्ला यांच्या उपशास्त्रीय गायनाने रंगली मैफल

ठुमरी सम्राज्ञी शोभा गुर्टू यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे आयोजन

पुणे : सुप्रसिद्ध गायिका आस्था शुक्ला यांनी उपशास्त्रीय संगीतातील वैशिष्ट्ये दर्शविणारी ठुमरी, होरी, गझल, दादरा, भजन ऐकवून रसिकांची मने जिंकली.
ठुमरी सम्राज्ञी शोभा गुर्टू यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. गांधर्व महाविद्यालय, पुणे येथील विष्णू विनायक स्वरमंदिरात ही मैफल झाली.
आस्था शुक्ला यांनी मैफलीची सुरुवात वात्सल्याचे भावरंग दर्शविणाऱ्या ‌‘राधा नंदकुंवर समझात रही‌’ या मिश्र खमाज रागातील ठुमरीने केली. प्रामुख्याने कथक नृत्य प्रकारात उपशास्त्रिय संगीतातील होरी रचनेवर नृत्याविष्कार सादर केला जातो. शुक्ला यांनी बिंदादिन महाराज रचित मिश्रगारा रागावर आधारित ‌‘मै तो खेलूंगी उनहिसे‌’ ही होरी प्रभावीपणे सादर केली. उर्दू शब्दप्रधान गायकी दर्शविताना ‌‘साईल से खफा युँ मेरे प्यारे नही होते‌’ ही गझल सादर करून रसिकांना मोहित केले. या नंतर मिश्र देसमांड रागातील लोकसंगीतावर आधारित ‌‘सेजरिया कैसे आऊँ ढोला‌’ ही राजस्थानी ठुमरी ऐकविल्यानंतर ‌‘नजरिया लागे नही कही ओर‌’ हा दादरा सादर केला. यातून शोभा गुर्टूजींचे साहित्यविषयक विचार प्रकट होतात, असे शुक्ला यांनी आवर्जून सांगितले.
संत मीराबाई यांचा भक्तीसमर्पण भाव दर्शविणारे ‌‘तुम केहोल जोशी, शाम मिलन कब होसी‌’ हे भजन सादर करून नंतर मिश्र पहाडी रागातील ‌‘रंगी सारी गुलाबी चुनरिया रे‌’ हा दादरा ऐकविला. शुक्ला यांनी मैफलीची सांगता संत कबीर यांची मुलगी संत कमाली यांनी रचलेल्या अध्यात्माची कास धरलेल्या ‌‘सैया निकस गए मै ना लडी थी‌’ या मिश्र भैरवी रागातील भावपूर्ण रचनेने केली. उपशास्त्रीय संगीतात तबला साथीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गीतांच्या अंगानुसार तबला वादनामध्ये दाया-बायाचे संतुलन साधत साथसंगत करावी लागते. पार्थ ताराबादकर यांनी वादनातील प्रगल्भतेचे दर्शन घडवित तबला साथ केली. शुभदा आठवले (संवादिनी), गायत्री गोखले, अनघा पाठक (सहगायन) यांनी साथसंगत केली.
प्रास्ताविकात प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी शोभा गुर्टू यांच्या आठवणींना उजाळा दिला. कलाकारांचा सत्कार उपप्राचार्या परिणीता मराठे यांनी केला.

जीवनात ध्यानाचे महत्त्व अलौकिक म्हणून प्रत्येकाने रोज ध्यान करणे ही आजच्या काळाची गरज – अभिनेत्री मधुरा वेलणकर – साटम

मुंबई : रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाचे आयुष्य गुंतागुंतीचे बनले आहे. यामुळे मनावर येणारा ताणतणाव दूर होणे गरजेचा आहे. म्हणून प्रत्येकाने रोज एक तास तरी ध्यान करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर – साटम यांनी सांताक्रुज येथे आयोजित केलेल्या तेजज्ञान फाउंडेशनच्या रजत महोत्सवी प्रसंगी केले. या कार्यक्रमात मधुरा वेलणकर, तेजज्ञान फाउंडेशनच्या विश्वस्त तेजविद्या, रमा शहा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना तेजज्ञान फाउंडेशनच्या विश्वस्त तेजविद्या यांनी तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांचा परिचय आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा गौरव केली. त्यांनी उपस्थितांना तेजज्ञान फाउंडेशनच्या जागतिक शांततेसाठीच्या कटिबद्धतेचा उल्लेख करत, बाहेरच्या जगतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अंतर्मनात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे, असे सांगितले. जीवनात ‘स्वल्पविराम’ घेण्याचे महत्व पटवून देत, “हातातील मोबाइल काही वेळ बाजूला ठेवून ध्यानात बसल्यास, ध्यानाद्वारे आयुष्यात हा स्वल्पविराम निर्माण होईल आणि आपल्या सर्वोच्च आनंदाचा, ‘स्व-अनुभव’ येईल,” असे ही त्या म्हणाल्या.

