Home Blog Page 512

दिल्ली विधानसभा निवडणूक- 5 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात:8 फेब्रुवारीला निकाल

नवी दिल्ली-दिल्लीत एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. तत्पूर्वी, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांवर 30 मिनिटे तथ्यांसह स्पष्टीकरण दिले.

निवडणुकीत मतदार वाढवून विशिष्ट वर्गाला लक्ष्य करण्याचे आरोप चुकीचे असल्याचे ते म्हणाले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागतो. हे सर्व एका निश्चित प्रोटोकॉल अंतर्गत घडते.

या निवडणुकीत आम आदमी पार्टीला (आप) 53.57% मतांसह 62 जागा मिळाल्या, तर भाजपला 8 जागांसह 38.51% मते मिळाली. त्याच वेळी, काँग्रेसला 4.26% मते मिळाली होती, परंतु पक्ष आपले खाते उघडण्यात अपयशी ठरला होता. 2015 च्या निवडणुकीतही काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही.AAP ने देशाच्या निवडणूक इतिहासातील चौथा सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत 96% यशासह पक्षाने 67 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर AAP ला 54.34% मते मिळाली. पाचव्या सर्वात मोठ्या विजयाचीही केजरीवाल यांच्या पक्षाच्या नावावर नोंद आहे.

2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 88% च्या यशाने पक्षाने 62 जागा जिंकल्या होत्या. तथापि, देशात 100% यश ​​दराच्या नोंदी आहेत. सिक्कीम संग्राम परिषदेने 1989 मध्ये राज्यातील सर्व 32 जागा जिंकल्या आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटने 2009 मध्ये विजय मिळवला.

हनुमान टेकडीवर तरुणीला दाखवला कोयता अन ..ओरबाडली सोन्याची चैन

पुणे-फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या हनुमान टेकडीवर एका १७ वर्षीय महाविद्यालयीन मुलगी मित्रासाेबत फिरावयास गेली असताना, तिला अज्ञात आराेपींनी धारदार कोयत्याचा धाक दाखवून तिला मारहाण करत एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी सदर पिडित मुलीने डेक्कन पोलीस ठाण्यात अनाेळखी आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनाेळखी आराेपींवर जबरी चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी ही एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ४ जानेवारी राेजी दुपारी दोन वाजण्च्या सुमारास तक्रारदार मुलगी आणि तिचा मित्र सेनापती बापट रस्त्यावरील हनुमान टेकडी परिसरात फिरावयास गेलेले होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या अज्ञात चोरट्यांनी मुलगी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राला काेयत्याचा धाक दाखवून धमकावत शिवीगाळ केली. मुलीस मारहाण करुन चोरट्यांनी जबरदस्तीने मुलीच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोन्याची साखळी चोरून नेली. घाबरलेली मुलगी आणि तिचा मित्र या प्रकारानंतर त्या ठिकाणावरुन घरी गेले. त्यानंतर तिने पालकांशी चर्चा करुन याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची माहिती समजल्यानंतर, डेक्कन पाेलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक एस सावंत पुढील तपास करत आहेत. हनुमान टेकडी परिसरात मागील दोन महिन्यात टेकडीवर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन युवकांना लुटल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. यापूर्वी देखील बाणेर-पाषाण रस्त्यावरील टेकडीवर फिरायला गेलेल्या ईशान्य भारतातील महाविद्यलायीन तरुणीस लुटण्यात आल्याची घटना घडल्यावर चतु:शृंगी पोलिसांनी चोरट्यांना अटक केली होती.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्यास १५ जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत

पुणे दि. ७: विद्यार्थ्याचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र, सद्यस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेले तसेच नव्याने या योजनेसाठी अर्ज करणारे विद्यार्थी यांना ऑनलाईन अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने समाज कल्याण विभागाने स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२५ पर्यंत वाढविली आहे.

