Home Blog Page 446

विराट कोहलीने रचला वर्ल्ड रेकॉर्ड

0

INDIA (24/50 ov, T:242) 124/2

Pakistan 241

दुबई : विराट कोहलीने पाकिस्तानची धुलाई करत आता वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.१३ व्या षटकात. त्यावेळी हारिस रौफ हा गोलंदाजी करत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने खणखणीत चौकार वसूल केला आणि आपल्या नावावर मोठा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.विराट कोहलीने पाकिस्तानच्या सामन्यात दमदार फलंदाजी करताना वनडे क्रिकेमधील आपल्या १४ हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमध्ये वनडेत १४ हजार धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांनी आपल्या नावावर १४ हजार धावा केल्या होत्या.

18 व्या षटकात भारताने दुसरी विकेट गमावली. येथे शुभमन गिल 46 धावा करून बाद झाला. त्याला अबरार अहमदने बोल्ड केले. याआधी शाहीन आफ्रिदीने रोहित शर्माला बाद केले.

पुन्हा सत्याग्रह चळवळ करण्याची गरज:डॉ.अच्युत गोडबोले

तरूणाईला बाबा आमटे यांचे विचार दिशादर्शक:डॉ.कुमार सप्तर्षी

पुणे:

बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना
ज्येष्ठ लेखक डॉ.अच्युत गोडबोले यांच्या हस्ते देण्यात आला.याच कार्यक्रमात ‘बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार’ देवून ओरिसा येथील सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन दास आणि कोल्हापूर येथील हसन फत्तेखान देसाई यांना संयुक्तपणे गौरविण्यात आले. जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, एक लाख रुपये असे होते , सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराचे स्वरूप मानपत्र आणि पन्नास हजार रुपये असे होते. अध्यक्ष डॉ.सोमनाथ रोडे हे अध्यक्षस्थानी होते.

हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार,दि.२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता गांधी भवन (कोथरूड, पुणे) येथे झाला.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुहिता थत्ते,रुकय्या जोशी,सुहिता थत्ते,डॉ. सोमनाथ रोडे,विजय भारतीय,गिरीश पद्मावार,अनिल हेब्बर,राजन अन्वर,सौ.उर्मिला सप्तर्षी, लक्ष्मीकांत देशमुख,अभय छाजेड,डॉ.मधुसूदन झंवर,अनिकेत लोहिया,माधवी इनामदार,गजानन राऊत,गिरीश पद्मावार,विजय देशमुख,डॉ.प्रवीण सप्तर्षी,जेकब,शुभांगी रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अशोक बेलखोडे यांनी केले.प्रेम कोहाडे यांनी भारत जोडो गीत सादर केले.सुहिता थत्ते, रुकय्या जोशी यांचेही यावेळी भाषण झाले.
सूत्रसंचालन मंदार परांजपे यांनी केले तर आभार प्रदर्शन माधव बावगे यांनी केले.

यावेळी बोलताना डॉ.अच्युत गोडबोले म्हणाले,’आज देशात रोज हजारो गाड्या रस्त्यावर येतात आणि रस्ते गर्दीने वाहनांनी तुंबून जातात. यावर उपाय म्हणून फ्लायओव्हर बांधणे हे उपाय नसून, ते आपल्या चुकीच्या नियोजनामुळे होते आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट आणि सक्षम करण्याची गरज आहे. संपूर्ण देशात ९० टक्के लोकांचे दरमहा उत्पन्न हे २५ हजार रुपयांहून कमी आहे. सरकारने पुढील वीस पंचवीस वर्षे शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक आदी समस्यांवर अफाट खर्च केला तरच भारत प्रगती पथावर येऊ शकेल. देशात अंधश्रद्धा, विषमता, बेकारी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आजची लोकशाही ही खरी लोकशाही नाही.या धर्मयुद्धाविरोधात आजच्या तरूणांनी निदान विचार केला पाहिजे आणि त्यासाठी आंदोलने उभारली पाहिजे.भारत महासत्ता वगैरे वल्गना आहेत ,सर्व थोतांड आहे, त्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनी सत्याग्रह चळवळ करण्याची गरज आहे’.

पुरस्कार स्वीकारल्यावर मनोगत व्यक्त करताना डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’बाबा आमटे मला मानसपुत्र मानत असत आणि मेधा पाटकर यांना मानस कन्या मानत, बाबा आमटे मला वडिलांसारखं मार्गदर्शन करायचे तसेच ते माझ्या राजकीय, सामाजिक आंदोलनात मला मानसिक पाठिंबा देत असत, बाबा आमटे यांच्या भारत जोडो आंदोलनात सहभागी झालेल्यानी आजच्या तरूणांना अशा प्रकारच्या आंदोलनासाठी तयार केले पाहिजे, त्यांनी आजच्या तरूणांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी बाबा आमटे झाले पाहिजे’.