वेलणकर – साटम म्हणाल्या की रोज आपण स्वतःशी संवाद साधला पाहिजे. व्यवसाय, दैनंदिन कामातून वेळ काढत आपण ध्यान देखील करायला हवे. ध्यानासह  सकारात्मक विचार करायला हवा. सकारात्मक विचार न केल्याने त्याचे शरीरावर, मनावर, विचारांवर विपरीत परिणाम होतात. तेजज्ञान फाउंडेशनचे समाजातील कार्य उल्लेखनीय आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या की ध्यानामुळे शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या व्यक्ती सशक्त होते, त्यामुळे तिच्यात आत्मबळ निर्माण होते. आपण ध्यानाच्या माध्यमातून आपल्या मनाला तयार केल्यास कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. त्यासाठी ध्यान करने निश्चितच महत्वपूर्ण आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद सावंत यांनी केले.

महिला सक्षमीकरणासाठी ‘आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची; गोलमेज परिषदेत नीलम गोऱ्हे यांनी मांडले व्हिजन

मुंबई : “माझा ठाम विश्वास आहे की कोणतीही सार्वजनिक मोहीम असो, त्याच्या अंमलबजावणीत तसेच नियोजन आणि मूल्यमापनातही महिलांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही. एक राष्ट्र म्हणून, आम्ही अलीकडेच राज्यांच्या विधान मंडळांमध्ये तसेच आमच्या आदरणीय भारतीय संसदेत महिलांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. आपल्या लोकसंख्येतील महिलांचे लक्षणीय प्रमाण लक्षात घेता, हे एक स्वागतार्ह पाऊल आहे”, असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापति नीलम गोऱ्हे यांनी समारोपात केले.

कोची येथे महिला राजकारण्यांचे नेटवर्क गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. 29 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर असे दोन दिवस परिषदेत वेगवेगळ्यांवर चर्चा झाली आणि भाषणे झाली. या परिषदेत विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी “महिला सक्षमीकरणासाठी खासदार आणि आमदारांचे नेटवर्क तयार करण्याची भूमिका आणि पद्धती” या विषयावर मार्गदर्शन केले व गोलमेज परिषदेचा समारोप केला.

याविषयी बोलताना, “चार दशकांहून अधिक काळ एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी माझ्या सर्व कार्यात नेहमीच महिलांना केंद्रस्थानी ठेवले आहे. माझा ठाम विश्वास आहे की कोणतीही सार्वजनिक मोहीम असो, त्याच्या अंमलबजावणीत तसेच नियोजन आणि मूल्यमापनातही महिलांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही.

एक राष्ट्र म्हणून, आम्ही अलिकडेच राज्यांच्या विधान मंडळांमध्ये तसेच आमच्या भारतीय संसदेत महिलांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. आपल्या लोकसंख्येतील महिलांचे लक्षणीय प्रमाण लक्षात घेता, हे एक स्वागतार्ह पाऊल आहें मी.पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपली संसद या क्रांतिकारी तरतुदीसाठी भरभरून कौतुकास पात्र आहे, जी दीर्घकाळ प्रलंबित होती.” असं उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाले.

पुढे त्या म्हणाल्या की, “सरकारने सुरू केलेल्या विविध कृती, कल्याणकारी योजना, उपक्रम यांचे महत्त्व आम्हाला माहीत आहे; परंतु तळागाळात त्यांची जोरदार अंमलबजावणी आवश्यक आहे.” तसेच, त्यांनी काही आवश्यक दृष्टीकोन सांगितले जे ही प्रक्रिया पूर्णत्वास आणण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

१) लैंगिक समानतेच्या दृष्टीकोनातून प्रतिसाद देणारे आणि जबाबदार नेतृत्व
२) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरापर्यंत जाळे विकसित करण्यासाठी, दर्जेदार वेळ आणि कामावर आधारित निर्णय घेण्यातील भूमिकेचे मापदंड
३) भारतीय राजकारणातील विविध क्षेत्रांसाठी बहुलता (Plurality) आणि विविधतेसाठी जागा
4) महत्त्वाच्या घडामोडी आणि कायदेशीर, धोरणात्मक स्तरावरील बदल तसेच आंतरराष्ट्रीय अधिवेशने परिषदांवरील सर्व स्तरावरील प्रतिनिधींसाठी परस्पर सल्लामसलत