समाजकल्याण विभागामार्फत शासकीय वसतिगृहाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत आज्ञावली (सॉफ्टवेअर) विकसनाचे काम प्रगतीपथापर असून त्यामध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचे मॉड्यूल कार्यरत झाले आहे. त्यानंतर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वेळोवेळी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आलेली होती. तथापि, तांत्रिक अडचणीमुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून समाज कल्याण आयुक्तांनी पुन्हा १५ जानेवारीपर्यंतची मुदत वाढविली आहे.

समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहासाठी ऑनलाईन अर्ज केला नाही अशा विद्यार्थ्यांनी वरील पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. देण्यात आलेली मुदतवाढ अंतिम मुदतवाढ असून त्यानंतर कोणत्याही प्रकारे नवीन मुदतवाढ देण्यात येणार नसल्याने वरील अंतिम दिनांकापर्यंत अर्ज करतील अशाच विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

तरी पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांत व्यवसायिक, अव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

माजी सैनिकांसाठी १७ जानेवारी रोजी गोवा येथे रोजगार मेळावा

पुणे दि. ७: पुनर्वसन महासंचालक कार्यालय (दक्षिण) यांच्यामार्फत माजी सैनिकांसाठी जीएनए स्टेडीयम (वरुणपुरी ग्राउंड) वरुणपुरी, मंगोर हिल वास्को डी गामा, गोवा येथे दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी रोजगार मेळावा आयोजित केला आहे.

यासाठी इच्छुक माजी सैनिकांनी आपला कोरीकुलम विटे, बायोडेटाच्या पाच प्रती फोटोसह उपरोक्त मेळाव्यासाठी गोवा येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी सहसंचालक, नवी दिल्ली दूरध्वनी क्रमांक ०११-२०८६२५४२ व पुनर्वसन महासंचालक कार्यालय पुणे दूरध्वनी क्रमांक ०२०-२६३४१२१७, ८१२६३६०९८० वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

२५ तोळे सोने चोरून पसार झालेल्या चव्हाणनगरमधील महिलेला पकडले

पुणे- बिबवेवाडीत विद्यासागर हौ सोसायटी, महेश सोसायटी जवळ,अर्थव बंगला येथे केअरटेकर म्हणून काम करणा-या महिलेने साडे पंचवीस तोळे सोने चोरून नेल्या प्रकरणी तिला बिबवेवाडी पोलीसांनी केली आहे. गायत्री सुनिल हातेकर, वय २४ वर्षे, रा. गणपती मंदिराजवळ, चव्हाणनगर धनकवडीअसे या अटक केलेल्या महिलेचे नाव असून सप्टेंबर २०२४ मध्ये तिने हि चोरीन केल्याचे पोलिसांनी सांगितले .

पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि ,दिनांक २६/०९/२०२४ रोजी ते दिनांक ०१/१०/२०२४ रोजी , बिबवेवाडी पुणे येथे ‘एक फिर्यादी’ यांचे आईचे घरातून कोणीतरी अज्ञात चोरटयाने प्रवेश करून कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने २५.५ तोळे वजनाचे संमतीशिवाय चोरून नेले म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिली होती त्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.२३३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ अन्वये दिनांक ०१/१०/२०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली शोध चालू असताना पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून महिला नामे गायत्री सुनिल हातेकर, वय २४ वर्षे, रा. गणपती मंदिराजवळ, चव्हाणनगर धनकवडी पुणे हिस ताब्यात घेवून तिचेकडे तपास करता सदर महिला ही सप्टेंबर २०२४ मध्ये फिर्यादी याचे आईकडे केअरटेकर म्हणून कामास असताना तिने त्यांचे कपाटातून सोन्याचे दागिने चोरल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेने तिच्या कडे अधिक तपास करून तिचेकडून दाखल गुन्हयातील चोरीस गेले दागिन्यापैकी तपासान्वये ८,७०,०००/- कि. रू.ची एक सोन्याची लगड वजन १४६ ग्रॅम हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पो.स्टे.श्री. शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. मनोजकुमार लोंढे, बिबवेवाडी पोलीस चौकी अधिकारी सपोनि संजय निकुंभ, पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमंलदार आशिष गायकवाड, राहुल शेलार, नितीन कातुर्डे, मपोहवा गोकुळा काटकर यांनी केलेली आहे.