हसन देसाई म्हणाले या पुरस्काराने माझ्या जीवनाचे सोने झाले, ‘मी कधीही कुणाला पुरस्कार मिळविण्यासाठी पुढे -पुढे केले नाही’. मधुसूदन दास म्हणाले, ‘बाबा आमटे आज आपल्यात शरीराने नसले तरी त्यांचे विचार आणि त्यांचे मार्गदर्शन, त्यांनी आपल्याला दिलेली स्वप्न, प्रेरणा आपल्याला सतत प्रेरणा देत राहील. सायकलवरून भारत जोडो आंदोलनात सहभागी झालेल्या कार्योकर्तयांनी आजच्या तरूणांना सोबत घेऊन पुन्हा एकदा, महात्मा गांधी, बाबा आमटे यांच्या स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पुन्हा भारत जोडो आंदोलन जोरदारपणे सुरू करण्याची गरज आहे.’

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचे परिक्षा केंद्रावर मंगलमय वातावरणात स्वागत…

पुणे-दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या पहिल्या दिवशी परिक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने रांगोळी व औक्षणासह सनई चौघड्याच्या जयघोषात मंगलमय वातावरणात गुलाबपुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले. बाजीराव रोडवरील नुमवि प्रशालेत हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी म.न.वि.से.राज्य कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ म्हणाले, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचे मोठे दडपण असते. हे दडपण कमी झाल्यास ते उत्तम कामगिरी करू शकतील, या भूमिकेतून गेल्या ८ वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत.
यावेळी नुमविचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, माजी नगरसेविका सुशीला नेटके, आशिष देवधर, गणेश भोकरे, ज्योती वसंत खुटवड, आरती रवि सहाणे, रुपेश चांदेकर, करण मेहता, दिलीप वाघमारे, सुरेश सांबार, ऋषिकेश करंदीकर, जयश्री पाथरकर, प्रतिक्षा रणधीर, विजय रजपूत, निखिल रजपूत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन म.न.वि.से.चे राज्य कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ यांनी केले होते.

नीलम गोऱ्हेंच्या विरोधात पुण्यात महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन

पुणे-अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असे खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. त्यांच्या या मोठ्या दाव्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात पुण्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून आले. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील घराबाहेर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आंदोलन केले आहे.

नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरें यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. ठाकरे यांच्या पक्षातील महिला शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी महिलांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आलीय. महिलांनी हातात टायर आणि मर्सिडीज गाड्याचे पोस्टर आणले होते त्यावरती टायरवाल्या काकू असे लिहण्यात आले होते. यावेळी बोलताना महिला महिला म्हणाल्या, नीलम गोऱ्हे यांनी मुलाखतीमध्ये पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा अपमान केला आहे, त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. गोऱ्हेंनी आत्तापर्यंत पदासाठी किती गाड्या दिल्या त्याच्या पावत्या त्यांनी द्याव्या, असेही या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

यावेळी संतप्त महिला कार्यकर्त्यांनी खेळण्यातील मर्सिडीज गाड्या दाखवत नीलम गोऱ्हे तुम्ही आता यातून फिरा म्हणत हल्लाबोल केला आहे, तर वाढदिवसाच्या वेळी नीलम गोऱ्हे आम्हाला सामान्य कार्यकर्त्यांना माडंव घालायला सांगतात, एलईडीच्या माळा लावायला लावतात. प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी करतात, त्या नीलमताई आता यावर बोलतील का म्हणत महिलांनी घोषणाबाजी केली. त्या जोड्यांनी मारण्याच्या लायकीच्या आहेत असे म्हणत महिलांनी त्यांच्या फोटोला तुडवले. यावेळी महिला पदाधिकारी मोठ्या आक्रमक झाल्याच्या दिसून आल्या. काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

नीलम गोऱ्हे भेटीसाठी महिलांकडून गिफ्ट घ्यायच्या. त्या आम्हाला वेळ देण्यासाठी आमच्याकडून साडी घ्यायच्या, त्यांनी आमच्याकडून दहा ते पंधरा हजारांची साडी देखील घेतली असा आरोप देखील महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसाला आणि इतर पदासाठी देखील वेगवेगळ्या गोष्टी घ्यायच्या अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

साहित्य संमेलनाच्या आयोजकांना एक मर्सिडीज:सदस्यांना 50 लाख दिल्याची चर्चा, संजय राऊत यांचा नीलम गोऱ्हे यांना टोला

काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला

संजय राऊत यांनी संमेलनाचे संयोजक संजय नहार यांना फोन करून आपली नाराजी केली व्यक्त

मुंबई-शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर ठाकरे गटातील नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र पाठवत नाराजी व्यक्त केली आहे.

काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच नीलम गोऱ्हे यांनी संमेलनात सहभागी होण्यासाठी सदस्यांना 50 लाख तर आयोजकांना एक मर्सिडीज दिल्याची चर्चा बाहेर सुरू असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

नीलम गोऱ्हे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. संजय राऊत यांनी संमेलनाचे संयोजक संजय नहार यांना फोन करून आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे. यावर राजकारणासाठी साहिते संमेलन मंचांचा वापर टाळला पाहिजे, अशी प्रतिक्रिया नहार यांनी दिली आहे.

दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय?

नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय? सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर महामंडळाने त्वरित माफी मागावी.

नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, “मी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले.”

हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे.

