Home Blog Page 532

सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर 11.322 किलो गांजा केला जप्त

0

मुंबई-

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 19 डिसेंबर 2024 रोजी 11.322 किलोग्राम हायड्रोपोनिक विड (गांजा) जप्त केला. या कारवाईत सुमारे 11.322 कोटी रुपयांचे अवैध अंमली पदार्थ,  ट्रॉली बॅगेच्या आत हवाबंद प्लास्टिक पिशव्यांमध्ये लपवून ठेवलेले आढळले.

सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी संशय आल्यानंतर तात्काळ कारवाई करून बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला अडवले, त्याची कसून तपासणी केली आणि त्याच्याकडे लपवलेले अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी, अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा 1985 अंतर्गत  या प्रवाशाला अटक केली असून पुढील तपास चालू आहे.

तू मइके चली जायेगी, मैं डंडा लेकर आऊंगा…असं काही करून भाजपा सरकार चालतेय .. जयंत पाटील पहा काय म्हणाले…

जयंत पाटील म्हणाले की, निकालानंतर राज्यात थोडं नाराजी नाट्य सुरू होते. कुणी आपल्या गावाकडे निघून गेले. या परिस्थितीला एक गाणं खूप अनुरूप आहे.

तू मइके चली जायेगी
मैं डंडा लेकर आऊंगा
मैं डंडा लेकर आऊंगा
तू डंडा लेकर आएगा
मैं कुए में गिर जाऊंगी
मैं कुए में गिर जाऊंगी
मैं रस्सी से खिंचवाऊंगा
मैं पेड़ पे चढ़ जाऊंगी
मैं ारी से कटवाऊंगा
तुम मइके चली जायेगी
मैं दूजा ब्याह रचाऊँगा
मैं दूजा ब्याह रचाऊँगा
मैं मइके नहीं जाऊंगी
मैं मइके नहीं जाऊंगी

असे काहीसे राज्यात झाले. कुणी मायके गेले नाही दुजा ब्याह रचाऊँगा म्हटलं की घाबरुन जुळणी झाली, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, निकाल लागून एक महिना होत आला पण गिरीश महाजन यांना माहिती नाही की आपण कोणत्या खात्याचे मंत्री होणार. अधिवेशनाचे 6 दिवस झाले पण कोणत्या खात्याचे आपण उत्तर द्यायचे हे मंत्र्यांला माहिती नाही.

जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे मी कौतुक करतो की त्यांनी कोणत्याही चर्चांचे उत्तर देण्याचा त्रास तुम्हाला कुणाला होऊ दिला नाही. याचा दुसराही अर्थ होतो तो म्हणजे तुमच्या कुणाचीही गरज नाही एक मुख्यमंत्री काफी आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करायचे पाहिजे. 237 आमदारांचा पाठिंबा मिळाला आणि तुम्हा कोणत्याही मंत्र्यांची गरज नाही हे सांगण्यासाठी ह्या अधिवेशानाचा वापर झाला आहे.

‘शिव गौरव गाथा’ महानाट्यातून उलगडला शौर्याचा इतिहास

हिंदू सेवा महोत्सवात सादरीकरण ; तब्बल १५० हून अधिक कलाकारांचा सहभाग                                                        पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, प्रशासन आणि विचार धारेवर आधारित तसेच ज्या ज्या क्रान्तिकारकांनी शिवरायांकडून प्रेरणा घेऊन भारत मातेसाठी कार्य केले, अशा महावीरांना वंदन करीत शिवगौरव गाथा हे महानाट्य सादर झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट, यांच्या जीवनाचे पैलू उलगडून दाखविण्यासोबतचा भारतीयांच्या शौर्याचा इतिहास मांडण्यात आला.
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये महानाट्य शिव गौरव गाथा चे सादरीकरण झाले. याप्रसंगी डॉ. सुनील काळे, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या प्रशासन व दृष्टीकोनाबद्दल काही प्रसंग यामध्ये आहेत. संख्येने काही शेकडो असलेले मावळे हजारोंच्या मुघल सैन्यलाल कोणत्या प्रेरणेमुळे नामोहरम करू शकले, याबाबी महानाट्यात ठळकपणे दर्शविण्यात आल्या. जिजाऊंचे बालशिवाजींना रामायणातील कथा सांगण्याचे प्रसंग आणि त्यातून संस्कार कसे घडतात, हे देखील दाखविण्यात आले आहे. अफजलखान वध हा गाण्याच्या माध्यमातून सुरेखपणे दाखविण्यात आला आहे.  

लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, स्वातंत्रवीर सावरकर, महात्मा फुले, लहुजी वस्ताद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस या सारख्या असंख्य पुढारी आणि क्रांतिकारकांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन भारत मातेसाठी महान कार्य केले. हे सर्व पात्र त्यांच्या प्रेरणेविषयी महानाट्यात सांगत होते. संजय भोसले लिखित आणि दिग्दर्शित या महानाट्यात भारतीय एकात्मतेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा संदेश देण्यात आला आहे.

निर्मिती डॉ. जनार्दन चितोडे यांची होती. महानाट्याचे सादरीकरण संवाद, गाणी, पोवाडे आणि आकर्षक नृत्याच्या माध्यमातून केले आहे. नृत्य दिग्दर्शन मयूर वैद्य यांनी केले.
ऐतिहासिक काळात नेणारे नेपथ्य, भव्य असा असा रंगमंच, आकर्षक वेशभूषा आणि उत्तम प्रकाशयोजना या महानात्याची वैशिष्ट्ये आहेत. जवळपास १५० कलाकारांनी हे महानाट्य सादर केले आहे.

राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर:सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट

0

मुंबई -काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या रविवारी परभणीच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यात ते परभणी हिंसाचारात न्यायालयीन कोठडीत संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत. त्यांच्यासोबत विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील प्रमुख काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत.

परभणी शहरात गत आठवड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. आंदोलकांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा रविवारी न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. प्रारंभी सोमनाथ यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा केला जात होता.

पण त्यानंतर पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आंबेडकरी समाजात संतापाची तीव्र लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी परभणीच्या दौऱ्यावर येऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे राज्यातील सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी परभणी हिंसाचारावर विधानसभेत निवेदन केले. त्यात त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला नसल्याचा दावा केला. तसेच ते पोलिस कोठडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले होते. सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता. तसा उल्लेख त्यांच्या शवविच्छेदन अहवालात आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले, तेव्हा त्यांच्या पोटात जळजळ होत होती. तशी तक्रार केल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील निवेदनानंतर अवघ्या 10 मिनिटांतच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने त्यांचा दावा फेटाळला होता. माझा मुलगा 4 दिवस त्यांच्या ताब्यात होता. माझा मुलगा आजारी होता, तर त्यांनी आम्हाला का बोलावले नाही? आता ते माझा मुलगा आजारी असल्याचा दावा करत होता. पण माझ्या मुलाला कोणतेही व्यसन नव्हते. तो ठणठणीत होता. त्याचा मृत्यू होईपर्यंत पोलिसांनी आम्हाला बोलावले नाही. त्याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा होता असे रिपोर्टमध्ये का आले? असा खडा सवाल सूर्यवंशी यांच्या आईने उपस्थित केला आहे.

पीडित आईने यावेळी सरकारने देऊ केलेली 10 लाख रुपयांची मदतही नाकारली आहे. माझा मुलगा आजारी असल्याचे सरकार चुकीचे सांगत आहे. मला त्यांचे 10 लाख रुपये नको. मला केवळ न्याय हवा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

शरद पवार परभणीत:सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट; म्हणाले- सोमनाथ यांना झालेली मारहाण अयोग्यच

0

परभणी-मस्साजोगनंतर शरद पवार यांनी परभणीमध्ये जात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सूर्यवंशी कुटुंबीयांनी माझ्या मुलाला ज्यांनी मारले त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी असेही कुटुंबीयांनी म्हटले आहे.