दिल्लीतील साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान, इंग्लड, अमेरिकेतील साहित्यप्रेमी उत्सुक

पुणे : दिल्ली येथे होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास येण्याची इच्छा विदेशातील साहित्य प्रेमींनी व्यक्त केली आहे. संमेलनास येऊ इच्छिणारे विशेषत: पाकिस्तान, इंग्लड आणि अमेरिकेतील मराठी नागरिक आहेत, अशी माहिती साहित्य संमेलनाचे आंतरराष्ट्रीय समन्वयक डॉ. सतिश देसाई यांनी दिली.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळचे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्ली येथील छत्रपती शिवाजी साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडियम )येथे होत आहे. महाराष्ट्रातील साहित्य रसिकांनी ज्या प्रमाणे संमेलनास येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्याच प्रमाणे विदेशातूनही रसिक येण्यास उत्सुक आहेत. संमेलनात कसे सहभागी होता येईल, अशी विचारणा त्यांच्याकडून होत आहे. संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने पाकिस्तानातील कराची येथील महाराष्ट्र मंडळाचे प्रतिनिधी विशाल राजपूत यांनी तसेच लंडन येथील सुजाता गोठस्कर आणि उत्तम शिराळकर यांनी साहित्य संमेलनास उपस्थित राहण्यासाठी विचारणा केली असल्याचे डॉ. देसाई म्हणाले.
दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी विदेशातून येण्यास इच्छुक असलेल्या विशेषतः पाकिस्तानातील कराची येथील मराठी भाषिक साहित्यप्रेमीं संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाच्या तसेच गृह मंत्रालयाच्या माध्यमातून योग्य ती शहानिशा करून निर्णय घ्यावा, अशी सूचना ज्येष्ठ नेते आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. विदेशातून साहित्य प्रेमींनी संमेलनास येण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्या बाबतचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि संयोजन समिती एकमताने घेईल, असे डॉ. देसाई म्हणाले.

HMPV विषाणू पुण्यात शिरकाव करण्याअगोदर ते येऊ नये म्हणून कडक उपाय योजना करा – ठाकरेंच्या शिवसेनेचा महापालिकेला इशारा

पुणे- HMPV विषाणू पुण्यात शिरकाव करण्याअगोदर ते येऊ नये म्हणून कडक उपाय योजना करा अन्यथा … अशा स्पष्ट शब्दात महापालिकेच्या आरोग्य विभागाला ठाकरेंच्या शिवसेनेने इशारा दिला आहे. याबाबत शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले कि,’देशात सध्या आज HMPV या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे, आपल्या देशाच्या शेजारील चीनमधे याचा प्दुरार्भाव वाढल्याने अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच आपल्या देशात महाराष्ट्राच्या शेजारील राज्ये गुजरात व कर्नाटक येथे या रोगाचे रूग्ण आढळून आले आहेत. प्रत्येक संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव पुणे शहरात झपाट्याने होतो याचा अनुभव आहेच. मागील स्वाइन फ्लू, कोरोना, सारख्या संसर्गजन्य रोगामुळे महाराष्ट्रात आणि पुण्यात हाहाकार माजविला होता, स्वाईन फ्लूचा भारतातला पहिला रुग्ण पुणे शहरात शाळेतील विद्यार्थीनीच्या माध्यमातून आढळला होता. तदनंतर पुण्यात त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला होता. कोरोना महामारीमुळे पुणे शहरासहित संपूर्ण देशात लाॅकडाउनची परिस्थिती एकदा नाही तर दोनदा ओढवली गेली.