शुबमन गिलने घेतला रोहितच्या विकेटचा बदला, शाहीन आफ्रिदीची केली जोरदार धुलाई

0

गिलने शाहीनला 7 चौकार लगावले, रौफच्या चेंडूवर खुशदिलने झेल सोडला

(15/50 ov, T:242) 89/1

रोहित क्लीन बोल्ड झाल्यावर पुढच्या षटकात शुबमन गिलने रोहितच्या विकेटचा व्याजासकट बदला घेतला आहे. शुबमन गिलने सातव्या ४ षटकात चौकार लगावत १४ धावा केल्या. यासह गिलने भारतावरचा दबाव करत त्यांच्या विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची धुलाई केली.9व्या षटकात भारताची धावसंख्या 50 च्या पुढे नेली आहे. शाहीन आफ्रिदीच्या षटकात गिलने दोन चौकार मारून धावसंख्या 50 च्या पुढे नेली. दुसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर त्याने चौकार मारले. 

टीम इंडियाने एका विकेटवर 64 धावा केल्या. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने वेगवान सुरुवात केली. रोहित 31 धावांवर बाद झाल्यानंतर गिल आणि कोहलीने जबाबदारी स्वीकारली.

भारताच्या डावाच्या ११व्या षटकात शुभमन गिलला जीवदान मिळाले. हरिस रौफच्या षटकातील चौथ्या चेंडूवर गिलने पुल शॉट खेळला. येथे शॉर्ट मिड-विकेटवर उभा असलेला क्षेत्ररक्षक खुशदिल शाहने झेल सोडला. गिल तेव्हा 35 धावांवर खेळत होता .

भारताला सुरुवातीलाच धक्का-रोहित शर्मा क्लीन बोल्ड; शाहीन आफ्रिदीच्या खात्यात मोठी विकेट

0

(9/50 ov, T:242) 63/1

९ओव्हर मध्ये ६३ रन

पाकिस्तानने दिलेल्या २४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताची रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी ही उतरली आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल सुरूवातीच्या षटकांपासूनच फटकेबाजी सुरू केली आहे. भारताने ४ षटकांत २६ धावा केल्या .

भारतीय डावातील दुसरे षटक टाकणाऱ्या नसीम शाहने पहिल्या षटकातून 10 धावा दिल्या. त्याच्या षटकात रोहित शर्माने लागोपाठ दोन चेंडूंवर 2 चौकार ठोकले. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. रोहितने वनडेत ३३९ वा षटकार ठोकला आहे.

पाचव्या षटकातील सहाव्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीने यॉर्कर चेंडू टाकत रोहित शर्माला क्लीन बोल्ड केलं. रोहित शर्मा १५ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह २० धावा करत बाद झाला.

रोहित शर्माला बाद केल्यावर शाहीन आफ्रिदी आनंदात

पुढच्या षटकात शुबमन गिलने रोहितच्या विकेटचा व्याजासकट बदला घेतला आहे. शुबमन गिलने सातव्या ४ षटकात चौकार लगावत १४ धावा केल्या. यासह गिलने भारतावरचा दबाव करत त्यांच्या विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची धुलाई केली.

दुबईच्या मैदानावर वनडे सामन्यांमध्ये भारताचा संघ अजिंक्य आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांमध्ये पाकिस्तानचा रेकॉर्ड भारताच्या वरचढ आहे. त्यामुळे आज कोणता संघ बाजी मारणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत.

एसआरए अंतर्गत ४५० स्क्वेअर फुटांची सदनिका मिळावी – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

