Home Blog Page 393

भारतीय लष्कराचे शौर्य युवापिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी – काळकर

पुणे (ता. २७ मार्च): भारतीय सैन्याने देशावर आलेल्या प्रत्येक धोक्याला यशस्वीपणे परतवून लावले असून, आपले लष्कर नेहमीच तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे मत प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.

भारत-पाकिस्तान युद्धाला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि लष्करी इतिहास व माजी सैनिकांसोबत कार्यरत असलेल्या ‘ऑलिव्ह ग्रीन’ या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या मार्बल सभागृहात १९६५ च्या युद्धातील छायाचित्रे व माहितीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. डॉ. पराग काळकर बोलत होते.

या वेळी ‘ऑलिव्ह ग्रीन’ संस्थेचे संचालक ले. कर्नल (नि.) अवधूत ढमढेरे, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, काशिनाथ देवधर, डॉ. संजय तांबट तसेच विद्यार्थी उपस्थित होते. युद्धाच्या छायाचित्रांचे अंगावर शहारे आणणारे विश्लेषण लष्करी इतिहासतज्ज्ञ नितीन शास्त्री यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय तांबट यांनी केले.

येथे शिकविली जाते, पारंपारिक लावणी….

ठाण्याच्या “लावणी नृत्य” प्रशिक्षण शिबिरात,विदयार्थ्यांमध्ये आनंद…. उत्साह… आणि जोश.

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या सहकार्यातून ठाण्यात सध्या बहुरंगी बहुढंगी असे दहा दिवसांचे “लावणी नृत्य प्रशिक्षण शिबीर”सुरू आहे.
काही मंडळींनी बदनाम केलेल्या लावणीला आज शासनाने या शिबीराच्या माध्यमातून राजश्रय दिला आहे. म्हणूनच या शिबिराच्या संचालिका शैला खांडगे यांच्यावर विश्वास दाखवत या शिबीराच्या प्रशिक्षणासाठी डॉक्टर वकील, उद्योजिका महिलांनी आज वेळात वेळ काढून प्रवेश घेतला आहेत.
बुधवार दि. 26मार्च रोजी या शिबिरातील प्रशिक्षणार्थी विध्यार्थ्यांना लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ गणेश चंदनशिवे यांनी एक ते दिड तास प्रात्यक्षित्य करून लावणीची परंपरा या विषयावरचे धडे दिले.डॉ. मुकुंद कुळे यांनी लावणीचा सिद्धातिक इतिहास सांगितला, तर मंत्रालयातील पत्रकार खंडूराज गायकवाड यांनी लावणीला परंपरा आहे. त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासन विविध शिबीरं आयोजित करते.त्यामुळे पुढच्या पिढीने ही परंपरा शास्त्रशुद्ध शिक्षण घेवून जपावी.असे विदयार्थ्यांना सांगितले.
लावणी सम्रादयी प्रमिला लोदगेकर यांनी लावणीचा ठेका धरून नृत्य सादर केले. यावेळी त्यांनी आपल्या लावणी नृत्याची परंपरा सांगितले.यावेळी लोककलेचे जेष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी आलेल्या पाहुण्यांचे मनःभरून कौतुक केले.
शिबीराच्या संचालिका शैला खांडगे यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले.

येथे शिकविली जाते पारंपारिक लोककला
गण गवळण, मुजरा, छक्कड,शृंगारीक लावणी असे विविध कला प्रकार दहा दिवस शिकविले जाणार आहेत.त्यामुळे आम्हाला कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळत आहेत. म्हणूनच आमच्या चेहऱ्यावर आनंद आहे…. मनात उत्साह आहे…. अन तेवढा जोश सुद्धा आहे. असे येथील आलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थाचे प्राजंळ मत आहेत.

काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी अनंतराव गाडगीळ यांना संधी दिली जाण्याची शक्यता