“SDGs ही आमची अत्यंत मार्गदर्शक तत्त्वे मानली जावीत ही सर्वांना नम्र विनंती आहे. खासदार, आमदार, धोरण बनवण्याच्या टप्प्यावर, त्याच्या योग्य अवलंब करण्यासाठी पुढाकार घ्या आणि शाश्वत विकासासाठी पुरेसा निधी मिळण्याची खात्री करा. विधिमंडळाती राष्ट्रकुल संसदिय मंच देखील या दिशेने अधिक योगदान देऊ शकतो. तसेच जागतिक महिला आयोगाचे ६९ सत्र आणि बीजिंग + 30 थीमसाठी निवडून आलेल्या सदस्यांमध्ये आणि त्यांच्या मतदारसंघांमध्ये अधिक स्पष्टीकरण आणि जागरूकता आवश्यक आहे.

जागतिक ते स्थानिक पातळीवर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात महिला आघाडीवर आहेत. तथापि, महिला गटांचे डिजिटलायझेशन आणि क्षमता निर्माण कार्यक्रमाची गरज आहे. पीठासीन अधिकारी या नात्याने मी आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छिते की संसद आणि विधान मंडळांनी सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणविषयक समस्यांवर प्रत्येक सत्रात आपापल्या सभागृहात अर्थपूर्ण आणि परिणामाभिमुख चर्चा केली पाहिजे.” असंही त्यायावेळी म्हणाल्या.

शाश्वत विकास हा एक असा शब्द आहे ज्याचे विस्तृत परिणाम आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळात आपण घेतलेल्या काही चांगल्या पद्धती, काही उपक्रमांचा या प्रतिष्ठित व्यासपीठावर उल्लेख करणे आवश्यक आहे. याबाबत बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “मी येथे अभिमानाने नमूद करू इच्छिते की 23-24 सप्टेंबर 2024, नवी दिल्ली येथे 10 व्या CPA भारतीय क्षेत्र परिषदेत SDG संदर्भात केलेल्या माझ्या आवाहनाचे सर्व सन्माननीय प्रतिनिधींनी स्वागत केले. विधान मंडळातील पीठासीन अधिकाऱ्यांकडून दरवर्षी SDG च्या अपडेटवर एक समान प्रस्ताव / ठराव असू शकतो. व्यवसाय सल्लागार समिती आणि सर्व राजकीय पक्षांचे सदस्य किंवा सरकार पीठासीन अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून या प्रस्तावावर चर्चा आणि मसुदा तयार करू शकतात. महिला सबलीकरणाचा राष्ट्रीय आढावा घेण्याची गरज आहे. SDG च्या त्यामुळे आरोग्य, शिक्षण, महिला आणि मुलींची सुरक्षा यावर विशेष लक्ष केंद्रित करून महिला आमदारांची राष्ट्रीय गोलमेज परिषद आयोजित केली जावी.

महाराष्ट्र विधिमंडळात, SDG आणि महिला सक्षमीकरणावरील ठरावावर दोन्ही सभागृहात चर्चा झाली आणि आमदारांनी सामायिक केलेले मुद्दे सरकारी योजना आणि अर्थसंकल्पात समाविष्ट केले गेले. मी सर्व सन्माननीय सहभागींना आपापल्या सभागृहात आणि विधिमंडळात या प्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करू इच्छिते.

UN च्या मंचांसोबत ग्लोबल इकॉनॉमिक फोरम देखील अर्थपूर्ण आहेत. त्यामध्ये मला भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली. माझ्या भाषणात 2024 मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथे, मी अनेक सुपर सक्रिय महिलांना आर्थिक क्षेत्रात सामूहिक यंत्रणेसह काम करताना पाहिले. महिलांचा आर्थिक विकास आणि शाश्वत विकास उद्दिष्टे एकत्रित करण्याची गरज मी अधोरेखित केली होती कारण त्यांची प्रगती एकमेकांवर अवलंबून आहे. भारतीय महिलांच्या पुढाकाराबद्दल जागतिक स्थरावर प्रचंड सकारात्मक भावना होत्या. गेल्या चार दशकांपासून महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी सतत पाठिंबा दिल्याबद्दल मी फ्रेडरिक एबर्ट स्टिफंटंग यांचा विशेष उल्लेख करू इच्छिते.