आठवले यांच्या हस्ते अजंठा नगर एसआरए प्रकल्पाचे भूमिपूजन

पिंपरी, पुणे -एसआरए अंतर्गत झोपडपट्टी धारकांना ३०० स्क्वेअर फुटांची सदनिका मिळावी अशी मागणी सर्वप्रथम मी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे केली होती. आता कुटुंबाचा आकार वाढल्यामुळे एसआरए अंतर्गत विकसित होणाऱ्या प्रकल्पांमध्ये ४५० स्क्वेअर फुटांची सदनिका मिळावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रामदास आठवले यांच्या हस्ते शनिवारी (दि.२२) चिंचवड येथील अजंठा नगर एसआरए प्रकल्प टप्पा ३ चे भूमिपूजन आणि बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, इलाबाई ठोसर, विश्वास गजरमल, अंकुश कानडी, आरपीआय महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, आरपीआय शहराध्यक्ष कुणाल वाव्हवळकर, युवक शहर अध्यक्ष डॉ. धम्मरत्न गायकवाड, कार्याध्यक्ष योगेश भोसले, चिंचवड विभाग अध्यक्ष नितीन परेकर, राजेश बोबडे, सिकंदर सुर्यवंशी, विकास गाडे, मोहन म्हस्के, विकसक राजेश कदम आदी उपस्थित होते.
आठवले यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी नेतृत्व आहे. त्यांनी गरीब, शेतकरी, युवा यांच्यावर लक्ष केंद्रित करून यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. ५० लाख ६५ हजार कोटींचा एकूण अर्थसंकल्प आहे. यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय विभागासाठी एक लाख ६८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
परभणी मध्ये झालेल्या घटनेत सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिसांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेबाबत चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून दोन महिने झाले तरी चौकशी सुरू आहे. पोलिसांबद्दल आदर आहे, परंतु अशा घटनांची चौकशी होण्यासाठी एवढा वेळ लागणे योग्य नाही. या विषयात देखील मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे.
फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना महाराष्ट्र सरकार अनुदान देते. तर दुसरीकडे आंतरजातीय विवाह केला म्हणून विक्रम गायकवाड सारख्या युवकाची हत्या होणे योग्य नाही. यातील आरोपी पकडले असून त्यांना फाशी व्हावी अशीही मागणी मी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे. भारतामध्ये वर्षाला साधारणपणे १८ लाख आंतरजातीय विवाह होतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. जाती, धर्माच्या भिंती तोडल्या पाहिजेत म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केले असेही रामदास आठवले यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका मे महिन्यात होण्याची शक्यता कमी आहे. आरपीआयला लोकसभा आणि विधानसभेत महायुतीकडून जागा मिळाल्या नाहीत. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये तसेच जिल्हा नियोजन समिती आणि विविध राज्य महामंडळामध्ये आरपीआयला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. नागालँड, मणिपूरमध्ये आरपीआयचे आमदार आहेत. तसेच दादरा, नगर, हवेली, दिव, दमन, लक्षद्वीप सह सर्व राज्यात आरपीआय पोहचली आहे. महाविकास आघाडीचे अपयश म्हणजे ईव्हीएमचा दोष नसून महाविकास आघाडीचा दोष आहे. लाडक्या बहिणी आणि विशेषता दलित मतदारांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस मतदान केले. लाडक्या बहिणींना आता दरमहा २१०० रुपये देण्यात येणार आहेत. पात्र लाडक्या बहिणींना वेळेत पैसे मिळावेत अशी अपेक्षा आहे. त्यांच्यामुळेच राज्यामध्ये महायुतीला २३७ जागा मिळाल्या आहेत. महायुती सक्षम असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी पुन्हा पुन्हा जाणे योग्य नव्हे. आरपीआय महायुतीत असताना राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन फार फायदा होणार नाही. राज ठाकरेंचा महायुतीला उपयोग होणार नाही असेही स्पष्टपणे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.

राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई झालीचपाहिजे : खा. सुप्रिया सुळे

0

दिल्ली, २३ फेब्रुवारी २०२५ : ” राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई झालीच पाहिजे. सशक्त लोकशाही मध्ये मनभेद असता कामा नयेत मात्र मतभेद असलेच पाहिजेत. समाजहिताच्या धोरणासाठी विरोधकांनी टीका केलीच पाहिजे. आणि विरोधकांच्या टीकेवर आत्मचिंतन करून राज्यकर्त्यांनी कार्य प्रक्रिया सुधारली पाहिजे.” असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. दिल्ली येथील तालकटोरा येथे चालू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या छ. संभाजी महाराज विचार पिठावरील खुल्या काव्य संमेलनात साहित्यिकांशी यावेळी त्यांनी संवाद साधला.

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खुल्या कवी संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. शरद गोरे, शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर मोळक, कवी संमेलन अध्यक्ष युवराज नळे, युवा कवी विक्रम मालन आप्पासो शिंदे, महिला व बालविकासच्या प्रशासकीय अधिकारी सुवर्णा पवार आदी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” सशक्त लोकशाही मध्ये टीका झालीच पाहिजे. ती सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने व्हायला हवी. यामध्ये कविता फार मोठ योगदान देते. कवितेच्या माध्यमातून सरकारला जाग आणता येते. कविता प्रभावी शस्त्र असते. कवीने विद्रोह करावा.”

डॉ. शरद गोरे म्हणाले,” या खुल्या साहित्य संमेलनातून कष्टकरी साहित्यिक आपली जगण्याची परिभाषा मांडत आहेत. कष्टकऱ्यांच साहित्य हे खऱ्या अर्थाने व्यवस्थेला जाग करण्याचं काम करते. या खुल्या कवी संमेलनातून कवी आपली व्यथा मांडत आहेत आणि मराठी साहित्यासाठी हे चित्र फारच आश्वासक आहे.”

कवी संमेलन अध्यक्ष युवराज नळे म्हणाले, “संजय नहार आणि शरद गोरे यांच्या माध्यमातून राज्यातील व राज्याबाहेरील शेकडो कवी व कवयित्रींना आपल्या कविता, गझल सादरीकरण करण्याची संधी मिळाली. सर्वांनीच अत्यंत सुंदर विचार समाजाला दिला. साहित्यिक उपेक्षित राहता कामा नये, याची आपण नोंद घ्यायला हवी.”

विक्रम मालन आप्पासो शिंदे म्हणाले,” युवा कवींनी विद्रोही साहित्य जन्माला घालावे. गोडी गुलाबाची कविता कष्टकरी कवीची ओळख सांगत नाही. समाजातील समस्यांचे निरीक्षण करून व्यवस्था सुधारण्याची कविता लिहावी. कवी हाच जग बदलण्याचा विचार देऊ शकतो.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल घाडगे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल कुंभार यांनी केले. रमेश रेडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

पाकचे भारताला 242 धावांचे आव्हान:सौद शकीलची फिफ्टी, रिझवानसोबत शतकी भागीदारी; कुलदीपच्या 3, हार्दिकच्या 2 विकेट

0

पाकिस्तानचा संघ ४९.४ षटकांत २४१ धावांवर ऑलआउट झाला. खुशदिल शाह ३८ धावा करून बाद झाला. त्याला विराट कोहलीने हर्षित राणाच्या गोलंदाजीवर झेलबाद केले. कोहलीने एकदिवसीय सामन्यात त्याचा १५८ वा झेल घेतला.
४९ व्या षटकात पाकिस्तानने आपला ९ वा बळी गमावला. येथे हरिस रौफ ८ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर धावबाद झाला. या डावात धावबाद होणारा तो दुसरा फलंदाज आहे.