पुणे: विधानसभा निवडणुकीमध्ये सबंध महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी राजीनामा दिला असून हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारली आहेत.
प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आता नवे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रामध्ये नव्याने पक्ष संघटना बांधतील आणि संघटनात्मक काही फेरबल करतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे पुण्यातील काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलाबाबत पुन्हा एकदा फिल्डिंग सुरू झाली आहे. माजी आमदार अनंतराव विठ्ठलराव गाडगीळ,अविनाश बागवे, संजय बालगुडे, या नावांची चर्चा असली तरी सध्याचे प्रभारी अरविंद शिंदे यांनाच अध्यक्ष राहू द्यावे मात्र माजी मंत्री रमेश बागवे,माजी आमदार मोहन जोशी,अभय छाजेड आणि शिंदे यांच्यात तत्पूर्वी समन्वयाची बैठक घेऊन एकोपा साधावा असे नेत्यांना वाटू लागले असल्याचे काहीजण सांगत आहेत. असंख्य वेळा आमदारकी डावलल्याने पक्षापासून दूर गेलेले आबा बागुल यांच्याबाबत देखील नेते विचार करू शकतात असेही काहींचे म्हणणे आहे.काँग्रेस कडे मातब्बर अनुभवी नेते असले तरी त्यांच्यात आपसातच प्रचंड दरी निर्माण झाल्याने शहरातील काँग्रेसची दुरावस्था झाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.या सर्वांना एकत्र आणून पक्ष पुढे नेण्याची जबाबदारी अनंतराव गाडगीळ यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता काही जाणकार सूत्रांनी वर्तविली आहे.ज्यामुळे अनंतराव गाडगीळ यांच्यासारखा ब्राम्हण चेहरा देखील शहराच्या राजकारणात सक्रीय होऊन पक्षाला उभारी मिळू शकेल अशी आशा काही समीक्षकांना वाटते आहे. काहींनी रोहित टिळकांचे नाव देखील सुचवले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या दरम्यान सपकाळ यांच्याकडे काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचला.यानंतर आता पुणे शहर काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. पुण्यातील विविध गटांकडून शहराध्यक्ष पदासाठी लॉबिंग करण्यात येत आहे. या वेगवेगळ्या गटांकडून पुणे कॉग्रेस शहराध्यक्ष पदासाठीचे वेगवेगळी नावं चर्चेत आहे. पुणे शहरातील काँग्रेसचा शहराध्यक्ष बदलावा यासाठी गेल्या काही काळापासून काँग्रेसमधील काही गट कार्यरत आहेत. सुरुवातीला लोकसभा निवडणुकीपूर्वी शहराध्यक्ष बदलावा, यासाठी पुण्यातील काही काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते.शहराध्यक्ष बदलाबाबत मागील वेळेस एका कॉग्रेसच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रभारी चेन्निथला तसेच बाळासाहेब थोरात आदींची मुंबईत भेट घेतली होती.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अविनाश बागवे , अरविंद शिंदे हे उत्तम चेहरा असून त्यांना महापालिकेत विविध पदांवरती काम केलं असून त्यांना महापालिकेची चांगली जाण आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत त्यांच्यासारखा युवा आणि आक्रमक चेहरा दिल्यास काँग्रेसला फायदा होईल, अशी भूमिका देखील मांडण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान अनंतराव गाडगीळ हे दिले तरी शहराध्यक्ष पद स्वीकारतील काय? याबाबत अनेकांना शंका वाटते आहे.

बनावट पावत्या बनवणाऱ्या पुण्यातील टोळीचा पर्दाफाश

पुणे, 27 मार्च 2025

केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या (CGST) पुणे-II आयुक्तालयाच्या वसुली अधिकाऱ्यांनी, इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवणे आणि ते चालवून घेण्यासाठी बनावट पावत्या तयार करणाऱ्या आणखी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या बनावट पावत्यांची अंदाजे रक्कम 25 कोटी रुपये इतकी आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) चा लाभ घेण्याच्या आणि वापरण्याच्या उद्देशाने वस्तूंची कोणतीही नेआण केल्याशिवाय या बनावट पावत्या  जारी केल्या गेल्या.अशा आठ बनावट कंपन्या/खोट्या कंपन्यांचा प्रारंभिक शोध लागला असून त्यापैकी सहा पुण्यातल्या आहेत.फसवणूक केलेल्या करांच्या रकमेचे स्वरूप आणि फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या प्रादेशिक व्याप्तीचे मूल्यांकन केले जात आहे. 

पुण्यातील रहिवासी असलेल्या या संघटीत टोळीचा सूत्रधार असलेल्या तीन आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.ज्या कंपन्यांनी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा (ITC)  लाभ घेतला आहे त्यांच्याकडून पुढील तपास आणि वसुलीची कारवाई सुरू आहे. 

यात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, CGST पुणे-II आयुक्तालयाद्वारे पुणे आणि जवळपासच्या भागात सक्रीय असलेल्या एकाधिक बनावट GST इनव्हॉइसिंग आणि बनावट ITC पेडलिंग संघटित टोळीशी संबंधित नऊ जणांना गेल्या सोळा महिन्यांत अटक करण्यात आली आहेत.बनावट आयटीसीच्या धोक्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हा विभाग कटिबद्ध असून ते त्याच्या कायदेशीर थकबाकी देणाऱ्या कंपन्यांची यामुळे फसवणूक होते आणि खऱ्या करदात्यांवर  यामुळे  अन्याय होतो आणि अर्थविभागाचे  नुकसान होते.

पुणे रेल्वे स्टेशन प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या व सुरक्षेकडे रेल्वे अधिकाऱ्यांचे जाणूनबुजून दुर्लक्ष: शिवसेना आक्रमक

पुणे- वाढत्या गुन्हेगारीने शहराला आणि राज्याला त्रस्त केले असताना पुण्यातील रेल्वे स्थानकावर महिला, त्यांची बालके आणि एकूणच प्रवासी देखील सुरक्षित नसताना त्यांच्या सुरक्षेकडे डोळेझाक करणाऱ्या रेल्वे अधिकार्यांना आज पुण्यात शिवसेनेने धारेवर धरले यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलीस बोलाविले पोलिसांनी मध्यस्थी करत लेखी निवेदन द्यायला लाऊन रेल्वे सुरक्षेचे महत्व पटवून दिले यावेळी पुणे रेल्वे स्टेशन येथे येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भातील मागण्या रेल्वे प्रशासनाने त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. या सर्व आंदोलनाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहिल.असा इशारा पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिला आहे.
याप्रसंगी विधानसभाप्रमुख उत्तम भुजबळ, विभाग प्रमुख अनिल दामजी,अनिल परदेशी, रोहिणी कोल्हाळ, युवराज पारिख, गिरीश गायकवाड, नितीन थोपटे, शैलेश जगताप उपस्थित होते.संजय मोरे यावेळी म्हणाले,‘पुणे रेल्वे स्टेशनला लाखो प्रवासी रेल्वेने ये जा करत असतात. त्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. परंतु रेल्वे प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे निदर्शनास येते. आताची रेल्वे स्टेशनची परिस्थिती ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी झालेली आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुरक्षेचे संदर्भात अनेक निवेदनं दिली व आंदोलन सुद्धा केले. त्यावेळी आम्हाला त्या वेळेचे डी आर एम दुबे मॅडम यांनी दिनांक 23 मार्च 2023 रोजी सांगितले होते की लवकरच रेल्वे बोर्डाकडून पुणे रेल्वे स्टेशन येथे 120 सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. परंतु आत्तापर्यंत कुठेही सीसी कॅमेरे लावलेले नाही. याचा अर्थ रेल्वे रेल्वे प्रशासन सुरक्षिततेच्या बाबतीत चालढकल करत आहे.

