Home Blog Page 426

औरंगजेबाच्या कबरीला काँग्रेसच्या काळात संरक्षण: – मुख्यमंत्री फडणवीस

औरंगजेबाच्या कबरीवर 13 वर्षात 6.5 लाखांचा खर्च-औरंगजेबाचा मृत्यू 3 मार्च 1707 साली नगरच्या भिंगार किल्ल्यात झाला. आपल्याला आपल्या गुरुच्या कबरीजवळ दफन करावे, अशी औरंगजेबाची इच्छा होती. त्यानुसार त्याचा मुलगा आझम शाह याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये त्याची कबर बांधली. दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीवर 13 वर्षात 6.5 लाखांचा खर्च झाला, तर शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी मात्र काही हजारांचा खर्च झाला, अशी माहिती हिंदू जनजागृती संघटनेचे सुनील घनवट यांनी दिली. तसेच त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे अनुदान रद्द करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

मुंबई-औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे. मागील काही दिवसांपासून औरंगजेबाची ही कबर हटवण्यात यावी अशी मागणी होत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. औरंगजेबाच्या कबरीला काँग्रेसच्या काळात एएसआयचे संरक्षण मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. तसेच प्रत्येकाला असच वाटते की कबर हटवली पाहिजे. मात्र काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात, असेही ते म्हणाले.विकी कौशलच्या छावा चित्रपटाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. छावा चित्रपटात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ कशाप्रकारे केला याबाबत दाखवले आहे. त्यातच सपाचे आमदार अबू आझमींनी औरंगजेबावर स्तुती सुमने उधळत त्याचे कौतुक केले होते. यानंतर खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. त्यांनी औरंगजेबाची कबर ठेवण्याची काय गरज असा सवाल उपस्थित करत औरंगजेबाची कबर उखडून टाका, अशी मागणी केली होती. अनेक दिवसांपासून होत असलेल्या या मागणीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त मोठे विधान केले.

औरंगजेबाच्या कबरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ही कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली. काँग्रेसच्या काळात ही कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या (ASI) संरक्षणाखाली आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या गंभीर आरोपावर आता काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण आहे. आता कबरीला देण्यात आलेले हे विशेष संरक्षण कायद्याचे पालन करून हटवणे अथवा बदलवणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणात घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे आमदार नितेश राणे यांनी ही कबर किती दिवस राहिल हे पाहा असे संकेत दिले आहेत.

महिला दिनाच्या निमित्ताने सह्याद्रि हॉस्पिटल तर्फे वॉकथॉन

0

पुणे-आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, सह्याद्रि सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखानाने एक वॉकाथॉन आयोजित केला होता. अभिनव जोशी, एव्हीपी – ऑपरेशन्स, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना यांच्या संकल्पनेतून साकारलेला
हा कार्यक्रम कार्य-जीवन संतुलन, पोषणतत्त्वांची काळजी, महिलांची सुरक्षा आणि लिंग समानता यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला होता. त्यांनी वॉकाथॉनमध्ये सह्याद्रि हॉस्पिटल, डेक्कन येथील अनेक उत्साही महिलांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. हॉस्पिटल मधील महिला कर्मचारी जांभळ्या रंगाच्या आरामदायक क्रीडावस्त्रांमध्ये यात सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रम सह्याद्रि हॉस्पिटल, डेक्कन येथून सुरू झाला आणि छत्रपती संभाजी महाराज गार्डन, जे.एम. रोड येथे संपन्न झाला, जिथे तज्ञ आहारतज्ञ मालविका करकरे यांनी सर्व सहभागींना आरोग्यदायक आहाराचे महत्त्व विषद केले. प्रमुख नर्सिंग सुपरिटेंडंट शशिकला कामठे यांनी कार्यस्थळी महिलांची सुरक्षा याबद्दल जनजागृती केली आणि एचआर सीनियर मॅनेजर ॲड. शीतल मोरे यांनी कार्य-जीवन संतुलन आणि लिंग समानतेबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाने बागेमधील अनेक लोकांचे लक्ष वेधले, जिथे त्यांनी एकमेकींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या, फोटो काढले आणि सहभागींसोबत त्यांचे विचार देखील व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप नाश्त्याने झाला.

सध्याचा काळ हा जगासाठी कठीण काळ,गांधी पुन्हा जन्म घेतील-ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे प्रतिपादन

पुणे : अमेरिकेत डोनॉल्ड ट्रम्प, चीनमध्ये क्षी जिनपिंग, रशियात व्लादिमीर पुतीन हे सत्तेवर आहेत, तर जर्मनीत हिटलरचा पक्ष सत्तारूढ होत आहे. असे लोक जेव्हा सत्तेत येतात, तेव्हा अशाच कालखंडात गांधी जन्माला येतात आणि काम करतात. सध्याचा काळ हा जगासाठी कठीण काळ असून गांधी जन्माला येण्यासाठी दुसरा सुवर्णकाळ कोणता नाही. गांधी गेले नाहीत. ते पुन्हा पुन्हा जन्म घेत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी शनिवारी केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनातील
दुसऱ्या दिवसाच्या पाचव्या सत्रात ‘पुन्हा पुन्हा गांधी !’ या विषयावर
आवटे बोलत होते. लेखक चंद्रकांत झटाले, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे
प्रसाद गावडे व्यासपीठावर उपस्थित होते.
आवटे म्हणाले, ‘भारत हा देश नसून भौगोलिक अभिव्यक्ती आहे. युरोपातील दोन
देशांमध्ये जेवढे साम्य आहे, तेवढे साम्य देखील भारताच्या पंजाब आणि
बंगाल या दोन प्रांतांमध्ये नाही, असे इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान
विस्टन चर्चिल यांनी १९४० मध्ये भाषण करताना सांगितले होते. पण गांधी
नावाच्या माणसाने त्यानंतरच्या काळात भारत नावाचा देश एकसूत्रात बांधला.
याचे सर्व श्रेय महात्मा गांधींकडे जाते. नई तालीम म्हणून शिक्षण पद्धती,
आरोग्य, शेतीचे प्रयोग, राजकीय विचारवंत गांधी अशा विविध क्षेत्रात
त्यांनी काम केले. त्यामुळे आपल्याला गांधींशिवाय पर्याय नाही. गांधी सर्वदूर
पोहोचत आहेत. नव्या पिढीला कळले आहे की गांधी ही समस्या नसून समाधान आहे.
जेव्हा सर्व वाटा बंद होतात तेव्हा गांधीमार्गच वाट दाखवितो. गांधी आजही
सामान्य माणसाला समर्पक वाटतात, हे समजून घेतले पाहिजे. १९१५ साली गांधी
आफ्रिकेतून भारतात आले आणि अवघ्या पाच वर्षात गांधी हे राष्ट्रीय नेते
झाले. मी सनातनी हिंदू आहे असे गांधी सांगत पण धर्माच्या चौकटीला त्यांनी
धक्का दिला, हे त्यांचे वेगळेपण आहे. गांधींच्या भजनात राम होता, तो आपण
सोडला म्हणून तो चुकीच्या रथावर आरूढ झाला. गांधींच्या गोठ्यात गाय होती,
ती आपण सोडली म्हणून ती हिंसक झाली.’

