Home Blog Page 447

मुलाखतीतून नेत्यांनी उलगडला कार्यप्रवास

0

पुणे : दिल्लीतील राजकारणात दरबारी प्रवृत्ती आहे. इथे उगवत्या सूर्यालाच नमस्कार केला जातो. तरीही दिल्लीतील राजकारणाचा कार्य परिसर मोठा आहे. मराठी माणसाकडे कमी महत्त्वाकांक्षा आणि अल्पसंतुष्टता असल्याने मराठी माणूस दिल्लीच्या राजकारणात कमी पडतो, असे विचार माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. माझ्यातील लेखकाला शिक्षकांनी प्रोत्साहन दिले. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक विषमता दिसल्याने मी समाजकार्याकडे वळले. त्यातूनच पुढे राजकारणात स्थिरावले, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. मला राजकारणाची मनापासून आवड होती. अनेक थोर राजकारणी वक्त्यांची भाषणे ऐकण्यात मला रस होता. परंतु प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश होईल, याचा मी कधी विचारच केला नाही. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींमुळे आपल्या आयुष्याला वेगळे वळण लागले, अशा भावना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केल्या.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सरहद, पुणे आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‌‘असे घडलो आम्ही‌’ या विषयावर विशेष मुलाखतीचा कार्यक्रम आज (दि. 23) आयोजित करण्यात आला होता. माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सहभाग होता. त्यांच्याशी राजीव खांडेकर, प्रवीण बर्दापूरकर यांनी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात विशेष मुलाखतीचा कार्यक्रम रंगला.

दिल्लीतील राजकारणात मराठी माणूस मागेच : पृथ्वीराज चव्हाण

मी राजकीय कुटुंबातून आलो असलो तरी घरातील शिक्षणाचे संस्कार माझ्यात रुजले होते. त्यामुळेच उच्च शिक्षण पूर्ण केल्याशिवाय मी राजकारणाकडे वळलो नाही. माझे प्राथमिक शिक्षण कराडच्या नगरपालिकेच्या शाळेत झाले. पुढे वडिल खासदार झाल्यामुळे आमचे वास्तव्य दिल्लीतच राहिले. तेथे पहाडगंज येथील नूतन मराठी विद्यालयाच्या शाळेत मला आठवी ऐवजी सातवीत प्रवेश मिळाला, कारण दोन्हीकडील शिक्षणामध्ये खूप तफावत होती. तेव्हापासूनच योग्यतेपेक्षा एक पायरी खाली संधी मिळणे नशिबी आले. दिल्लीतील राजकारणी इरसाल असतात. त्यांच्याबरोबर व्यवहार करताना मराठी माणसाचे वेगळेपण महत्त्वाचे ठरते. परंतु मराठी माणसाकडे महत्वाकांक्षेची कमतरता असल्यामुळे तसेच तो अल्पसंतुष्टही असल्यामुळे केंद्रीय राजकारणात मराठी आवाज घुमला नाही. या उलट उत्तरेकडे सगळे राजकीय नेते दिल्लीत राहतात आणि केंद्रीय राजकारणच करतात. भाषेचा न्यूनगंड, दिल्लीतील हवामान, खाणे-पिणे या विषयांचा बाऊ करून मराठी माणूस दिल्लीतील राजकारणात मागेच पडला आहे. आज महाराष्ट्राच्या जनतेनेी मराठी नेत्यांना साथ देऊन केंद्रीय राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. येथे संगीत खुर्चीचा खेळ होऊ देता कामा नये. आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी मी केंद्रात मंत्री असताना याची प्रक्रिया सुरू झाली होती. पुढे महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना भाषेविषयी समिती स्थापन करून त्याचा अहवाल माझ्यामार्फतच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला पाठविला गेला. पुढे साहित्य अकादमीकडून हा अहवाल तपासला गेला. या संपूर्ण प्रक्रियेला मोठा कालखंड लागला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषा संवर्धन आणि विकासासाठी आर्थिक तरतूद झाली आहे.

द्विध्रुवीकरणामुळे राजकारणात प्रवेश : डॉ. नीलम गोऱ्हे

मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. माझे शिक्षण मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळेत झाले तसेच साने गुरुजी विद्यालय आणि नंदादीप विद्यालयात शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे मी लिहायला लागले. सातवीत असताना मी काव्य केले. व्यक्त होण्यासाठी मी लिहिती झाले. पुढे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना विविध सामाजिक चळवळींशी जोडली गेले. तेव्हापासूनच समाजातील सर्वच क्षेत्रात तफावत, जातीभेद, स्त्री-पुरुष भेद मनाला जाणवत होता. अत्याचार घडल्यानंतर कृती करण्याऐवजी तो होऊच नये या करिता मी आंदोलनांमध्ये सहभागी होऊ लागले. विद्या बाळ, माधव गडकरी आदींच्या प्रेरणेतून कार्यप्रेरित झाले आणि पुन्हा एकदा लिहिती झाले. याच काळात राजकीय द्विध्रुवीकरण घडत होते. मला विधानपरिषदेत कार्य करण्याची इच्छा होती. त्याच वेळेस बाळसाहेब ठाकरे यांची भेट झाली. त्यांनी मला मराठी भाषा, महिला धोरण या विषयावर कार्य कर असा सल्ला दिला. त्यामुळेच मी समाजकारणातून राजकारणात प्रवेश केला. कुठल्याही राजकीय पक्षात कार्यकर्त्याला कमी समजण्याचे कारण नाही. राजकीय नेत्याने कुणाचा संर्पकच नको म्हणणे, दोन मर्सिडिज वाहनांच्या बदल्यात एक पद अशा भूमिका घेतल्या तर तो पक्ष सोडणेच योग्य, हा निर्णय मी घेतला आणि जो कार्यकर्ता ध्येयाने प्रेरित आहे त्याला साथ दिली. आजही मी शिवसेनेतच आहे. जी शिवसेना समाजातील तळागाळातील व्यक्तींसाठी कार्यरत आहे, अत्याचाराविरुद्ध लढत आहे अशा शिवसेनेतच मी शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे.

