Home Blog Page 433

बँक ऑफ इंडियाने 111 नवीन शाखांसह देशभरात केला विस्तार

मुंबई,बँक ऑफ इंडिया (BOI) ने देशभरात 111 नवीन शाखांचे उद्घाटन करून आपल्या विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या शाखांचे आभासी उद्घाटन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. रजनीश कर्नाटक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या माध्यमातून बँकेने आर्थिक समावेशन आणि ग्राहकांसाठी सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या बांधिलकीला बळकटी दिली आहे.

नवीन उद्घाटन झालेल्या शाखा अनेक शहरांमध्ये पसरलेल्या असून, बँक ऑफ इंडियाच्या देशव्यापी उपस्थितीला आणखी बळकटी मिळाली आहे. हैदराबाद FGMO मध्ये (Field General Manager Office) सर्वाधिक वाढ झाली असून, 17 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. चेन्नई FGMO मध्ये 14 नवीन शाखांसह लक्षणीय विस्तार झाला आहे. पुणे FGMO मध्ये 13 नवीन शाखा, तर नवी दिल्ली FGMO मध्ये 12 नवीन शाखा सुरू झाल्या आहेत. भोपाळ FGMO मध्ये 11 नवीन शाखांचा समावेश झाला आहे. चंडीगड आणि लखनौ FGMO यांनी प्रत्येकी 10 नवीन शाखांचे उद्घाटन केले आहे.

विस्ताराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरजनीश कर्नाटक म्हणाले : या विस्तारामुळे प्रमुख शहरी आणि निमशहरी भागांमध्ये आमची उपस्थिती अधिक मजबूत झाली आहेज्यामुळे बँकिंग सेवा ग्राहकांच्या अधिक जवळ पोहोचतीलशाखा नेटवर्क वाढवून आम्ही ग्राहकांसाठी सुलभता सुधारणेत्यांना अधिक वैयक्तिकृत बँकिंग अनुभव देणे आणि सेवा सहज उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहेआम्ही घू व्यवसायांना पाठबळ देणे आणि व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे यासाठी वचनबद्ध आहोतहा उपक्रम आर्थिक समावेशनाला चालना देण्याच्या आणि देशाच्या आर्थिक वाढीत योगदान देण्याच्या आमच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.”

आमदार बापूसाहेब पठारे यांची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी काल (ता. ३) विधानसभेच्या आठ तालिका अध्यक्षांची घोषणा केली. यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तालिका अध्यक्ष नियुक्तीवर आमदार पठारे म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी तसेच विविध विषयांवर, विधेयकांवर सखोल चर्चा घडवून आणण्यासाठी ‘तालिका अध्यक्ष’ म्हणून असलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने आणि पारदर्शकतेने पार पाडेल. लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकटी देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे ही माझी प्राथमिकता असेल.” तसेच, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे त्यांनी आभार मानले.

पठारे हे वडगावशेरी मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. २००९-२०१४ या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती आणि नागरी विकासाच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना दिली आहे. सध्याही ते मतदारसंघात करत असलेल्या विकासकामांबद्दल नागरिकांमध्ये सकरात्मक चर्चा होताना दिसते आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेचा अनुभव वडगावशेरीकरांनी यापूर्वीही घेतला आहे व आताही घेत आहेत. विधानसभा सदस्य म्हणून विविध धोरणात्मक निर्णय व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. पठारे यांच्या या एकूणच अनुभवाच्या पार्श्वभूमीवर तालिका अध्यक्ष या पदाला ते योग्य न्याय देतील, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

बापूसाहेब पठारे यांच्यासह योगेश सागर, संजय केळकर, बबनराव लोणीकर, रमेश बोरणारे, दिलीप बनकर, सुनील राऊत व अमित झनक यांचीही तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