शिवसेनेने केलेल्या मागण्या ….

१) व्हीआयपी गेट, अम्ब्रेला गेट ताडीवाला रोड गेट या ठिकाणी 24 तास RPF व GRP पोलीस TC नियुक्त करावे.
२) पुणे रेल्वे स्टेशन परिसरात नवीन उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
३) पुणे रेल्वे स्टेशन परिसरात RPF व GRP पोलिसांची गस्त वाढवावी.
४) पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या मेन गेटच्या व्यतिरिक्त इतर सर्व रस्ते बंद करण्यात यावे.
५) महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी उपाययोजना कराव्यात.
6) पुणे रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांची संख्या जास्त असते, त्यामुळे प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करावी ( पुणे रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे उपलब्ध करावे व आरक्षण केंद्राच्या आवारात गार्डन सारखे बाकडे बसवावेत)
७) पुणे रेल्वे स्टेशन मधील स्टॉल धारक व फॅन्ड्रीवाले रेल्वे स्टेशन येथे त्यांचे सामान ठेवतात. त्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागा नसते स्टॉल व फॅन्ड्रीवाल्यांना सामान ठेवण्यासाठी बंदी करावी.
८) पुणे रेल्वे स्टेशन येथील पार्सलवाले कुठल्याही प्लॅटफॉर्मवर कुठेही सामान टाकतात. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना चालायला सुद्धा जागा रहात नाही. रेल्वे प्रशासनामार्फत आपण पार्सल वस्तूंसाठी नियमित जागा ठरवून द्यावी.
९) दारू पिणारे लोक सर्रासपणे पुणे रेल्वे स्टेशन येथे वावरतात. त्यांना आपण पुणे स्टेशन परिसरात बंदी करावी.
१०) व्हीआयपी गेट समोरील लेनमध्ये RPF पोलीस लोखंडी बॅरिगेड लावतात. त्यामुळे सामान्य प्रवाशांना त्याचा त्रास होतो व संपूर्ण पुणे स्टेशन परिसर ट्रॅफिक जाम होते. बॅरिगेड लावणे त्वरित बंद करावेत.
11) उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांना स्वच्छ व थंड पाण्याची मोफत व्यवस्था करावी.

सलग ५१ लावणी गीते सादर करून पुष्पा चौधरी यांचा विश्वविक्रम

वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल मध्ये नोंद

पुणे : मराठी लावणी संगीत जगाच्या पटलावर यावी आणि लावणीला समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी यांनी सलग ५१ मराठी पारंपारिक लावणी गायनाचा विश्वविक्रम केला आहे. सलग ४ तास ४५ मिनिटे पुष्पा चौधरी यांनी लावणीची गाणी सादर करून विश्वविक्रम केला.

कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे प्रतिनिधी दिनेश पैठणकर आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल च्या प्रतिनिधी नीता दोंदे टिपणीस यांनी या विश्वविक्रमाची नोंद घेत प्रमाणपत्र आणि मेडल देऊन पुष्पा चौधरी यांचा सन्मान केला. यावेळी सिद्धेश्वर झाडबुके, अनिरुद्ध हळंदे, संतोष राऊत हे समीक्षक म्हणून उपस्थित होते. यावेळी लीला गांधी, सुरेखा पुणेकर, माया खुटेगावकर, श्वेता शिंदे, जयमाला इनामदार, प्राजक्ता गायकवाड, शुभदा नाईक, डॉ. शशी डोईफोडे , अंकुश मांडेकर, प्रदीप कोथमीरे, तृप्ती देसाई,शशिकला मेंगडे, वृषाली चौधरी, सायली वांजळे, दिपाली धुमाळ.
तसेच वॅलेंटीना कंपनीचे आबासाहेब चोरघे, संतोष बांदल, संदीप पवार, सुषमा चोरघे, जयश्री बादल, अश्विनी पवार, स्नेहा भगत, रवींद्र वाडकर, प्रमोद गायकवाड, सुषमा सोरटे, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.

पुष्पा चौधरी यांनी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी सुरुवात करून दुपारी २ वाजून ४६ मिनिटांनी शेवटची ५१ वी लावणी गायली.

पुष्पा चौधरी म्हणाल्या, लावणीच्या समृद्ध परंपरेला जागतिक पातळीवर नेण्यासाठी मी विश्वविक्रमाचा प्रयत्न केला. डिजे च्या काळात जुन्या पारंपरिक लावण्या मागे पडत आहेत. कलाकारांच्या माध्यमातूनच ही कला जिवंत राहणार आहे. यासाठी विश्वविक्रम करण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्ण केला.
त्यांच्या स्वामिनी अकॅडेमी मधील गायकांनी कोरस साठी साथ दिली. पुण्यातील नामवंत वादक हर्षद गणबोटे की ज्यांनी सुरेखा पुणेकरांसोबत १५ वर्ष ढोलकी वाजवली यांच्या टीमने अतिशय सुंदर वाद्य वाजवली. तसेच उषा मंगेशकर यांच्या गाण्यांना साथ देणारे कुंभार सर यांनी सुंदर गिटार वाजवली.