दरम्यान शरद पवार म्हणाले की, शांततेत आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार झाला तो अतिशय धक्कादायक आहे. सोमनाथ यांना मारहाण करणे योग्य नव्हते. त्यांना ज्यांनी मारले त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. सोमनाथ यांच्या मृत्यू प्रकरणी वस्तूस्थिती समजून घेण्यासाठी मी इथे आलो आहे. तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आमची आहे.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी ह्या मुद्द्यावर चर्चा केली. सोमनाथ यांचा गुन्हा काय होता. माझ्या माहितीनुसार जे आंदोलन झाले ते शांततेत झाले होते. आंदोलन शांतेत असताना पोलिसांनी यांना सर्वांना अटक केली. यानंतर शरद पवार यांनी परभणीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. कुटुंबाची भूमिका काय हे जाणून घेतल्यानंतर सरकारशी मला बोलता येईल. त्यासाठीत मी आलो आहे. घडलेली घटना गंभीर आहे.

शरद पवार म्हणाले की, जे सगळं घडले ते सर्वांना धक्का देणारे आहे. महाराष्ट्र विधानसभेत अनेकांनी हा मुद्दा उपस्थित केला. तुमची जी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी ही तुमची मागणी मी राज्य सरकारकडे पोहचवणार आहोत. अन्याय अत्याचार सहन करायचा नाही ही तुमची भूमिका अगदी योग्य आहे.

सोमनाथ सूर्यवंशी याला काहीच आजार नव्हता. त्यांचा खून करण्यात आला आहे. तो आंदोलनात नसताना त्याला अटक करण्यात आली. सोमनाथचा मृतदेह घेऊन जात असताना पोलिसांनी आम्हाला खूप त्रास दिला. 5 दिवसांमध्ये मारहाण करत ज्यांनी माझ्या मुलाचा खून केला त्या सर्वांना फाशीची शिक्षा द्यायला हवी. या 5 दिवसात आम्हाला काहीच माहिती दिली नाही. डायरेक्ट त्याचे निधन झाल्याचा फोन आला.

आम्ही त्यांची बॉडी ताब्यात घेण्यासाठी गेलो असता आम्हाला सोमनाथच्या अंगावर व्रण दिसून आले. त्याला पोलिस ठाण्यात मारले नाही. बाजूला एका रुममध्ये नेत मारहाण करण्यात आली असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल दिलेली सर्व माहिती खोटी आहे.

महात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची निवड

स्वागताध्यक्षपदी रवींद्र फुले, निमंत्रकपदी छायाताई नानगुडे व सुनील धिवार

दशरथ यादव यांची माहिती

सासवड, : खानवडी (ता.पुरंदर) येथे होणा-या सतराव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक न्यायाधीश वसंतराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष पदी रवींद्र फुले तर निमंत्रक पदी छायाताई नानगुडे व सुनील धिवार यांची निवड करण्यात आली आहे. संमेलन दि.२८ डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

महात्मा फुले यांच्या मूळ खानवडीमध्ये दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात ग्रंथदिडी, उदघाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध कवी प्रकाश घोडके उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, माजी आमदार संभाजीराव कुंजीर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे आदी उपस्थित राहणार आहेत.

श्री पाटील हे साहित्य क्षेत्रात गेली वीस वर्षे काम करीत असून न्यायपालिकेत न्यायधीश म्हणून सेवा करीत साहित्यात वेगळा ठसा त्यांनी उमटविला आहे. शेकडो कविसंमेलने त्यांनी केली आहेत. मूळचे नाशिक जिल्ह्यातील असून मुंबईत जलद गती न्यायालयात न्यायधीश म्हणून त्यांनी काम केले आहे.

यापूर्वी झालेल्या महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, इतिहासाचार्य मा.म.देशमुख, म.भा.चव्हाण, प्रा.गंगाधर बनबरे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रा. रतनलाल सोनग्रा, डाँ सय्यद जब्बार पटेल, डाँ जयप्रकाश घुमटकर, दशरथ यादव, हरीश मेश्राम, भा.ल.ठाणगे, रावसाहेब पवार, डॉ स्वाती शिंदे, अविनाश ठाकरे, यांनी भुषविले आहे.
साहित्य संमेलनाचे संयोजन राजाभाऊ जगताप, गंगाराम जाधव, दत्ता होले, चंद्रकांत फुले, रमेश बोरावके, दिपक पवार, संजय सोनवणे, श्यामराव मेमाणे आदी करीत आहेत .