गावडे म्हणाले, ‘माझे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग या भागात गाव
आहे. हा पर्यावरणशी निगडीत संवेदनशील भाग आहे. या ठिकाणी वाघाचा अधिवास
असलेला अख्खा डोंगर खाणकामातून अवघ्या आठ वर्षात नामशेष झाला. तेव्हा
कोकण वाचविण्यासाठी काहीतरी करायचे ठरविले आणि गांधी यांच्या
ग्रामस्वराज्य या चळवळीशी मी जोडला गेलो. गावातील लोकांना हिंदुत्ववादाची
गरज नाही, ते जे जीवन जगत आहेत तीच त्यांची संस्कृती आहे. कोकणात पर्यटन,
विकास प्रकल्प यामुळे चंगळवाद बोकाळला आहे. पर्यावरणीय बुद्धिमत्ता हे
तत्वही गांधींकडून शिकलो. गेल्या दहा वर्षातील विकासाचे प्रारूप हे
पर्यावरणाला घातक आहे. कोकणात रिफायनरी होत आहे, ती पर्यावरणासाठी
विनाशकारी आहे. या ठिकाणचे लोक, मच्छिमार रिफायनरीला विरोध करत आहेत. पण
हा लढा संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताचा आहे. कारण भारतासाठी सह्याद्री हा
महत्त्वाचा असल्याने तो तसाच राखला पाहिजे. याकरिता गांधी मार्गाने लढा
देणे आवश्यक आहे. मोठे रस्ते, औद्योगिक वाढ यातून गावचे गावपण हरवत चालले
असून ते धार्मिकरित्या नव्हे, तर नैसर्गिकरित्या जपले पाहिजे. गावाचे
गावपण जपणे हाच गांधीवाद आहे.’

कोणताही काळ येवो गांधींशिवाय पर्याय नाही. शेतकरी आंदोलन गांधी मार्गाने
केले म्हणून केंद्राला शेतकरी कायदे मागे घ्यावे लागले, असे सांगून झटाले
म्हणाले, ‘भगतसिंग यांची फाशी रद्द व्हावी, याकरिता गांधींनी सहा पत्रे
लिहली, हे लॉर्ड आयर्विनने हे लिहून ठेवले आहे. भगतसिंग यांची फाशी रद्द
होण्यासाठी गांधींनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते, हे भगतसिंग यांच्या
वडिलांना देखील माहीत होते, त्यामुळेच ते भगतसिंग निवर्तल्यानंतर
काँग्रेसच्या अधिवेशनाला गेले होते. त्यामुळे गांधीवाद्यांनी आता
आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर येऊन वकिलाच्या भूमिकेत आले पाहिजे. रा.
स्व. संघ, हेडगेवार यांनी भगतसिंग यांची फाशी रोखण्यासाठी काय केले? असा
प्रश्न विचारला पाहिजे. गांधी हे १९१५ साली भारतात आले आणि १९२० साली
ते राष्ट्रीय नेते झाले. त्यानंतर १९४७ साली देश स्वतंत्र झाला. अवघ्या
२७ वर्षात गांधींमुळे देश स्वतंत्र झाला. मग गांधी यांच्यामुळे उशिरा देश
स्वतंत्र झाला हा आरोप खरा की खोटा? जीवनात सहा वेळा जीवघेणे हल्ले झाले,
पण कधी सुरक्षा घेतली नाही. गांधी हे बीज आहे, त्यामुळे ते पुनः पुन्हा
उगवत राहणार’.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुण्यात बौद्ध अनुयायांचा विराट मोर्चा

पुणे :  बुद्धम् शरणम् गच्छामि ॥ धम्मम् शरणम् गच्छामि॥ संघम् शरणम् गच्छामि .. च्या स्वरात शांततेचा संदेश देत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुण्यात बौद्ध अनुयायांचा विराट मोर्चा काढण्यात आला. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती, पुणेच्या वतीने आयोजित या महामोर्चात लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते.

बिहार मधील बूद्धगया येथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे हजारो वर्षापासूनचे विहार आहे. मात्र त्याचा ताबा बौद्धेतर विशेषता ब्राम्हणी धर्मपंडितांकडे आहे.  या गोष्टीचा जगभरातून निषेध होत असून  महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखी खाली कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. सध्या बुद्धगया येथे जगातील बौद्ध भिख्खूंचे प्रतिनिधी आंदोलन करत आहेत. याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बालगंधर्व ते अलका चौक दरम्यान बौद्ध समाजाचा महामोर्चा काढण्यात आला.

भदंत नागघोष महाथेरो, भंते राजरत्न, भंते बुद्धघोष थेरो, भंते धम्मधर थेरो.भंते पय्यारक्खित.भंते धम्मानंद, भंते यश, भंते प्रियदर्शी भंते सुमंगल, भंते राहुल आदी बौद्ध भिख्खूंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या महामोर्चातलाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते. बालगंधर्व चौकात बुद्ध वंदना करून मोर्चाची  सुरूवात झाली. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीसह शांतता संदेश देत हा मुक महामोर्चा मार्गस्थ झाला. भंते च्या हस्ते डेक्कन येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अलका चौकात सभा घेवून मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती कार्यालय, पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी निवेदन स्वीकारले.

मोर्चाला संबोधीत करताना भंते राजरत्न म्हणाले, इ. स. पूर्व 563 पासून तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी सम्राट अशोकाने त्यांच्या काळात ऐतिहासिक बौद्ध विहाराची निर्मिती केली आहे. मात्र आज त्या विस्तीर्ण बौद्ध विहाराच्या परिसरात अतिक्रमण करण्यात आले असून इतर देवी देवतांच्या नावाने तेथील विहार रूपांतरीत करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी महाविहार आहे त्याच्या उजव्या बाजूस बौद्ध मूर्तीं सापडून देखील तिथे  इतर देवी देवतांची मंदिर उभारली जात आहेत. तथागत भगवान गौतम बुद्धांची जन्मभूमी म्हणून आज जागतिक स्थरावर भारताकडे आदराने पाहिले जात. अन् आज त्याच देशात महाबोधी महाविहार मुक्तीसाथी जगभरात आनंदोलन केली जात आहेत. लोकं रस्त्यावर उतरली आहेत. ही भारतसरकारसाठी निंदनीय बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी देखील भंते राजरत्न यांनी केली.