पुण्यातील हिरे व्यापाऱ्याचे अपहरण:दोन करोड रुपयांची मागणी

पुणे दोन करोड रुपयांसाठी शहरातून एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले. बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलाअपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिऱ्याचे व्यापारी हिरे घेऊन त्यापासून दागिने तयार करण्याचे काम करतात. सोमवारी सायंकाळी पती-पत्नी मुलीला शाळेतून आणण्यासाठी सॅलिस्बरी पार्क परिसरात गेले होते. शाळेतून घेतल्यानंतर त्यांनी मुलाला पत्नीच्या ताब्यात सोपवले आणि काही कामानिमित्त कॅम्पात जात असल्याचे सांगून निघून गेले.दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या मोबाईलवर व्यापारी यांच्या मोबाईल वरून फोन आला. समोरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीने “मैने आपके पति को उठाया है, दो करोड तयार रखो, आपके ससुर जी को बोलो, दो घंटे मे फोन करेंगे” असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या फिर्यादीच्या पतीने तातडीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त मनोज कुमार पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, निखिल पिंगळे, विवेक मासाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.तपासा दरम्यान त्यांचे शेवटचे लोकेशन नवले पूल परिसरात आढळून आले आहे. याशिवाय तिथं हे वापरत असलेली दुचाकी देखील त्याच परिसरात आढळली आहे. त्यानुसार पोलीस आता त्या घटनेचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे हिरे व्यापारी हे मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटात असल्याची ही माहिती समोर आली आहे. याशिवाय जास्तीचा परतावा देतो असे सांगून त्यांनी अनेकांकडून पैसे घेतल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या अपहरण प्रकरणामागे आणखी दुसरी काही बाजू आहे का याचा देखील तपास पुणे पोलीस घेत आहेत.

“त्या औरंग्याने माझ्या राजासमोर भिक मागितली! उदात्तीकरण काय करतो?”; सभागृहात महेश लांडगे कडाडले

मुंबइ – हिंदूस्थानवर क्रुरपणे अमानुष अत्याचार करणारा मुघल सम्राट औरंगजेबने माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समोर इस्लाम स्वीकारण्यासाठी भिक मागितली होती. त्या औरंग्याचे उदात्तीकरण काय करतो? महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आमदार अबु आझमी सारख्या प्रवृत्तींना सभागृहातच आणि रस्त्यावर ठेचून काढले पाहिजे, असा संताप भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी भर सभागृहात व्यक्त केला.

महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे क्रूरकर्मा औरंगजेब धार्जिने आमदार अबू आझमी यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत. याच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर भारतीय जनता पार्टी महायुतीच्या समविचार आमदारांनी आज आंदोलन केले. या आंदोलनामध्ये ‘‘हाल हाल करुन मारला आमचा छावा… औरंग्याच्या औलादीला माफी मागायला लावा..’’ अशी मागणी करीत आमदार महेश लांडगे सहभागी झाले.आमदार लांडगे म्हणाले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी या धर्मासाठी मरावे कसे याचा आदर्श अजरामर केला बलिदान दिले त्याग समर्पण केले. “छावा” चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या राजाचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला. ज्या माझ्या राजाला औरंग्याने हाल हाल करून मारले त्या औरंग्याचे उदातीकरण करताना अबू आझमी सारख्या धर्मांध लोकप्रतिनिधीला लाज कशी वाटत नाही? असा प्रश्न लांडगे यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हिंदुत्वाचा पुरस्कार करते. आमचे पंतप्रधान कुंभमेळ्यातील पवित्र स्नान करतात आणि दुसऱ्या बाजूला जगातील आर्थिक महासत्ता बनण्याचा संकल्प ही भारतवासियांच्या मनामध्ये रुजवतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर, व्होट जिहाद सारख्या प्रवृत्तींचा एका बाजूला रिमोट करतात आणि दुसऱ्या बाजूला “3 ट्रिलियन इकॉनॉमी” असे महाराष्ट्रासाठी व्हिजनही ठेवतात. आमचे नेते हिंदुत्ववादी सरकार म्हणून लोकांमध्ये विकासाचे मुद्दे घेऊन जातात. पण, तुमचा जन्म केवळ जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी झालेला आहे, अशी जहरी टीका आमदार लांडगे यांनी केली आहे.अबू आझमी सारख्या धर्मांध लोकांमुळे महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होत आहे. स्वतःच्या भावांची क्रूरपणे हत्या करून राजा बनलेला तुझा औरंग्या आणि स्वतःच्या भावाच्या पादुका ठेवून रामराज्य करणारा भरत राजा यात फरक आहे. धर्मरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत न झुकलेला माझा राजा कुठे? आणि माझा इस्लाम स्वीकारा म्हणून माझ्या राजासमोर भीक मागणारा तुझा औरंग्या कुठे? देशात औरंग्याच्या ज्या काही लाचार अवलादी आहेत. त्याच्यामध्ये एकाने तरी विकासाच्या मुद्द्यावरती भाष्य केल्याचं दिसते का? प्रखर हिंदुत्वाचा विचार व विकासाचा संकल्प आणि स्वप्न घेऊन काम करणारे माझे हिंदुत्ववादी महायुती सरकार या औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या प्रवृत्तींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी मी या निमित्ताने सभागृहासमोर करणार आहे, असा घणाघातही आमदार महेश लांडगे यांनी केला.

पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित चौथी ‘फ्रेंडशिप करंडक’ २०२५ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा !!

रंगारी रॉयल्स्, तुळशीबाग टस्कर्स, सुर्योदय रायझर्स, रमणबाग फायटर्स संघांनी स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला !!

पुणे, ४ मार्चः पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत रंगारी रॉयल्स्, तुळशीबाग टस्कर्स, सुर्योदय रायझर्स आणि रमणबाग फायटर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.

सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पुण्याचे पोलिस उपायुक्त (झोन १ चे) संदीपसिंग गिल आणि पुनित बालन ग्रुपचे संचालक आणि ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे मुख्य आयोजक पुनित बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अण्णा थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे संजीव जावळे, तुळशीबाग गणपती मंडळाचे नितीन पंडीत यांच्यासह पुण्यातील गणपती उत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळांचे अध्यक्ष, मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, ढोल-ताशा पथकातील सदस्य, मीडिया क्षेत्रातील मान्यवर सदस्य व सहभागी संघ आणि संघातील खेळाडू आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन म्हणाले की, पुण्यातील गणेशोत्सवामध्ये किंवा नवरात्रोत्सवामध्ये मंडळामध्ये झोकून देऊन काम करणार्‍या अध्यक्ष, पदाधिकार्‍यांपासून कार्यकर्त्यांना एकमेकांशी निवांत बोलण्यासाठी दोन मिनिटेसुद्धा नसतात. त्यांच्या अथक परिश्रमातून पुण्यातील उत्सव निर्विघ्नपणे पार पडत असतात. अशा या माझ्या मित्रांसाठी या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेव्दारे या सर्व लोकांनी एकत्र येवून मैत्रीचे दोन क्षण अनुभवावे, हा आमचा मुख्य हेतू आहे. स्पर्धेत अधिक संघांना खेळण्याची संधी मिळावी, अशी मागणी गतवर्षी झाली होती. त्यामुळे स्पर्धेच्या चौथ्या वर्षी आम्ही ८ नवीन संघांना स्पर्धेत सहभागी केले आहे. विविध मंडळे आणि ढोल-ताशा पथकांमध्ये महिला आणि मुलींचा सहभाग असतो. त्यामुळे पुढील वर्षी महिलांचीसुद्धा क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यास आम्हाला निश्चितच आनंद होईल, असे पुनित बालन यांनी स्पष्ट केले.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संदीपसिंग गील म्हणाले की, पुनित बालन यांच्या तर्फे आयोजित ही ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसुन एक क्रिकेट महोत्सवच आहे. या महोत्सवामध्ये पुण्यातील विविध गणेश मंडळ, नवरात्र मंडळ तसेच ढोल-ताशा पथक अशा सर्वच क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक एकत्र येत आहेत आणि मैत्रीचे नवे नाते निर्माण करत आहेत. या वेगवेगळ्या मंडळांच्या कार्यकर्ते आणि सभासदांच्यावतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. अशाप्रकारे आपले सामाजिक कर्तव्य पार पाडून नागरिकांचे जीवन समृद्ध करत आहेत. त्यांच्या या कामगिरीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो.

अभिजीत वाडेकर यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर तुळशीबाग टस्कर्स संघाने कसबा सुपरकिंग्ज् संघाचा ७ गडी राखून पराभव करून विजयी सलामी दिली. विशाल मुधोळकर याने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर रंगारी रॉयल्स् संघाने एचएमटी टायगर्स संघाचा ४८ धावांनी सहज पराभव केला. मयुर साखरे याने केलेल्या नाबाद पन्नास धावांच्या खेळीमुळे सुर्योदय रायझर्स संघाने गुरूजी तालिम टायटन्स् संघाचा ८ गडी राखून पराभव केला. सत्यजीत पाले याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रमणबाग फायटर्स संघाने नुमवी स्टॅलियन्स् संघाचा ४५ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.

