Home Blog Page 534

मराठी माणसावर मुजोरी करणाऱ्याचे पार्सल माघारी पाठवा – आदित्य ठाकरे

नागपूर -कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली ती दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे. महाराष्ट्रात मराठी-अमराठी, जाती-जातीचा जो वाद सुरू आहे, त्याला महायुतीचे सरकारच्या काळात वाढले आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मराठी माणसांना सोसायटीमध्ये घरे दिली जात नाही. मुंबईही महाराष्ट्राची राजधानी आहे, आणि मग देशाची आर्थिक राजधानी. राज्यातील प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसांचा आहे. आमच्या राज्यात वेगवेगळ्या राज्यातील लोकं राहत आहेत. पण जर आम्हाला कुणी माज दाखवला तर मराठी तरुणांनी त्याला न्याय दिला तर पोलिसांनीमध्ये येऊ नये.आदित्य ठाकरे म्हणाले की, कल्याणमधील मराठी माणसावर हत्याराने हल्ला करण्यात आला. कोण तो शुक्ला की कोण त्यांचे तोंड कुणी सुजवले, हातपाय तोंडले तर पोलिसांनीमध्ये येऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करतो की त्याला एमटीडीसीमधून बडतर्फ करत हे पार्सल जिथून आला तिथे त्याला परत पाठवून द्या.आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपचे सरकार येण्यापूर्वी असा वाद कधीच झाला नाही. अनेक भाषिक लोकं महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे राहत आहेत पण असा प्रकार कधीच झाला नाही. गेली 2 अडीच वर्षे शिंदे- फडणवीस यांच्या सरकारच्या काळात हे प्रकार वाढल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.आदित्य ठाकरे म्हणाले की, आमच्या परंपरेत मास मच्छी खातो, कुणी व्हेज सोसायटी करण्याचा प्रयत्न केला किंवा मराठी माणसाला घरे देण्यास नकार दिला तर त्या सोसायटीची ओसी रद्द केली पाहिजे. जर कुणी मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर कुणी दादागिरी करत असेल तर पोलिसांनी त्याला दांडा काय आहे, हे दाखविले पाहिजे.आदित्य ठाकरे म्हणाले की, परिसराचे नाव बदलण्याची गरज काय आहे, बऱ्याच ठिकाणी परिसरांचे नाव बदलण्याचा प्रकार सुरू आहे. भाजपच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राग आहे. ते राष्ट्रपुरुष आहेत, त्यांचा फोटो आम्ही सोबत घेऊन जाऊ शकतो ना त्यांच्याबद्दल भाजपच्या मनात इतका राग का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात राहून आणि महाराष्ट्राचं खाऊन मराठी माणसावरच उलटण्याची ही मुजोरी कुणामुळे आली?रोहीत पवार

मुंबई- कल्याणच्या योगीधाम परिसरातील एका सोसायटीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडियावर याबद्दल पोस्ट केली आहे.“कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेल्या गंभीर मारहाणीच्या घटनेमागे कुणाचं पाठबळ आहे? महाराष्ट्रात राहून आणि महाराष्ट्राचं खाऊन मराठी माणसावरच उलटण्याची ही मुजोरी कुणामुळे आली? महाराष्ट्राला आता दररोज हेच बघावं लागणार आहे का?” , असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेल्या गंभीर मारहाणीच्या घटनेमागे कुणाचं पाठबळ आहे?

मुंबई अदाणी,लोढा,गुंदेचा व्यापाऱ्यांच्या घश्यात घालावी यासाठी मोदी-शाहा व त्यांच्या व्यापारी गोतावळ्यानं मराठी माणसावर दादागिरी सुरु केली.

मुंबई- फक्त कल्याण नाही, मुंबईतही अदाणी,लोढा,गुंदेचा व्यापाऱ्यांच्या घश्यात घालावी यासाठी मोदी-शाहा व त्यांच्या व्यापारी गोतावळ्यानं मराठी माणसावर दादागिरी सुरु केली असून ती खपवून घेतली जाणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाने दिला आहे. खासदार संजय राऊतआनिआमदार सुनील प्रभू यांनी या संदर्भात आवाज उठविला आहे.

कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या प्रकाराची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे मनसेनं मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला असताना दुसरीकडे आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षानं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अजमेरा सोसायटीत अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने अभिजीत देशमुख यांना बेदम मारहाण केली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.दादागिरी सुरु केली