नेहमीच राया तुमची घाई, चला जेजुरीला जाऊ, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, कुण्या गावाचं आलं पाखरू, कळीदार कपूरी पान, खेळताना रंग बाई होळीचा, ढोलकीच्या तालावर, बुगडी माझी सांडली ग, अशी एकाहून सरस आणि गाजलेली लावणी गीते पुष्पा चौधरी यांनी सादर केली.वॅलेंटीना वूमेन्स इम्पॉवेरमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न झाला.

वृत्तपत्रविद्या विभागात युद्ध छायाचित्रांचे प्रदर्शन

पुणे (ता. २७): भारत-पाकिस्तान दरम्यान १९६५मध्ये झालेल्या युद्धाला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या युद्धातील भारतीय सैन्यदलाच्या पराक्रमाची व महत्त्वाच्या लढायांची छायाचित्रे पाहण्याची संधी पुणेकरांना येत्या शनिवारी मिळणार आहे.
माजी सैनिकांची ‘ऑलिव्ह ग्रीन’ ही स्वयंसेवी संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संयुक्तपणे हे प्रदर्शन आयोजित करत आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात (रानडे इन्स्टिट्यूट परिसर) शनिवारी (ता. २९) सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ पर्यंत ते सर्वांसाठी खुले असेल. प्रदर्शनाचे उद्घाटन सामरिक शास्त्राचे तज्ज्ञ डॉ. श्रीकांत परांजपे यांच्या हस्ते होईल. १९६५च्या युद्धात पाकिस्तानचे विमान पाडणारे वीरचक्रविजेते एअर मार्शल (नि.) प्रकाश पिंगळे यांचा विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात येणार आहे.
या वेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, ‘ऑलिव्ह ग्रीन’चे संचालक लेफ्टनंट कर्नल (नि.) अवधूत ढमढेरे, अधिसभा सदस्य अ‍ॅड. इशानी जोशी आदी उपस्थित राहणार आहेत. लष्करी इतिहासविषयक तज्ज्ञ नितीन शास्त्री युद्धछायाचित्रांबाबत माहिती देणार आहेत. कच्छच्या रणात पाकिस्तानची घूसखोरी, हाजी पीर, असल उत्तरच्या लढाईत भारतीय सैनिकांनी मिळवलेला विजय, लाहोरच्या दिशेने केलेली कूच आदींची छायाचित्रे व कात्रणे प्रदर्शनात पाहता येतील.

पुणे विभागातील ‘या’ गाड्या रद्द

पुणे, 27 मार्च 2025

विलासपूर विभागातील रायगड-झारसुगुडा जंक्शन तिसऱ्या/चौथ्या विद्युतीकृत विभागावरील कोटारलिया स्टेशनवर चौथ्या मार्गाचे जोडणी काम सुरू करण्यासाठी, पूर्व-एनआय/एनआय कार्यक्रम खालीलप्रमाणे नियोजित करण्यात आला आहे:

प्री-एनआय (पीएनआय) कालावधी: 11 एप्रिल 2025 ते 18 एप्रिल 2025 (08 दिवस)

नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कालावधी: 19 एप्रिल 2025 ते 23 एप्रिल 2025 (05 दिवस)

एकूण कालावधी: 13 दिवस

या कामामुळे, खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत:

ट्रेन क्रमांक 20822  (संत्रागाची – पुणे एक्सप्रेस) 12 एप्रिल 2025 आणि 19 एप्रिल 2025 रोजी रद्द करण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 20821 (पुणे – संत्रागाची एक्सप्रेस) 14 एप्रिल 2025 आणि 21 एप्रिल 2025 रोजी रद्द करण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 12129 (पुणे – हावडा आझाद हिंद एक्सप्रेस) 11 एप्रिल 2025 ते 24 एप्रिल 2025 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 12130 (हावडा – पुणे आझाद हिंद एक्सप्रेस) 11 एप्रिल 2025 ते 24 एप्रिल 2025 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 12222 (हावडा – पुणे दुरांतो एक्सप्रेस) 10 एप्रिल 2025, 12 एप्रिल 2025, 17 एप्रिल 2025 आणि 19 एप्रिल 2025 रोजी रद्द करण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 12221 (पुणे – हावडा दुरांतो एक्सप्रेस) 12 एप्रिल 2025, 14 एप्रिल 2025, 19 एप्रिल 2025 आणि 21 एप्रिल 2025 रोजी रद्द करण्यात आली आहे.

प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी प्रवासाचे नियोजन वरील माहितीनुसार करावे.

अल्पवयीन मुलास स्वत:च्या घरातूनच करायला लावली २५ लाखाची चोरी

पुणे-अल्पवयीन मुलास जीवे मारण्याची भिती दाखवत स्वत:च्याच घरातून दागिने आणि रोकड चोरण्यास भाग पाडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . या अल्पवयीन मुलाने स्वत:च्या घरातून पाच महिन्यांत तब्बल २५ लाखांचे दागिने आणि २० हजारांची रोकड भामट्यांकडे सोपवली. हा प्रकार उघडकीस आल्यावर पालकांनी पोलिसांत धाव घेत तीघांविरुध्द तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघा सराईतांना अटक केली असून, त्यांच्याकडून सोने आणि रोख रक्कम जप्त केली आहे.