अशी परिस्थिती या नवीन संसर्गजन्य रोगाने पुन्हा निर्माण होउ नये म्हणून पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत आत्तापासूनच काळजी घेउन फवारणी व तत्सम उपाययोजना करणे गरजेचे वाटते. यामधे घाईघाईने टेंडर काढताना कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही याबाबत जातीने लक्ष घालावे. त्यामुळे आपण तत्परतेने पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या सर्व खाजगी व सरकारी शाळा तसेच आस्थापना यांचे सॅनिटायझेशन करणे आवश्यक आहे. तसेच शिक्षक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, गर्दीची ठिकाणे यांची योग्य काळजी घेण्यात यावी. खाजगी क्लासेस, थिएटर,हॉटेल्स , लग्न समारंभ हॉल , बसस्थानक, रेल्वे स्टेशन, जिमच्या मालकांना काळजी घेण्याबाबत सूचना करण्यात याव्यात असे निवेदन तोंडाला मास्क लावून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे पक्षाच्या वतीने पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांना देण्यात आले .
सदर पत्रास अनुसरून पुणे आयुक्तांनीही तत्पर आरोग्य अधिकाऱ्यांना सदर HMVP वर तत्पर उपाययोजना करण्यास आदेश दिले आणि काळजी घेण्यास कळविले .
यावेळी निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकूडे, गटनेते अशोक हरणावळ, उपशहर प्रमुख आबा निकम, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, संघटक किशोर रजपूत, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, शहर समन्वयक युवराज पारीख , विभाग प्रमुख प्रविण डोंगरे,चंदन साळुंखे, अतुल दिघे, राहुल जेकटे, अजय परदेशी, दिपक कुंजीर, अजय कुडले, शैलेश जगताप,जुबेर तांबोळी हे शिवसैनिक उपस्थित होते.

आयुक्तसाहेब ,सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहा – दीपक मानकर

पुणे -आयुक्तसाहेब ,सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहा आणि त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा आपली प्रशासनावरील पकड ढिली होऊ देऊ नका अशी सूचना आज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

शहरातील विकासकामे, नागरिकांची दैनंदिन कामे तातडीने होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष‌‌ दीपक मानकर यांनी आज महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी हा इशारा दिला .पुणे शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत दीपक मानकर यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुणे शहरातील विकासकामे किंवा प्रभागातील मूलभूत कामे ठप्प झाली होती. ती लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करावीत. त्यामध्ये प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन, विद्युत खांब बसविणे, ड्रेनेज, पाणी पुरवठा, विविध रस्ते, वाहतुकीचे प्रश्न यांसह विविध प्रमुख विभागामध्ये असलेली नागरिकांची दैनंदिन कामे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मा.आयुक्त श्री राजेंद्र भोसले यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याचे संबधित विभाग प्रमुखांना निर्देश दिले. या प्रसंगी शहराध्यक्ष , माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे,राहुल कांबळे , पदाधिकारी आदी उपस्थित होते.

भाजप पदाधिकाऱ्याला पुणे विमानतळावर अटक: १ पिस्तुल, २ मॅगझिन, २८ जिवंत काडतुसं सापडली

पुणे: भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला पुणे विमानतळावर अटक झाली आहे. हैदराबादला जाण्यासाठी निघालेल्या दीपक काटेला पुणे विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं. आता तो विमानतळ पोलीस स्टेशनच्या अटकेत आहे. त्याच्याकडे १ पिस्तुल, २ मॅगझिन आणि २८ जिवंत काडतुसं सापडली आहेत. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर भाजप नेत्यांसोबतचे अनेक फोटो आहेत.ज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही समवेतच्या फोटोचा समावेश आहे .दिपक सिताराम काटे (32, रा. मु. पो. सराटी, ता. इंदापुर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत इंडिगो एअरलाईनमध्ये सिक्युरिटी एक्झ्युकेटीव्ह प्रिती लक्ष्मण भोसले यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे.