अखेरीस त्या माजूर्ड्या अखिलेश शुक्लाला अटक

0

मुंबई : मराठी माणसांना द्वेष पूर्ण वागणूक देत मारहाण करणाऱ्या माजुर्ड्या अखिलेश शुक्लाला कल्याण पोलिसांनी अखेरीस अटक केली आहे. अखिलेश शुक्ला हा टिटवाळा परिसरात लपून बसला होता. तिथून त्याला अटक करण्यात आली आहे.

कल्याणमधील अजमेरा सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणारा अखिलेश शुक्लाला पोलिसांनी अटक केली आहे. डिसीपी अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल आहे. यात अखिलेश शुक्ला याला ताब्यात घेतलं आहे. आरोपी अखिलेश हा टिटवाळा आणि शहाड परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचून आरोपीला अटक केली. अखिलेशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याच्या व्हिडीओच्या लोकेशनमुळे त्याला अटक करण्यात आली. आमचे टीम टिटवाळा शहर परिसरात आरोपीचा शोध घेत होती. या शोध दरम्यान त्याला पकडलं. त्याची वैद्यकीय चाचणी करून न्यायालयात हजर केले जाणार आहे’ अशी माहिती झेंडे यांनी दिली.

तसंच, या प्रकरणात आणखी गुन्हे दाखल केले जाणार आहे. जखमींचा जबाब घेतला आहे. त्यानुसार कलम वाढवण्यात येणार आहे. शुक्लावर आधी सुद्धा काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा सुद्धा आम्ही तपास करत आहोत, असंही झेंडे यांनी सांगितलं.

अखिलेश शुक्लाचा ड्रामा सुरू

दरम्यान, अखिलेशनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ” आमची पाचवी पिढी कल्याणमध्ये राहत असून, मी स्वतःला मराठी भाषिक समजतो. हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे. तसंच माझ्या पत्नीवर आधी हल्ला झाला आणि नंतर माझ्या मराठी भाषिक मित्रांनी मला वाचवलं. तसंच वादादरम्यान देशमुख कुटुंबीयांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला आणि माझ्या पत्नीला केसांनी पकडून मारहाण केली, असं आरोपी अखिलेशचं म्हणणं आहे

नानासाहेब पेशवे द्विशताब्दी जन्म सोहळा वेणगाव येथे जल्लोषात संपन्न

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि नानासाहेब पेशवे स्मारक समितीतर्फे आयोजन
पुणे :  सन १८५७ च्या स्वातंत्र्य समराचे शिल्पकार नानासाहेब पेशवे यांच्या २०० व्या जन्मदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वेणगाव या त्यांच्या जन्मस्थानी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातून निघालेल्या रायगड व शनिवारवाड्याच्या जलकलश असलेल्या रथाचे वेणगाव येथे दोनशे महिलांनी औक्षण करून स्वागत केले. या सोहळ्यात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी झाशीची राणी, भाई कोतवाल यांच्या जीवनावर नाट्य सादरीकरण केले. वनवासी कल्याण आश्रमाच्या मुलांनी नृत्य सादर केले. 
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि नानासाहेब पेशवे स्मारक समिती यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान झाले. व्यासपीठावर पेशव्यांचे वारसदार पुष्कर पेशवे, हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्नुषा मेधा कोतवाल, नानासाहेब पेशवे स्मारक समितीचे अध्यक्ष विवेक सुर्वे, इतिहास अभ्यासक मोहन शेटे  उपाध्यक्ष भाई गायकर , सचिव रमेश मुंढे, कोषाध्यक्ष नितीन कांदळगावकर, रायगड स्मारक मंडळाचे सुधीर थोरात, संदीप महिंद गुरुजी उपस्थित होते. 
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, सन १८५७ ला संपूर्ण देशात क्रांतियज्ञ प्रज्वलित करणारे नानासाहेब पेशवे हे भारतमातेचे थोर सुपुत्र होते. वेणगाव च्या भूमीने एका राष्ट्रसमर्पित सेनानीला जन्म दिला आहे. महापुरुषांच्या स्मरणाने आपल्याला सुद्धा राष्ट्रकार्यासाठी प्रेरणा मिळते, असेही त्यांनी सांगितले. 
नानासाहेब पेशवे यांच्या २०० व्या जन्मदिनानिमित्तइतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने पुणे ते वेणगाव अशी रथयात्रा आयोजित केली होती. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले व क्रांतिगुरु लहुजी वस्ताद आणि आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक स्मारक समितीच्या पदाधिका-यांनी रायगड व शनिवारवाड्याच्या जलकलशांचे पूजन करुन यात्रेस प्रारंभ करुन दिला.       मोहन शेटे यांनी वेणगाव येथे नानासाहेब पेशवे यांचे भव्य स्मारक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी स्मारकासाठी पाच एकर जागा देण्याची घोषणा केली. पनवेल येथील आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यास संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.       
समीर‌ सोमने यांनी सूत्रसंचालन केले.

राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या खोट्या FIR च्या निषेधार्थ पुणे काँग्रेसचे निषेध आंदोलन.

पुणे

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी संसदेत संविधानाच्या विषयावर आपले मत मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद बेताल वक्तव्‍य केले याच्या निषेधार्थ काल दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी काँग्रेस पक्षाने संसदेच्या बाहेर निदर्शने केली आणि भाजपाच्या खासदारांनी इंडिया ब्लॉगच्या खासदारांना संसदेमध्ये प्रवेश करून दिला नाही आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना धक्काबुक्की केली त्यामुळे खाली पडले. या घटनेची दिशाभुल करण्यासाठी भाजप खासदारांनी राहुल गांधीमुळे त्यांच्या खासदारांना दुखापत झाली असे खोटे आरोप करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांवर दबाव आणला. पोलीसांनी दबावाखाली राहुल गांधीवर FIR दाखल केला याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ना. गोपाळकृष्ण गोखले स्मारक, फर्ग्युसन कॉलेज रोड येथे भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन केली.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘भारतीय जनता पक्षाचे नेहमीचे धोरण आहे की, ‘‘खोटे बोला पण रेटून बोला’’. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमित शहांनी केलेल्या वक्तव्‍या विरोधात संसदेत आवाज उचलला आणि देशाच्या जनते समोर भाजपाचा पर्दाफाश केला यामुळे त्यांनी पोलीसांवर दबाव टाकून खोटी FIR दाखल केली. आज काँग्रेस पक्षाने भाजपाच्या दडपशाही विरोधात आम्ही निदर्शने करून निषेध व्‍यक्त करीत आहोत. भाजपाच्या या कृत्यास जनता योग्यवेळी धडा शिकवेल.’’

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत ॲड. अभय छाजेड, सदानंद शेट्टी, अमिर शेख, मेहबुब नदाफ, नीता रजपूत, लता राजगुरू, अजित दरेकर,राज अंबिके, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, संदिप मोकाटे, गुलाम हुसेन खान, संजय मोरे, ब्लॉक अध्यक्ष अजित जाधव, रमेश सकट, रमेश सोनकांबळे, भरत सुराना, सुजित यादव, विनोद रनपिसे, अविनाश अडसुळ, भुषण रानभरे, प्रदिप परदेशी, ॲड. नंदलाल धिवार, प्रियंका रणपिसे, प्राची दुधाने, उषा राजगुरू, अर्चना शहा, शारदा वीर, सुंदरा ओव्‍हाळ, सीमा सावंत, अमित कांबळे, गणेश गुगळे, किशोर मारणे, रामदास केदारी आदी उपस्थित होते.