एका पंधरा वर्षीय मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनूसार, येरवडा पोलिसांनी रोहीदास नवनाथ ओव्हाळ( २९, जाधवनगर, येरवडा), रेहान शब्बीर कुरेशी(२५, येरवडा) आणि स्टिफन जॉन शिरसाट(१९, रा.वडगाव शेरी) या तिघांविरुध्द लहान मुलास चोरी करण्यास भाग पाडल्याप्रकरणी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादींचे किराणा मालाचे दुकान आहे. ते एकत्र कुटूंबात रहातात. त्यांचे स्वत:चे, भावाचे आणि आईचे दागिने हे त्यांच्या आईच्या ताब्यात ठेवलेले होते. त्यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने त्यांच्या आईने कपाटातील दागिने तपासले, तेंव्हा त्यांना कपाटात दागिने नसल्याचे आढळले. त्यांच्या आईने कुटूंबाला याबाबत माहिती दिली. कुटूंबातील सर्व सदस्यांकडे विचारणा करण्यात आल्यावर त्यासंदर्भात कोणालाच काहीच माहिती नव्हती. दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांच्या १५ वर्षाच्या मुलाला विचारणा केली असता, तो तणावात दिसला. त्याला विश्‍वासात घेतले असता, ‘ वो लोग मुझे मार देगे, मैने नाम बताया तो मार देंगे’ असे बडबडू लागला.त्याला पोलिसांत तक्रार केल्यावर काही होणार नाही असे सांगितल्यावर त्याने सांगितले की, त्याच्या समवयस्क मित्राने रोहीदास, रेहान आणि स्टिफन बरोबर सात महिन्यांपूर्वी ओळख करुन दिली होती. काही दिवसांनंतर त्यांनी ‘आमच्या तिघांना घरातून पैसे आणून दे, अमाचे रेकॉर्ड माहित आहे का किती खराब आहे? नाहीतर तुला मारुन टाकू’ अशी धमकी दिली. त्यांच्या धमकीला घाबरुन जानेवारी महिन्यापर्यंत त्याने घरातून २० हजाराची रोकड त्यांना आणून दिली. दरम्यान, आजोबा आजारी असल्याने घरात होते. यामुळे आरोपींना पैसे देता आले नाहीत. यामुळे आरोपींनी घरच्यांनाही मारुन टाकू अशी धमकी दिल्याने मुलाने दागिने चोरुन आरोपींच्या स्वाधीन केले.

दरम्यान आरोपी दागिने विक्रीसाठी एका ठिकाणी येणार असल्याची खबर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानूसार तीघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ३३ तोळे ६९० ग्रॅम सोने चार लाखाची रोकड असा १४ लाख ४२ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांनी काही दागिने गहाण ठेऊन रोकड घेतली होती. यातील ६० हजार रुपये त्यांनी ऐषोआरामात उडवले आहेत.ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शहरातील मुख्य ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रमाण ५३% ने कमी -अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील

पुणे शहरातील वाहतूक हा सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असुन साधारणतः शहरातील प्रत्येक व्यवत्तीस दररोज किमान १० कि.मी.चा प्रवास करावा लागतो. वाहतूक कोडीमुळे इंधन अपव्यय, पर्यावरण हानी व मनस्ताप इ. समस्या वाढतात. सन २०२३ मध्ये पुणे शहर हे वाहतुकीचे दृष्टीने सर्वात मंद शहर म्हणून चौथ्या स्थानावर होते तर २०२४ मध्ये ते सातव्या स्थानी होते. त्यामुळे वाहतूकीची समस्या जाणून घेवून ती सोडविणेसाठी सर्व स्तरातून प्रयत्न करणे गरजेचे झाले होते.
त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून व रंजनकुमार शर्मा, पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांनी पुणे शहरातील वाहतूक समस्या निर्माण करणाऱ्या सर्व कारणांचा प्रायोगिक अभ्यास करून, Empirical study, प्रत्यक्ष निरीक्षणाचे आधारे, तसेच १. IRC 106-1990-Low Cost Traffic Management Techniques for Urban area, २. IRC SP 043-1994 – Improving Capacity of Roads in Urban area चा वापर करून कमी वेळात व कमी खर्चाच्या उपाययोजना राबविल्या. मुख्य रस्त्यांवरील ट्रॅव्हल टाईम कमी करणे व रस्त्यांची कॅरींग कॅपेसिटी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामध्ये पुणे महानगरपालिका व इत्तर शासकीय विभाग / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने पुणे शहरातील २६५ कि.मी. वे एकूण ३३ मुख्य रस्ते निश्चित करून या रस्त्यांच्या सुधारणांसाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
माहे सप्टेंबर-२०२४ पासून सुरू केलेल्या या उपक्रमांमध्ये, वाहतूक अभियांत्रिकी बदल, तंत्रशुध्द पध्दतीने व्हेईकल काऊंटचे आधारे राईट टर्न, लेफ्ट टर्न, यु टर्न बंद किंवा सुरू करणे, मुख्य रस्त्यांचे सरफेसींग चांगले ठेवणे, बॉटल नेक दुर करणे, वाहतूकीस अडथळा ठरणारे पीएमपीएमएल बस थांबे, लक्डारी व रिक्षा थांबे स्थलांतरीत करणे, सिग्नल सिक्रोनायझ करणे, सिग्नल टायमिंग व्यवस्थित करणे, चौक सुधारणा, पार्किंग मॅनेजमेंट, वाहतूक नियंत्रण साधनांचा वापर, वाहतूक विलगीकरण टेक्नीक्स, अतिरिक्त मनुष्यबळ वापरून वाहतूक नियमन व वाहतूक नियमभंग कारवाई, इ. उपाययोजना करण्यात आल्या.
पुणे शहरात सर्वात पहिल्यांदा एटीएमएस, गुगल मॅप, नागरीक तक्रारी व सोशल मिडीया यांचे माध्यमातुन प्राप्त वाहतूक कोंडींचे कारणांचा विश्लेषणात्मक अभ्यास करून त्यानुसार वाहतूक सुधारणा करण्यात येत आहेत.
वरील प्रमाणे केलेल्या उपाययोजनांमुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूकीचा वेग १०.४४ टक्क्याने वाढला असुन, शहरातील मुख्य ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीचे प्रमाण ५३% इतके कमी झाले आहे. या उपक्रमामध्ये खालील प्रमाणे मुख्य बदल करण्यात आलेले आहेत.
१) वाहतूक प्रशिक्षण :-
वाहतूक शाखेकडील अधिकारी व अंमलदारांकरीता वाहतूक नियमन, वाहतूकीचे कायदे व नियम, सॉफ्ट स्किल, कम्युनिकेशन स्किल इ. अभ्यासक्रम असणारे प्रशिक्षण शिबीर सुरू करण्यात आले असुन अद्याप पर्यत ४४५ अधिकारी व अंमलदारांना प्रशिक्षीत करण्यात आले असुन उर्वरीत सर्वाना याचप्रमाणे पुढील ६ आठवड्यांमध्ये प्रशिक्षीत करण्यात येणार आहे.
२) सिग्नल यंत्रणेमध्ये बदल केल्याने वाहतूक गतिमान होण्यास मदत :-
एकुण सिग्नल
३०२
एटीएमएस सिग्नल १२४
यापैकी ३३ ठिकाणचे ९७ सिग्नल सिक्रोनाईझ केले, तसेच पहिल्यांदाच ०२ एटीएमएस स्वतंत्र सिग्नल सिंक्रोनाईज्ड केल्यामुळे एकूण ९९ सिंक्रोनाईज्ड सिग्नल व उर्वरीत एटिएमएस स्वतंत्र सिग्नल-२७ आहेत. उर्वरीत १७६ जुने स्वतंत्र सिग्नल असुन त्यापैकी प्रायोगिक तत्त्वावर एकूण ०२ रिमोट कंन्ट्रोल सह सिग्नल आहेत.

वरील प्रमाणे ३०२ सिग्नल पैकी १२४ एटीएमएस सिग्नल असुन त्यापैकी ३३ ठिकाणचे एकूण ९७ +२ सिग्नल जागतीक वेळ, वाहतूकीचा फलो व सिग्नल मधील अंतर इ. बाबींची सांगड घालून सिंक्रोनाईझ करण्यात आले, त्यामुळे सिग्नलवर वाहन चालकांना थांबण्याची वेळ कमी झालेली आहे. त्याचप्रमाणे ०२ सिग्नलला रिमोटव्दारे नियंत्रीत करण्यात येत आहे. उर्वरीत १७६ जुन्या सिग्नलबाबत महानगरपालिकेसोबत समन्वयाने उपाययोजना करीत आहोत.
३) खालील प्रमाणे एकूण ५९ ठिकाणी केलेल्या बदलामुळे रस्त्यावरील वाहतूकीचा वेग वाढण्यास मदत :-
रस्त्यांवरील राईट टर्न बंद १५
रोड रुंदीकरण (बॉटलनेक कमी केले) १४
जंक्शन/मिडियन सुरु आणि बंद -०७
पीएमटी बस स्टॉप स्थलांतरीत केले-१०
लक्झरी बस थांबे स्थलांतरीत केले-०२
वाहतूकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे-०७
वन वे (एकेरी मार्ग) ०२
आयलॅण्ड रिमुव्ह-०२

वाहतूकीचे वर्गीकरण
जड वाहनांना बंदी
४) लक्झरी बसेस करीता ऑफ स्ट्रीट पार्कीग व्यवस्था :
१. सोलापूर रोड वरील हडपसर येथे व
२. अहिल्यादेवी नगर रोडवरील वाघेश्वर अशा २ ठिकाणी लक्झरी बसेस करीता ऑफ स्ट्रीट पार्कीग व्यवस्था करण्यात आली आहे.
५) वाहतूक कोंडीच्या कारणांचा प्रथमच अभ्यास करून वाहतूक कोंडीच्या संख्येत घट (एटीएमएस, गुगल मॅप, कंट्रोल व सोशल मिडीया कडून प्राप्त माहिती.)करता येईल यासाठी प्रयत्न केले.