मधु दंडवते यांचा पराभवाची सल कायम राहणार : सुरेश प्रभू
व्यक्तीगत आयुष्यात मला मधु दंडवते, भाई वैद्य अशा नेत्यांविषयी मन:पूर्वक आदर आहे. मधु दंडवते यांच्याविरुद्ध निवडणूक लढणे ही माझ्या आयुष्यातील घोडचूक आहे. ते जर निवडून आले असते तर त्या वेळेच्या राजकीय परिस्थितीमुळे पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होऊ शकला असता. मी निवडून आल्यापेक्षा मधु दंडवते हरले याचे दु:ख माझ्या मनात कायमच राहणार आहे. मला बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांची भाषणे ऐकण्याची आवड होती. एका प्रसंगी बाळासाहेब ठाकरे यांनी माझे भाषण ऐकले तेव्हाच त्यांनी मला सांगितले की, आमचे सरकार आले तर तुलाच अर्थमंत्री करणार. बाळासाहेब यांचा मोठेपणा एवढा की, त्यांनी मला खरेच मंत्री केले. राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही मी केंद्रीय मंत्री झालो. माझ्या राजकीय कारकिर्दीकरिता बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, लालकृष्ण अडवानी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या मनाचा मोठेपणा कारणीभूत आहे. अनेकदा मी राजकारणाच्या लहरीपणाचा बळी ठरलो. रेल्वे खात्याच्या कार्यक्षमतेचा परमोच्च बिंदू गाठला असतानाच झालेल्या रेल्वे अपघाताला मी कारण ठरलो या नैतिक जबाबदारीच्या भावनेतून राजीनामा दिला. मी आजही भाजपामध्ये असून अखेरपर्यंत भाजपातच राहणार आहे.

भाषा हा माणसाने लावलेला शोध

0

महाराष्ट्र धर्माचा, मराठी भाषेचा शोध मध्ययुगीन इतिहासापलिकडे जाऊन घेणे आवश्यक
मराठी साहित्या संमेलनात ‌‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म‌’ विषयावर परिसंवाद
छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजभाषा कोष निर्माण करून मराठी भाषेला सोन्याचे दिवस दाखविले. मराठी साहित्याचा प्रवास, त्याची रुजवात सातवाहन काळात सुरू झाली. या घराण्याने महाराष्ट्राचा पाया रचला असून याचा आज विसर पडलेला दिसतो. मराठी मन आणि भाषा सहिष्णु आहे. मराठी भाषेला दागिना म्हणून मिरवायचे की लोढणे म्हणून ओढायचे हे मराठीजनांनी ठरविणे आवश्यक आहे. धर्माचा जन्म माणसासाठी होतो, माणसाचा धर्मासाठी नव्हे. धर्माची योग्य व्याख्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. भाषा हा माणसाने लावलेला शोध, संस्कृतीचा ठेवा आहे, असा सूर परिसंवाद उमटला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सरहद, पुणे आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‌‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण सभामंडपातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मंचावर आयोजित चर्चासत्रात श्रीपाद अपराजित, डॉ. अनिरुद्ध मोरे, अरुणा देशपांडे, संजय सोनवणी, प्रभाकर ओव्हाळ सहभागी झाले होते. श्रीराम पवार अध्यक्षस्थानी होते.
प्रभाकर ओव्हाळ म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासातील संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी होती. मराठी भाषेची व्याप्ती शाहिरी रचनांनी वाढविली. आज मराठी भाषा ही प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांच्या फारकतीमध्ये अडकली आहे. खेड्यापाड्यातील मुलांना प्रमाण भाषा बोजड वाटत असल्याने शिक्षण निरस वाटू लागले आहे. पटसंख्या कमी असल्याने अनेक शाळा बंद केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत भटक्या, विमुक्त, आदिवासी मुलांनी कसे शिकायचे असा प्रश्नच आहे.
संजय सोनवणी म्हणाले, मराठी भाषा ही संस्कृत भाषेतून निर्माण झालेली नाही. महाराष्ट्र धर्म अर्वाचिन नाही. आज महाराष्ट्र धर्माचे विस्मरण झाले आहे. महाराष्ट्र धर्माचा, मराठी भाषेचा शोध घेताना आपण मध्ययुगीन इतिहासापलिकडे जातच नाही. आज महाराष्ट्रावर, मराठी भाषेवर उत्तरेकडील पगडा मोठ्या प्रमाणात जाणवतो. विचार करणारे, बुद्धी वापरणारे विचारवंत दिसत नाहीत. सांस्कृतिक लढाईला तयार राहण्याची महाराष्ट्राला आज गरज आहे.
श्रीपाद अपराजित म्हणाले, महाराष्ट्र धर्म आणि वर्तमान या विषयी अभ्यास करताना, रिवाज व नवप्रयोग याचा अंदाज आला तर आपल्याला समज आहे असे समजावे. मराठीच्या कक्षा रुंदावताना गावपातळीवरील शब्द समजत नसतील तर आपण नव्या महाराष्ट्र धर्माला जागत नाही. महाराष्ट्राची लोकपरंपरा सहिष्णु असली तरी दस्तावेजीकरण करण्यात मागे आहे. अकर्मण्याच्या गोष्टींचे दस्तावेजीकरण करणे, हा नवमहाराष्ट्र धर्म आहे.
डॉ. अनिरुद्ध मोरे म्हणाले, मराठी भाषा, धर्म, जाती, पंथ यांना एकत्र घेऊन नांदते आहे. अडीच हजार वर्षांपेक्षा जास्त परंपरा लाभलेल्या मराठी माषेची महती अभिजात दर्र्जा मिळाल्याने सिद्ध झाली आहे. भाषेला जेव्हा राजाश्रय मिळतो तेव्हा ती चांगल्या प्रकारे विकसित होते. धर्म म्हणजे धारणा-कर्तव्य होय. धर्माची व्याख्या जेव्हा सामान्य जनांपर्यंत पोहोचेनाशी झाली तेव्हा समाजाला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी संतांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. मराठी भाषेची अस्मिता संत परंपरेने जिवंत राहिली आहे.
अरुणा देशपांडे म्हणाल्या, आपल्या मातृभाषेचा सार्थ अभिमान असणे अत्यंत आवश्यक आहे. मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म टिकविण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर स्थायिक असलो तरी कृतिशील राहून त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीराम पवार म्हणाले, महाराष्ट्र धर्म विवेकाची मांडणी करणारा आहे. समतेचा विचार बाजूला पडला होता. तेव्हा संत वाङ्मयाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाने तो पुढे आणला. महाराष्ट्रातील माणसाने नेतृत्व करावे, राज्य करावे हे स्वप्न उराशी बाळगणे आवश्यक आहे. प्रबोधन चळवळ, वैचारिक क्रांती, लोकपरंपरा, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीतून महाराष्ट्र धर्माचे पालन केले गेले. मराठी ही संस्कृत भाषेच्या पोटातून आलेली नसून ती स्वतंत्र भाषा आहे. आपली पाळे-मुळे न सोडता महाराष्ट्र धर्म उत्क्रांत होत गेला आहे. सर्व समावेशकता आणि सहिष्णुता यांच्या माध्यमातून जिंकणे हा धागा म्हणजे महाराष्ट्र धर्म होय.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरजा आपटे यांनी केले. वक्त्यांचा सन्मान श्रीराम पवार यांनी केला.