एआयच्या सकारात्मक आणि नकारात्मक वापरावर जग विभागले गेले आहे. त्यामुळे लिंगाच्या (Gender ) दृष्टीकोनातून AI वर अधिक वादविवाद आणि चर्चेची गरज आहे. आमच्याकडे आधीपासूनच जगातील सर्वाधिक मोबाईल फोन वापरकर्ते आहेत. त्यापैकी करोडो लोक त्यांचे मोबाईल फोन आर्थिक व्यवहार करण्यासाठी, नेटवर्किंगसाठी आणि मेसेजिंगसाठी दररोज वापरतात. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर हा आपला मुख्य अजेंडा असायला हवा. अशी संसाधने संसदेच्या सदस्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील या प्रक्रियेला पूरक बनविण्यास सक्षम करतील. महाराष्ट्रात सध्याच्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची टक्केवारी वाढल्याने अनेक मतदारसंघातील निकाल बदलले. “

लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महिलांना प्रोत्साहित केले गेले आणि त्यामुळे अनेक मतदारसंघात विजय मिळवला गेला. लाडकी बहिण योजनेचे बहुतेक लाभार्थी आधीच त्यांच्या आर्थिक आणि राजकीय हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या महिलांच्या गंभीर समूहाचा भाग होते. या सर्व महिला मतदार निश्चितपणे SDG आणि सामाजिक परिवर्तनाच्या पुरस्कर्त्या बनतील.”
या बैठकीत महिला लोकप्रतिनिधींच्या नेटवर्क चा निर्णय घेण्यात आला.

महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या विचारांचा वापर केवळ राजकारणासाठी : डॉ. राजाराम दांडेकर

आबासाहेब अत्रे, इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कारांचे वितरण

पुणे : स्वामी विवेकानंद, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, विनोबा भावे अशा महनीय व्यक्तींचे शिक्षणाविषयी विचार समाजापुढे यावेत, अशी अपेक्षा आहे. मात्र महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या विचारांचा वापर केवळ राजनितीसाठी केला जातो आहे, अशी खंत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राजाराम दांडेकर यांनी व्यक्त केली.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‌‘आबासाहेब अत्रे पुरस्कार‌’ बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका आणि प्रामुख्याने मुलांसंबंधी पुस्तके लिहिलेल्या मराठी लेखिका तसेच पुण्यातील गरवारे बालभवनच्या माजी संचालिका कै. शोभा अनिल भागवत यांना तर ‌‘इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कार‌’ पिरंगुट जवळील संस्कार प्रतिष्ठान संचालित मतिमंद मुलांची निवासी शाळा व प्रौढ मतिमंदांसाठी निवासी शेती प्रकल्प राबविणारे उल्हास केंजळे व प्रतिभा केंजळे या दाम्पत्यास शनिवारी (दि. 30) प्रदान करण्यात आला. पुरस्कारांचे वितरण डॉ. राजाराम दांडेकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. रघुवीर कुलकर्णी, रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष नीलेश येवलेकर मंचावर होते. पुरस्काराचे यंदाचे तेरावे वर्ष आहे. दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या आवारातील खुल्या मंचावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कै. शोभा भागवत यांना मरणोत्तर देण्यात आलेला पुरस्कार त्यांच्या कन्या आभा भागवत यांनी स्वीकारला. कै. शोभा भागवत यांना दिल्या गेलेल्या पुरस्काराचे स्वरूप पंधरा हजार रुपये व मानचिन्ह असे तर केंजळे दाम्पत्यास दिल्या गेलेल्या पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये व मानचिन्ह असे आहे.

रेणूताई दांडेकर, दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रफुल्ल निकम, भारत वेदपाठक, वीणा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. डॉ. भारती एम. डी. आणि प्रसाद भडसावळे यांनी संयोजन केले.

देश-विदेशातील शिक्षण व्यवस्थांविषयी अनुभव कथन करून डॉ. दांडेकर म्हणाले, आयुष्यातील प्रश्नांचा बाऊ न करता पर्यायांचा विचार केला गेला पाहिजे, कारण त्यातच समस्येचे उत्तर सापडते. हाताने केलेल्या कृती, गोष्टी कायम लक्षात राहतात यातून संवेदना नव्याने जागृत होतात, बुद्धिला चालना मिळते. अशा पद्धतीच्या शिक्षणातून मनोविकलांग मुलांमध्येही बदल होऊन त्यांचा विकास होतो. प्रत्येक मुलातील सद्गुण शोधून त्याची पारख होऊन योग, ध्यान, संगीत, शेती आणि लघुउद्योगांद्वारे शिक्षण दिल्यास मनोविकलांग मुले देखील स्वत:च्या पायावर उभी राहू शकतात. ते पुढे म्हणाले, शोभा भागवत यांनी लहान मुले व पालकांसाठी केलेले सामाजिक कार्य अद्भुत आहे. सहजीवन कसे असावे याचा परिपाठ भागवत दाम्पत्याने समाजापुढे ठेवला आहे. विस्कटलेली माणसे व संसार पुन्हा जुळून मार्गी लागावीत यासाठी त्यांचे कार्य मोलाचे आहे.