सुरक्षा अधिकारी प्रिती भोसले या विमानतळावर प्रवाशांचे बँगेज स्क्रिनिंगचे व तपासणीचे काम करत असताना, दिपक काटे हा पुणे विमानतळ येथे आला असता त्याची मशीनमध्ये बॅग तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या बँगेत मेटल डिटेक्ट झाल्याने त्याच्या बँगेत एका कॅरीबॅगमध्ये 7.65 कॅलीबरचे दोन मॅगझीन व 28 काडतुसे असलेले पिस्तुल मिळून आली. त्याच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्याने याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. तो विमानाने हैद्राबाद येथे जात असताना ही कारवाई करण्यात आली. त्याने ही पिस्तुले स्वतः जवळ का बाळगली ते बाळगण्या मागचा नेमका त्याचा उद्देश काय होता याचा पुढील तपास पोलिस करत आहेत.दीपक काटे पुण्याच्या इंदापूर तालुक्याचा रहिवासी आहे. तो भाजपच्या युवा मोर्चाचा प्रदेश सचिव आहे. याशिवाय तो शिवधर्म फाऊंडेशनचा संस्थापकदेखील आहे. त्याच्या सोशल मीडियावर भाजपच्या अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो आहेत. त्यात प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतही त्याचा फोटो आहे. हा फोटो पाटील भाजपमध्ये असतानाचा आहे.

HPMV चा एकही रुग्ण आढळलेला नाही-महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. निना बोराडे

पुणे-महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. निना बोराडे यांनी म्हटले आहे कि,’पुणे महानगरपालिका कार्य क्षेत्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तथापि खबरदारीचा एक भाग म्हणनू नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गा पासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सुचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

त्या पुढे म्हणाल्या,’सध्या चीनमध्ये Human Metapneumovirus (HPMV) उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस मध्ये २००१ मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दी सारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे. सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लू प्रमाणे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. या अनुषंगाने डीजीएचएस आणि संचालक, एन सी डी सी, दिल्ली यांनी दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.
पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक ३ जानेवारी २०२५ च्या शासन परिपत्रकातील मार्गदर्शन सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येत असून तशा सूचना क्षेत्रिय स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत.महाराष्ट्रात व पुणे महानगरपालिका कार्य क्षेत्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तथापि खबरदारीचा एक भाग म्हणनू नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गा पासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सुचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
हे करा :

जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा
टीश्यू पेपरने झाका.
साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणां पासून दूर राहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन (व्हेंटीलेशन) होईल याची दक्षता घ्या.


हे करू नयेः
हस्तांदोलन
टीश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
आजारी लोकांशी जवळचा संपर्क
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे,
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे (सेल्फ मेडिकेशन) घेणे.


चीनमधून आलेल्या नवीन विषाणू Human Metapneumovirus (HMPV) अहवालांबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही.असे सांगत महापालिकेच्या आरोग्यप्रमुख बोराडे म्हणाल्या कि,’आरोग्य विभागामार्फत जनजागृती करण्यात येत असून डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालया मध्ये ५० आयसोलेशन बेड व ५ आय. सी. यु. बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शासकीय, निमशासकीय व खाजगी आरोग्य संस्थांना आपत्कालीन परीस्थिती हाताळण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांच्या स्तरावरून सूचित करण्यात आले आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांनी केला ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान

पुणे-मराठी पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ गाव पोंभुर्ले येथे स्मारक व्हावे; यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली.

पत्रकार दिनानिमित्त आज पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुजीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव, उपाध्यक्ष चंद्रकांत फुंदे, अश्विनी पाटील केदारी, मिकी घई यांच्या सह पत्रकार संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी यातील बारकावे जाणून घेणं अतिशय महत्वाचे झाले आहे. त्यामुळे पत्रकार संघाने नवोदित आणि ज्येष्ठ पत्रकारांसाठी एखादे प्रशिक्षण शिबीर राबविण्याचे ठरविले. तर त्यासाठी सर्वतोपरी मदत करु, अशी ग्वाही यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ गाव पोंभुर्ले येथील आचार्यांच्या स्मारकाचा प्राधान्याने विकास व्हावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून रोगनिदान चाचण्यांमध्ये (महापालिका रूग्णालय केंद्रात – कमला नेहरू व सुतार दवाखाना) सर्व रोगनिदान चाचण्यांवर ५० टक्के सवलतीत चाचणी ही सुविधा क्रन्सा डायग्नोस्टिक्स लिमिटेडतर्फे आज पत्रकार दिनाच्या औचित्याने जाहीर करण्यात आली. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत क्रन्सा डायग्नोस्टिक्सचे सह व्यवस्थापकीय संचालक यश मुथा यांनी या विषयीचे पत्र पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनित भावे व सरचिटणीस मीनाक्षी गुरव यांना सुपूर्द केले.