चाकण, पिंपरी, भोसरीमध्ये तासभर वीज खंडित-ऊस पेटवल्याने महापारेषणच्या ४०० केव्ही टॉवर लाइन ट्रिपिंग 

पुणे, दि. २३ फेब्रुवारी २०२५मरकळ-आळंदी दरम्यान एका शेतात टॉवर लाइनखाली ऊस पेटवल्यामुळे महापारेषणच्या लोणीकंद-तळेगाव ४०० केव्ही टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग आले. परिणामी ३१४ मेगावॅटची तूट निर्माण झाली आणि स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा (एलटीएस) कार्यान्वित होऊन पिंपरी चिंचवड, चाकण एमआयडीसी व परिसर, भोसरी व भोसरी एमआयडीसी परिसरातील सुमारे १ लाख ८९ हजार ९०० ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी (दि. २३) सकाळी १०.०९ ते ११.०६ वाजेपर्यंत खंडित झाला होता.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या लोणीकंद-तळेगाव ४०० केव्ही टॉवर लाइनमध्ये सकाळी १०.०९ वाजता ट्रिपिंग आल्यामुळे तब्बल ३१४ मेगावॅटची पारेषण तूट निर्माण झाली. परिणामी तळेगाव-चाकण ४०० केव्ही टॉवर लाइनच्या वीजभारात मोठी वाढ झाली. पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘एलटीएस’ (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे महापारेषण कंपनीच्या चाकण ४०० केव्ही, चाकण २२० केव्ही, चिंचवड २२० केव्ही, भोसरी २२० केव्ही आणि ब्रीज स्टोन २२० केव्ही अशा ५ अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला. सोबतच या उपकेंद्रांतून महावितरणच्या १६ उपकेंद्रांना व १२९ वीजवाहिन्यांना होणारा वीजपुरवठा देखील खंडित झाला.

एलटीएस कार्यान्वित झाल्यामुळे चाकण एमआयडीसी तसेच शिंदेगाव, सावरदरी, वराळे, वासुली, येलवाडी, खालुंब्रे, संगुर्डी, एमआयडीसी फेज दोन, भांबोरी, कुरुळी, नाणेकरवाडी, चिंबोली, निघोजे आदी गावांतील ९०० उच्चदाब व ४ हजार लघुदाब औद्योगिक ग्राहक आणि ३५ हजार घरगुती व व्यावसायिक ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर खंडित होता. तसेच पिंपरी चिंचवड शहर, भोसरी गाव, भोसरी एमआयडीसी, पुनावळे, ताथवडे, रहाटणी, थेरगाव, तुकाराम नगर, प्राधीकरण, नाशिक रोड, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, ब्लॉक टी, जे व एस आदी परिसरातील सुमारे दीड लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी १०.०९ ते ११ वाजेपर्यंत बंद होता.   

लोणीकंद-तळेगाव ४०० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग आल्यामुळे महापारेषणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर पाहणी सुरू केली. यामध्ये मरकळ-आळंदी मार्गावर एका शेतात टॉवर लाइनखालीच ऊस पेटवल्यामुळे हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. पेटवलेल्या ऊसाच्या धुरामध्ये बाष्प असल्यामुळे ४०० केव्ही लाइनमध्ये ट्रिपिंग आले. ऊसाची आग तातडीने विझवल्यानंतर त्या ठिकाणच्या टॉवर लाइनची तपासणी करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.

एकनाथ शिंदेंची शिवसेना नाहीतर त्यांची गद्दार सेना:- उद्धव ठाकरे

शिवरायांनी दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असे सांगितले नाही
मुंबई-एकनाथ शिंदेंची शिवसेना नाहीतर त्यांची गद्दार सेना आहे, तिकडे गेलेल्या लोकांवर मी काहीच बोलणार नाही. ज्यांना मी काही देऊ शकलो नाही, असे जुने शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात आणि देशात जी अराजकता पसरली आहे ती दूर करत आपले खरे हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. काँग्रेसचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, धर्म हा जगायचा असतो सांगायचा नसतो असे संत गाडगेबाबा यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितलेली दशसुत्री मी मुख्यमंत्री असताना तो खरा धर्म आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असे काही शिकवले नाही. जे देशाला आपले मानतात ते आपलेच आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, धर्माचा ज्यांनी खेळखंडोबा केला आहे त्यांचे राजकारणापुरते मुस्लीम प्रेम कसे आहे याचे मी दाखले तुम्हाला देऊ शकते. निवडणुकीसाठी हे जे सुरू आहे ते देशाला चांगल्या दिशेने नेईल असे मला वाटत नाही. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचे रक्षण करणे हे भाजपचे हिंदुत्व आहे? का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. माझ्या हिंदुत्वाची व्याख्या व्यवस्थित आहे भाजपचे काय?

उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्याबद्दल 3 वर्षे होऊन सुद्धा न्यायालयाचा निकाल लागत आहे. न्यायाधिशांची कारकीर्द पूर्ण झाली तरी आमचा निकाल लागलेला नाही. याबाबतील निकाल लागला आहे तर प्रत नार्वेकरांना द्यावी.