पालकांचा विश्वास हा महत्त्वाचा घटक : केंजळे
सत्काराला उत्तर देताना आमच्या कार्यात संपूर्ण समाजाचे योगदान असून या सर्वांमार्फत आम्ही या पुरस्काराचा स्वीकार करत आहोत, अशा भावना प्रतिभा केंजळे व उल्हास केंजळे यांनी व्यक्त केल्या. विकलांग मुलांच्या संगोपनात पालकांची मानसिक ताकद महत्त्वाची असते. आमच्या शाळेच्या माध्यमातून सर्व वयोगटातील मतिमंद मुलांचा सांभाळ करताना पालकांचा आमच्यावरील विश्वास हा घटक महत्त्वाचा ठरला आहे. समाजाच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे विकलांग मुलांविषयी आस्था जागृत झाल्यास आमचे कार्य सोपे होईल, असे त्यांनी नमूद केले.

शोभाताई मैत्रिणीच्या भूमिकेत असत
शोभा भागवत यांच्या कार्याला उजाळा देताना त्यांच्या कन्या आभा भागवत म्हणाल्या, मुले शिकत असताना त्यांना आवश्यक असणारा निवांतपणा, मोकळेपणा, आपले ऐकून घ्यायला कुणाची तरी असल्याची भावना शोभाताई यांनी दिल्यामुळे अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत त्या मैत्रिणीच्या भूमिकेतच असत. मुलांविषयी असलेला प्रेमाचा झरा त्यांनी कधीही कमी होऊ दिला नाही. मुलांची शारीरिक, मानसिक गरज ओळखून त्याविषयी पालकांना जागृत करून मुलांच्या संगोपनातील पालकांचा सहभाग वाढवत शोभाताईंनी त्यांना सहज पालकत्व शिकविले. कोवळ्या वयाच्या मुलांच्या मनातील आत्मविश्वास कमी करू नये कारण ही मुलेच उद्याचा समाज घडविणार आहेत, या मतावर त्या ठाम होत्या.

मान्यवरांचे स्वागत डॉ. रघुवीर कुलकर्णी, संजीव महाजन यांच्या हस्ते करण्यात आले तर परिचय ज्येष्ठ शिक्षिका विनया भंडारी, समीर शिपूरकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कल्पना गुजर यांनी केले.

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनने साजरी केली उत्कृष्टतेची ३८ वर्षे 

पुणे- १ डिसेंबर २०२४ : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या  व्या आवृत्तीचा आज सणस मैदानावर धावपटू आणि प्रेक्षकांच्या अभुतपूर्व सहभागासह समारोप झाला. या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या ३८ वर्षांपासून सातत्याने केले जात आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, यांनी यावेळी उपस्थित राहून विजेत्यांना बक्षिसे दिली. या स्पर्धेची बांधिलकी राजकीय संबंधांच्या पलीकडे जाऊन एकता आणि खिलाडूवृत्तीला चालना देण्यासाठी आहे असे म्हणत  त्यांनी या स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करण्यावर भर दिला.
बक्षीस वितरण समारंभास शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या आयोजन समितीचे अध्यक्ष अभय छाजेड आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे पुणे शहर विभागाचे विभागीय व्यवस्थापक डॉ. जावेद मोहनवी, माजी आमदार रवींद्र धंगेकर,यांचीही उपस्थिती होती. त्यांनी पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन आणि इतर लांब पल्ल्याच्या शर्यतीतील विजेत्यांना तसेच व्हीलचेअर शर्यतीतील विजेत्यांना बक्षिसे दिली.