पाकिस्तानने भारताला २४२ धावांचे लक्ष्य दिले आहे. संघाकडून सौद शकीलने एकमेव अर्धशतक झळकावले. त्याने ६२ धावा केल्या आणि कर्णधार मोहम्मद रिझवान (४६) सोबत १०४ धावांची भागीदारी केली.

सलामीवीर बाबर आझम (२३ धावा) आणि इमाम-उल-हक (१० धावा) चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले. भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध खालच्या मधल्या फळीलाही अपयश आले. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने ३ विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्याने २ विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना १-१ यश मिळाले. २ फलंदाज धावबाद झाले. विराट कोहली १५८ झेल घेऊन सर्वाधिक एकदिवसीय झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (१५६ झेल) यांना मागे टाकले.

सलामीवीर बाबर आझम (२३ धावा) आणि इमाम-उल-हक (१० धावा) चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले. भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध खालच्या मधल्या फळीलाही अपयश आले. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने ३ विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्याने २ विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना १-१ यश मिळाले. २ फलंदाज धावबाद झाले.

पाकिस्तानने टॉस जिंकला असली तरी भारताने यावेळी सामन्यामध्ये आपला दबदबा कायम ठेवला. पाकिस्तानने संयतपणे सुरुवात केली होती. बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी यावेळी ४१ धावांची सलामी दिली. पण त्यावेळी हार्दिक पंड्या भारताच्या मदतीला धावून आला. हार्दिकने बाबरला बाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अक्षर पटेलने अचूक थ्रो करत इमाम उल हकला रन आऊट केले. त्यावेळी भारत पाकिस्तानवर अंकुश ठेवेल, असे वाटत होते. पण त्यावेळी मोहम्मद रिझवान आणि सौद शकिल यांनी दमदार फलंदाजी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचली. ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण त्यावेळी अक्षर पटेल भारताच्या मदतीला धावून आला.अक्षर पटेलने यावेळी रिझवानला क्लीन बोल्ड केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. रिझवानला यावेळी ४६ धावा करता आल्या. पण दुसरीकडे सौद शकीलने मात्र अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे त्याला बाद करण्याची भारताला जास्त गरज होती. यावेळी भारताच्या मदतीला धावून आला तो हार्दिक पंड्या. हार्दिकने भारताला दुसरे यश मिळवून देत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. सौद शकीलला यावेळी पाच चौकारांच्या जोरावर ६२ धावा कराव्या लागल्या. त्यामुळे पाकिस्तानला भारताला २४१ धावांत रोखता आले. भारताला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आता एकच गोष्ट करावी लागणार आहे. ती गोष्ट म्हणजे दमदार फलंदाजी. कारण दुसऱ्या डावात खेळपट्टी आणखीन संथ होत जाणार आहे, त्यामुळे फलंदाजी करणे भारतासाठ सोपे नसेल. त्यामुळे भारतीय फलंदाज यावेळी कशी कामगिरी करतात, यावर त्यांचा विजय अवलंबून असणार आहे.

हा सामना पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा आहे. गेल्या सामन्यात त्यांना न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे, भारताने बांगलादेशला पराभूत केले होते. आता जर पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांना भारताविरुद्ध जिंकावे लागेल. जर पाकिस्तान भारताविरुद्ध हरला तर पुढच्या फेरीत पोहोचण्याच्या त्याच्या आशा जवळजवळ संपुष्टात येतील.बाबर आझमने पाकिस्तानकडून दमदार सुरुवात केली होती. बाबरने गेल्या सामन्यातही अर्धशतक झळकावले होते पण त्याच्या संथ फलंदाजीमुळे सर्वांनी त्याला लक्ष्य केले. यावेळी बाबरने हे होऊ दिले नाही आणि येताच त्याने काही आश्चर्यकारक चौकार मारले. त्याने तीन उत्कृष्ट चौकार मारले, विशेषतः कव्हर ड्राइव्हवर. तो चांगल्या लयीत दिसत होता पण हार्दिकने नवव्या षटकात त्याची विकेट घेतली आणि त्याला डावाचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यापासून रोखले. बाबरने २६ चेंडूत २३ धावा केल्या.

बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद सोमवारी पुण्यात -पणन मंत्री जयकुमार रावल

0

मुंबई, दि. 23 – राज्यातील बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी सोमवारी पुणे येथे बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिली. या परिषदेत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे मार्फत आयोजित ही परिषद पुण्याच्या बाणेरमधील बंटारा भवन येथे होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. तर पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे आदी या परिषदेस उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री श्री.रावल यांनी दिली.