पुणे पोस्ट्स अँड टेलिकॉम को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेचा १०३ व्या वर्धापनदिन उत्साहात

पुणे-दि पुणे पोस्ट्स अँड टेलिकॉम को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेचा १०३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित  कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री.उमाकांत वालगुडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार  पडला. विजय तेंडुलकर नाट्यगृह, राजीव गांधी इ-लर्निंग स्कुल, , पुणे येथे सभासदांच्या गुणवंत विदयार्थी पाल्यांचा गुणगौरव, संस्थेच्या वतीने सभासद  विविधकल्याणकारी कार्यक्रम आयोजित केले जातात.
प्रमुख पाहुणे श्री. ईश्वर दास,यांच्या  विद्यार्थ्यांचा चेक व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. नागेशकुमार नलावडे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली.संस्थेची३००० सभासद संख्या असून राज्यभर कार्या क्षेत्र आहै औरंगाबाद कल्याण ,मुंबई येथे शाखा असून‌ खेळते भांडवल १०३ रू. कोटी आहे ४.५२ कोटी ढोबळ नफा असून  अ दर्जा प्राप्त आहे दरवर्षी १३% लाभांश दिलि जातो  संस्थेच्या वतीने विवीध उपक्रम राबविले जातात.यावेळी प्रमुख पाहुणे ईश्वदास यानी विशेष मार्गदर्शन केले  याप्रसंगी वृषाली दाभोळकर ,संदीप गुंजकर ,नितीन‌ कदम , किशोर गवळी उपस्थित होते . सभासद व पाल्यांनी सूरताल संध्या नृत्यगायन सादर केले.
 संस्थेने या वेळेस आपल्या देशाची सेवा करणारे कमांडट मिलिटरी हॉस्पिटलचे प्रमुख पाहुणे कर्नल मा.श्री. ईश्वरदास संस्थेच्या कार्याचा गौरव केला, तसेच  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना पुढील शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या व  मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सभासद व विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव गणेश भोज यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप गुळुंजकर यांनी केले

रिझवानला अक्षरने बोल्ड केले, 33 षटकांनंतर विकेट पडली; 8 चेंडूंत पाकिस्तानच्या दोन विकेट , रिझवाननंतर सौद आऊट(38.2/50 ov) 174/5

0

पाकिस्तान (38.2/50 ov) 174/5

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने ३३.२ षटकांत ३ गडी गमावून १५१ धावा केल्या. बाबर आणि इमाम-उल-हक यांच्यानंतर कर्णधार मोहम्मद रिझवान ४६ धावा करून बाद झाला. सौद शकील क्रीजवर आहे (५७ धावा). अक्षर पटेलने रिझवानला बाद करून १०४ धावांची भागीदारी मोडली.

भारताकडून हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली. त्याने बाबर आझमला (२३) बाद केले. अक्षर पटेलने इमामला (१०) थेट फटका मारून धावबाद केले.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ५व्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार रिझवानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला होता की, नाणेफेक फारशी महत्त्वाची नाही, जरी खेळपट्टी थोडी नंतर मंदावू शकते.

अक्षर पटेल विकेट घेतल्यावर आनंदात

भारत – पाकिस्तान सामन्याचा स्कोअरबोर्ड

प्लेइंग-11

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा.

पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), इमाम उल हक, सऊद शकील, बाबर आझम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.

३४ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीपने सौद शकीलचा झेल सोडला. शकीलने अक्षरचा फुल लेंथ बॉल लाँग ऑनच्या दिशेने खेळवला. इथे कुलदीप चेंडूकडे धावला आणि पुढे डाईव्ह मारला पण झेल सोडला गेला. मात्र, पुढच्याच षटकात पांड्याच्या चेंडूवर शकील अक्षर पटेलकडून बोल्ड झाला. शकील ६२ धावा करून बाद झाला.

भारत 21 षटकांपासून विकेटच्या शोधात.. पाक १५१ च्या पुढे

0

पाकिस्तान (33.2/50 ov) 151/3

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा ५वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावली आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने सलग १२ वा टॉस हरला आहे. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये कोणताही बदल झालेला नाही, तर पाकिस्तानने एक बदल केला आहे.

भारताकडून हार्दिक पांड्याला एक विकेट मिळाली. त्याने बाबर आझमला (23) बाद केले. अक्षर पटेलने इमामला (10) थेट फटकेबाजी करत धावबाद केले.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाचव्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार रिझवानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला होता की नाणेफेकीने फारसा फरक पडत नाही, जरी ही खेळपट्टी नंतर थोडी संथ होऊ शकते.

भारत – पाकिस्तान सामन्याचा स्कोअरबोर्ड

प्लेइंग-11

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा.

पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), इमाम उल हक, सऊद शकील, बाबर आझम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.

सौद शकीलने 31व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 63 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने वनडे कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्यिक, कलावंतांचा सत्कार

‌‘माझा मऱ्हाटाचि बोलु कवतिकें‌’ विशेष सांगीतिक कार्यक्रम

पुणे : मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी योगदान देणाऱ्या साहित्यिक, कलावंत, रंगकर्मी यांचा मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने संवाद, पुणे, कोहिनूर ग्रुप आणि महक यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने ‌‘माझा मऱ्हाटाचि बोलु कवतिकें‌’ या गीत, संगीतावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम गुरुवार, दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. बकुल पंडित (नाट्यसंगीत), डॉ. प्रकाश खांडगे (लोकसाहित्य), शाहीर हेमंत मावळे (पोवाडा), राजाभाऊ चोपदार (श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वंशपरंपरागत पालखीचे चोपदार, वारकरी), त्यागराज खाडिलकर (कीर्तन), रघुनाथ खंडाळकर (अभंगवाणी), मनिषा निश्चल (भावगीत) यांचा गौरव ज्येष्ठ रंगकर्मी, जनस्थान पुरस्काराचे मानकरी प्रा. सतीश आळेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कोहिनूर ग्रुपचे संस्थापक कृष्णकुमार गोयल, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती संवाद, पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. केतकी महाजन-बोरकर कार्यक्रमाच्या संयोजक आहेत.
‌‘माझा मऱ्हाटाचि बोलु कवतिके‌’ या कार्यक्रमात बकुल पंडित, शाहीर हेमंत मावळे, राजाभाऊ चोपदार, त्यागराज खाडिलकर, रघुनाथ खंडाळकर, मनिषा निश्चल यांचा सहभाग असणार आहे. झंकार कानडे, सागर टेमघरे (की-बोर्ड), हनुमंत रावडे (ढोलक, पखवाज), संतोष पेडणेकर (तालवाद्य), विजय तांबे (बासरी), अमेय ठाकुरदेसाई (तबला), सिद्धार्थ कदम (ऑक्टोपॅड) साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये IND Vs PAK:रिझवान-सौद यांच्यात अर्धशतकी भागीदारी;32 ओव्हर मध्ये 2/142