गिनीज रेकॉर्ड धारक आणि उत्कट मॅरेथॉनपटू आशिष कसौडेकर यांनी पूर्ण मॅरेथॉनला झेंडा दाखवून कार्यक्रमाची सुरुवात केली. डीसीपी श्री भाजीभाकरे आणि एसीपी राहुल आवारे यांच्यासह इतर प्रमुख व्यक्तींनी इतर शर्यतींना झेंडा दाखवला.
आंतरराष्ट्रीय पूर्ण मॅरेथॉन प्रकारात इथिओपियाच्या धावपटूंनी अव्वल स्थान पटकावले. आसेफा बिजुमेह आयलेनेहने प्रभावी २:१७.५९  अशी वेळ नोंदवून विजेतेपद पटकावले, त्यानंतर हुंडे डाबा केनेने २:१९.१५ च्या वेळेसह विजय मिळवला. केनियाच्या मैथ्या मिशेल क्यालोने २:२२.२९  वेळेत शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान मिळविले.
भारतीय मॅरेथॉनपटूंमध्ये उत्तर प्रदेशचे ज्ञान बाबू विजयी झाले, तर नाशिकचे कमलाकर देशमुख आणि गणेश बागुल या दोघांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.
आंतरराष्ट्रीय महिलांच्या पूर्ण मॅरेथॉन प्रकारात, इथियोपियाच्या निगाटू तिसासुआ बसाझिनने अव्वल स्थान पटकावले, त्यानंतर तिची इथिओपियाची सहकारी बेलेव एगर मेकोनेन हिने दुसरे स्थान पटकावले. भारतातील अश्विनी मदन जाधव हिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसरे आणि भारतीय मॅरेथॉनर्सच्या यादीत पहिले स्थान पटकावले.
पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ही शहरासाठी एक प्रमुख स्पर्धा बनली आहे, जी संपूर्ण भारत आणि परदेशातील धावपटूंना आकर्षित करते. या स्पर्धेचे 38 वर्षे सातत्यपूर्ण आयोजन हा शहराची खेळाबद्दलची आवड आणि निरोगी जीवनशैलीला चालना देण्याच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
महिलांच्या अर्ध मॅरेथॉनने पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये लक्ष वेधले, कारण भारतीय महिला खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारांमध्ये सर्वोच्च सन्मान मिळवला. वेग आणि सहनशक्तीच्या रोमांचकारी प्रदर्शनात रत्नागिरीच्या साक्षी संजय जड्यालने अव्वल स्थान पटकावले, त्यानंतर हरियाणातील भारती आणि वसईच्या अर्चना लक्ष्मण जाधव यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. भारतीय महिला खेळाडूंनी केलेली ही प्रभावी कामगिरी लांब पल्ल्याच्या धावण्याच्या जगात त्यांच्या वाढत्या पराक्रमाचा पुरावा होता.
३८व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे अतिरिक्त ठळक मुद्दे:
एका उल्लेखनीय प्रदर्शनात, केतन अब्रोणकर, व्यवसायाने अभियंता, यांनी २१ किमीची अर्ध मॅरेथॉन एक तास ५६ मिनिटांत प्रभावीपणे पूर्ण केली आणि संपूर्ण अंतरावर तीन चेंडू खेळवून, समन्वयासाठी एक नवीन मानक स्थापित केले.

– वय आणि प्रथेला झुगारून, ७६ वर्षीय शोभा दाते यांनी १० किमीची शर्यत यशस्वीपणे पूर्ण केली, तिच्या दृढनिश्चयाने असंख्य लोकांना प्रेरणा दिली.

– पुण्यातील देवेश खातूने रविवारी आपली १५०वी मॅरेथॉन पूर्ण करून देशातील सर्वात समर्पित आणि कुशल मॅरेथॉन धावपटूंपैकी एक म्हणून आपली प्रतिष्ठा वाढवून एक उल्लेखनीय टप्पा गाठला.

– रचना रानडे, एक लोकप्रिय YouTube फायनान्स इन्फ्लुएंसर, पाच किमी शर्यतीत फिनिशर्सपैकी एक होती, तिने हे दाखवून दिले की फिटनेस आणि फायनान्स हातात हात घालून जाऊ शकतात.

– शाश्वततेसाठी होकार देत, विजेत्यांना बांबू सोसायटी ऑफ इंडियाने बांबूपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या, जे पर्यावरणीय जबाबदारीच्या प्रतिकबद्धतेचे प्रतीक आहे.-

या इव्हेंटमध्ये पुणे आणि शेजारच्या शहरांतील मॅरेथॉन धावपटूंच्या डझनभर पेक्षा जास्त गटांचा सहभाग दिसला, ज्यामुळे या प्रदेशातील दिर्घ अंतर धावण्याची वाढती लोकप्रियता अधोरेखित झाली.

– पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनने भारतातील प्रमुख मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक म्हणून ओळख मिळवून मॅरेथॉनच्या आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये फ्लॅगशिप इव्हेंट म्हणून समाविष्ट करण्याचा मान मिळवला आहे.

– एकूण 12,000 स्पर्धक – रुपये 35 लाख रुपयांची महापालिकेकडून पारितोषिके –

श्री संत माई विद्या वृत्ती अंतर्गत ३२ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रदान

इयत्ता दहावीच्या होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना एस.एस.सी. बोर्डाचे प्रवेश शुल्क 
पुणे: शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे या संस्थेच्या माध्यमातून इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना एस.एस.सी. बोर्डाचे परीक्षा शुल्क देण्यात आले. कै. संत शिवगंगादेवी बार्शीकर यांच्या स्मरणार्थ श्री संत माई विद्या वृत्ती अंतर्गत शेठ हिरालाल सराफ प्रशालेतील ३२ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क देण्यात आले.
बुधवार पेठेतील शेठ हिरालाल सराफ प्रशालेत विद्या वृत्ती प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या हस्ते विद्या वृत्ती देण्यात आली. प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे,  प्रबोधिनीच्या सेवाव्रती नंदिनी देवकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार, होनराज मावळे यावेळी उपस्थित होते.
प्रशांत भस्मे म्हणाले, आयुष्यातील पुढची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा महत्त्वाची आहे. अभ्यास करण्यासोबतच विद्यार्थ्यांनी आपले अंगभूत गुण ओळखायला हवेत. अभ्यासाशिवाय अनेक क्षेत्र आज विद्यार्थ्यांसाठी खुली आहेत. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. चांगले यश मिळून समाज आणि देशाची उन्नती करा तसेच अभ्यासासोबतच व्यायाम करून शरीर सुदृढ ठेवण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. 
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, मुलांच्या उन्नतीसाठी आई-वडील कष्ट करत असतात. मुलांनी शिक्षण घेऊन आयुष्यात खूप मोठे व्हावे, हे स्वप्न ते पाहतात. मुलांनी देखील आयुष्यात यशस्वी होऊन आज जशी मदत त्यांना मिळाली आहे तशीच मदत त्यांनी मोठे झाल्यावर करावी. समाजाचे दिलेले समाजाला परत करायचे आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवे.
नंदिनी देवकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावीचे वर्ष महत्त्वाचे असून त्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून स्वतःशीच स्पर्धा करायला हवी.

फेर पडताळणीचा फायदा होणार नाही:EVM मशीनमध्ये गुप्त कोड, प्रोगाम फीट केलाय का? तपासावे लागणार – पृथ्वीराज चव्हाण

पुणे-विधानसभा निवडणुकीनंतर आता ईव्हीएम मशीन आणि मतदानातील तफावत याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरच शंका घेतली आहे. त्यानंतर आता पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला आहे. या सर्व घडोमोडींवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. ईव्हीएम मशीनवर जनतेचा विश्वास राहिला नाही. फेर पडताळणीचा काही फायदा होणार नाही मशीनमध्ये काही गुप्त कोड, प्रोगाम फीट केला आहे का? हे तपासले तरच खरी माहिती समोर येईल, असे चव्हाण म्हणाले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली. बाबा आढाव यांनी ईव्हीएमविरोधात घेतलेल्या भूमिकेला काँग्रेसने पाठिंबा दर्शवला. यासाठी मी मुंबईहून आल्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत महायुतीवर निशाणा साधला.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागा म्हणजे 65 टक्के जागा दिल्या. भाजपच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत जनतेने नकारात्मक शिक्कामोर्तब केले. त्यानंतर चार-साडेचार महिन्यांच्या कालावधीत इतका मोठा बदल होईल, असे कोणलाही वाटले नाही. राजकीय विश्लेषणातही ते दिसून आले नाही. महाराष्ट्रात सत्ता बदल होण्याचा सर्वांनाच आत्मविश्वास होता. पण आमदारांच्या पक्षांतराचा देखील काहीच फरक पडला नाही, यावर विश्वास बसत नाही. निवडणूक फ्री आणि फेअर होणे आवश्यक आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

फेर पडताळणीचा काही फायदा होणार नाही
पंतप्रधानानी निवडणूक आयुक्त बदलण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला अंदाज आला होता. सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा मुडदा पाडला आहे. निवडणुकीत पोलिसांचा गैरवापर करण्यात आला. पोलिसांकडून मतदान करून घेतले, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ईव्हीएम मशीनवर जनतेचा विश्वास राहिला नाही. फेर पडताळणीचा काही फायदा होणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅटच्या चिट्ठ्या मोजायला हव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली.