भंते नागघोष म्हणाले, जगात बौद्ध धम्म बुद्धगया येथून प्रसारित झाला आहे, भारत देशाची ओळख जगात बुद्धभूमी अशी आहे. आपले पंतप्रधान, राष्ट्रपती  अन्य देशांच्या प्रमुखांना बुद्ध मूर्ती देतात. सम्राट अशोकाणे बांधलेले बुद्ध विहार  आपल्या ताब्यात नाही. बुद्धिस्ट टेंपल मॅनेजमेंट कामिटी मध्ये ९ पैकी ५ लोक हिंदू आहेत यामुळे तिथे हिंदूचे बहुमत आहे, त्या जोरावर तिथे कर्मकांड केले जाते. बुद्ध चरणी आलेल्या अनुयायांना मात्र कोणत्याही सुविधा मिळू शकत नाहीत, यामुळे जो पर्यंत १९४९ चा कायदा रद्द होणार नाही तो  पर्यंत महाविहार मुक्त होणार नाही. बिहार पोलिस आणि शासन तिथे बसलेल्या उपोषण करत असलेल्या भंते आणि बौद्ध अनुयायांवर दडपशाही करत आहे. श्रीलंकेतून आलेले भंते अनागारिक यांनी १८९१ साली सुरू केलेला महायबिधी महाविहार मुक्तीचा लढा १३५ वर्षे सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

धम्म पालन गाथेने या विराट मोर्चाची सांगता झाली.

स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पुण्यात संपन्न

रेडबेल मीडिया प्रस्तुत नवीन सिनेमाची घोषणा

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीत एका नवीन आणि बहुचर्चित स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मोठ्या दिमाखात पुण्यातील कॅम्प भागातील विला मारिया बंगल्यात पार पडला. रेडबेल मीडिया निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित स्वप्नसुंदरी या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली.चित्रपटाचे निर्माता सतीश महादेव गेजगे असून, या चित्रपटात काही नामांकित कलाकार झळकणार आहेत. भूषण प्रधान, सायली पाटील, अशोक शिंदे आणि शिल्पा नवलकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.मुहूर्त सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती होती. चित्रपटाच्या कथानकाबाबत अधिक माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली असली, तरी हा एक दमदार आणि उत्कंठावर्धक स्वप्नसुंदरी चित्रपट ठरणार असल्याची निर्मात्यांनी ग्वाही दिली आहे. स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त महिलादनिानिमित्त 8 मार्च 2025 रोजी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. प्रेक्षकांना एक वेगळी कथा अनुभवायला मिळणार आहे.

देशासाठी लढून मरायचे की घरात बसून सडून मरायचे, हे ठरवा: बी. जी. कोळसे पाटील.

मस्साजोग ते नेकनूर पहिल्या दिवशी २३ किमीची पदयात्रा, मुक्काम नेकनूर, नंतर पदयात्रा बीडकडे मार्गक्रमण

नेकनूर, बीड, दि. ८ मार्च २०२५
आंतरराष्ट्रीय महिला दिन हा मातृशक्तीला अभिवादन करण्याचा दिवस असल्याने त्याचे औचित्य साधत ही सद्भावना पदयात्रा ही महिलादिनी सुरु केली. समतेचा व स्त्री पुरुष समानता हा विचार संघाला मान्य नाही. आजपर्यंत संघ प्रमुख महिला झालेली नाही, महिलांना एक वस्तू माननारी ही प्रवृत्ती आहे. राज्यात आज याच विचाराच्या पिल्लावळींनी आका, खोक्या हा खेळ मांडला आहे, त्याविरोधी आपण रस्त्यावर उतरलो आहोत, आपण संविधानाचा विचार पुढे घेऊन जाऊ, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

मस्साजोग येथून सकाळी सुरु झालेली सद्भावना पदयात्रा २३ किमीचा प्रवास करून नेकनूर येथे पहिल्या दिवसाचा समारोप झाला. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्त्रीभृणहत्या करण्यात येते हे चिंताजनक आहे. स्त्री पुरुष प्रमाणात बीड जिल्हा मागे आहे. आजच्या महिला दिनी स्त्री पुरुष समानतेचा संदेश घेऊन पुढे जावे लागणार आहे. मनुवादी विचार सरणीमुळे स्त्री भृण हत्यांचे प्रकार वाढले आहेत. मनुवादी विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही. तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम केले, त्यांची गाथा पाण्यात बिडवली. संत ज्ञानेश्वरांनी गीता सोप्या भाषेत लिहिली, त्यांना त्रास दिला. बहुजन समाजाच्या प्रगतीत या विचाराने विरोध केला. सावित्रिबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्या त्याला विरोध करत फुले दांम्पत्यांना शेणाचे गोळे व दगड मारणारा विचार हाच होता.

शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकडोजी महाराज यांचा विचार हा आयडिया ऑफ इंडिया आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भाजपाच्या राज्यात मोकाट आहेत, त्यांना सरकार संरक्षण देते, पुरस्कार देऊन गौरव करत आहे. समाजासमाजात भांडणे लावणे हा भाजपाचा विचार आहे. पण आपल्याला पुरोगामी विचाराने पुढे जावे लागणार आहे. समाजातील विषमता दुर करण्यासाठी सद्भावना यात्रा काढण्यात आली आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

यावेळी बोलताना माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील म्हणाले की, सरकारविरोधात बोलले की ईडी, सीबीआय, आयकर मागे लावले जातात, मतदार याद्या बदतात, यामुळे आता घराघरात पोहचावे लागेल. महाराष्ट्र काँग्रेसला आज बुद्ध व गांधींच्या मार्गाने चालणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांचे नेतृत्व लाभले आहे. तर देशाला राहुल गांधी यांच्यारुपाने एक दमदार नेतृत्व उभे लाभले राहिले आहे. देशातील आजची परिस्थिती अत्यंत बिकट आहे या परिस्थितीत आपण देशासाठी लढून मरायचे की घरात बसून सडून मरायचे, हे ठरवा असे आवाहन कोळसे पाटील यांनी केले.

यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, अर्थतज्ञ देसरडा, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी आमदार राहुल बोंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, रविंद्र दळवी, युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवराज मोरे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे, भगवानगडाचे विश्वस्त आणि जालना जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

दारूची नशा आयुष्याची दुर्दशा: गौरव अहुजा माफी मागतच पोलिसांना शरण

पुणे- पुण्यातील शास्त्रीनगर चौकात दारूच्या नशेत भररस्त्यात बीएमडब्ल्यू उभी करून लघुशंका आणि अश्लील चाळे केल्याप्रकरणी गौरव अहुजाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री सातारा जिल्ह्यातील कराड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज त्याला पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी अटक करण्याआधी त्याने एक व्हिडिओ जारी करत माफी मागितली होती.येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक- 168/2025, कलम – 270,281,285,79 BNS सह 110/112 म पो कायदा 184,185 मो वा कायदा 85 दारूबंदी कायदा या गुन्ह्यातील आरोपी गौरव मनोज आहुजा, 25 वर्षे, राहणार – एन आयबीएम रोड, कोंढवा, पुणे यास कराड पोलिसांच्या ताब्यातून घेऊन, वैद्यकीय तपासणी करून पुणे येथे आणण्यात आले. आज 9 मार्च रोजी 07.50 वा जता अटक करण्यात आलेली आहे.

‘मी गौरव आहुजा, माझ्याकडून आज सकाळी पुण्याच्या रस्त्यावर कृत्य घडले. हे कृत्य खूप वाईट होते. मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता आणि शिंदे साहेब यांची मनापासून माफी मागतो. मी मनापासून माफी मागतो, मला माफ करा. मला एक चान्स द्या, सॉरी…’ असे तो आपल्या व्हिडिओमध्ये म्हणत आहे. तसेच , मी पोलिस स्टेशनमध्ये हजर होणार आहे. कृपया माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका, अशी विनंतीही गौरव अहुजाने केली.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गौरव आहुजासह त्याचा मित्र भाग्येश ओसवाला यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. भाग्येश ओसवालचा मेडिकल रिपोर्ट पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळले आहे. तर गौरव आहुजाचा मेडिकल रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे.

भाग्यश्री प्रकाश ओसवाल, 22 वर्षे, धंदा व्यवसाय, राहणार – मार्केटयार्ड, पुणे अटक- 23.00 वाजता

पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकात एक BMW कार ( क्रमांक एमएच 12 आरएफ 8419) उभी करत गौरव अहुजाने मद्यधुंद अवस्थेत लघुशंका केली. यानंतर एका व्यक्तीने त्याला हटकले असता त्याच्यासमोर अश्लील कृत्य केले. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला. जागतिक महिला दिनाच्या दिवशीच श्रीमंत बापाच्या मुलाचे असे कृत्य समोर आल्याने पुण्यात संतापाची लाट उसळली होती. त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो फरार झाला होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

या गौरव आहुजाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. तो फेब्रुवारी 2021 मध्ये क्रिकेट बेटिंगप्रकरणी अटक झालेला आहे. तत्कालीन पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने गँगस्टर सचिन पोटेला याच्या टोळीवर कारवाई करत क्रिकेट बेटिंग रॅकेट उद्ध्वस्त केले होते. यात कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बेटिंगच्या विळख्यात ओढण्यात आले होते. याच प्रकरणात गौरव आहुजावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गांधींना मारणे म्हणजे लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न होता: अजित अभ्यंकर

पुणे:महात्मा गांधींनी भारतामध्ये लोकशाहीची जागा निर्माण करून दिली. तसे झाले नसते तर भारताचा हिंदू पाकिस्तान झाला असता. सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे हेच स्वप्न आहे, पण ते पूर्ण होणार नाही. गांधींना मारणे म्हणजे लोकशाहीची जागा नष्ट करण्याचा प्रयत्न होता, असे मत ज्येष्ठ कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. धर्म म्हणजे अस्मिताबाजी आणि धर्म म्हणजे द्वेष हे नाकारयचे असेल आणि धर्मचिकित्सेची जागा ठेवायची असेल तर गांधी नावाचा अवकाश अनुभवला पाहिजे. जात, धर्म आणि लिंग द्वेषाचे वातावरणाविरोधात सर्वांनी मिळून लढले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
गांधी विचार साहित्य संमेलनात ‘जात, वर्ग आणि लिंग संघर्ष गांधीजींच्या दृष्टिकोनातून’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ. धम्मसंगिनी रमा, समाजशास्त्रज्ञ डॉ. श्रुती तांबे या परिसंवादात सहभागी झाले होते. रोहन गायकवाड यांनी अभ्यंकर यांचा सत्कार केला. रेश्मा सांबारे यांनी तांबे आणि धम्मसंगिनी रमा यांचा सत्कार केला.
धम्मसंगिनी रमा म्हणाल्या, जात ही व्यवस्था आहे. जात आणि पुरुषसत्ता यातून स्त्रीदास्य निर्माण झाले. याबाबतचे मूलभूत चिंतन गांधींच्या विचारात दिसत नाही. जात कशी काम करते, या व्यवस्थेबद्दल गांधींच्या विचारात हाती काही लागत नाही. पण, त्यांच्या उदारमतवादी विचारांत नंतर काही मांडणी दिसू लागते. जात ही ग्रामस्वराज्याचा गाभा आहे. जात व्यवस्था ही उत्पादक रचना आहे. हा गांधींचा पूर्वीचा विचार होता. नंतर त्यात प्रागतिक विचारांमुळे बदल झाला असे मला वाटते. जातीअंत म्हणजे अस्पृश्यता न पाळणे हे प्राथमिक काम आहे आहे. पण, साधन , संपत्तीमध्ये वाटा आणि शासन व्यवस्थेत स्थान असले पाहिजे. देशात जातीच्या वस्त्या आहेत. इथे लोकांना का राहावे लागते, याचे मूलभूत चिंतन गांधी विचारांचे सरकार सत्तेत असताना झाले नाही.
तांबे म्हणाल्या, धर्मावरून जगात दुफळी माजली आहे. भांडवलशाही वापरून जात, धर्माआधारे सत्ता राबवली जात आहे. ८५ टक्के आदिवासी विस्थापित झाले आहेत. विकासाच्या प्रक्रियेने त्यांना भिरकावून लावले आहे. जंगले उद्ध्वस्त झाली आहेत. हा आदिवासी आज शहरांत मेट्रोचे काम करत आहे. अशा वातावरणात माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळणार आहे का नाही ? गांधींमध्ये विरोधाभास होता पण कृतिशील लोकांच्या बाबतीत हा धोका असतो. गायपट्ट्यातील कर्मठ लोकांना घराबाहेर आणण्याचे काम गांधींनी केले.