सामाजिक कार्यात तरुण पिढीचा सहभाग वाढविण्याची आवश्यकता

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी ;  परिषदेतर्फे २१ व्या अधिवेशनाचे पुण्यात उद्घाटन
पुणे : बदलत्या जीवनशैली बरोबर विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालली आहे. समाजातील युवा पिढी विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय आणि व्यापार क्षेत्रात आघाडीवर आहे, मात्र ही नेक्स्ट जनरेशन समाजापासून अलिप्त असल्याचे दिसते. समाजकार्य किंवा न्यातीसाठी एकत्र येणे म्हणजे केवळ सीनियर सिटीजन्सचे काम नाही. सामाजिक कार्यात तरुण पिढीचा सहभाग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेतर्फे २१ वे अधिवेशन गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर समाजश्रेष्ठी सुरेंद्र शंकरशेट, उदयराव गडकरी, दिनकर बायकेरीकर, डॉ.आनंद पेडणेकर, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, प्रमोद बेनकर, स्वागताध्यक्ष अजय कारेकर, साहित्य संमेलन अध्यक्षा कृष्णी वाळके आदींसह संस्थेचे देशभरातील पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. 
श्री अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या यजमानपदाखाली हे आयोजन करण्यात आले आहे. कमिटीचे सरपंच अजय कारेकर, चिटणीस अरुणा गडकरी, खजिनदार संजय चाचड, विश्वस्त नंदकुमार पेडणेकर, रत्नाकर काकतीकर यांनी अधिवेशनात आयोजनाकरिता विशेष परिश्रम घेतले आहेत. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले.
डॉ. गजानन रत्नपारखी म्हणाले, दैवज्ञ समाजातील बहुतांश कुटुंब हे सुवर्णकार व्यवसायात आहेत, आज रशिया – युक्रेन आणि इस्त्रायल – हमास युद्धामुळे  या व्यवसायवर मंदीचे सावट पसरले आहे, यामुळे यातील छोट्या कारागिरांना, छोट्या सुवर्ण व्यापाऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव देण्याचा विषय असो की नानांच्या स्मारकाचा विषय असो हे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय पाठबळाची आपल्याला गरज आहे. समाज एकत्र असल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सूर्यकांत कल्याणकर यांनी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद संस्थेच्या कामाचा आढावा घेत अधिवेशनाचे महत्व विषद केले. अन्य मान्यवरांच्या  मनोगतातून सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी समाजाने एकत्र यावे, असे आवाहन केले.

गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात पुण्यात रास्ता रोको आंदोलन व निदर्शने.