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केलं. “कल्याणमध्येच नव्हे, तर मुंबईतही हे असे प्रकार घडले आहेत. मी वारंवार बोलतोय, कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले. मराठी माणसं घाणेरडे आहेत असं म्हटलं. शिव्या घातल्या. मुंबईतही मराठी बोलायचं नाही वगैरे म्हणत मराठी माणसाला जागा नाकाल्या जात आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.“महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना निर्माण केली. भाजपानं मराठी माणसाची संघटना फोडून मराठी माणूस कमजोर केला. इथे मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळावी, मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी यासाठी हे केलं. मुबई अदाणी, लोढा, गुंदेचा व्यापाऱ्यांच्या घश्यात घालावी यासाठी मोदी-शाहा व त्यांच्या व्यापारी गोतावळ्यानं मराठी माणसाला कमकुवत केलं आहे. निवडणूक निकालांनंतर मराठी माणसावर हल्ले वाढू लागले आहेत. मराठी माणसाला मुंबईतून घालवण्याचे उद्योग चालू आहेत”, असा दावा राऊतांनी केला.दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी कल्याणमधील प्रकारावरून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांना लक्ष्य केलं. “स्वत:ला जे शिवसेना समजतायत, मोदी-शाहांनी ज्यांच्या हातात शिवसेना चिन्ह दिलं, त्या नामर्द लोकांना कालची कल्याणमधील घटना टोचते आहे का? आम्ही बघू काय करायचं ते. मराठी माणसाबाबत ज्यांना वेदना आहे त्यांनी एकत्र यायला पाहिजे. एकनाथ शिंदे नामर्द आहेत. सत्तेसाठी लाचार आहेत. काल मराठी माणसावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला हवी. आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. दोन उपमुख्यमंत्री आहेत. तुम्ही स्वत:ला कसले मराठी समजता?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

‘जीएसटी’ कॉन्सिलच्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणार;राज्यातल्या ‘जीएसटी’ कर संकलनात सुसूत्रता आणून पारदर्शकता आणणार

0
  • उप‍मुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, : आपल्या देशाने ‘एक देश एक कर’ ही संकल्पना स्वीकारली आहे, त्याच माध्यमातून ‘जीएसटी’ कर प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अनेक सवलती, अनुदानाच्या योजना राबविण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंसह कृषीक्षेत्राशी निकडीत खते, बी-बियाणे, औषधांवरील ‘जीएसटी’तून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘जीएसटी’ कॉन्सिलच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत ‘जीएसटी’च्या अनुषंगाने सदस्यांनी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. राज्यातल्या ‘जीएसटी’ कर संकलनात अधिक सुसूत्रता, पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशातल्या एकूण कर संकलनापैकी 16 टक्के करसंकलन एकट्या महाराष्ट्रातून जमा होतो. देशांतर्गत एकूण कर संकलनातमहाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे. यामुळे राज्यातल्या ‘जीएसटी’ करप्रणालीत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. राज्याच्या सीमेलगतच्या भागातून होणारी करचुकवेगिरीची प्रकार थांबविण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अनेक सवलती, सबसिडीच्या योजना राबविण्यात येतात. जीवनावश्यक वस्तूंसह कृषीक्षेत्राशी निगडीत खते, बी-बियाणे, औषधांवरील ‘जीएसटी’तून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या ‘जीएसटी’ कॉन्सिलच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.
महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम 2002 (सुधारणा) विधेयक, 2024’ मंजूर
‘महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम 2002 (सुधारणा) विधेयक, 2024’ आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या माध्यमातून राज्य शासनाचा महसूल वाढवण्यार भर देण्यात आला आहे. या विधेयकानुसार सध्याच्या महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम, 2002 मधील कलम 37 नुसार वसुलीबाबत राज्याचा प्रथम भार विशिष्ट शर्तीच्या अधीन राहून होता. या विधेयकांच्या सुधारणेनुसार महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम, 2002 अंतर्गत विनाशर्त प्रथम भार स्थापित झाल्यानंतर जलद गतीने वसुली करणे शक्य होणार आहे.

तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेल खरेदी करुन व्यापारी खोल समुद्रात उभ्या असलेल्या बोटींना बॅरेलद्वारे पुरवठा करतात. हा पुरवठा अन्य पेट्रोलपंपाद्वारे केल्या जाणाऱ्या पुरवठ्याप्रमाणे गृहीत धरुन कर भरणा करण्यापासून व्यापारी सूट घेतात. या सुधारणेमुळे किरकोळ विक्री केंद्राची व्याख्या आणि किरकोळ विक्रीचे स्पष्टीकरण कायद्यात समाविष्ट होऊन कर चुकवेगिरीला रोखणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर या कायद्यातल्या कलम 2 (24) (पाच) या कलमामध्ये सुयोग्य स्पष्टीकरणाचा समावेश केल्यामुळे, एखाद्या संस्थेने किंवा क्लबने स्वतःच्या सदस्यांना केलेल्या विक्रीवर कर आकारणी शक्य होणार आहे.

पीआयसीटी महाविद्यालयात “इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स आणि शाश्वतता” विषयावर आंतरराष्ट्रीय सत्राचे यशस्वी आयोजन