कोणत्याही जाती, धर्माचा शिक्का नसलेले बापू एकमेव नेते: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांचे प्रतिपादन

पुणे : सर्व नेत्यांवर जात आणि धर्माचे शिक्के लागले आहेत. कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा वापर केला नाही किंवा हे या अमुक जाती, धर्माचे नेते नाही, असे एकमेव नेते म्हणजे महात्मा गांधी आहेत. बापूंवर कोणत्याही जाती, धर्माचा शिक्का नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी शनिवारी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे कोथरूड येथील गांधी भवन परिसरात आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनातील दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात ‘हिंदू – मुस्लिम प्रश्न आणि गांधीजी’ या विषयावरील परिसंवाद ते बोलत होते. लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते इरफान इंजिनीअर, लेखक आणि पत्रकार किशोर बेडकीहाळ यांनी या परिसंवादात भाग घेतला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन अध्यक्षस्थानी होते. सुनील पाटील यांच्या हस्ते किशोर बेडकीहाळ आणि अन्वर राजन यांचा सत्कार करण्यात आला. मिलिंद गायकवाड यांच्या हस्ते इंजिनीअर यांचा सत्कार करण्यात आला.
गांधी म्हणाले, जिना, सावरकर, अडवाणी आणि मोदी यांना विशिष्ट समाजाचे नेते म्हणून ओळखले जाते. बापूंवर असा शिक्का मारता येत नाही. बापूंवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप करण्यात आला आणि या तुष्टीकरणाला तर आता देशद्रोहाचे स्वरूप देण्यात आले आहे. काही लोक बापूला शत्रू आणि नथुरामला दिव्य मानतात. त्याची पूजा केली जात आहे. या लोकांवर बोलणे गरजेचे आहे. घरी सर्वधर्मीय लोक यायचे त्यातून बापूंवर सर्वधर्माचा संस्कार झाला. मोहनदासचे महात्मा कसे झाले याचा अभ्यास केला पाहिजे. गांधींना आजचे मापदंड लावून चालणार नाही. त्यांना मोजण्यासाठी हे मापदंड पुरेसे नाहीत. बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत तर तिथे एकही नेता गेला नाही. हिंदू सुरक्षित नसतील किंवा मुस्लिम सुरक्षित नसतील तर बापू तिथे जायचे आणि हल्ला करणाऱ्यांना खडसावायचे. अशा प्रकारचे राजकारण आज कोणता नेता करेल ? देशात विभाजनाचे राजकारण सुरू असून आपण हिंदू आणि मुस्लिम असे बोलण्यापेक्षा भारतीय म्हणून बोलले पाहिजे.
बेडकीहाळ म्हणाले, गांधींवर खिलाफत चळवळ आणि मुस्लिम अनुनयाचा आरोप करण्यात येतो. गांधी भारतात येण्यापूर्वी बंगालची फाळणी झाली होती. जागतिक पातळीवरच्या मुस्लिमांचे नेतृत्व म्हणून तुर्कस्थानच्या खलिफाकडे पाहिले जात होते. ब्रिटिशांमुळे त्याचे स्थान धोक्यात आल्याने जगभरातील मुस्लिमांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. मुस्लिम समाजामध्ये ब्रिटिशांविरोधात असंतोष निर्माण करण्याची ही संधी आहे, असे गांधीजींनी मानले. हिंदू-मुस्लिम एकजुटीचा सर्वात चांगला कालखंड लखनौ करारानंतर १९२२ ते १९३७ पर्यंतचा आहे.
इंजिनीअर म्हणाले, ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी हिंदू- मुस्लिम प्रश्न तणावाचा नव्हता. ब्रिटिशांनी सत्ता राबविण्यासाठी हा झगडा निर्माण केला. त्यानंतर मुस्लिम लीगला ताकद मिळाली. गांधी ही नैतिक शक्ती आहे. सर्व धर्मांत सत्य आहे, असे गांधींना वाटायचे. ईश्वर हे सत्य नाही तर सत्य हाच ईश्वर आहे, असे त्यांनी सांगितले. गांधींनी सत्याचा पाठलाग करायला सांगितला.
अध्यक्षीय भाषणात अन्वर राजन म्हणाले, महात्मा गांधींचे व्यक्तिमत्त्व धार्मिक होते, पण त्यांना कोणत्या एका धर्मात बसवता येणार नाही. जगातील, भारतातील, महाराष्ट्रातील कोकण , मराठवाडा येथील मुस्लिम वेगळे आहेत. मुस्लिमांमध्ये वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती आहेत. त्यांच्या संस्कृतीमध्ये स्थानिक संदर्भ आहेत. गांधींच्या चळवळीत महिलांचा सहभाग सर्वाधिक होता. त्याआधी आणि नंतर तेवढा सहभाग नव्हता. स्वाती महाळंक यांनी सूत्रसंचालन केले. कमलाकर शेटे यांनी आभार मानले.


महेश मांजरेकर यांची ‘फिल्टर कॉफी’

कॉफीची नजाकत काही वेगळीच! मग ती कोल्ड असो वा हॉट! कॉफीच्या शौकिनांची संख्या कमी नाही. कॉफीचा खरपूस दरवळ जसा घरभर पसरतो, तसाच आता  रंगभूमीवर कॉफीचा दरवळ पसरणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी  ही फिल्टर कॉफी नाट्यरसिकांसाठी आणली आहे. अद्वैत आणि अश्वमी  थिएटर्स  प्रकाशित महेश वामन मांजरेकर सादर करीत असलेली ही तजेलदार कॉफी ६ एप्रिल ला रंगभूमीवर येणार आहे.

रितीशा प्रोडक्शन्स निर्मित महेश वामन मांजरेकर लिखित दिग्दर्शित  फिल्टर कॉफी या नाटकांचे निर्माते  दिलीप माधव जगताप असून सहनिर्माते राहुल भंडारे आहेत. नाटकात विराजस कुलकर्णी, विक्रम गायकवाड, कुणाल मेश्राम, अंकिता लांडे आणि उर्मिला कानिटकर यांच्या भूमिका आहेत. 