0

कुलदीपच्या षटकात सऊद शकीलने 2 चौकार मारले

सौद शकीलचे चौथे अर्धशतक

सौद शकीलने 31व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 63 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने वनडे कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले.

कुलदीप यादवने टाकलेल्या 26 व्या षटकात सऊद शकीलने दोन चौकार मारले. या दोन चौकारांच्या मदतीने पाकिस्तानची धावसंख्या 100 धावांच्या पुढे गेली.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा ५वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावली आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने सलग १२ वा टॉस हरला आहे. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये कोणताही बदल झालेला नाही, तर पाकिस्तानने एक बदल केला आहे.

पाकिस्तानने 10 षटकांत 2 विकेट गमवून 55 धावा केल्या आहेत. सऊद शकील आणि मोहम्मद रिझवान क्रीजवर आहेत. इमाम उल हक १० धावसंख्येवर धावबाद झाला. त्याला अक्षर पटेलने डायरेक्ट थ्रोवर बाद केले. बाबर आझम २३ धावा करून बाद झाला. त्याला हार्दिक पंड्याने यष्टीरक्षक केएल राहुलकरवी झेलबाद केले.

भारत – पाकिस्तान सामन्याचा स्कोअरबोर्ड

प्लेइंग-11

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा.

पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), इमाम उल हक, सऊद शकील, बाबर आझम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.

“ पायरेसीने मला चीनमध्ये स्टार बनवले! ‘३ इडियट्स’ तिथे पायरसीमुळे व्हायरल झाला

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२५ : ” सिनेमा आणि कथाकथनाने भाषा आणि प्रादेशिक मर्यादा ओलांडल्या आहेत. विडंबन म्हणजे, पायरसीने मला चीनमध्ये स्टार बनवले! ‘३ इडियट्स’ तिथे पायरसीमुळे व्हायरल झाला. वेगळ्या संस्कृतीतील चित्रपट स्वीकारल्याबद्दल आणि त्याला प्रेम आणि आदर दिल्याबद्दल याचे श्रेय चिनी प्रेक्षकांना जाते. ते सर्व नैसर्गिक होते आणि त्यात माझी कोणतीही भूमिका नव्हती ,” असे प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया २०२५ मध्ये “६० अँड नॉट डन – द स्क्रीन अँड स्पॉटलाइट ” या शीर्षकाच्या सत्रात सांगितले.

चित्रपटसृष्टीतील त्याच्या दशकांच्या प्रवासाबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला, ” गेल्या ३७ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत मला मिळालेल्या संधींसाठी मी खरोखरच भाग्यवान आणि कृतज्ञ आहे. माझे काम आणि नाटक सारखेच असल्याने मला माझा व्यवसाय आवडतो. मी उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शकांसोबत काम केले आहे आणि काही अद्भुत चित्रपटांचा भाग होण्याचे भाग्य मला लाभले आहे. माझा व्यावसायिक प्रवास माझ्या वैयक्तिक चित्रपटापेक्षा अधिक यशस्वी झाला आहे .”

अमीर खान पुढे म्हणाले, ” मी निवडलेले चित्रपट मी कोण आहे हे प्रतिबिंबित करतात. मला काही विशिष्ट विषयांकडे आकर्षित वाटते, परंतु मी स्पष्ट आहे की मी एक मनोरंजन करणारा आहे, सामाजिक शिक्षक नाही. मी सांगणारी कोणतीही कथा आकर्षक आणि मनोरंजक असली पाहिजे. जर ती लोकांना विचार करायला लावते, तर ती चांगली गोष्ट आहे. सर्जनशील लोकांमध्ये खूप शक्ती असते – जर कथा प्रभावी असेल तर ती मनांना आकार देते. राष्ट्र उभारणीत ही एक संधी आहे .”

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाण्याबद्दल तो म्हणाला, “ मला ‘परफेक्शनिस्ट’ हा शब्द आवडत नाही. मला जादूमध्ये जास्त रस आहे. सर्जनशील क्षेत्रात, परिपूर्ण असे काहीही नसते – ते नेहमीच विकसित होत असते. मला विश्वास आहे की देव तपशीलांमध्ये आहे. मला खोलवर जाणे आवडते कारण तिथेच काहीतरी खास घडते. बरेच कलाकार एका सेट इमेजमध्ये काम करतात, पण मला ते कधीच आवडले नाही. मला नेहमीच काहीतरी नवीन करायचे होते, जे मला आव्हान देते. मी स्वाभाविकपणे अपारंपरिक भूमिकांकडे आकर्षित होतो. हा टॅग प्रत्यक्षात शबाना आझमींसोबतच्या एका अपघाती भेटीतून आला होता. तिने एकदा मला विचारले होते की माझ्या चहामध्ये किती साखर हवी आहे आणि मी त्याबद्दल विशेष होतो. तिथूनच हे सर्व सुरू झाले !”

चीन, तुर्की आणि जपानवर विजय मिळवण्याबद्दल आमिर खान म्हणाला, ” सिनेमा आणि कथाकथन भाषा आणि प्रादेशिक अडथळ्यांपेक्षा जास्त आहे. विडंबन म्हणजे, पायरसीने मला चीनमध्ये स्टार बनवले! ‘३ इडियट्स’ तिथे पायरसीमुळे व्हायरल झाला. वेगळ्या संस्कृतीतील चित्रपट स्वीकारल्याबद्दल आणि त्याला प्रेम आणि आदर दिल्याबद्दल चिनी प्रेक्षकांना श्रेय जाते. ते सर्व नैसर्गिक होते – त्यात माझी कोणतीही भूमिका नव्हती .”