पुणे :पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT),JCAME आणि IEEE पीआयसीटी AP-S विद्यार्थी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने “इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स आणि शाश्वतता” या विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. IEEE अँटेना आणि प्रोपोगेशन सोसायटीच्या (AP-S) 75व्या वर्धापन दिनानिमित्त नुकताच हा कार्यक्रम इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागात पार पडला.
कार्यक्रमात नामांकित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये डॉ. वेंग चो च्यू (पर्ड्यू विद्यापीठ), डॉ. अजय पोद्दार (सिनर्जी मायक्रोवेव्ह, USA), प्रा. जी. एस. मणी (IEEE JCAME पुणे अध्यक्ष), प्रा. यहिया अंतर (कॅनडा), डॉ. मुरलीधरन (अॅडव्हान्सड सिस्टिम्स), आणि डॉ. पुनीतकुमार मिश्रा (ISRO) यांचा समावेश होता. तज्ज्ञांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक्समधील तंत्रज्ञान आणि शाश्वततेसाठी त्याचा महत्त्वपूर्ण वापर यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वाय. रविंदर आणि डॉ. एम. व्ही. मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. एस. टी. गंधे यांचा कार्यक्रमासाठी मोलाचा पाठिंबा मिळाला.
विशेषतः, वंचित विद्यार्थ्यांसाठी “डू-इट-युअरसेल्फ” किट्स वापरून इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सवरील सत्र आयोजित करण्यात आले. तसेच, IEEE ने “ME and Electromagnetics” नावाची प्रयोगशाळा सुरू केली. PICT च्या स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे कौतुक झाले.
हा कार्यक्रम शाश्वत तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि सहयोग वाढवण्याच्या दिशेने यशस्वी ठरला.

कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची अजित पवार यांची केंद्राकडे मागणी

0

आमदार नितीन पवार, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे यांच्या मागणीनुसार कांद्यावरील 20 टक्केनिर्यातशुल्क हटवण्यासाठी अजितदादांचे केंद्राला पत्र

मुंबई :- केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारीत चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे.

राज्यातील आमदार सर्वश्री नितीन अर्जुन पवार, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, सरोजताई अहिरे आदी लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून याप्रश्नी लक्ष घालण्याची तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती. या लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणतात की, राज्यात विशेष करुन नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांकडून परदेशात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात केली जाते. आजमितीस उन्हाळी कांदा संपलेला असून नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटाशी लढत कांद्याचे उत्पादन घेतलेले आहे. अवेळी पाऊस व बदलत्या हवामानानुसार त्यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उर्वरीत चांगल्या कांद्यास खर्चावर आधारीत चांगला भाव मिळणे गरजेचे असतांना बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. सद्यस्थितीत राज्यातील लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2400 रुपये अत्यल्प दर मिळत असून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान मोठे आहे. लाल कांदा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तात्काळ विक्री करावे लागत आहे, हे सुद्धा नुकसानीचे महत्वाचे कारण आहे. हे नुकसान टाळण्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 20 टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे. जेणेकरून लांल कांद्याचे दर टिकुन राहतील व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत चांगले दर मिळतील, असे उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय व्यापार मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले असून 20 टक्के निर्यातशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्राच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून तातडीने सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

2 किलो सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशुल्क विभागाने दोन जणांना केली अटक

0

मुंबई-सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 आणि 19 डिसेंबर 2024 रोजी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 2.073 किलो सोने जप्त केले. या सोन्याची अंदाजे किंमत 1.48 कोटी रुपये आहे. मुंबई सीमाशुल्क विभाग III ने या संदर्भात दोन व्यक्तींना अटक केली आहे.

18 डिसेंबर 2024 रोजी घडलेल्या पहिल्या प्रकरणात, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी एका खाजगी विमानतळ कर्मचाऱ्याला 03 अंडाकृती कॅप्सूल आणि या कॅप्सूल ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काळ्या रंगाच्या मोज्यांसह सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांची कसून तपासणी केल्यानंतर त्याने त्या अंडाकृती आकाराच्या कॅप्सूलमध्ये 24 कॅरेट शुद्धतेचे 1.363 किलो वजनाचे गोल्ड डस्ट वॅक्समध्ये लपवल्याचे आढळून आले. या सोन्याची अंदाजे किंमत 96 लाख रुपये आहे. अधिक चौकशीत, खाजगी विमानतळ कर्मचाऱ्याने  कबूल केले की हे सामान मुंबई विमानतळाबाहेर तस्करी करण्याच्या उद्देशाने ट्रांझिट प्रवाशाने त्याच्याकडे दिले होते. या खाजगी विमानतळाच्या कर्मचाऱ्याला 1962 च्या सीमाशुल्क कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.

काल १९ तारखेला घडलेल्या दुसऱ्या प्रकरणात, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी स्पॉट प्रोफाइलिंगच्या आधारे जेद्दाहून मुंबईला येणाऱ्या एका प्रवाशाला अडवले.त्यावेळी या प्रवाशाकडे 24 कॅरेट शुद्धतेचे एकूण वजन 745.00 ग्रॅम गोल्ड डस्ट आढळून आले. ज्याचे निव्वळ वजन 710.00 ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत 52 लाख रुपये आहे.प्रवाशाने हे सोने आपल्या शरीरात  लपवून ठेवले होते. या प्रवाशाला सीमा शुल्क कायदा 1962 अंतर्गत अटकही करण्यात आली आहे.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमाचे आयोजन

पुणे, : जिल्ह्यात मंगळवार, 24 डिसेंबर 2024 रोजी आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विविध प्रकारचे उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे; या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षक परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील योजना व तक्रार निवारणाबाबत माहिती प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये वस्तू व सेवा खरेदी करताना दर्जा तसेच वजन मापामध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून सावधानता बाळगण्याबाबतचे संदेश, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्राहकांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य आदीबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता आण्याकरीता संदेश व माहिती देणारे विविध शासकीय कार्यालयांचे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत, अशी माहिती श्री. सुधळकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आली आहे.