राज्यातील 305 बाजार समित्या व त्यांचे 623 उप बाजारांच्या माध्यमातून राज्यात उत्पादित शेतमालाची सुरळीत विक्री व्यवस्था विकसित करण्याचे कामकाज गेल्या 40 वर्षापासून सुरू आहे. राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात कालानुरूप बदल घडविणे, शेतमालाच्या विपणनामध्ये आधुनिक बाबींचा अंगीकार करणे, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोई-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाय योजना आदी विषयांसंदर्भात या परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे.

राज्यात कृषी पणन व्यवस्थेत अद्ययावतपणाबरोबरच सुसूत्रता आणि समन्वयता आणण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय नियोजनाचे कामकाजही करण्यात येत आहे. कृषी पणन मंडळाने कृषी पणन व्यवस्थेत आधुनिकीकरण, सुधारणा आणण्याबरोबरच राज्यात कृषी पणन व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध प्रकल्प राबविणे, योजना राबविणे, नवीन कार्यक्रम आखणे याचबरोबर शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या संस्थांच्या विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील बाजार समित्यांचे पदाधिकारी, अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तसेच राज्यात कृषी मालासाठी निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी करुन त्यांच्यामार्फत निर्यातवृद्धी करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून या परिषदेचे आयोजन करण्यात येत असल्याचे मंत्री श्री.रावल यांनी सांगितले.

या परिषदेमध्ये राज्यातील बाजार समित्यांचे आधुनिकीकरण, बाजार समितीनिहाय विकास आराखडा, बाजार समित्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अ़डीअडचणी व उत्पन्न वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना आदींबाबत चर्चा अपेक्षित असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.

काँग्रेस मुख्यालय टिळक भवनात सोमवार व मंगळवारी बैठकांचे सत्र.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार संघटनात्मक बाबींचा आढावा

सोमवारी २४ फेब्रुवारीला सर्व जिल्हा अध्यक्षांची व २५ ला प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक.

मुंबई, दि. २३ फेब्रवारी २५
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटना बांधणीला सर्वप्रथम प्राधान्य देत आढावा बैठकांचे आयोजन केले आहे. राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठक सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता तर मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी दुपारी १.३० वा. रोजी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

या बैठकांमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे तसेच पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी-यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, मुझफ्फर हुसेन यांच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप व कुणाल चौधरी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड गणेश पाटील यांनी दिली आहे.

अनुवादातून भाषाज्ञान समृद्ध होते

0

परिसंवाद : ‌‘अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत‌’
छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : अनुवाद करणे ही सांस्कृतिक प्रक्रिया आहे, पण अनुवादाला आज दुय्यम स्थान दिले जाते. अनुवादामुळे भाषाज्ञान समृद्ध होते. भाषांतर करताना सहित्यामधील मर्म किंवा भाव अनुवादित करणे सोपे नसते. भाषांतर करताना नवनवीन शब्दांचा वापर व्हावा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सरहद, पुणे आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‌‘अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत‌’ या विषयावर आज (दि. 23) परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण सभामंडपातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मंचावर आयोजित चर्चासत्रात प्रफुल्ल शिलेदार अध्यक्षस्थानी होते. डॉ पृथ्वीराज तौर, सुनीता डागा, दीपक बोरगावे, विजय नाईक, महामंडळ प्रतिनिधी किरण सागर यांचा सहभाग होता.
साहित्यकृतीचा अनुवाद करताना शब्दांची योग्य निवड करणे महत्त्वाचे ठरते. भाषांतरात क्लिष्टता न आणता वाचकांना समजेल अशा पद्धतीने अनुवाद होणे आवश्यक आहे. उत्तम अनुवादित साहित्य जगभरात पोहोचण्यासाठी या गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे, असे मत विजय नाईक यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, प्रत्येक राज्याची भाषा आपले वैशिष्ट्य जपत असते. त्यातून उत्तम साहित्यकृतींची निर्मिती होते. त्यामुळे विपुल प्रमाणात अनुवादित साहित्य निर्माण करण्यासाठी त्या त्या भाषेतील साहित्यकृतींची उपलब्धता असणे आवश्यक आहे. उत्तम अनुवादित साहित्य मोठ्या प्रमाणात वाचले जाते त्यातूनच ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते.
दीपक बोरगावे म्हणाले, अनुवाद ही संस्कृती संक्रमणाची बाब आहे. अनुवाद करणे अवघड असले तरी ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आज अनुवादित साहित्यकृतींना दुय्यम समजले जाते. या करीता अनुवादाबाबत नेमके मॉडेल तयार करण्याची गरज आहे. तसेच नवनवीन शब्दांचा वापर होणेही अपेक्षित आहे.
सुनीता डागा म्हणाल्या, साहित्यकृती विश्वव्यापी होण्यात अनुवादित साहित्याचा मोठा वाटा आहे. अनुवादकाला भाषेची जाण असणे आवश्यक आहे. अनुवादाच्या प्रक्रियेत लेखक आणि अनुवादक यांच्यामध्ये सतत चर्चा सुरू राहिली पाहिजे.
डॉ. पृथ्वीराज तौर म्हणाले, ज्ञानाचे चलन-वलन भाषेतून होत असते. अनुवाद हा भाषेला ज्ञानभाषा करण्याचे महत्त्वाचे काम करतो. मराठी भाषेत अनुवादाची परंपरा दीर्घ असून त्यात विविध शैली आहेत. अनुवादामुळे भाषाज्ञान समृद्ध होते.
परिसंवादाचा समारोप करताना प्रफुल्ल शिलेदार म्हणाले, प्रत्येक संमेलनात अनुवादित साहित्य या विषयावर चर्चा होणे तसेच अनुवादाच्या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे. अनुवादित साहित्यासंदर्भात शासकीय स्तरावरही स्वतंत्र मंडळ व समिती तयार व्हायला हवी.