स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
कसबा सुपरकिंग्ज्ः ८ षटकात २ गडी बाद ६६ धावा (नचिकेत देशपांडे ५१ (२७, ६ चौकार, २ षटकार), भुषण ढेरे १०, उमेश तांबडे १-८) पराभूत वि. तुळशीबाग टस्कर्सः ५.२ षटकात ३ गडी बाद ६७ धावा (अभिजीत वाडेकर २६, अमित सावळे नाबाद १६, नितीन पंडीत नाबाद १२, सचिन पै १-७); सामनावीरः अभिजीत वाडेकर;

रंगारी रॉयल्स्ः ८ षटकात ६ गडी बाद १२६ धावा (विशाल मुधोळकर ५४ (१५, ३ चौकार, ६ षटकार), निलेश एस. ३१, समीर भट २०, अजिंक्य मारटकर २-२६) वि.वि. एचएमटी टायगर्सः ८ षटकात ९ गडी बाद ७८ धावा (अर्थव ए. ३४, रूग्वेद शिंदे २३, विशाल मुधोळकर ४-२०, निलेश एस. ३-१०); सामनावीरः विशाल मुधोळकर;

गुरूजी तालिम टायटन्स्ः ८ षटकात ४ गडी बाद ८६ धावा (भावेश एस. २९, रोहन शेडगे २९, गंगाधर कांगणे २-११) पराभूत वि. सुर्योदय रायझर्सः ५.२ षटकात २ गडी बाद ८७ धावा (मयुर साखरे नाबाद ५० (१३, १ चौकार, ७ षटकार), वैभव अव्हाळे नाबाद २५, सुशील फाले १-२८); सामनावीरः मयुर साखरे;

रमणबाग फायटर्सः ८ षटकात ६ गडी बाद १०० धावा (समीर पंचपोर ३४, प्रज्योत शिरोडकर १७, सत्यजीत पाले १६, प्रणव लोखंडे २-९) वि.वि. नुमवी स्टॅलियन्स्ः ५.४ षटकात १० गडी बाद ५५ धावा (सोमा खांडेकर २३, ओम भिसे १८, सत्यजीत पाले ५-१७, प्रज्योत शिरोडकर १-३); सामनावीरः सत्यजीत पाले;

.

0

कलांमधून उलगडणार ‌‘ती‌’आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शनिवार, रविवारी आयोजन

पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ऋत्विक सेंटरतर्फे विविध क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार आणि त्यांच्या कलेतील ‌‘ती‌’ या अनोख्या संकल्पनेवर परिसंवाद, कविता रसग्रहण, तबला वादन, नाट्य आणि चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ऋत्विक सेंटर आयोजित दोन दिवसीय विशेष कार्यक्रम शनिवार, दि. 8 आणि रविवार, दि. 9 मार्च रोजी सायंकाळी 4 ते 8 या वेळात ऋत्विक सेंटर, वेद भवनजवळ, कोथरूड, पुणे येथे होणार आहे. चित्रकाराला दिसलेली ‌‘ती‌’ या संकल्पनेवर आधारित प्रख्यात चित्रकार प्रसाद भारद्वाज यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन दोनही दिवस सकाळी 11 ते सायंकाळी 8 या वेळात खुले असणार आहे.
शनिवार, दि. 8 मार्च रोजी ‌‘कविला उमगलेली ती‌’ या संकल्पनेवर आधारित वैभव जोशी यांचे ‌‘ती‌’च्या वरील कवितांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन अभिनेत्री समिरा गुजर-जोशी करणार आहेत.
दिग्गज कलाकारांनी विविध कलाप्रकारातून केलेला स्त्रीचा गौरव या अंतर्गत विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दिग्दर्शक सुनील सुकथनकर, चित्रकार राजू सुतार आणि नर्तक डॉ. परिमल फडके यांना पॉडकास्टर सौमित्र पोटे ‌‘विविध कला प्रकारातून ती‌’ या विषयी बोलते करणार आहेत.
रविवार, दि. 9 मार्च रोजी ‌‘चित्रकथीमधील ती‌’ या अंतर्गत कोंकणी लोककलेवरून प्रेरित ‌‘मिथ ऑफ मँडिगोज‌’ हे नाट्य सादर होणार आहे. याचे लेखन, दिग्दर्शन शंतनु सायली यांचे आहे. सुप्रसिद्ध तबला वादक सावनी तळवलकर यांचे एकल तबलावादन होणार असून त्यांना स्वानंद राजोपाध्ये संवादिनी साथ करणार आहेत.
कार्यक्रमाची संकल्पना सुप्रसिद्ध चित्रकार प्रसाद भारद्वाज यांची असून दोन दिवसीय कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती ऋत्विक सेंटरच्या समन्वयक श्रुती पोरवाल यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी माहिती लपवली, राज्य सरकारलाही सहआरोपी करा

पाशवी बहुमताच्या आधारे सरकार सभागृह चालू देत नाही

मुंबई, दि. ४ मार्च २०२५
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रुरपद्धतीने केली, याची गृहखात्याकडे माहिती नव्हती का? असा संपप्त सवाल करत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवली आणि आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता थेट प्रसार माध्यमांना दिली, हा सभागृहाचा अपमान आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर उद्या हक्कभंग आणू, असा इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे.

विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकाल सोडून अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर जाऊन रात्री चर्चा केली व त्यातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला. सरकारला या प्रकरणाची सर्व माहिती होती पण त्यांनी ती लपवली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोटी माहिती देऊन सभागृह व जनतेची दिशाभूल केली. सरपंच हत्येमध्ये वाल्मिक कराड व त्याचे सहकारी आरोपी आहेत पण सरकारने या प्रकरणातील माहिती लपवल्याने त्यांनाही सरआरोपी केले पाहिजे, अशी मागणी उद्या सभागृहात करु असे नाना पटोले म्हणाले.

औरंगजेबाच्या मुद्द्यावर बोलताना पटोले म्हणाले की, सभागृह चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे पण तेच बहुमताच्या जोरावर गोंधळ घालून सभागृह बंद पाडत आहेत, ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रशांत कोरटकरने अपशब्द वापरून महाराजांचा अपमान केला त्याच्यावर सरकार कडून काहीच बोलले जात नाही. महाराजांचा अपमान करणारे काही जण मंत्रिम़ंडळातही आहेत. जर कोणी महापुरुषांचा अपमान करत असेल तर त्याचे समर्थन कसे करता, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.

मी कोणत्याही महापुरुषाबाबत अपशब्द बोललो नाही:कोणी दुखावले असेल तर माझे विधान मागे घेतो, औरंगजेबाच्या विधानावरून अबू आझमींचा यू-टर्न

मुंबई-समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दले केलेले विधान मागे घेतले आहे. माझ्या शब्दांचा विपर्यास केल्याचे ते म्हणाले. मी बोलताना कोणत्याही महापुरुषांबाबत अपमानजनक वक्तव्य केले नसल्याचेही आझमी यांनी स्पष्ट केले. या मुद्द्याला राजकीय मुद्दा बनवले जात असल्याचा आरोपी अबू आझमी यांनी यावेळी केला. अबू आझमी यांनी त्यांचे विधान मागे घेतल्यानंतर हा वाद संपणार का? हे पाहावे लागणार आहे.अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. एकनाथ शिंदे यांनी तर अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आज विधानसभेतही अबू आझमींच्या वक्तव्यामुळे गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे सभागृहाचे आजचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. या सर्व घटनांनंतर अबू आझमी यांनी आपल्या औरंगजेब बद्दलच्या विधानावर स्पष्टीकरण दिले.

आझमी म्हणाले की, जेव्हा मी विधानसभेतून बाहेर आलो आणि पत्रकारांशी बोललो, तेव्हा पत्रकारांनी मला आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींची औरंगजेबाशी केलेली तुलना यावर प्रतिक्रिया देण्यास सांगितले, ज्यावर त्यांनी इतिहासकारांनी जे म्हटले आहे तेच पुन्हा सांगितले. जेव्हा इतिहासकारांवर बंदी नाही, तर त्यांच्या विधानावर इतका गोंधळ का होत आहे? असा प्रश्नही अबू आझमी यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे स्पष्ट केले की ते कधीही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा डॉ. आंबेडकर यांचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाहीत. ते म्हणाले की, अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधाने केली, परंतु त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला आहे. औरंगजेब रहमतुल्लाह अलेह बद्दल, जे इतिहासकार आणि लेखकांनी म्हटले, तेच मी म्हटले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल कोणतेही अपमानजनक भाष्य केलेले नाही. परंतु तरीही माझ्या विधानामुळे कोणी दुखावले असेल तर मी माझे शब्द, माझे विधान मागे घेतो, असे अबू आझमी म्हणाले.या मुद्द्याला राजकीय मुद्दा बनवले जात आहे आणि यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद करणे म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचे नुकसान करणे आहे, असे मला वाटते, असेही अबू आझमी म्हणाले.
औरंगजेबाबत बोलताना काय म्हणाले होते आझमी?
मोगल बादशहा औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्यात व छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती. उलट त्याच्याच काळात भारताला सोन्याची खाण म्हणून संबोधले जात होते, असा वादग्रस्त दावा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केला आहे. औरंगजेबाची कबर खोदण्याबद्दल बोलणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत. सद्यःस्थितीत महाराष्ट्रासह देशात मुस्लिमांवर अत्याचार वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.

औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा ही अफगाणिस्तानपर्यंत होती. जीडीपी 24 टक्के एवढा होता. भारताला त्यावेळी ‘सोने की चिड़िया’, असे म्हटले जात होते. असे असताना चुकीचे म्हणू का? छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर औरंगजेबची लढाई झाली, ती राज्य कारभाराची होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कधीच धर्माची लढाई झाली नाही. मी धर्माची लढाई मानत नाही.

अबू आझमी या देशद्रोह्याला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही-एकनाथ शिंदेंची विधानसभेत मागणी

मुंबई-अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात देशाचा जीडीपी 24 टक्के होता. भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमारपर्यंत होती, असे म्हणत औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची नाही, तर सत्तेसाठी होती, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळाले. औरंगजेबाचे गोडवे गायल्याबद्दल सपाचे आमदार अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, औरंगजेबाचे गुणगान गाणाऱ्यांना सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, असेही शिंदे म्हणाले.

अबू आझमी यांच्या औरंगजेबावरील वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अबू आझमींना निलंबित करावे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आली होती. या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे आजचे दिवसभराचे कामकाम स्थगित केले.काल, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजेच औरंग्याचे गोडवे, याठिकाणी अबू आझमीने गायले. खरे म्हणजे अबू आझमीचा निषेध करायला हवा. अबू आझमीचा धिक्कार करतो. अबू आझमीचा धक्कार करत असताना, अबू आझमीने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय चुकीचे वक्तव्य केले होते. अबू आझमी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जाणीवपूर्वक अपमान करतो, असा आरोपी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना केला.छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केले, आपल्या प्राणाचे बलिदान केले मात्र धर्म बदलला नाही. अशा संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणे, म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे. म्हणून या देशद्रोह्याला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आपण ‘छावा’ बघा, रईस… छावा सिनेमा बघा, असे आवाहनही त्यांनी केले.

छत्रपती संभाजी महाराजांवर 40 दिवस अनन्वित अत्याचार केले. त्यांचे डोळे काढले, त्यांची नखे काढली, त्यांची जीभ कापली, अंगावरची कातडी सोलून त्यावर मीठ टाकले, एवढा अपमान केला, चाळीस दिवस हा अत्याचार सुरू होता. धर्म बदला म्हणून सांगितले. अशा औरंग्याचे गोडवे गाणे म्हणजे आपल्या राष्ट्र पुरुषांचा अपमान आहे. आपल्या देशभक्तीचा अपमान आहे, असा घणाघात करत एकनाथ शिंदे यांनी

देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था।
महा पराक्रमी परम प्रतापी, एकही शंबू राजा था।।

हा शेर सभागृहात म्हटला.

शंभू राजाने 9 वर्षांत 69 लढाया जिंकल्या. अरे लाज वाटायला हवी. या औरंगजेबाने आपली मंदिरे तोडून टाकली. आया-बहिणींवर अत्याचार केला. आया-बहिणींवर बलात्कार झाले. या औरंग्याने बापाला कैद केले, मुलांना मारून टाकले. 27 लोकांना मारले. असे सांगत, अबू आझमी निलंबित झाला पाहीजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली.

सरकारकडे देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ-फोटो असताना मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न केला:फडणवीस, अजित पवारांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही- हर्षवर्धन सपकाळ

मुंबई दि. ४ फेब्रुवारी २०२५
स्व. संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेक-यांनी जी क्रूरता केली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचे फोटो पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय रहात नाही. काल या घटनेची छायाचित्रे पाहिल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करत आहे. पोलीस आणि सरकारकडे ही छायाचित्रे आणि व्हिडीओ असूनही सरकार धनंजय मुंडे यांना वाचवत होते. सरकारच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यांनी तात्काळ राजीनाम द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, फक्त धनंजय मुंडेच्या राजीनामा घेतला म्हणून सरकार आपली पाठ थोपटून घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ का केले नाही हा खरा प्रश्न आहे. या अमानवी कृत्यांचे सगळे फोटो, व्हिडीओ, पुरावे सुरुवातीपासून पोलिसांकडे होते म्हणजेच गृहमंत्री व सरकारकडे होते. या सैतानांच्या टोळीची अमानवी कृत्यांची संपूर्ण माहिती असूनही दोन महिने सरकार धनजंय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, हे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे या टोळीला सरकारचा पाठिंबा होता आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबायचे होते हे स्पष्ट होते.