कैची पडल्याने
वाहतूक नियमभंग
रस्त्यावरील खड्डे
रस्त्याचे काम चालू
वाहतूक फ्लो जास्त
उत्सव ,मिरवणुका
वाहन बंद पडल्याने
अपघात झाल्याने
व्हीआयपी मुव्हमेन्ट
सिग्नल बंद पडल्याने

इतर कारणे
एकुण २२७९ कारणांचा अभ्यास करण्यात आला
वाहतूक कोंडीची इतर ०२ कारणे
(रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे व मनोरुग्न महीला वाहनांवर दगड मारत असल्याने.)
वरील पैकी वाहतूक कोंडी टाळता न येणा-या कारणांपैकी १४७ ठिकाणी व उपक्रम / उत्सवांमुळे ४८ ठिकाणी झालेली वाहतूक कोंडी अशा एकूण १९५ ठिकाणच्या वाहतूक कोंडी व्यक्तिरीक्त अन्य वाहतूक कोंडींच्या कारणांमध्ये वेळीच उपाययोजना केल्याने घट झाल्याचे दिसून येते.
६) नियमभंग करणा-या वाहन चालकांवर विशेष मोहिमे अंतर्गत गतवर्षीच्या ०३ महिन्याच्या तुलनेत पाच पट वाढ तर एकुण कारवाईत दुप्पट वाढ –
विशेष मोहिम
ड्रंक अॅण्ड ड्राइर्ल्ड, ट्रिपल सिट, राँग साईड, धोकादायक
ड्राईव्हिंग, जड वाहतूक

जानेवारी ते मार्च-२०२४- २,३५,२११
जानेवारी ते मार्च-२०२५- ४,४५,८१६

नोव्हेंबर, डिसेबर / २०२३ व नोव्हेंबर, डिसेंबर २०२४ ची तुलना केली असता वाहतूक कोंडी २१ टक्क्यांनी कमी झालेली आहे. तसेच सरासरी १० कि.मी. साठी लागणारा कालावधी २०२३ च्या तुलनेत १ मिनिटानी कमी झालेला आहे. सन २०२३ या वर्षामध्ये पुणेकरांना वार्षिक वाहतूकीचे तास १०९.४५ मिनिटे एवढे लागत होते ते सन २०२४ मध्ये १०८ तास, म्हणजेच १ तास ४५ मिनीटांनी सन २०२३ च्या तुलनेत कमी लागत आहे.
एकंदरीत वरील प्रमाणे केलेल्या उपाययोजनांमुळे माहे फेब्रुवारी व मार्च-२०२५ महिन्यांतील वाहतुकीच्या गतीची तुलना मागील वर्षाचे माहे ऑगस्ट-सप्टेंबर व डिरोबर-२०२४-जानेवारी २०२५ बरोबर करता, १०.४४ व ४.९३ टक्क्यांनी गतीमध्ये सुधार झालेचे दिसुन येते, पुणे शहर पोलीसांकडून करण्यात येणा-या उपाययोजनांमुळे वाहतूकीचे गतीमध्ये नियमीत सुधारणा होत असुन सरासरी १०.५ टक्यांनी गती वाढली असल्याचे दिसुन येत आहे.
(मनोज पाटील) अपर पोलीस आयुक्त
पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर






सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेडला औद्योगिक दौरा

पुणे, २७ मार्च २०२५ – सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) च्या ऑटोमोबाइल अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकताच कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेड (थर्मल प्रोसेसिंग डिव्हिजन), रांजणगाव, एमआयडीसी  येथील औद्योगिक दौऱ्यात भाग घेतला. या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक औद्योगिक तंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादन प्रक्रियांचा अनुभव मिळाला, जो त्यांच्या शिक्षणात महत्त्वपूर्ण योगदान देणारा ठरला.दौऱ्यादरम्यान, विद्यार्थ्यांना व्हॅक्यूम फर्नेस ऑपरेशन्स, हीट ट्रीटमेंट प्रक्रिया, आणि साहित्य चाचणी प्रयोगशाळांबद्दल मूल्यवान माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेच्या घटकांच्या उत्पादनामध्ये या तंत्रज्ञानांचा महत्त्वपूर्ण टप्पा समजावून घेता आला. त्यांना ऑटोमोटिव्ह, निर्माण, टूलिंग, खनिज, एरोस्पेस, संरक्षण, आणि रेल्वे यांसारख्या उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रगत हीट ट्रीटमेंट उपायांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा अनोखी संधी मिळाली.दौऱ्याने विद्यार्थ्यांना कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेड कशी विविध उद्योगांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करते, यावर देखील प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना औद्योगिक तज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, थर्मल प्रोसेसिंग, साहित्य चाचणी, आणि गुणवत्ता आश्वासन प्रक्रियांबद्दल माहिती घेता आली.दौऱ्यावर विचार व्यक्त करताना, सुमित दुबल, प्राध्यापक, ऑटोमोबाइल अभियांत्रिकी विद्यालय, म्हणाले, “हा दौरा विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील वास्तविक अनुप्रयोगांचा अमूल्य अनुभव देणारा ठरला. यामुळे त्यांना उच्च-गुणवत्तेच्या उत्पादन प्रक्रियांची आणि तंत्रज्ञानांची समज प्राप्त झाली, जी आधुनिक जगाला आकार देणाऱ्या उद्योगांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.”