जिल्ह्यात 24 डिसेंबर पर्यंत सुशासन सप्ताहाचे आयोजन

पुणे, : केंद्र शासनामार्फत 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह ‘गांव की और’ या संकल्पेवर आधारित सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाच्या भारत सरकार कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन विभागाने https://darpgapps.nic.in/GGW24 हे संकेतस्थळ विकसित केले असून सर्व संबंधित विभागाकडून ‘सुशासन सप्ताह’कालावधीत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती ऑनलाईनपद्धतीने अपलोड करावी, अशा सचूना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिल्या आहेत.

सुशासन सप्ताह निमित्त आयोजित केलेले उपक्रम, मोहिम तसेच कार्यक्रमाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती सर्व विभागांनी सॉफट प्रती gbpune2016@gmail.com या ईमेल पत्त्यावर तसेच मूळ प्रती खास दुतासोबत 23 डिसेंबर 2024 पर्यंत या कार्यालयास पाठवावे, असेही श्रीमती कदम यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

स्थानिक तक्रार समितीकरीता 31 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा, 2013 अंतर्गत स्थानिक तक्रार समितीवरील अध्यक्षा व सदस्य पदांवरील नियुक्तीबाबतचे निकष निश्चित करण्यात आले असून इच्छूकांनी त्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास 31 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक तक्रार समितीमध्ये 1 अध्यक्ष आणि 2 सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. अध्यक्ष या पदाकरीता सामाजिक कार्याचा 5 वर्षांचा अनुभव असलेल्या आणि महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या महिला असावी. सदस्य पदाकरीता महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशा अशासकीय संस्था, संघटना किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती असावी. या दोन सदस्यांपेकी एक सदस्य महिला असावी. परंतु, दोन सदस्यांपैकी एका सदस्यांना कायदयाचे ज्ञान असावे किंवा त्यांची पार्श्वभुमी ही कायद्याच्या क्षेत्रातील असावी. तसेच एक सदस्य अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर मागास वर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी.

“लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचीत असलेली व्यक्तीमध्ये “समाजिक कार्य” या क्षेञात महिला सक्षमीकरणास अनुकूल सामाजिक परिस्थितीच्या निर्मितीबाबत आणि विशेषत: कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत किमान 5 वर्षांचा अनुभव असलेले सामाजिक कार्यकर्ते तसेच कामगार, सेवा, दिवाणी किंवा फौजदारी कायद्यांशी परिचित असलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

इच्छुकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 29/2, गुलमर्ग पार्क कोऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी, तिसरा मजला, जाधव बेकर्स जवळ, सोमवार पेठ, पुणे 411011 तसेच lcpune2021@gmail.com या ईमेल पत्त्यावर ९९६०७७४८५७ भ्रमणध्वनी क्रमाकांवर सपंर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर यांनी केले आहे.

29व्या आंतरराष्ट्रीय जल परिषदेचे पुणे येथे उद्घाटन

पुणे-

केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (CWPRS) आणि इंडियन सोसायटी फॉर हायड्रोलिक्स (ISH) च्या संयुक्त विद्यमाने आयोजित “हायड्रॉलिक्स, वॉटर रिसोर्सेस, रिव्हर आणि कोस्टल इंजिनिअरिंग – HYDRO 2024 इंटरनॅशनल” या  29व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले.  

18 ते 20 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या तीन दिवसीय परिषदेमधे हायड्रोलिक्स, जलस्रोत, नदी अभियांत्रिकी आणि किनारपट्टी व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांवर आमंत्रित व्याख्याने, संशोधन पेपर सादरीकरण तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक उपायांना पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

केद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे HYDRO 2024चे उद्घाटन केले. देशातील जल जीवन मिशन, अटल भूजल योजना, जल शक्ती अभियान, जल सुरक्षा व स्वच्छता आदी प्रमुख राष्ट्रीय प्रकल्पांमध्ये CWPRS च्या  योगदानाचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.  जलशक्ती मंत्रालय सचिव देबश्री मुखर्जी यांनी ही व्हिडीओ संदेशाद्वारे जल परिषदेस शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी, CWPRS चे संचालक डॉ. आर. एस. कांकरा, इंडियन सोसायटी ऑफ हायड्रोलिक्स (ISH) चे उपाध्यक्ष प्रो एच एल तिवारी, जे चंद्रशेखर अय्यर, माजी अध्यक्ष, केंद्रीय जल आयोग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, सचिव डॉ एम रविचंद्रन, संशोधन केंद्राचे अतिरिक्त संचालक आणि जल परिषद आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रभात चंद्र आदी मान्यवर उपस्थित होते. 

दरम्यान, ISH पुरस्कार जसे की ISH जीवनगौरव S.N. गुप्ता स्मृती व्याख्यान, प्रा.आर.जे. गार्डे संशोधन पुरस्कार, आयएसएच जर्नल रिव्ह्यूअर अवॉर्ड, जल विज्ञान पुरस्कार (आयएसएच जर्नलमधील सर्वोत्कृष्ट पेपर), आयएसएच सर्वोत्कृष्ट पीएचडी थीसिस पुरस्कार इत्यादींचे वितरणही करण्यात आले. यंदाचा इंडियन सोसायटी फॉर हायड्रोलिक्स (आय एस एच) जीवनगौरव पुरस्कार CWPRS चे माजी सहसंचालक, ISH चे माजी अध्यक्ष  प्रमोद देवळालीकर यांना देण्यात आला.