देशमुख कुटुंबियांच्या लढ्याला जनता आणि माध्यमांनी दिलेली साथ यामुळे या प्रकरणातील सत्य उजेडात आले. अन्यथा हे प्रकरण दडपण्यात सरकार यशस्वी झाले असते. आता आपली कातडी वाचविण्यासाठी मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका होती अशा बातम्या पसरवून अंग झटकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून सुरु आहे. हा त्यांचा कातडी बचाव प्रयोग यशस्वी होणार नाही, त्यांचे सत्य जनतेसमोर आले आहे, त्यामुळे त्यांनी पायऊतार व्हावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्रिपदावरुन उचलून फेका,त्याचेवर खुनाचा गुन्हा दाखल करा,टोळी राज्यातून संपवावी लागेल- जरांगे – मनोज जरांगे

मुंबई-संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे काही फोटो सोमवारी समोर आले. यानंतर आज मनोज जरागे पाटील यांनी मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख मनोज जरांगे यांच्यासमोर ढसाढसा रडले.धनंजय देशमुख म्हणाले की, माझ्या भावाला किती वेदना झाल्या असतील. मला आता वेदना सहत नाहीत, मला आई समोर बसल्याने, मुलं सोबत असल्याने मला रडताही येत नाही. मला भावाला वाचवता आले नाही, अशी खंत त्यांनी यावेळी मनोज जरांगे यांच्याकडे व्यक्त केली.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्रिपदावरुन उचलून फेका असे जरांगे यांनी म्हटले आहे. ही टोळी राज्यातून संपवावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडेंवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करा. तसेच, हत्या प्रकरणाचा बदला घेतला जाणार, अशा शब्दांत जरांगेंकडून धनंजय देशमुखांचे सांत्वन करण्यात आले.

मनोज जरांगे म्हणाले की, संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे ही जबाबदारी आपली आहे. आपल्या हातात तेवढी एकच गोष्ट आहे की, येऊ द्या त्यांना सुटून जसे यायचे तसे येऊद्या संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला घेणंच आपल्या हातात आहे. हे खूप भयंकर कृत्य आहे. इतका राग का? चूक काही मोठी नव्हती. देशात कुठेच अशी हत्या झाली नाही. इतका रोष व्यक्त करण्याइतकं काहीच झाले नव्हते.

मनोज जरांगे म्हणाले की, या सर्व गोष्टीला धनंजय मुंडे जबाबदार आहे. त्याला यांचा पैसा गोड लागला. मग या लोकांनी जमीनी बळकावल्या लोकांना मारहाण केली. त्यांने मंत्रिपदाचा वापर यांच्यासाठी केले आहे. इतके तिरस्कारने भरलेले सरकार मी बघीतले नाही. पुरावे नाही म्हणता तुम्हाला लाज वाटेल. धनंजय मुंडे 302 मध्ये आरोपी झाला पाहिजे. तरच हे सरकार खानदानी सरकार आहे. यांना पैसा, पदे मिळवण्यासाठी हे कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. ही विकृती पहिल्यापासून अशीच आहे. मी खूप कठोर काळजाचा आहे, पण कालचे फोटो पाहिल्यानंतर कुणीही खचून जाईल. धनंजय देशमुख यांना घरात जावे लागेल, बाहेर यावे लागेल. याचा बिमोड आपल्याला करायचा आहे, तुम्हाला लढावे लागेल. हे आपल्या लेकरांवर हसले आता त्यांना बाहेर सुटून येऊ द्या मग जनतेला न्याय करावा लागेल.

मनोज जरांगे म्हणाले की, काल फोटो पाहिल्यानंतर मला रात्रभर झोप लागली नाही. मी तफफड करत होता. माझा संतोष देशमुख हसला पाहिजे, की माझ्या माघारी माझ्या मराठा पोरांनी बदला घेतला. आता बदला होणार.सर्व टोळीचा बिमोड करत बदला घेणार आहोत.

अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा: मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला राजीनामा

मुंबई-बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ओएसडीसह पीएच्या हाती मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे.देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर केल्याचे समजत आहे.

राजीनामा सोडा, धनंजय मुंडेंना बडतर्फ न केल्यास अधिवेशन बंद पाडणार

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ नका:त्यांना बडतर्फ करा, अंजली दमानियांची मागणी; बडतर्फ न केल्यास अधिवेशन बंद पाडण्याचा इशारा
मुंबई–काल ते धनंजय मुंडे म्हणत आहेत माझ्याविरुद्ध जे जे बोलले त्यांना मी धडा शिकवीन, मी त्यांना ओपन चॅलेंज देते मला जो धडा शिकवायचा आहे तो शिकवा तुम्हाला जे करायचे आहे ते करा असेल हिम्मत तर बघू आपण. मी लढाईची ताकद ठेवते असे आव्हान अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे. त्या आज माध्यमांशी बोलत होत्या. धनंजय मुंडेंना बडतर्फ केले नाही तर आम्ही अधिवेशन बंद पाडू असा इशारा देखील अंजली दमानिया यांनी दिला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरले आहे. सुरुवातीपासून त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे हृदयद्रावक फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंवर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना अश्रू अनावर झाले होते. धनंजय मुंडेंना बडतर्फ केले पाहिजे, असे लोक सत्तेत कशासाठी हवेत, असा जाबही त्यांनी सरकारला विचारला.अंजली दमानिया म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचा केवळ राजीनामाच घेऊ नये, तर त्यांना बडतर्फही केले पाहिजे. मुंडेंच्या माणसाने 10 वर्षं संघटित गुन्हेगारी केली, तरीही सरकार असे असंवेदनशील का वागत आहे? असा सवालही दमानिया यांनी केला. वाल्मीक कराडला का अशी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते आहे. त्या थर्डक्लास कराडला कोठडीतही व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते? असाही सवाल त्यांनी केला. मी धनंजय मुंडेंविरोधात आतापर्यंत कितीतरी पुरावे दिले आहेत. परंतु, पुरावे दिले की, आरोप सिद्ध होऊ देत असे बोलतात. हे नेमके काय चालले आहे?

अजित पवारांनी लोकप्रतिनिधी म्हणून वागावे. आरोपपत्र दाखल होईपर्यंत मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्या देवेंद्र फडणवीसांना या फोटोबाबत, व्हिडिओबाबत माहिती नव्हते का? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. जर आज यांचा आता राजीनामा नाही आला, बडतर्फ केले गेले नाही.. तर संपूर्ण महाराष्ट्रात जे जे लढले आणि जे सामान्य लोक लढले त्या सगळ्यांना मी हात जोडून निवेदन करते की उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोहोचायचे आणि यांचा अधिवेशन बंद पाडायचा, असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील आठवडा भरापासून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा यावर खलबंत सुरू होती, मात्र मुख्यमंत्र्यांकडून दोन वेळा क्लीनचीट देण्यात आल्यामुळे राजीनामा घेण्यास उशीर झाला असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश

मुंबई-बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करतील, अशी शक्यता आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. या प्रकरणात त्यांचे नाव आल्यापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, असे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांचा पक्ष घेईल, अशी भूमिका घेतली होती. मात्र, सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या करतानचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण संतप्त झाले आहे.दरम्यान काल माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले दोन दिवसांनंतर आम्ही ठरवू. धनंजय मुंडे यांच्यावर पक्षातून दबाव आहे, मात्र त्यांची राजीनामा देण्याची इच्छा नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये लोकांचे आणि स्वतःच्या पक्षातील आमदार, खासदारांचे किती प्रेशर येते? ही गोष्ट थांबवता येऊ शकते का? ते पाहून त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणार आहे, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.

पुढे करुणा शर्मा म्हणाल्या, मला मंत्रालयातून माहिती मिळाली आहे. माझे काही लोक आहेत, त्यांच्याकडून मला माहिती मिळाली आहे. सर्वांना माहिती आहे, धनंजय मुंडे छोटा मोठा आमदार किंवा मंत्री नाहीत. जो अजितदादा गट आहे, तो अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे. त्यामुळे स्वतःच्या पक्षात स्वतःची चालणार. पक्ष त्यांचा आहे मी एवढ्या वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे, मला सर्व काही माहिती आहे. म्हणूनच मी हे सांगत आहे, असे करुणा शर्मा म्हणाल्या.