“एक कटू वास्तव: श्रीमंत लोक गरिबांपेक्षा १० ते १५ वर्षे जास्त जगतात

0

एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया २०२५ मध्ये डॉ. (प्रा.) वेंकी रामकृष्णन

●       “सामाजिक अलगाव टाळणे आणि उद्देशाची भावना राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मधुमेहासारख्या लवकर आरोग्य तपासणीमुळे वृद्धत्वात लक्षणीय फरक पडू शकतो”

●       “मानवाशिवाय इतर कोणत्याही प्रजातीला त्यांच्या मृत्युदराची जाणीव नाही.”

मुंबई : “ एक कटू वास्तव म्हणजे दीर्घायुष्यात संपत्तीची भूमिका असते कारण श्रीमंत लोक गरिबांपेक्षा १० ते १५ वर्षे जास्त जगतात ,” असे डॉ. (प्रा.) वेंकी रामकृष्णन यांनी एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया २०२५ मध्ये “ द सायन्स ऑफ एजिंग- द इअरनिंग फॉर अमरत्व” या सत्रात बोलताना सांगितले.

मृत्युदराबद्दल मानवी जाणीवेची विशिष्टता अधोरेखित करताना, डॉ. (प्रा.) वेंकी रामकृष्णन यांनी म्हटले की, “मृत्यू ही एक विलक्षण घटना आहे, आपण येथे बसलो असतानाही आपल्या लाखो पेशी मरत आहेत. आपल्या आयुष्याची एक नैसर्गिक मर्यादा आहे, जीन कॅलमेंट यांनी नोंदवलेली सर्वात मोठी आयुर्मानाची मर्यादा १२२ वर्षे आहे. कोणीही १२० वर्षांपेक्षा जास्त जगलेले नाही. शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या वाढत असताना, शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या (११० पेक्षा जास्त) स्थिर राहिली आहे. वृद्धत्व हे मूलतः बदल आणि नुकसानाचे संचय आहे ज्यामुळे कालांतराने बिघडलेले कार्य वाढते.”

वृद्धत्वाच्या जैविक लक्षणांवर चर्चा करताना, डॉ. (प्रा.) वेंकी रामकृष्णन म्हणाले, ” वृद्धत्वाची काही प्रमुख लक्षणे आहेत, ज्यात आपल्या डीएनए आणि त्याच्याशी संबंधित प्रथिनांमध्ये बदल, तसेच पेशींचे अकार्यक्षम होणे यांचा समावेश आहे. वृद्धत्व प्रत्येक स्तरावर होते आणि अनेक देशांमध्ये, प्रजनन दर कमी होत असताना वृद्ध लोकांचे प्रमाण वाढत आहे. विश्वासार्ह आणि संशयास्पद दाव्यांसह दीर्घायुष्य संशोधनात मोठा स्फोट झाला आहे .”

एका महत्त्वाच्या प्रयोगाचा उल्लेख करताना त्यांनी अधोरेखित केले की, ” आपण वयानुसार, काही पेशी वृद्धावस्थेत प्रवेश करतात जिथे त्या आता विभाजित होत नाहीत. एका प्रयोगात, एका जुन्या उंदराला एका तरुण उंदराशी जोडले गेले आणि संशोधकांना असे आढळून आले की मोठ्या उंदराला तरुण उंदराच्या रक्ताचा फायदा झाला, तर लहान उंदराला त्रास झाला .”

डॉ. (प्रा.) वेंकी रामकृष्णन पुढे म्हणाले, ” सर्वसाधारण कल्पना अशी आहे की आपण जसजसे मोठे होतो तसतसे काही विशिष्ट संयुगे तयार करण्याची आपली क्षमता कमी होते. उदाहरणार्थ, वृद्ध व्यक्तींमध्ये NAD प्रिकर्स सुमारे 30-40% कमी होतात. पेशींचे पुनर्प्रोग्रामिंग आणि स्टेम पेशींचे पुनरुत्पादन हे वृद्धत्व कमी करण्यासाठी शोधल्या जाणाऱ्या अनेक पद्धतींपैकी एक आहेत .”