अटल सेवा महाआरोग्य शिबीराचं आयोजन, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या हस्ते लोगोचे अनावरण

पुणे : विविध सामाजिक उपक्रमातून सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असणारे भाजप युवा नेते ‘लहू बालवडकर’ यांच्या वाढदिवासानिमित्ताने बालेवाडीत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही उपस्थित राहून लहू बालवडकर यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी २४ ते २५ जानेवारी रोजी होणाऱ्या अटल सेवा महाआरोग्य शिबीराच्या लोगोचेही अनावरण ‘मुरलीधर मोहोळ’ यांच्या हस्ते करण्यात आले.

लहू बालवडकर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये राहून विविध सामाजिक तसेच राजकीय उपक्रम राबवत आले आहेत. मागच्या वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने लहू बालवडकर सोशल वेलफेअर वतीने ‘भव्य भजन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या भजन स्पर्धेला जवळपास १०० पेक्षा जास्त भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता. तसेच मोठ्या संख्येने पुणेकरांनी ही भव्य दिव्य स्पर्धा याची देही याची डोळा अनुभवली होती. मात्र यंदा त्यांनी ‘अटल सेवा महाआरोग्य शिबीर’ आयोजित केले आहे.

आज बालेवाडी येथे जनसंपर्क कार्यालय येथे केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देत लहू बालवडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना मिल्क चॉकलेटही दिले. याचसोबत बालेवाडी येथे येत्या २४ व २५ जानेवारीला लहू बालवडकर सोशल वेलफेअर व सनराईस मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने अटल सेवा महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्या शिबीराच्या लोगोचेही अनावरण करण्यात आले.

दरम्यान, लहू बालवडकर सोशल वेलफेअर व सनराईस मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या अटल सेवा महाआरोग्य शिबीरामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड व मुंबईतील नामांकित तसेच धर्मदाय, शासकीय आणि खाजगी रूग्णालयाचा सहभाग असणार आहे. या शिबिरात शस्र्क्रिया न करता व कुठलेही इम्प्लांट न वापरता गुडगा प्रत्यारोपण, सांधेदूखी, खुबा प्रत्यारोपण, अशा वेदनादायक आजारांवरती नवीन आयुर्वेदिक उपचार प्रणालीने उपचार केले जाणार आहेत.

जम्मू आणि काश्मीरसाठी ऐतिहासिक निर्णय : नवीन जम्मू रेल्वे विभागाच्या उद्घाटन कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे पायाभूत सुविधांसाठी परिवर्तनात्मक पाऊल असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केले स्वागत

नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटन केल्यामुळे जम्मू-काश्मीर आणि भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज एक नवीन अध्याय कोरला गेला. या ऐतिहासिक कार्यक्रमात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); भूविज्ञान आणि पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी या प्रदेशात सुरू असलेल्या परिवर्तनीय रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांवर प्रकाश टाकला आणि जम्मू आणि काश्मीरला जोडण्यात त्यांची भूमिका अधोरेखित केली. ते म्हणाले की यामुळे जम्मू काश्मीर राष्ट्रीय मुख्य प्रवाहात येईल आणि या सुविधा आर्थिक आणि सामाजिक प्रगती उत्प्रेरकाचे कार्य करतील.

या समारंभात बोलताना डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले  की , “या रेल्वे विभागाची स्थापना हा केवळ लॉजिस्टिक/ दळणवळणातील  मैलाचा दगड नव्हे तर जम्मू आणि काश्मीरला भारताच्या आर्थिक विकासाच्या मार्गाशी जोडण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी आहे. “त्यांनी भूतकाळात या प्रदेशाच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला अडथळा ठरणारी आव्हाने आणि विलंब याचा उल्लेख करत  अलीकडील वर्षांमध्ये अभूतपूर्व प्रगती कशी झाली हे नमूद केले.