या वेळी जल परिषद 2024 ची स्मरणिका आणि केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या सुधारित संकेत स्थळाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या परिषदेत 350 संशोधक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

जादूचे प्रयोग : कळसुत्री बाहुल्यांचा खेळ ‌‘भविष्यातील बालरंगभूमी‌’ विषयावर महाचर्चा

प्रतिभा मतकरी यांचा ‌‘बालरंगभूमी गौरव पुरस्कार‌’ देवून होणार सन्मान
संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्यासह असणार मान्यवरांची उपस्थिती

पुणे : कलांच्या माध्यमातून मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास व्हावा, या दृष्टीने कार्यरत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेतर्फे दि. 20 ते दि. 22 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात पहिले बालरंगभूमी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील बालकलावंत तसेच दिव्यांग बालकलावंतांना सादरीकरणासाठी संधी देण्याचा बालरंगभूमी संमेलनाचा प्रयोगही प्रथमच होत आहे. बालनाटकांबरोबरच जादूचे प्रयोग, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ होणार असून हे संमेलन बालकलाकारांसह शालेय विद्यार्थ्यांना पर्वणी ठरणार आहे, अशी माहिती बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के-सामंत यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पुण्यातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक, बिबबेवाडी येथे या तीन दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून संमेलनासाठी सर्वांना मुक्त प्रवेश असणार आहे.
संमेलनाची सुरुवात दि. 20 रोजी सकाळी 9 वाजता बालनाट्यांच्या सादरीकरणाने होणार आहे. महाराष्ट्रातील विविध स्पर्धांमध्ये गाजत असलेली म्हावरा गावलाय गो (नाट्यरंग, जळगाव), विंडो 98 (मोहिनीदेवी रुंगठा शिक्षण मंडळ, नाशिक), दहा वजा एक (दामले विद्यालय, रत्नागिरी), फुलपाखरू (नाट्य आराधना, अहिल्यानगर) ही बालनाट्ये सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळात सादर होणार आहेत. दुपारी 1 वाजता प्रख्यात चित्रकार अरुण दाभोळकर व ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या विशेष उपस्थितीत कलादालनाचे उद्घाटन होणार आहे. या कलादालनात बालकलाकारांनी साकारलेली चित्र, शिल्पांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या कलादालनात जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌‍तर्फे तसेच महाराष्ट्रातील विविध तज्ज्ञांची कला, हस्तकला, व्यंगचित्र, चित्रकला याविषयी विनामूल्य कार्यशाळा होणार आहेत.
चित्ररथांसह शोभायात्रा
दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्रातून आलेल्या सर्व बालकलावंतांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून शोभायात्रेला शिळीमकर विद्यालयापासून सुरुवात होणार आहे. या शोभायात्रेचे वैशिष्टय म्हणजे यात मोठ्या चित्ररथांसह, हरियाणातून आलेल्या कलावंतांच्या भव्य मानवीकृती असणारे रामायणातील प्रतिकृती असणार आहेत. लेझीम, दिंडी यासह विविध ऐतिहासिक महापुरुषांची तसेच पारंपरिक व्ोशभूषा केलेले बालकलावंत या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. सायंकाळी 7 वाजता सुलभा देशपांडे मुक्तमंचाचे उद्घाटन रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले यांच्या हस्ते होणार आहे. पद्मश्री परशुराम गंगावणे, रघुवीर विजय जादूगार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता सुधा करमरकर मुख्यमंच येथे रघुवीर विजय जादूगार यांचे जादूचे प्रयोग तर सुलभा देशपांडे मुक्तमंचावर पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम होणार आहे.
मुख्य उद्घाटन सोहळा व बालकलावंतांचे कलादर्शन
दि. 21 डिसेंबरला सुधा करमरकर मुख्यमंचावर सोलापूर, मंगळवेढा, अहिल्यानगर, नंदूरबार, पंढरपूर, मुंबई, रत्नागिरी, पुणे, इचलकरंजी, लातूर, जळगाव, नाशिक येथील बालकलावंतांचा तर सुलभा देशपांडे मुक्तमंचावर दिव्यांग बालकलावांचे विविध कलादर्शन सादर होणार आहेत. सकाळी 10.30 वाजता सुधा करमरकर मुख्यमंचाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्याला उद्घाटक म्हणून ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांच्यासह अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, अभिनेते सुबोध भावे, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, ज्येष्ठ निर्माते अजित भुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
‌‘भविष्यातील बालरंगभूमी‌’ या विषयावर दुपारी 12 वाजता महाचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चेत नटवर्य मोहन जोशी, मोहन आगाशे, सुबोध भावे, ॲड. निलम शिर्के सामंत, राजीव तुलालवार यांचा सहभाग असणार आहे. या महाचर्चेचे सूत्रसंचालन अजित भुरे करणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 ते 5 सुधा करमरकर मुख्यमंचावर बालरंगभूमी परिषदेच्या शाखांतील बालकलावंतांचे गायन, वादन कलादर्शन होणार आहे. तर सुलभा देशपांडे मुक्तमंचावर दिव्यांग बालकलावंतांचे कार्यक्रम सादर होणार आहे. यानंतर सहभागी शाखांचा सन्मान सोहळा होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता व्यंगचित्रकारितेवर आधारित प्रख्यात व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांचा मनोरंजक कार्यक्रम होणार असून, सायंकाळी 6.30 वाजता वेशभूषा, रंगभूषा, संगीत, नृत्य यांचा विविधरंगी कार्यक्रम ‌‘दे धमाल‌’ होणार आहे. दुसऱ्या दिवशीचा समारोप रात्री 8 वाजता सुलभा देशपांडे मुक्तमंचावर शुभांगी दामले यांच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे निर्मित ‌‘चेरी एके चेरी‌’ या ग्रीप्स थिएटर बालनाट्याचा प्रयोग होणार आहे.
बालरंगभूमी संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी (दि.22) रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळशत सुधा करमरकर मुख्यमंचावर सातारा, बीड, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, परभणी, कोल्हापूर, अकोला, नागपूर, धुळे, जालना, ठाणे, पिंपरी-चिंचवड, पुणे येथील बालकलावंतांचे तर सुलभा देशपांडे मुक्त मंचावर दिव्यांग बालकलावंतांचे विविध कलादर्शन होणार आहे. दुपारी 12 ते 1 बालक, पालक आणि मान्यवरांचा परिसंवाद होणार असून, या परिसंवादाच्या सूत्रधार ज्येष्ठ अभिनेत्री निलम शिर्के-सामंत असणार आहेत. त्यानंतर विविध कलादर्शनानंतर सहभागी शाखांचा सन्मान सोहळा होणार आहे. याच दरम्यान सुलभा देशपांडे मुक्तमंचावर पद्मश्री उदयजी देशपांडे यांचे मल्लखांब खेळ व मार्गदर्शन दुपारी 12 वाजता तर दुपारी 2 वाजेपासून दिव्यांग बालकांचे कला सादरीकरण होणार आहे. दुपारी 4.30 वाजता बालप्रेक्षकांना गंमतीदार विषयांवर बोलतं करणारा मजेदार खेळ ‌‘चॅटर बॉक्स‌’ हा कार्यक्रम होणार आहे.
दिमाखदार पुरस्कार सोहळ्याने होणार समारोप
पहिल्या बालरंगभूमी संमेलनाच्या निमित्ताने बालरंगभूमीवर अविरत कार्य करणाऱ्या व महाराष्ट्रातील बालरंगभूमीचे कार्य वृध्दिंगत करणाऱ्या प्रतिभा मतकरी यांना ‌‘बालरंगभूमी गौरव पुरस्कार‌’ देवून गौरविण्यात येणार आहे. यासह पद्मश्री उदय देशपांडे, पद्मश्री परशुराम गंगावणे, रामदास पाध्ये, सलील कुलकर्णी यांना विशेष सन्मानाने तर भार्गव जगताप, खुशी जारे, आरुष बेडेकर यांना विशेष बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्याला अभिनेते सचिन पिळगावकर, संमेलनाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह गंगाराम गवाणकर, डॉ. निशिगंधा वाड, कुमार सोहवी, शैलेश दातार, ऋतुजा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सन्मान सोहळ्यादरम्यान सिने नाट्य बाल – युवा कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. यात माझी तुझी रेशीमगाठ फेम मायरा वायकूळ, लिटील चॅम्पस्‌‍ फेम बालगायिका स्वरा जोशी, अलबत्या गलबत्या फेम निलेश गोपनारायण, आमच्या पप्पांनी गणपती आणला फेम माऊली व शौर्य घोरपडे आदी बालकलाकार सादरीकरण करणार असून याप्रसंगी त्यांनाही गौरविण्यात येणार आहे.
पुणेकर रसिकांसह बालगोपाळांनी या पहिल्या बालरंगभूमी संमेलनाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के-सामंत व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