बॉक्स ऑफिसवरील यशाबद्दल ते म्हणाले, “माझ्या सर्व चित्रपटांचा स्वतःचा प्रवास आहे. आम्ही कधीही भारताबाहेर प्रेक्षक शोधण्याचा प्रयत्न केला नाही कारण आमच्याकडे आधीच देशात इतके वैविध्यपूर्ण प्रेक्षक आहेत. तरीही, कालांतराने, आमचे चित्रपट सेंद्रियपणे जगभर प्रवास करत आहेत. मी भारतीय प्रेक्षकांसाठी ‘लगान’ बनवला होता – तो आधीच चार तासांचा चित्रपट होता आणि जगभरातील बहुतेक लोकांना क्रिकेट देखील माहित नाही. पण चित्रपटाने स्वतःचा प्रवास सुरू केला. तो आमच्या नियंत्रणात नव्हता. मी एकदा स्वित्झर्लंडमध्ये होतो आणि पाहिले की तो सहा ते आठ महिने थिएटरमध्ये चालू आहे. प्रश्नोत्तरांच्या सत्रादरम्यान, प्रोजेक्शनिस्टने मला सांगितले की त्याने कधीही असा प्रतिसाद पाहिला नव्हता, अगदी अमेरिकन किंवा युरोपियन चित्रपटासाठी देखील आणि हा पूर्णपणे युरोपियन प्रेक्षकांचा होता .”

चित्रपट निर्मितीच्या व्यावसायिक पैलूबद्दल बोलताना अमीर खान पुढे म्हणाले, ” चित्रपट निर्मितीमध्ये व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावतो कारण प्रत्येक चित्रपट ही एक गुंतवणूक असते. माझा असा विश्वास आहे की चित्रपट आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा आणि ते नेहमीच माझे ध्येय असते. गेल्या २० वर्षांपासून मी आगाऊ शुल्क आकारले नाही. जर माझा चित्रपट यशस्वी झाला तर मी कमाई करतो. मी शो नंतर कॅप पास करणे, जिथे प्रेक्षकांना परफॉर्मन्स आवडला तर पैसे देणे अशा जुन्या पद्धतीचा अवलंब करतो. यामुळे मला वेगवेगळ्या विषयांवर काम करण्याचे सर्जनशील स्वातंत्र्य मिळते .”

तो पुढे म्हणाला, ” मी भावनिक व्यक्ती आहे, म्हणून जेव्हा माझे चित्रपट चालत नाहीत तेव्हा मला वाईट वाटते. चित्रपट निर्मिती कठीण असते आणि कधीकधी गोष्टी नियोजित प्रमाणे होत नाहीत. ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये माझा अभिनय थोडा जास्त होता आणि तो टॉम हँक्सच्या आवृत्तीइतका चांगला चालला नाही. जेव्हा माझे चित्रपट अपयशी ठरतात तेव्हा मी दोन ते तीन आठवड्यांसाठी एका प्रकारच्या नैराश्यात जातो. त्यानंतर, मी माझ्या टीमसोबत बसतो, काय चूक झाली याचे विश्लेषण करतो आणि त्यातून शिकतो. मला माझ्या अपयशांची खरोखर कदर आहे कारण ते मला चांगले काम करण्यास प्रवृत्त करतात .”

त्यांच्या चित्रपटांमधील सामाजिक समस्यांकडे असलेल्या त्यांच्या कलांबद्दल बोलताना त्यांनी अधोरेखित केले, ” गेल्या काही वर्षांत, मला जाणवले आहे की आपल्या समाजासमोर अनेक आव्हाने आहेत आणि ती समजून घेणे नेहमीच सोपे नसते. जर आपण प्रयत्न केले तर आपल्याला उपाय सापडतील, परंतु त्यांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करणे कठीण आहे. विविध क्षेत्रातील तज्ञ आपले जीवन चांगले बनवण्यासाठी मार्गदर्शन करू शकतात. मला आनंद आहे की या शोने प्रभाव निर्माण केला आणि तो माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक आणि शिकण्याचा अनुभव होता .”

वैयक्तिक आयुष्य आणि भविष्यातील ध्येयांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ” मी माझा फोन जास्त वापरत नाही. मला पुस्तके आणि वाचन आवडते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मी माझ्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवत आहे. मी मोठे झाल्यावर अधिक काम करू इच्छितो, फक्त एक अभिनेता म्हणूनच नाही तर एक निर्माता म्हणूनही. माझे प्रॉडक्शन हाऊस नवीन प्रतिभेसाठी एक व्यासपीठ बनावे, ते अधिक चैतन्यशील बनवावे अशी माझी इच्छा आहे. ‘महाभारत’ बनवण्याचे माझे एक स्वप्न आहे. मला आणखी एक क्षेत्र जे उत्साहित करते ते म्हणजे मुलांची सामग्री कारण ती तरुण मनांना आकार देते .”

बॉलीवूडच्या भविष्याबद्दल बोलताना त्यांनी अधोरेखित केले, ” आपल्याला अधिक चित्रपटगृहांची आवश्यकता आहे. तसेच, सर्जनशील लोक म्हणून, आपण लेखकांना खूप जास्त महत्त्व दिले पाहिजे .”

‘मानवतेची पुढची सीमा’ या थीमभोवती केंद्रित असलेल्या एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया २०२५ मध्ये, वेगाने बदलणाऱ्या जगात भारताच्या उदयामुळे निर्माण होणाऱ्या आव्हाने आणि संधींचा शोध घेण्यासाठी विचारवंत आणि नवोन्मेषकांना एकत्र आणले जाईल. हवामान बदल, भू-राजकीय संघर्ष आणि एआय सारख्या तांत्रिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर, शिखर परिषदेने भारताची एक प्राचीन संस्कृती आणि भविष्य घडवण्यात लोकसंख्याशास्त्रीय शक्तीगृह म्हणून भूमिका उलगडली. दोन दिवसांच्या या शिखर परिषदेत जागतिक विचारवंत, बुद्धिजीवी आणि बदल घडवणाऱ्यांच्या कल्पनांचा संगम होतो, ज्यामध्ये विज्ञान, औषध, सामाजिक करार आणि जागतिक नेतृत्वातील परिवर्तनात्मक शक्यतांचा समावेश आहे, विविध क्षेत्रातील तज्ञ सर्वांसाठी चांगल्या, अधिक शाश्वत जगासाठी धाडसी दृष्टिकोन देतात.