पुणे-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ह्यांनी संसदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांना उद्देशून केलेल्या अवमानकारक वक्तव्या विरोधात संपुर्ण देशात संसद, विधानसभा, विधानपरिषद, असो किंवा रस्त्यावर भाजप सरकार विरोधात आंदोलन छेडले जात आहे.शिवसेना पुणे शहराच्या वतीने अमित शहा यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको करून निषेध करण्यात आला .
डॉ बाबासाहेब आंबेडकर का अवमान नही सहेगा हिंदुस्तान”, बोला जय भिम”, ” मी आंबेडकर.. तू आंबेडकर … अशा घोषणेने पुण्यात दांडेकर पूल परिसरात शिवसेना [उद्धव बाळासाहेब ठाकरे] पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले, यावेळी शिवसैनिकांसोबत स्थानिक नागरिकांनीही, महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला , आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले, आणि अमित शाह ह्यांनी गृहमंत्री पदाचा त्वरित राजीनामा द्यावा ही मागणी करण्यात आली.
यावेळी शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले कि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला बुध्दीचातुर्याने राज्यघटना दिल्यामुळेच आपण देशाचे गृहमंत्री म्हणून संसदेत आहेत. आणि तिथे बसूनच आपण पूजनीय असलेल्या विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना करता, भाजपच्या पोटातले आपण ओठावर आणले. देवाची पूजा आम्ही सर्व बांधव आवर्जून करतो. त्यासोबतच ज्यांनी आम्हाला स्वर्गाहून चांगल स्वराज्य दिल. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करतो. देशाला ज्यांनी राज्यघटना दिली. संविधान लिहून कायदा तयार केला. सर्वाना समान जगण्याचा हक्क, अधिकार दिला. तडीपार गुन्हेगार असूनही त्यांना निवडणूक लढवण्याचा हक्क दिला. सभागृहात मानसन्मान मिळवून दिला. ज्या महामानवाने न्याय मिळण्यासाठी न्यायालय दिले. पृथ्वीवरच स्वर्गसुख दिले. त्या परमपूज्य, विश्वरत्न, महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचीदेखील आम्ही पूजा करतो. तुमच्या देवाची आठवण सांगतो. पुण्यात औंध भागात ज्यावेळी आधुनिक देवाच मंदिर उभ करून आधुनिक देवाची पूजा सुरू झाली. त्यावेळी आपण गप्प होतात. तेव्हा 7 जन्माच्या स्वर्गसुखाची आठवण नाही झाली. महागाईच्या देवाची शिवसेनेने पूजा केली आणि आधुनिक देव मंदिरासहित गायब झाला. हे आपण हेतुपुरस्सर विसरलात. ज्यांनी जगण्याच सामर्थ्य दिलं त्यांचीच अवहेलना करता. यासर्व वक्तव्याचा, विचारांचा आणि तुमचा जाहिर निषेध करीत आहे. यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रदेश संघटक वसंत मोरे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत , उपशहरप्रमुख प्रशांत राणे, भरत कुंभारकर, शहर संघटक राजेन्द्र शिंदें, किशोर रजपूत, बाळासाहेब भांडे, उमेश गलिंदे, निलेश जठार, विभागप्रमुख सुरज लोखंडे, प्रसाद काकडे, गोविंद निंबाळकर, प्रसाद चावरे, संदीप गायकवाड, अजय परदेशी, अनिल माझीरे, मनीष जगदाळे, नंदू येवले, राजू चव्हाण, दिलीप पोमण, मारुती ननावरे, मकरंद पेठकर, अजित बांदल, युवासेनेचे शहर अधिकारी राम थरकुडे, परेश खांडके, गौरव पापळ, विलास नावडकर, ज्ञानंद कोंढरे, विजय जोरी, संजय साळवी , आरोग्य सेनेचे रमेश क्षिरसागर, नितीन निगडे, स्वप्नील जोगदंड, नीतीन रावलेकर, अरविंद दाभोलकर, निखिल जाधव, तानाजी लोहकरे, प्रतीक गलिंदे, नितीन दलभजन, बाळासाहेब गरूड, अप्पा आखाडे, शिवाजी पासलकर, राहुल शेडगे, रमेश लंडकत, गणेश घोलप, सुनील गायकवाड, नंदू जांभळे, देवेंद्र शेळके, शरद गुप्ते, सचिन मोहिते, मिलिंद माने,अमोल रणपिसे, गणेश वायाळ, सागर देठे, सतीश गवळी, शहादू ओव्हाळ, आकाश बालवडकर, महिला आघाडीच्या वतीने वैशाली कापसे, शीतल जाधव, कमल रोकडे, मथुरा बाई गवळी, तसेच स्थानिक नागरिक , आंबेडकर प्रेमींनी उस्फुर्त आंदोलनात सहभाग नोंदविला .

पुस्तक विक्री स्टॉल लावण्यासाठी २७ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि.20: हवेली तालुक्यातील मौजे पेरणे येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित विजयस्तंभास अभिवादन सोहळ्याच्यावेळी पुस्तक विक्री स्टॉल लावण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन स.नं.१०४/१०५, विश्रांतवाडी रोड, पोलीस स्टेशन समोर, येरवडा, पुणे येथे २७ डिसेंबर २०२४ रोजी दु.१२ वाजेपर्यंत अर्ज सादर करावे.

स्टॉलकरीता कार्यालयाच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज केवळ प्रत्यक्ष या कार्यालयात तसेच acswopune@gmail.com या ईमेल पत्त्यावर स्वीकारले जाणार आहेत. इतर कोणत्याही समाज माध्यमांद्वारे स्विकारले जाणार नाहीत.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य किंवा क्षमतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने स्टॅल वाटप करण्यात येणार आहे. स्टॉल वाटपाबाबत सर्व अधिकार तसेच याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्याबाबचे सर्व अधिकार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांचेकडे राहतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे देवदूतच – संदीप खर्डेकर.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे रक्तदाब तपासणी यंत्र भेट – यापुढेही सर्वोतोपरी मदत करणार