याप्रसंगी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले ‘१९९२ साली मला हे नाटक करायचं होतं. त्यावेळी ते शक्य झालं नाही आता हे नाटक मी आणलं असून ते स्वतः दिग्दर्शित करतोय. कॉफीच्या गडद रंगाप्रमाणे या नाटकाची गडद शेड नाट्यरसिकांना अनुभवायला  मिळेल’. सस्पेन्स थ्रिलर असं हे नाटक आहे. मराठी नाट्यरसिक प्रगल्भ आहे. वेगळ्या संहिताचं स्वागत त्यांनी नेहमीचं  केलं आहे.  माझ्या सॊबतीने निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ अशी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणलेली कडू गोड चवीच्या  फिल्टर   कॉफी ची ट्रीट नाट्यरसिक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वास महेश मांजरेकर यांनी व्यक्त केला. 

या नाटकाविषयी बोलताना अभिनेता विराजस कुलकर्णी म्हणाला की, वैविध्यपूर्ण नाटक मराठी रंगभूमीवर येतायेत, त्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. रंगभूमीमुळे मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख मिळतेय. नाटक हे  नेहमी दिग्दर्शकाचं मानलं जातं. दिग्दर्शकाच्या नावामुळे नाट्यरसिक नाटक पाहायला येतात. महेश मांजरेकर याचं नाव त्यात अग्रस्थानी आहे. त्यांच्या कलाकृती पाहत मी मोठा झालोय. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दवडणे शक्य नव्हतं. आम्ही घेऊन येत असलेलं हे नाटक थ्रीलर जॉनरच असून काहीतरी वेगळं नाट्यरसिकांना पाहायला मिळणार याची खात्री देतो. 

माझी ही पहिली नाट्यकृती असून महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्ग्ज दिग्दर्शकासोबत काम करणं ही माझ्यासाठी पर्वणी होती. या नाटकाच्या निमित्ताने माझी नाटक करायची इच्छा पूर्ण झाली याचा आनंद असल्याचे अभिनेत्री उर्मिला कानिटकर हिने यावेळी सांगितले. 

‘फिल्टर कॉफी’ या नाटकाचे सहलेखन अभय देखणे सहाय्यक दिग्दर्शक सुरज कांबळे आहे. संगीताची जबादारी हितेश मोडक   यांनी सांभाळली आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. वेशभूषा लक्ष्मण येलप्पा गुल्लार यांची आहे. दिपक कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य या नाटकासाठी लाभले आहे.

‘फुले कृषी सावित्री जत्रा’ उपक्रमाला खासदार सुनेत्रा पवार यांची भेट

पुणे, दि.८: पुणे जिल्हा परिषद आणि शासकीय कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “फुले कृषी सावित्री जत्रा” या विशेष उपक्रमाला खासदार सुनेत्रा पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रकल्प संचालक शालिनी कडू आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती पवार यांच्या हस्ते १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांतील १ लाख २ हजार महिलांना सायबर सुरक्षेचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

उमेद अभियानांतर्गत महिलांना उद्योगधंद्यांसाठी व विविध उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँक यांच्या मार्फत ₹१९ कोटी ६ लाख ३० हजारांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, या कर्जाच्या धनादेशांचे वाटप खासदार श्रीमती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत “लखपती दीदी”, “ड्रोन दीदी” आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना यावेळी विशेष सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यातील उमेद प्रेरित स्वयंसहाय्यता गटातील महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

या कार्यक्रमात महिलांसाठी “खेळ पैठणीचा”, तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने मंगळागौर, भारूड अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पाटील यांनी केले तर श्रीमती कडू यांनी आभार मानले.

पिंक रिक्षा योजनेमध्ये एक हजार महिलांच्या सहभागासाठी प्रयत्न करणार : आशा कांबळे

पिंपरी ! प्रतिनिधी

महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी पिंक रिक्षा योजनेमध्ये एक हजार महिलांच्या सहभागासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार पिंपरी चिंचवड महापालिका फेरीवाला समिती सदस्य व पिंक रिक्षा संघटनेच्या अध्यक्ष आशा बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.

जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिक वेहिकल ऑटो एक्जीबिशन 2025 सुरू करण्यात आले आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात आशा कांबळे बोलत होत्या. या वेळी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून महिलांनी सुरुवातीला पिंक रिक्षाचे रॅली आयोजित केली, पिंपरी ते ऑटो कस्टर पर्यन्त हि पिंक रिक्षा रैली काढण्यात आली.

या कार्यक्रमासाठी जगभरातील प्रतिनिधी उपस्थित होते. जिम बँनसोन, जर्मनी येथुन तसेच अमेरिका, इंग्लंड दुबई जपान, व्हिएतनाम यासह, दिल्ली राजस्थान, पंजाब, गुजरात, चेन्नई हैदराबादसह देशभरातील व प्रदेशातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रॅक, टेम्पो, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय कष्टकऱ्यांचे नेते अध्यक्ष बाबा कांबळे, इंटरनॅशनल फेडरेशन असोसिएशन ऑफ इलेक्ट्रिक वेहिकल के चेअरमन डॉ. एस. के. सरोज, अध्यक्ष डॉ.राजीव मिश्रा, डॉ दीपक वाधवा, श्रीनिवास कुमार, एमएसएमइचे केंद्र सरकार लघुउद्यो विभागाचे के.के.गोयल, डॉ कल्याण हट्टी, आदी यावेळी उपस्थित होते.

इंटरनॅशनल फेडरेशन असोसिएशन ऑफ इलेक्ट्रिक वेहिकल के चेअरमन डॉ. एस. के. सरोज म्हणाले की, ऑटोचा इलेक्ट्रिक वेहिकल मध्ये परिवर्तित होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांच्या पुढाकाराने पुढे कार्य सुरू ठेवणार आहे. केंद्र शासनाने महिलांना इलेक्ट्रिक व्हेहिकलसाठी अनुदान द्यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरोज यांनी केले.

आशा कांबळे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील काबाडकष्ट करणाऱ्या तसेच अत्यंत दुर्बल घटकातील 100 महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा परवाना काढून त्यांना शंभर रिक्षा देण्याचा उपक्रम घरकाम महिला सभा आणि बाबा सामाजिक फाउंडेशन या संयुक्त संस्थेच्या वतीने करण्यात आला होता. याला चार वर्षापेक्षा अधिक काळ होत आहे. कोविड काळामुळे ही योजना मध्यंतरी बंद होती. परंतु आता नव्याने पुन्हा ही योजना सुरू करून पिंपरी चिंचवड पुणे शहरातील एक हजार महिलांना पिंक रिक्षा योजनेमध्ये सहभागी करून त्यांना पिंक रिक्षा योजनेमध्ये स्वावलंबित करणार असल्याचे आशा कांबळे म्हणाल्या. ही योजना टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र भरून नंतर देशभर वाढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

स्नेह ज्योती मानसिक आरोग्य मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून मोफत समुपदेशन उपलब्ध – मंजुश्री खर्डेकर

कुटुंब व्यवस्था आणि मानसिक आरोग्य जपणे महत्वाचे – राजेश पांडे.