अभंग वाणीने झाला वृद्धेश्वर सिद्धेश्वर महाशिवरात्र महोत्सवाचा प्रारंभ

श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, शिवाजीनगर गावठाण तर्फे आयोजन 

पुणे : ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया’, ‘जय जय विठ्ठल रखुमाई’, ‘देव माझा मी देवाचा’, ‘हीच माझी सत्यवाचना’ अशा एकाहून एक सुंदर आणि स्वर मधुर अभंगवाणीने रसिकांना मंत्रमुग्ध करत श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या महाशिवरात्र संगीत महोत्सवाचा प्रारंभ झाला. 
शिवाजीनगर मधील वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्र संगीत महोत्सवाची सुरुवात ह.भ.प. गणेश महाराज भगत आणि सहकार यांच्या अभंग वाणीने झाली. महोत्सवापूर्वी गणेश महाराज भगत यांच्या हस्ते वृद्धेश्वर सिद्धेश्वराची आरती करून महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते यावेळी उपस्थित होते. 
‘देवाचिये द्वारी उभा विटेवरी कर कटेवरी ठेवूनिया’, ‘सुंदरते ध्यान’, ‘देह देवाचे मंदिर’, ‘विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेमभाव’ अशा भक्तिमय आणि नादपूर्ण अभंगांनी रंगून गेलेल्या महोत्सवामध्ये रसिकांनीही संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगांचा आनंद घेतला. ह.भ.प. गणेश महाराज भगत यांच्यासह स्वरा भगत, कल्याणी शेटे आणि अनन्या भगत यांच्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अभय नलगे (हार्मोनियम) आदिनाथ कुटे (तबला), धनंजय वसेकर (पखवाज), अनिल भुजबळ (ताल वाद्य) या कलाकारांनी अतिशय सुरेल साथ संगत केली.

 देशाच्या विकासात योगदान द्यायचे असेल तर सहकार हा एकमेव मार्ग-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा

: जनता सहकारी बॅंक लिमिटेड पुणे बँकेच्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारोहाचे आयोजन
पुणे: नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाला पूर्ण विकसित राष्ट्र करणे आणि २०२७ पर्यंत त्याच्या अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करणे हे दोन संकल्प राष्ट्राच्या समोर ठेवले आहेत. सहकारी क्षेत्राच्या योगदानाने दोन गोष्टी साध्य करता येऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार काम देणे आणि प्रत्येक व्यक्तीला देशाच्या विकासाशी जोडणे, प्रत्येक कुटुंबाला समृद्ध करणे हे केवळ सहकारी चळवळीच्या माध्यमातून शक्य आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाची सुरुवात केली आहे. देशाच्या विकासात योगदान द्यायचे असेल तर सहकार हा एकमेव मार्ग आहे. सहकाराच्या माध्यमातून छोटी छोटी रक्कम जमा करून मोठे काम होऊ शकते, असे मत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले.

जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे बँकेच्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारोहाचे आयोजन हडपसरमधील स्व. विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा होते. सांगता समारोह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, उपाध्यक्ष अलका पेटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप उपस्थित होते. जनता सहकारी  बँकेच्या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. अंब्रेला आॅर्गनायझेशनसाठी ५ कोटी चा धनादेश यावेळी बँकेच्या वतीने देण्यात आला.
अमित शहा म्हणाले,  छोट्या लोकांची मोठी बँक हा विश्वास जनता सहकारी बँकने  सार्थ केला आहे. देशातील पहिली को-अाॅपरेटीव्ह डिमॅट संस्था बनण्याचा बहुमान बँकेने प्राप्त केला आहे. ज्या बँकेचे लाभार्थी सगळ्यात जास्त ती बँक यशस्वी बँक आहे. आज जनता बॅंकेची ठेवी ९६०० कोटीपेक्षा अधिक आहे, हे बँकेचे यश आणि लोकांचा विश्वास आहे. सामाजिक कार्यात देखील बँक अग्रेसर आहे. कोणतीही संस्था जेव्हा सातत्यपूर्ण प्रगती करते तेव्हा त्यांचे संस्थापक, संचालक, सदस्य हे तिघे सगळ्या उद्देशांना पूर्ण करतात तेव्हाच ही प्रगती शक्य आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अमित शहा म्हणाले, देशात १४६५ सहकारी बँका आहेत, आणि त्यापैकी ४०० हून अधिक फक्त महाराष्ट्रात आहेत. आम्ही एक अंब्रेला संस्था (UMBRELLA ) सक्रिय करत आहोत, जी सर्व सहकारी बँकांना शक्य त्या सर्व प्रकारे मदत करेल. अंब्रेला संस्थेसाठी सहकारी बँकानी  ३०० कोटी रुपयांचे भागभांडवल उभे केले आहे. यामध्ये केंद्र सरकारचे देखील सहकार्य आहे. शाह म्हणाले की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाने शहरी सहकारी व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. देशातील पहिले सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक कार्यालय मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुण्यात सुरु होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
रविंद्र हेजीब म्हणाले, अनेक आव्हानांना तोंड देत समर्थपणे आपल्या विचारांचा वारसा जपत अमृतमहोत्सवी वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे सिंहावलोकन करण्याचा हा सुवर्णक्षण आहे. बँकेवर काम करणारे भागधारक, निष्ठावान खातेदार, निस्वार्थी संचालक आणि प्रामाणिक सेवक ही या बँकेची खरी शक्तीस्थाने आहेत. समाजातील सर्वसामान्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी बँकेने मागील ७५ वर्षे आपली भूमिका अत्यंत प्रभावीपणे निभावली आहे, असे सांगत बँकेच्या योजना आणि सामाजिक कार्यातील उपक्रमांची माहिती दिली.

जगदीश कश्यप यांनी स्वागत केले. रवींद्र हेजीब यांनी प्रास्ताविक केले. अलका पेटकर यांनी आभार मानले.