नवीन जम्मू रेल्वे विभाग एक महत्त्वपूर्ण जंक्शन म्हणून काम करेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देत जलद प्रवासी आणि मालवाहतूक सुलभ करेल. या व्यतिरिक्त, डॉ. जितेंद्र सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या व्यापक विस्तारावर भर दिला, ज्यामध्ये वंदे भारत ट्रेन आणि लोकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी धोरणात्मक दृष्ट्या स्थित थांबे यांचा समावेश आहे.

उद्योग, व्यवसाय व आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३१ जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन

मुंबईदि. ६ : केंद्र व राज्य शासन, विविध आस्थापना व त्यांचे अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, महापालिका, तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचे तिमाही विवरणपत्र येत्या ३१ जानेवारी पर्यंत सादर करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त अ. मु. पवार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

दर तिमाहीअखेर (मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर) विवरण सादर करणे बंधनकारक आहे. पंचवीस किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार कारखाने यांना सेवायोजन कार्यालये यांनी रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा १९५९ व अंतर्गत नियमावली १९६० नुसार मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ईआर-१ प्रत्येक तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या उद्योजकांनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्या उद्योजकांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. हे विवरणपत्र (ER-I) ऑनलाईन पध्दतीने https://rojgar.mahaswaym.gov.in  या वेबपोर्टलवर सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करुन ३१ जानेवारी,  २०२५ पर्यंत विवरणपत्र (ईआर-१) सादर करावे,

मुंबई शहर जिल्हा अंतर्गत येणारे सर्व नियोक्ते, आस्थापना यांनी https://rojgar.mahaswaym.gov.in  या वेबपोर्टलवर तिमाही विवरणपत्र ईआर १ सादर करण्याची दक्षता घ्यावी. या वेबसाइटच्या एम्प्लॉयर (List a Job ) या टॅबवर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉगइनमध्ये युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगइन करावे आणि ईआर रिपोर्टमध्ये ईआर -१ या ऑप्शनवर क्लिक करुन तिमाही विवरणपत्र ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहिती , मार्गदर्शन अथवा तांत्रिक अडचण असल्यास mumbaicity.employment@gmail.com  या ईमेलवर संपर्क करावा. ३१ डिसेंबर, २०२४ च्या तिमाही अखेर हजेरी पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाच्या माहितीचे विवरणपत्र ईआर ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत महास्वयम वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. हे विवरणपत्र ऑफलाईन स्विकारले जाणार नाही, असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांनी कळविले आहे.

गायक अभिजीत सावंत, कॉमेडीयन चंदन प्रभाकर आणि कंटेंट क्रिएटर फैजू ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या संचात दाखल