दिल्लीत आयोजित संमेलन अभूतपूर्व ठरेल : प्रतिभाताई पाटील

98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : सरहद, पुणे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या https://abmssdelhi.org या संकेतस्थळाचे (वेबसाईट) उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आज (दि. 19) करण्यात आले. दिल्लीत सुमारे 70 वर्षांनंतर होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा देऊन हे संमेलन अभूतपूर्व ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रतिभाताई पाटील यांच्या 90व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‌‘रायगड‌’ या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ॲड. प्रताप परदेशी, शैलेश वाडेकर, अनुज नहार, संतोष देशपांडे, पाटील यांच्या कन्या ज्योती राठोड आदी उपस्थित होते.
दिल्लीत होत असलेल्या संमेलनाविषयी माहिती देताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, सुमारे 70 वर्षांपूर्वी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते तर स्वागताध्यक्ष बॅरिस्टर काकासाहेब गाडगीळ होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील संमेलन झाले होते. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा योग परत जुळून आला असून या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वीकारले आहे. ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली 98वे संमेलन होत आहे.
प्रतिभाताई पाटील यांच्या 90व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा. मिलिंद जोशी यांनी मसापने प्रकाशित केलेला अक्षरधन हा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान केला. तर सरहदच्या वतीने काश्मीरी गब्बा देऊन शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांनी त्यांचा सन्मान केला. प्रतिभाताई पाटील यांच्या कुटुंबियांच्यावतीने पाटील यांच्यावरील गौरव ग्रंथ महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सरहद संस्थेला भेट देण्यात आला.