पुणे-मशाल संस्थेच्या माध्यमातून वस्ती विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे देवदूतच आहेत असे गौरवोदगार क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी काढले.
आज मशाल संस्थेच्या आरती भोर आणि कविता तडवी यांना ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणी साठी सात (7) रक्तदाब तपासणी यंत्र भेट देताना कर्तव्यपूर्तीचे समाधान आहेच पण भविष्यात देखील त्यांना अधिकाधिक सहाय्य करणार असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.यावेळी ट्रस्ट चे सदस्य सारंग राडकर, सोशल वर्कर आणि मशाल च्या कम्युनिटी ऑफिसर आरती भोर, कविता तडवी, वंशिका ट्रस्ट चे विशाल सातपुते इ मान्यवर उपस्थित होते.
मशाल संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करणाऱ्या व त्यांना औषधोपचार उपलब्ध करून देणाऱ्या आरती भोर व कविता तडवी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्यात हाडांचा ठिसूळपणा, रक्तदाब, मधुमेह इ आरोग्याच्या समस्या वाढल्या असून परिस्थिती मुळे ते दुखणं अंगावर काढतात असे सांगितले.त्यावर संदीप खर्डेकर यांनी “ग्लोबल ग्रूप, वेस्टर्न इंडिया फोर्जिंग, नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट” या सह अनेक दानशूर अश्या कार्याला मदत करत असतात त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला जी मदत लागेल ती उपलब्ध करेन असे वचन दिले.

…अन उलगडली शीख समाजाच्या त्यागाची कहाणी

  हिंदू सेवा महोत्सवात ‘सफर ए शहादत’ लाईट अँड साउंड शो चे आयोजन ; पटियाला येथील २५ कलाकारांचा सहभाग
पुणे : जो बोले सो निहाल, सत श्री अकाल… च्या घोषणांनी स.प. महाविद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. ‘सफर ए शहादत’ या लाईट अँड साऊंड शो मधून शीख समाजाच्या त्यागाची कहाणी पुणेकरांसमोर उलगडली. पटियाला येथील २५ हून अधिक कलाकारांनी यामध्ये सादरीकरण केले.

हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘सफर ए शहादत’ हा साऊंड अँड लाईट शो सादर करण्यात आला. यावेळी हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांसह शिख समाजातील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. चरणजितसिंग सहानी यांनी या सादरीकरणाकरिता विशेष पुढाकार घेतला होता. युनायटेड सिंग सभा फाऊंडेशन तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, तर महाराष्ट्र पंजाबी साहित्य अकादमी, महाराष्ट्र शासन यांचे सहकार्य मिळाले आहे.

पंजाबी रंगमंच पाटियला यांनी यामध्ये सादरीकरण करीत माता गुजरी पासून गुरु तेगबहाद्दूर जी, गुरु गोविंदसिंग, साहेबजादे व बंदा बहाद्दूर यांच्यापर्यंत समाजबांधवांवर जे जे अत्याचार झाले, ते नाट्य स्वरूपात सादर केले. दिनांक २२ डिसेंबर २०२४ पर्यंत भव्य महोत्सव होत असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक महत्वपूर्ण देवस्थाने, सामाजिक व धार्मिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

भारत जोडो यात्रेत सहभागी आहेत असा आरोप आपण केला होता त्या अर्बन नक्षली संघटनांची यादी द्या.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्र लिहून मागणी.

मुंबई, दि. २० डिसेंबर २०२४
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत समाविष्ट झालेल्या विविध संघटना राज्याच्या व लोकशाहीच्या विरोधात काम करणाऱ्या व अर्बन नक्षलवाद माजवणाऱ्या होत्या, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणावरील केला आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या त्या अर्बन नक्षली संघटनांची व त्या संघटनेच्या प्रमुखांची यादी द्यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, पुरोगामी महाराष्ट्रात विविध सामाजिक संघटना अनेक वर्षांपासून समाजोपयोगी कामे करत असून राज्यातील गोरगरिब व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करत आहेत. राज्यात व देशात लोकशाही भक्कम व्हावी यासाठी अशा संघटना कार्यरत आहेत. अशा सामाजिक संघटनांसह विचारवंत, ज्येष्ठ नागरिकही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. अशा संघटनांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नक्षलवादी संबोधणे अत्यंत चुकीचे आहे. भारत जोडो यात्रेला संघटनांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली त्या विविध संघटनांचे दाखले देत त्या संघटना नक्षलवादी आहेत असे संबोधले त्या संघटना व संघटना प्रमुखांची यादी आम्हाला द्यावी अशी मागणी पटोले यांनी केली आहे.