ईव्हीएम मशीनमध्ये काही गुप्त कोड आहे का?
निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन तपासणीसाठी दिल्या पाहिजे. आंतरराष्ट्रीय समितीने त्यांची तपासणी करावी. ईव्हीएम मशीन हातात भेटले पाहिजे. त्या मशीनमध्ये काही गुप्त कोड आहे का? ह्याची जागतिक तज्ज्ञाकडून त्याची तपासणी झाली पाहिजे. त्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही, असे ते म्हणाले. निवडणूक आयोग फेरमतमोजणीसाठी बोलवणार, लांबून मशीन दाखवणार आणि विचारणार पुरावा दाखवा. 5 टक्के मत मोजून काही फायदा होणार नाही. कारण आपल्या हातात मशीन नाही. या मशीनमध्ये काही गुप्त कोड, प्रोगाम फीट केला आहे का? हे तपासल्यानंतरच खरी माहिती समोर येईल, असे चव्हाण म्हणाले.

अमित शहांच्या बरोबर आणखी एक बैठक होईल तेव्हा साधक बाधक चर्चा होऊन लोकहिताचे सरकार स्थापन होईल- एकनाथ शिंदे

सातारा- राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या मूळगावी दरे येथे गेले होते. तेव्हापासून राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते आराम करण्यासाठी गावी गेल्याचे सांगण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांनी आज दरे गावात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना गावी जायचे नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. मी नेहमीच गावी येत असतो,मी गेल्अया बुधवारी माझी भूमिका स्पष्ट केली आहे, बाकी सर्व केवळ चर्चाच आहेत , शहांच्या बरोबर एक बैठक झाली आणि अजून एक बैठक होईल, तेव्हा साधक बाधक चर्चा होईल आणि चांगले लोक हितकारक सरकार स्थापन होईल असेही ते म्हणाले.

महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव नाही. मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय नरेंद्र मोदी, अमित शहा घेतील. मी माझी भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे. भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, यावेळी त्यांना गृहखात्यावरून सुरू असलेल्या वादाबद्दल तीनदा विचारण्यात आले. मात्र, शिंदे यांनी त्यावर बोलणे टाळले.उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत. आमची अमित शहांसोबत एक बैठक झाली आहे. आता तिनही पक्षांच्या नेत्यांची दुसरी बैठक देखील लवकर होणार आहे. त्या बैठकीत चर्चा होऊन महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

आम्ही जनतेला उत्तरदायित्व आहोत. महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव नाही. विरोधकांना काही काम राहिले नाही. त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेता होण्याइतके संख्याबळ नाही. झारखंडमध्ये त्यांचा विजय झाला. लोकसभेतही ते जिंकले, मग तेव्हा ईव्हीएम मशीन चांगले होते का? असा सवाल विरोधकांना केला आहे.

लाडक्या बहिणींनी, लाडक्या शेतकऱ्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने आले आहे. निवडणुकीच्या काळात खूप धावपळ झाली. मी एका दिवसात 8-10 सभा घेतल्या. माझ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात सुटी घेतली नव्हती. धावपळीमुळे थकवा आला होता. त्यामुळे मी आराम करण्यासाठी गावाकडे आलो होतो. गावी आलो की वेगळे समाधान मिळते. आता माझी तब्येत ठीक आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला मुदतवाढ

मुंबई  बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी केले.

राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली होती. योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी संपत असून सदर योजनेस एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

राज्यातील ६५,४४५ वीज ग्राहकांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून ८६ कोटी रुपयांचा भरणा झाला असून त्यांना ४४ कोटी ३५ लाख रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ झाला आहे. नागपूर परिमंडळातील ७५९२ वीज ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला असून हे परिमंडळ पहिल्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर परिमंडळ (६१०१ ग्राहक) आणि पुणे परिमंडळ (५८९३ ग्राहक) ही परिमंडळे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. विभागांमध्ये नागपूर विभाग २०,४०० लाभार्थी ग्राहकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्या नंतर कोकण विभाग (१७,७९८), पुणे विभाग (१७,४४८) व छत्रपती संभाजीनगर (९८१८) यांचा क्रम लागतो.  

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास  कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे. भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ व कळवा या महावितरणच्या फ्रांचायजी क्षेत्रातील वीज ग्राहकांनाही ही योजना लागू आहे.

असा लाभ घ्या – संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा  एकदा नियमित  वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.