संकेतस्थळाची वैशिष्ट्ये
संकेतस्थळाची निर्मिती करताना त्याची रचना साधी-सोपी आणि आकर्षक करण्यात आली आहे. संमेलनाविषयी अद्ययावत माहिती, प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथ दालनाची नोंदणी या संकेतस्थळाद्वारे करता येणार आहे. तसेच मराठी भाषा, महाराष्ट्र आणि दिल्लीचे संबंध यावर प्रकाशझोत टाकणारी छायाचित्रे, व्हिडिओ क्लिप्स, पॉडकास्ट, न्यूज क्लिप्स पाहण्याची सोय आहे.
विश्वकोश या विशेष विभागातून मराठी साहित्य आणि साहित्यिकांविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभरातील कोट्यवधी मराठी लोकांपर्यंत या संमेलनाविषयीची माहिती पोहोचेल.
संकेतस्थळाची निर्मिती संतोष देशपांडे यांच्या मीडियाक्युरा या संस्थेने केली असून मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे विशेष सहकार्य लाभले आहे.

भागवत म्हणाले- मंदिर-मशीद वाद दररोज होत आहेत:हे योग्य नाही; काहींना वाटते असे केल्याने ते हिंदूंचे नेते होतील

पुणे-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मंदिर-मशीद वाद होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. भागवत म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर असे मुद्दे उपस्थित करून काही लोकांना ते हिंदूंचे नेते होतील,असे वाटते. हे मान्य करता येणार नाही.

भागवत म्हणाले- आपण एकत्र राहू शकतो हे भारताला दाखवण्याची गरज आहे. आम्ही बऱ्याच काळापासून एकोप्याने जगत आहोत. ही सद्भावना जगाला द्यायची असेल, तर त्याचे मॉडेल बनवायला हवे.पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेत भारत विश्वगुरू या विषयावर व्याख्यान देताना भागवत यांनी हे वक्तव्य केले. कोणत्याही विशिष्ट जागेचे नाव न घेता ते म्हणाले, ‘दररोज एक नवीन प्रकरण (वाद) उभे केले जात आहे. याची परवानगी कशी देता येईल? अलीकडच्या काळात मंदिरे शोधण्यासाठी मशिदींचे सर्वेक्षण करण्याच्या अनेक मागण्या न्यायालयापर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र, भागवत यांनी आपल्या व्याख्यानात कोणाचेही नाव घेतले नाही.भारतीय समाजातील विविधतेवर प्रकाश टाकत भागवत म्हणाले की, रामकृष्ण मिशनमध्ये ख्रिसमस साजरा केला जातो. हे फक्त आपणच करू शकतो, कारण आपण हिंदू आहोत.

ते म्हणाले, आम्ही खूप दिवसांपासून एकोप्याने राहत आहोत. ही सद्भावना जगाला द्यायची असेल, तर त्याचे मॉडेल बनवायला हवे. राम मंदिर बांधले गेले कारण हा सर्व हिंदूंच्या श्रद्धेचा विषय होता.भागवत पुढे म्हणाले – बाहेरून आलेल्या काही गटांनी त्यांच्यासोबत कट्टरता आणली आहे आणि त्यांची जुनी राजवट परत यावी अशी त्यांची इच्छा आहे. पण आता देश संविधानानुसार चालतो. या व्यवस्थेत लोक त्यांचे प्रतिनिधी निवडतात, जे सरकार चालवतात.
राम मंदिरावर बोलताना ते म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिर हिंदूंना द्यायचे ठरले होते, पण ब्रिटिशांना हे कळले आणि त्यांनी दोन समाजांत तेढ निर्माण केली. तेव्हापासून ही अलिप्ततावादाची भावना अस्तित्वात आली. परिणामी पाकिस्तान अस्तित्वात आला.
भागवत म्हणाले – इतर देशांतील अल्पसंख्याकांचे काय चालले आहे याकडे सर्वांचे लक्ष आहेभारतामध्ये अल्पसंख्याकांच्या स्थितीबाबत अनेकदा चर्चा केली जाते, असेही मोहन भागवत म्हणाले. आता इतर देशांत अल्पसंख्याक समुदायांना कोणत्या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे हे आपण पाहत आहोत.शेजारच्या बांगलादेशातील हिंदू समुदायाविरुद्धच्या हिंसाचाराचा आरएसएस प्रमुखांनी कोणताही संदर्भ दिला नसला तरी, शेख हसीना सरकारच्या हकालपट्टीनंतर आरएसएसने अलिकडच्या आठवड्यात त्या देशातील हिंदूंच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

महिलांना होणाऱ्या विशिष्ट आजारांना कव्हर करणारे जीवन विमा उद्योगाचे पहिले उत्पादन