या नववर्षी, कलीनरी रोमांच अनुभवण्यास सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन एक जबरदस्त कुकिंग स्पर्धा घेऊन येत आहे. ‘मास्टर शेफ इंडिया’मध्ये यावेळी सेलिब्रिटीजची वर्णी लागणार आहे. यंदाच्या “सेलिब्रिटी मास्टरशेफ – अब उन सबकी सीटी बजेगी!”मध्ये अनेक प्रतिभावान किचनमध्ये आमनेसामने येताना दिसतील!
या मान्यवरांमध्ये आता गायक अभिजीत सावंत, कॉमेडीयन चंदन प्रभाकर आणि कंटेंट क्रिएटर फैजू सामील होत आहेत. आपले पाक कौशल्य दाखवून ही स्पर्धा जिंकण्यासाठी ते कंबर कसतील. पाककलेच्या माध्यमातून अभिजीतला पुन्हा प्रसिद्धी मिळवण्याची आशा आहे, तर चंदनला हे सिद्ध करायचे आहे की, तो फक्त एक कॉमेडीयन नाही. फैजूला डिजिटल विश्वाच्या बाहेर येऊन लोकांचे मन जिंकायचे आहे. हे सगळे जण खूप वेगवेगळ्या क्षेत्रातून आणि पार्श्वभूमीतून आले आहेत, त्यामुळे, त्या सगळ्यांचे मिश्रण खुमासदार होईल यात शंका नाही!
सुमधुर आवाज आणि सावध पावले उचलणारा अभिजीत सावंत बिग बॉस मराठीमधून दमदार पुनरागमन करून प्रकाश झोतात आला आहे. त्याने आपली कारकीर्द सावरली आहे आणि आता त्याला या नवीन ट्रॉफीची भूक लागली आहे. या शोविषयी आपले विचार व्यक्त करताना तो म्हणतो, “2004 मध्ये इंडियन आयडॉलचा पहिलावहिला सीझन जिंकणे हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. मी रातोरात देशभरात स्टार झालो. आता मी पिता झालो आहे, त्यामुळे माझ्या मुलांना ती जादू पुन्हा बघायला मिळावी अशी माझी इच्छा आहे. संगीत रियालिटी शोजचे विश्व पादाक्रांत केल्यानंतर आणि इतर फॉरमॅटमध्ये ठसा उमटवल्यानंतर सेलिब्रिटी मास्टरशेफचा अनुभव घेण्यास मी उत्सुक आहे. हा केवळ कुकिंगचा प्रवास नाही, तर कठोर परिश्रम, चिकाटी आणि आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करण्याचे महत्त्व मला माझ्या मुलांना पटवून द्यायचे आहे. मला आशा आहे की, त्यांना माझा अभिमान वाटेल आणि मला नव्या पिढीचे नवीन चाहते मिळतील!”
मनोरंजन क्षेत्रात बऱ्याच काळापासून काम करणारा चंदन प्रभाकर कसलेला कॉमेडीयन आहे, जो आता एक नवीन आव्हान पेलण्यास सरसावला आहे. या कुकिंग शोमध्ये दाखल होऊन आपल्यातील कॉमेडी शिवायचे इतर गुण दाखवण्याची संधी चंदनला मिळाली आहे. आपला उत्साह शेअर करत तो म्हणाला, “अगदी खालून सुरुवात करून मी आजवर बराच मोठा पल्ला गाठला आहे. मास्टरशेफ किचनमध्ये हे नवीन आव्हान पेलण्यासाठी मी सज्ज आहे. कुकिंग आणि कॉमेडी ही दोन अगदी भिन्न विश्व वाटली, तरी, माझ्यासाठी दोन्हीमध्ये सर्जनशीलता, जोखीम पत्करण्याची धडाडी आणि लोकांना आनंदी करण्याचा प्रयत्न आहे.”
दुसरीकडे, फैजूने आकर्षक रील्स बनवून सोशल मीडिया गाजवला आहे. आता फोनच्या ऐवजी फ्राइंग पॅन जवळ करण्याचे त्याने ठरवले आहे. विविध शोजमध्ये आपली किरकोळ उपस्थिती नोंदवल्यानंतर आता फैजू कुकिंग रियालिटी शो च्या माध्यमातून प्रकाशझोतात येत आहे. आपण केवळ पडद्यावरील एक चेहरा नाही हे सिद्ध करण्यास तो सज्ज आहे. फैजू म्हणतो, “एक कंटेंट क्रिएटर म्हणून अनेक वर्षे कंटेंटच्या माध्यमातून मी माझ्या चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आता कॅमेऱ्याऐवजी शेफचा कोट घालून काही तरी नवीन, गरमागरम, स्वादिष्ट असे सादर करण्यासाठी मी उत्सुक आहे. माझे पाककौशल्य दाखवण्यासाठी आणि स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढण्यासाठी सेलिब्रिटी मास्टरशेफ ही एक उत्तम संधी आहे.”
यापैकी कोणता स्टार होस्ट फराह खान आणि सेलिब्रिटी शेफ परीक्षक विकास खन्ना आणि रणवीर ब्रार यांना प्रभावित करेल?