पुणे-स्नेहालय विश्वस्त संस्था आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेले “मोफत मार्गदर्शन केंद्र” हे अगदी योग्य वेळी सुरु करण्यात आले आहे, सध्या समाजात खूप अस्वस्थता आहे आणि अश्या वेळी कुटुंब व्यवस्था आणि मानसिक आरोग्य जपणे हे खूप महत्वाचे आहे असे भाजपा चे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले.
आज त्यांच्या हस्ते जागतिक महिला दिन आणि सौ. मंजुश्री खर्डेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत मानसिक आरोग्यासंबंधी मार्गदर्शन, वैयक्तिक व कुटुंब समुपदेशन,विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशन,व्यसनमुक्ती,रस्त्यावरील स्क्रीझोफ्रेनिक मनोरुग्ण व्यक्तींसाठी मार्गदर्शन अश्या सर्व प्रकारच्या समुपदेशनासाठी च्या केंद्राचे उदघाट्न करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
दर गुरुवारी सकाळी 11 ते 4 कर्वेनगर येथील रमांबिका मंदिराजवळील शक्ती 98 चौकातील “दिव्यांग आधार केंद्र” येथे सौ. ज्योती एकबोटे ह्या मोफत मार्गदर्शन व समुपदेशन करणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत, त्यांना आपल्या भावना कुठे व्यक्त कराव्यात हे समजत नाही, त्यांच्या मानसिक कोंडमाऱ्यावर ह्या केंद्रात नक्कीच उपाय सापडेल असा विश्वास देखील सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केला.
याठिकाणी समुपदेशनासाठी येणाऱ्या सर्वांची माहिती गुप्त राखण्यात येते व त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या सोडविल्या जातात असे ह्या केंद्राच्या संचालिका सौ. ज्योती एकबोटे यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,नगरसेवक जयंत भावे,प्रभाग अध्यक्ष एड. प्राची बगाटे,सौ.श्रीजा ठाकूर,गौरीताई करंजकर, डॉ. हिमांशू परांजपे, डॉ. कांचन परांजपे इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित महिलांना डॉ.कांचन परांजपे यांनी तयार केलेली ऑरगॅनिक सौंदर्य प्रसाधने भेट देण्यात आली.

लाडक्या बहिणींना अधिक निधी देण्याचे आश्वासन सरकारने पाळावे- रामदास आठवले

पुणे: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने पूर्ण करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

आपल्या पुणे दौऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते. रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, रोहिदास गायकवाड, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महेंद्र कांबळे, बसवराज गायकवाड, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, विरेन साठे  वसीम पैलवान, संदीप धांडोरे, रोहित कांबळे, हबीब सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर काहीसा ताण येत असला तरी देखील राज्य सरकारने तो ताण सहन करूनही लाडक्या बहिणींना अधिक निधी देण्याचे आश्वासन पाळावे, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.

चालू आर्थिक वर्षाच्या आर्थिक अहवालानुसार राज्याच्या महसुली उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याचे दिसून येत आहे. मात्र, येणाऱ्या काळात राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दावोस येथे विविध उद्योगांशी झालेल्या करारानुसार राज्यात 15 लाख 90 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. त्याचप्रमाणे इतर काही उपाययोजना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळ राज्याच्या आर्थिक परिस्थितीत नक्कीच सुधारणा करेल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यात तणाव असल्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. प्रत्यक्षात शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आणि सध्याच्या फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणे चर्चा करून कोणताही निर्णय घेत असतात. त्यामुळे काही निर्णय रद्द केले असले तरी देखील त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चर्चा झालेली असणार आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात तणाव असल्याचे वृत्त चुकीचे आहे, असा दावाही आठवले यांनी केला.

अनेक पक्षांचे सरकार चालविताना एकमेकांमध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहे. याचा अर्थ महायुतीतील घटक पक्ष एकमेकांवर नाराज आहेत असा होत नाही. रिपब्लिकन पक्षामध्ये देखील मंत्रीपद न मिळाल्यामुळे काही प्रमाणात अस्वस्थता आहे. मात्र, महायुतीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येण्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनतेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा मिळणे आवश्यक आहे. विशेषत: पुण्यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी जनता वास्तव्य करीत आहे. त्यामुळे पुण्याचे महापौरपद आरक्षित झाल्यास ते रिपब्लिकन पक्षाला मिळावे, अशी मागणी ही त्यांनी केली.

पुण्यात भव्य आंबेडकर स्मारक उभारले जावे

पुणे रेल्वे स्थानकाजवळ आंबेडकर भवनच्या मागे दोन एकरचा भूखंड रिकामा आहे. या जागेवर भव्य आंबेडकर स्मारक उभारले जावे, अशी आपली मागणी असून त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. ही जागा कर्करोग रुग्णालयासाठी मागितली जात असली तरी देखील रुग्णालयासाठी इतर जागा निवडण्यात यावी. आपला विरोध रुग्णालयाच्या उभारणीला नाही. रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. मात्र, आंबेडकर भवन नजीकच्या जागेवर भव्य आंबेडकर स्मारक उभारले जावे, असा आपला आग्रह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महागया येथील महाबोधी ट्रस्टमध्ये सन 1949 च्या कायद्यानुसार हिंदू धर्मातील काही जणांना प्रतिनिधित्व देण्याचा नियम आहे. मात्र, इतर कोणत्याही धार्मिक ट्रस्टमध्ये इतर धर्माच्या प्रतिनिधींचा समावेश केला जात नाही. त्याप्रमाणेच महाबोधी ट्रस्टही पूर्णपणे बौद्ध समाजातील विश्वस्तांकडे दिला जावा, अशी मागणी आहे. या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे. या मागणीसाठी देशभर आंदोलन सुरू आहे. रिपब्लिकन पक्ष देखील 10 ते 19 मार्च दरम्यान राज्यातील सर्व जिल्हे तालुके आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये या मागणीसाठी आंदोलन करणार आहे. या मागणीचे कोणीही राजकारण करण्याची गरज नाही, असेही आठवले यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव विजय स्मारकासाठी दीडशे ते दोनशे एकर जागेची आवश्यकता आहे. मात्र, त्यासाठीच्या प्रक्रियेने अद्याप वेग घेतलेला नाही. यासाठी देखील आपण मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्मारकाचा आराखडा जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय अधिकारी यांनी तयार करून तो लवकरात लवकर राज्य शासनाला सादर करावा, अशी सूचनाही आठवले यांनी केली.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातील सर्वात उंच पुतळा हिंदू मिल स्मारकात उभारण्यात येणार आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हे या पुतळ्याचे काम करत असून या
कामासाठी 1हजार 89 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दीड वर्षाच्या कालावधीत हा पुतळा पूर्णपणे तयार होईल, अशी माहिती आठवले यांनी दिली.