ICICI प्रुडेन्शियल लाइफ आणि RGA ने लाँच केले

·         RGA India च्या सहकार्याने विकसित केलेले विस्तृत संशोधन उत्पादन

·         गंभीर आजाराचे निदान झाल्यास तत्काळ एकरकमी पेआउट आणि त्रास-मुक्त दाव्यांचा निपटारा    

·         ग्राहकांना उपचारांसाठी हॉस्पिटल निवडण्याचे स्वातंत्र्य

·         पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत प्रीमियमची हमी

·         प्रीमियम कालावधीसह अंगभूत लवचिकता

मुंबई: ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने आज ‘ICICI प्रू विश’ हे जीवन विमा उद्योगातील पहिल्याच प्रकारचे आरोग्य उत्पादन लाँच केले आहे, जे खास करून महिलांचे विशिष्ट गंभीर आजार आणि शस्त्रक्रियांसाठी सेवा पुरवते. हे उत्पादन ICICI प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सने एक अग्रगण्य जागतिक जीवन आणि आरोग्य पुनर्विमा कंपनी, रिइन्शुरन्स ग्रुप ऑफ अमेरिका, इनकॉर्पोरेटेड (RGA) च्या सहकार्याने विकसित केले आहे.

स्तन, गर्भाशय, गर्भाशयाचा कर्करोग आणि हृदयाचे आजार यासारख्या गंभीर आजारांच्या निदानावर ICICI प्रू विश आरोग्य कव्हरच्या रकमेच्या 100% पर्यंत त्वरित पेआउट ऑफर करते. मानक योजनांच्या विपरित, जेथे पेआउट परतफेड स्वरूपात असतात, हे उत्पादन ग्राहकांना लवचिकता प्रदान करून निदानावर निश्चित एकरकमी देते.

या संदर्भात केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षानुसार, ग्राहकांच्या चिंतेचे एक कारण म्हणजे दर काही वर्षांनी प्रीमियममध्ये वाढ होण्याची शक्यता. ICICI प्रू विश, 30 वर्षांच्या प्रीमियम गॅरंटी कालावधीसह, ग्राहकांना त्यांच्या प्रीमियम पेमेंटसाठी अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यास सक्षम करू शकते आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना मानसिक शांतता देते. हे उत्पादन ग्राहकांना प्रीमियम पेमेंट टर्म दरम्यान कधीही 12 महिन्यांसाठी प्रीमियम सॅबॅटिकल प्रदान करते. हे वैशिष्ट्य ग्राहकांना आर्थिक लवचिकता देते, तसेच त्यांना त्यांच्या आरोग्याच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सज्ज करते.

याशिवाय, हे उत्पादन ग्राहकांना बाळंतपणातील गुंतागुंत आणि नवजात बाळाचे जन्मजात आजार कव्हर करण्याचा पर्याय देखील देते.

ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य उत्पादन आणि वितरण अधिकारी श्री. अमित पल्टा म्हणाले, “आयसीआयसीआय प्रू विश हे जीवन विमा उद्योगाचे पहिले आरोग्य उत्पादन महिलांच्या विशिष्ट आरोग्यविषयक आजारांसाठी देताना आम्हाला आनंद होत आहे. हे उत्पादन त्यांना त्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी एकरकमी पेआउट ऑफर करून आर्थिकदृष्ट्या तयार होण्यास सक्षम करते.

भारतीय महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक आव्हानांबाबत आमचा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि त्यासंदर्भात RGA इंडियाचे सखोल ज्ञान यांचा मिलाफ करून ICICI प्रू विश विकसित करण्यात आले आहे. महिला ग्राहक वर्ग मोठ्या बाजारपेठेची संधी देतो आणि हे उत्पादन विशेषतः या विभागाच्या विमा गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. महिलांना होणाऱ्या आरोग्य जोखमींमुळे होणाऱ्या आर्थिक संकटातून हे उत्पादन मुक्ती देईल.

ICICI प्रू विश ग्राहकांना 30 वर्षांसाठी प्रीमियम गॅरंटी देऊन त्यांना काही वैद्यकीय घटनांसाठी एकाधिक दावे करण्याची लवचिकता देऊन आकर्षक प्रस्ताव देते. महत्त्वाचे म्हणजे, हे अतिरिक्त पेआउट करते ज्यामुळे आजारातून बाहेर पडण्याचा खर्च कव्हर होण्यास मदत होते.”

श्री. सुनील शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, रिइन्शुरन्स ग्रुप ऑफ अमेरिका, इंडिया म्हणाले, “ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स सोबत ‘ICICI Pru Wish’ सोबत आमच्या सहकार्याची घोषणा करताना आनंदी आहोत. आजच्या जगातील भारतीयांच्या विशेषत: महिलांच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले हे एक अग्रगण्य आरोग्य उत्पादन आहे. ही भागीदारी बाजारातील बदलत्या मागणीनुसार नावीन्यपूर्ण, ग्राहक-केंद्रित उपाय ऑफर करण्याच्या आमच्या परस्पर समर्पणावर प्रकाश टाकते.”

अधिक माहितीसाठी कृपया येथे मेल करा: corpcomm@iciciprulife.com