वृद्धत्वाच्या सामाजिक-आर्थिक पैलूवर चर्चा करताना, डॉ. (प्रा.) वेंकी रामकृष्णन म्हणाले, ” आता आपल्याला समजले आहे की व्यायाम, चांगली झोप आणि इतर निरोगी सवयी वृद्धत्व कमी करण्यास का मदत करतात. सामाजिक अलगाव टाळणे आणि उद्देशाची भावना राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मधुमेहासारख्या लवकर आरोग्य तपासणीमुळे वृद्धत्वात लक्षणीय फरक पडू शकतो. “

‘मानवतेची पुढची सीमा’ या थीमभोवती केंद्रित असलेल्या एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया २०२५ मध्ये, वेगाने बदलणाऱ्या जगात भारताच्या उदयामुळे निर्माण होणाऱ्या आव्हाने आणि संधींचा शोध घेण्यासाठी विचारवंत आणि नवोन्मेषकांना एकत्र आणले जाईल. हवामान बदल, भू-राजकीय संघर्ष आणि एआय सारख्या तांत्रिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर, शिखर परिषदेने भारताची एक प्राचीन संस्कृती आणि भविष्य घडवण्यात लोकसंख्याशास्त्रीय शक्तीगृह म्हणून भूमिका उलगडली. दोन दिवसांच्या या शिखर परिषदेत जागतिक विचारवंत, बुद्धिजीवी आणि बदल घडवणाऱ्यांच्या कल्पनांचा संगम होतो, ज्यामध्ये विज्ञान, औषध, सामाजिक करार आणि जागतिक नेतृत्वातील परिवर्तनात्मक शक्यतांचा समावेश आहे, विविध क्षेत्रातील तज्ञ सर्वांसाठी चांगल्या, अधिक शाश्वत जगासाठी धाडसी दृष्टिकोन देतात.

कवयित्री, गझलकारा अमृता जोशी यांना सुप्रियास्मृती करमज्योत पुरस्कार प्रदान

करमज्योत पुरस्कार आत्मशोधाला प्रवृत्त करणारा : अमृता जोशी

पुणे : “पुरस्कार ही कौतुकाची थाप असतेच, पण योग्य टप्प्यावर मिळणारा पुरस्कार लेखकाला प्रोत्साहन देणारा ठरतो. त्यातही गझलकार सुप्रियास्मृती करमज्योत पुरस्कार माझ्यासाठी अधिक मोलाचा, आनंदाचा आहे. कारण तो आत्मशोधाला प्रवृत्त करणारा आहे”, असे मनोगत प्रसिद्ध कवयित्री, गझलकारा अमृता जोशी यांनी व्यक्त केले.

करम प्रतिष्ठान आयोजित पाचवा मानाचा सुप्रियास्मृती करमज्योत पुरस्कार अमृता जोशी यांना आज (दि.23) प्रदान करण्यात आला. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयोजक प्रज्ञा महाजन, प्राजक्ता वेदपाठक, वैजयंती आपटे आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अमृता जोशी म्हणाल्या, “ज्यांच्या स्मृती या पुरस्काराशी निगडित आहेत, त्या सुप्रिया जाधव यांच्याशी माझे कवितेचे नाते जुळले आहे. सुप्रियाताईंच्या लेखनातील सच्चाई मला अतिशय भावते. माझ्या लेखनात अधिक घोटीवपणा, शिस्त हवी, असे त्यांचे सांगणे होते. माझ्या लेखन प्रवासातील हा पहिला पुरस्कार आहे. आपल्या लेखनाची अशी नोंद घेतली जाणे, आनंदाचे तर आहेच, पण अधिक जाणीवपूर्वक लिहिण्याचे भान देणारेही आहे. माझ्या लेखनप्रवासात गझलकार सुनंदा पाटील, शिवाजी काळे, म. भा. चव्हाण यांचे प्रभाव आणि मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. ज्या मंचावर मी पहिले सादरीकरण केले, त्या करम प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार मिळणे फार आनंदाचे आहे”. अमृता जोशी यांनी मनोगतानंतर सादर केलेली गझल दाद मिळवणारी ठरली.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर यांनी प्रतिष्ठानच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या व प्रशासक वर्षा कुलकर्णी यांच्या योगदानाची माहिती दिली. “कवितेकडे अतिशय जबाबदारीने पाहणारी व्यक्ती आणि प्रतिष्ठानच्या उपक्रमांमध्ये कमालीचे सातत्य आणि दर्जा जपणारी व्यक्ती म्हणजे वर्षा कुलकर्णी”, असे ते म्हणाले. ऑनलाईन व्यासपीठावर सतत नाविन्यपूर्ण उपक्रम एकहाती करणे, स्वभावातील निगर्वीपणा आणि सेवाकार्याची भावना, हे वर्षाताईंचे वेगळेपण आहे”, असे ते म्हणाले.

प्रज्ञा महाजन म्हणाल्या, “सुप्रिया जाधव यांचा करम प्रतिष्ठानच्या वाटचालीत सिंहाचा वाटा होता. अतिशय समर्पित वृत्तीने त्यांनी कार्य व लेखन केले. त्यांच्या याच वृत्तीचा मागोवा घेत दर्जेदार लेखन करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो”.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रित गझलकारांचे सादरीकरण झाले. त्यात मिलिंद छत्रे, भूषण कटककर, अजय जोशी, नचिकेत जोशी, प्राजक्ता पटवर्धन, सुजाता पवार, रेखा येलंबकर, वासंती वैद्य आणि अरुण कटारे यांचा सहभाग होता. अपर्णा डोळे, प्राजक्ता वेदपाठक आणि वैजयंती आपटे यांनी सूत्रसंचालन केले. मुक्ता भुजबले व चिन्मयी चिटणीस यांचा विशेष सहभाग होता. निरुपमा महाजन व वासंती वैद्य यांनी नियोजन केले.