आंतरजातीय विवाह केल्याप्रकरणी भोर येथील विक्रम गायकवाड या तरुणाची हत्या झाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, हे कृत्य एकट्या दुकट्याचे नसून यात आणखी काही आरोपी सहभागी असावेत, असा आमचा संशय आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतली असून त्यांनी कसून तपास करण्याचे आश्वासन दिले आहे, असे आठवले यांनी सांगितले.

संघटना वाढीवर लक्ष केंद्रित

रिपब्लिकन पक्षाने संघटन बांधणी आणि वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने 9 एप्रिल रोजी लोणावळा येथे राज्यभरातील 800 ते 1000 महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 18 मे रोजी सामाजिक सलोखा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात समाजातील सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी विचारमंथन केले जाणार आहे, असे आठवले म्हणाले. त्याचप्रमाणे ठाणे येथे एक जून रोजी पक्षाचे अधिवेशन होणार असून त्यात सुमारे एक लाख कार्यकर्ते सहभागी होतील, असा दावाही त्यांनी केला

महामानवांचा आव्हान करणारी आणि समाजात फूट पाडणारी वक्तव्य करणे अयोग्य असून त्याबद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील आठवले यांनी केली. ‘कोण नामदेव ढसाळ,’ असा उन्मत्त सवाल करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, चौकशी अंती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही आठवले यांनी दिली.

मोदींना घालवणे राहुल गांधी यांना शक्य नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. महायुतीला राज्यात आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशभरात जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मोदी यांना हटविणे राहुल गांधी यांना शक्य होणार नाही. केंद्रात इंडी आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी सपशेल तोंडघशी पडली आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर देखील पंतप्रधान पदावर मोदी हेच विराजमान होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महिलांवर वाढणाऱ्या अत्याचार आणि अवमानाच्या प्रकरणांचा आठवले यांनी तीव्र निषेध केला.

भररस्त्यात लघुशंका_तरुणाची ओळख पटली, वडील म्हणाले,त्याचे कृत्य लज्जास्पद

आरोपी अल्पवयीन नाहीत, त्यांना पकडण्यासाठी पथके रवाना, लवकरच ताब्यात घेऊ; पोलिसांची माहिती

पुणे-पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या तरुणाची पोलिसांना ओळख पटली आहे. गौरव आहुजा असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. यावेळी बोलताना त्यांनी गौरव माझा मुलगा आहे याची मला लाज वाटते, त्याने रस्त्यावर नव्हे तर माझ्या तोंडावर लघवी केली आहे, अशी संतप्त भावना व्यक्त केली आहे.या प्रकरणातील आरोपींवर सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील व अश्लाघ्य वर्तन करणे, मोटार व्हेइकल कायद्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी रहदारीला अडथळा निर्माण करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जात असल्याचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव म्हणाले.

गौरव आहुजाने पुण्याच्या येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात भररस्त्यात बीएमडब्ल्यू कार थांबवून लघुशंका केली होती. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यात संतापाची लाट पसरली आहे. विशेषतः या प्रकरणी पोलिसांवरही टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारावर कार मालकाचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. मनोज आहुजा असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते लघुशंका करणाऱ्या गौरवचे वडील आहेत. त्यांनी स्वतःच ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्त वाहिनी शी बोलताना आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची पुष्टी केली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्याच्या येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात पुणे – नगर रोडवर भररस्त्यात लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, दोन मद्यधुंद अवस्थेतील तरुण रस्त्याच्या मधोमध आपली आलिशान कार उभी करून थांबले आहेत. त्यापैकी एक तरुण गाडीतून उतरून रस्त्यावरच लघुशंका करतो. यावेळी त्याने रस्त्यावरच महिलांसमोर अश्लील चाळे केल्याचेही निदर्शनास येत आहे. त्याच्या सोबत असणारा दुसरा तरुण कारच्या समोरच्या सिटवर बसला आहे. त्याच्या हातातही दारुची बाटली आहे. हे दोघेही हुल्लडबाजी करताना दिसून येत आहेत. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्यांना जाब विचारला असता ते भरधाव वेगात वाघोलीच्या दिशेने निघून गेले.

तो माझा मुलगा असल्याची लाज वाटतेमनोज आहुजा यांनी आपल्या मुलाच्या कृत्यावर तीव्र संतापही व्यक्त केला आहे. गौरव माझा मुलगा आहे याची मला लाज वाटते. त्याने सिग्नलवर नव्हे तर माझ्या तोंडावर लघुशंका केली आहे. त्याचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. घटनेत वापरलेली कार माझ्या नावावर आहे. त्यामुळे या प्रकरणी जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असे त्यांनी म्हटले. मनोज आहुजा यांचा पुण्यात एक बार असल्याची माहितीही उजेडात आली आहे.

आरोपी तरुणी अल्पवयीन नाही – पोलिस-पुण्याचे पोलिस उप आयुक्त हिंमत जाधव यांनी या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, एक तरुण भर रस्त्यावर अश्लाघ्य वर्तन करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. संबंधित तरुणांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आरोपीचे नाव काय आहे? गाडी कोणाची होती? याची माहिती आमच्याकडे आहे. पण आरोपीला पकडण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे मी त्यांची नावे उघड करत नाही.कारवाई पूर्ण झाल्यावर आणि आरोपी ताब्यात आल्यानंतर याबद्दलची माहिती उघड केली जाईल. आरोपी व्यक्तीचे घर, त्यांचे काही नातेवाईक, पुण्याच्या बाहेरील त्यांची काही मित्रमंडळी यांच्याकडे त्यांचा शोध घेतला जात आहे. मुलांनी कुठे पार्टी केली होती का? याबद्दल माहिती मिळाली नाही, पण तपास केला जात आहे. आरोपी मुलांच्या आई-वडीलांशी संपर्क झाला असून आरोपींना ताब्यात घेण्यासाठी टीम रवाना झाली आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे अल्पवयीन नाहीत, असे ते म्हणाले.