असली राष्ट्रवादी कोणती हे जनतेने दाखवून दिले: अमित शहा

पुणे-महाराष्ट्राच्या जनतेला धन्यवाद करण्यासाठी मी आज पुण्यात आलो असल्याचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला आशीर्वाद दिला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार येथे स्थापन केले आहे. महायुतीला ऐतिहासिक बहुमत तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेच आहे मात्र, त्याच बरोबर कोणती शिवसेना असली आणि कोणती शिवसेना नकली तसेच कोणती एनसीपी असली आणि कोणती नकली, याचा निर्णय देखील महाराष्ट्रातील जनतेने केला असल्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे.

दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये असलेली जवळीक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मात्र, आज अमित शहा यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. खरी एनसीपी कोणाची हे आता महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. पुण्यात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत लाभार्थींना मंजूरी पत्र व पहिल्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमा’त ते बोलत होते.

या वेळी अमित शहा म्हणाले की, 20 लाख कुटुंबीयांना घर देताना त्या सर्व कुटुंबीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने मी अभिवादन तसेच अभिनंदन करतो. देशाच्या प्रगतीत विकासाचा पाया रचत असताना या सर्व कुटुंबांनी कामाला लागण्याचा संकल्प शहा यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्प्या दोनची सुरुवात केली आहे. देशभरात सर्वात जास्त घरे ही महाराष्ट्राला मिळाली असल्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे. याचा आम्हाला सर्वांना आनंद आणि गौरव असायला हवा, असे देखील ते म्हणाले. घराचा अर्थ केवळ चार भिंती नाही तर विकासाच्या स्वप्नाला साकार करणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येकाचे घर हे स्वर्गा सारखे तर असतेच मात्र येणाऱ्या पिढीसाठी हा विकासाचा प्रथम टप्पा देखील असतो. गरिबांना घरासोबतच शौचालय देणे म्हणजे त्यांच्या सन्मानाची आणि स्वाभिमानीची रक्षा मोदीजींनी केली असल्याचे शहा यांनी म्हटले आहे.

प्रत्येकाला घर या योजनेअंतर्गत महिला, मागासवर्गीय, एसटी, एससी, गरीब समाजाला स्वतःचे घर देण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. 2029 पर्यंत यात पाच कोटी घरे दिली जाणार आहेत. त्यातील तीन कोटी 50 लाख नागरिकांना आतापर्यंत घरे देण्यात आली आहेत. तर महाराष्ट्रात देखील आतापर्यंत तेरा लाख पन्नास हजार घरे देण्यात आली आहेत. आता 19 लाख 50 हजार घरे देण्यात येत आहेत. ही सर्व घरे वेळेत पूर्ण करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केले असल्याचे म्हणत अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे देखील कौतुक केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून बारामतीत गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रिया उपक्रम

बारामतीत सुरू झाला रुग्णसेवेचा नवीन आयाम

बारामती, दि. 22 : आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या बालकांसाठी एक दिलासादायक उपक्रम बारामतीत सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने गरजू मुलांसाठी विनामूल्य शस्त्रक्रिया उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

बारामतीतील मुथा हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा आणि डॉ. सौरभ मुथा यांच्या सहकार्याने मुंबईतील प्रख्यात शल्यविशारद डॉ. संजय ओक आणि त्यांचे सहकारी हे बालकांवर सेवाभावी वृत्तीने मोफत शस्त्रक्रिया करत आहेत.

शनिवार व रविवार या दोन दिवसांत ३० बालकांवर विविध शस्त्रक्रिया केल्या जाणार असून, त्यात हर्निया, टाळूला चिटकलेली जीभ दुरुस्त करणे, तसेच शरीरावरील गाठी काढणे यासारख्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, तसेच डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा, अनिल नवरंगे, अनिल जोगळेकर, माजी नगराध्यक्षा भारती मुथा, प्रियांका मुथा, डॉ. अनिल मोकाशी, अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी नितीन हाटे, किरण तावरे आणि प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांची उपस्थिती होती.

मोफत शस्त्रक्रियांचा उपक्रम नियमित राबवणार!

“उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रेरणेतून बारामतीत हा उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प केला आहे. यामुळे गरजू बालकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल,” असे डॉ. संजय ओक यांनी सांगितले.

उपचारांची नवी पहाट!

या अभिनव उपक्रमामुळे बारामतीतील गरजू कुटुंबांसाठी आरोग्यसेवेचे नवे दार खुले झाले आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या मुलांसाठी हा उपक्रम एक मोठी संधी ठरणार आहे.

मालपाणी इस्टेटला आकारलेला 1 कोटी 28 लाख दंड व्याजासहित वसुल कधी करणार ? रयत विद्यार्थी परिषदेचा सवाल

पुणे :
बालेवाडी येथील सर्वे नं 23 या ठिकाणी विनापरवाना रस्ते खोदाई करून विद्युत केबल 350 मी टाकण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत कोणत्याही ठिकाणी विनापरवाना रस्ते खोदाई करून बालेवाडी येथील मालपाणी इस्टेट या बांधकाम व्यावसायिकाने विनापरवाना खोदाई केल्यामुळे त्यास आकारलेला 1,28,01,600₹ दंडाची नोटीस 27/12/2023 रोजी पाठवण्यात आली होती तो दंड आज एक वर्ष उलटून गेले तरी बांधकाम व्यावसायिकाने दंड मनपा कोषागारात भरला नाही. पुणे मनपाने व्यावसायिकास पुन्हा एकदा नोटीस देऊन दंड व्याजासहित वसूल करावा. अन्यथा या व्यावसायिकाचे शहरात चालू असणाऱ्या मालपाणी यांच्या इतर बांधकामांना Work Stop Notice द्यावी.या बांधकाम व्यावसायिकाची कृती ही मनपा स्ट्रेचिंग पाॅलिसी भंग करणारी आहे.या व्यावसायिकाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे दंड वसुल करावा अन्यथा आम्ही येत्या काही दिवसांत न्यायालयाचा मार्ग अवलंबवू असा इशारा रयत विद्यार्थी परिषदेचे ऋषिकेश कानवटे यांनी दिला.