रेडबेल मीडिया प्रस्तुत नवीन सिनेमाची घोषणा
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीत एका नवीन आणि बहुचर्चित स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मोठ्या दिमाखात पुण्यातील कॅम्प भागातील विला मारिया बंगल्यात पार पडला. रेडबेल मीडिया निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित स्वप्नसुंदरी या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली.चित्रपटाचे निर्माता सतीश महादेव गेजगे असून, या चित्रपटात काही नामांकित कलाकार झळकणार आहेत. भूषण प्रधान, सायली पाटील, अशोक शिंदे आणि शिल्पा नवलकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.मुहूर्त सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती होती. चित्रपटाच्या कथानकाबाबत अधिक माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली असली, तरी हा एक दमदार आणि उत्कंठावर्धक स्वप्नसुंदरी चित्रपट ठरणार असल्याची निर्मात्यांनी ग्वाही दिली आहे. स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त महिलादनिानिमित्त 8 मार्च 2025 रोजी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. प्रेक्षकांना एक वेगळी कथा अनुभवायला मिळणार आहे.