हिंदूजा फाउंडेशनचा दौंड एसआरपीएफ कॅम्पसमधील उपक्रम 124.85 दशलक्ष लिटर स्वच्छ पाणी वाचविणार

• SRPF कॅम्पस येथील 4,000 रहिवासी आणि 1,000 बिगर-रहिवाशांना लाभ

पुणे , 27 मार्च 2025: हिंदूजा ग्रुपची 110 जुनी समाजाभिमुख काम शाखा हिंदूजा फाउंडेशनने आपल्या प्रमुख जलजीवन उपक्रमांतर्गत आज दौंडमधील राज्य राखीव पोलिस दल ( SRPF) गट 5 येथे पावसाचे पाणी संकलन आणि सांडपाणी पुनर्वापर सुरू केले. हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. पॉल अब्राहम आणि SRPF चे पोलिस महानिरीक्षक श्री. अशोक मोराळे यांचे सामान्य या खोलाचे उद्घाटन. हा व्यापारी या शाश्वत जलव्यवस्थापनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

‘महाराष्ट्राचे धान्यभांडार’ ओळखल्या जाणाऱ्या संपूर्ण जा दौंडमध्ये हिरवीगार शेती आणि भीमा-पवना नद्यांच्या सान्निध्यात आणि उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई चालते. अति उष्णता , उर्भजल नियंत्रणात घट , झपाट्याने वाढणारे शहरीकरण आणि पाणीसाठय़ाच्या अपुऱ्या सुविधा अनेक भूगर्भग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

दौंड वाढती पाणीटंचाई सोडा फाउंडेशन सांडणी पुनर्वापर खुणा जमा केली आहे SRPF 5 मध्ये 9 तलाव आणि सांडपाणी पुनर्वापराची जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या उपक्रमाने एसआरपीएफ गट 5 येथे पूर्वीपासूनच कार्यान्वित मोठ्या प्रमाणातील पाणी संकलनाला आणखी बलकट केले आहे. हा उपक्रम केंद्र फॉर एन्व्हायर्नमेंटल रिसर्च एज्युकेशन (सीईआरई) या स्वयंसेवी सर्व्हिसच्या विद्यमाने आला आहे.

हिंदुजाफाऊंडेशनचे अध्यक्ष पॉल अब्राहम यांनी या उपक्रमाचा प्रभाव ठळकपणे मांडत सांगितले , “दौंड स्थानावर पाण्याचा हा मोठा प्रश्न असून यामुळे जीवनावर मोठा परिणाम होत आहे. नगरसेवक आम्ही जलसंवर्धन आणि आरोग्य प्रतिबंधात्मक नियमांमध्ये योगदान देत आहोत. लाखो जलतरण पावसाचे पाणी संकलित जलस्रोतांचे प्रदूषण व्यवस्थापन करून आम्ही अनुकूल आणि शाश्वत शहरी हरित उपक्रमासाठी आदर्श मांड करत आहोत.

जलजीवन उपक्रमांतर्गत एसआरपीएफ गट ५ येथे ६ नवीन तलाव निर्माण करण्यात आले असून , ३ जुने तलाव खोलण्यात आले आहेत . ) तसेच , 11 पुनर्भरण विहिरी आणि ओव्हरफ्लो चर उभारण्यात आले असून भूजल प्रगतीशीलता मदत होईल आणि पाण्याचे पाणी वाहून जाण्यापासून रोखले जाईल.

या कार्यक्रमाने SRPF गट 5 येथे 500 स्थानिक प्रजातींच्या वनस्पतींची लागवड करत आहे आणि 94% टिकून दर विकसित करत आहे. हा उपक्रम पुढील 15 अंदाजे 119.13 मेट्रिक टन CO ₂ शोषून सर्व मदत करेल . त्यामुळे मदत मदत होईल. 34 देशी प्रजातींचा समावेश करून , पर्यावरणाचा समतोल राखण्यात स्थानिक आणि जैवविविधतेस पाठबळ देत दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यात यश आले आहे.

एसआरपीएफ 5 जलसंवर्धन आणि रुज्जीवनाच्या प्रयत्नांच्या सर्वांगीण दृष्टीकोनाच्या पर्यावरणातील मुख्य 124.85 दशलक्ष पुनरावृत्ती गोडे पाणी वाचले आहे. याचा लाभ 4,000 रहिवासी आणि 1,000 लाभार्थी असून , 40 एकर शेती आणि 20 एकर जंगल संवर्धन होत आहे.

अलिच हिंदुजा फाउंडेशनने त्यांच्या जलजीवन उपक्रमांतर्गत प्रमुख 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश 4,000 हून अधिक गावांमध्ये 5 शलक्ष ( 50 लाख) लोकांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यात यश मिळवले.

हिंदुजा फाउंडेशनने आपल्या समूहाने अनेक ठिकाणी विविध जलस्रो पुनर्संचयित केले आहेत . त्यात प्रवेशली 100 तलावांचा समावेश आहे. स्थानिक ऐतिहासिक महत्त्वाची बावडी अहमदाबादमधील मकरबा टँक , जोधपूरमधील नवलखा बावडी , अलवार (राजस्थान) येथील राणी मूसी सागर आणि नवी दिल्लीतील हौज शामशी या चर्चांचा समावेश आहे.

हिंदुजा फाउंडेशन बद्दल:

हिंदुजा ग्रुपचे संस्थापक श्री परमानंद दीपचंद हिंदुजा यांच्या परोपकारी तत्वांवर खोलवर रुजलेले हे फाउंडेशन १९६८ मध्ये मुंबईत पहिल्यांदा स्थापन झालेले एक सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट आहे. हिंदुजा कुटुंबाच्या मार्गदर्शनाने आणि हिंदुजा ग्रुप कंपन्यांच्या पाठिंब्याने, त्याच्या ५० वर्षांच्या अस्तित्वात, शिक्षण, आरोग्यसेवा, पाणी व्यवस्थापन, शाश्वत ग्रामीण विकास, समाज कल्याण, कला आणि संस्कृती आणि क्रीडा या क्षेत्रात विकास झाला आहे. सामाजिक प्रभाव निर्माण करण्यासाठी एक संरेखित दृष्टिकोन प्रदान करण्यासाठी ते ग्रुप कंपन्यांसोबत सक्रियपणे काम करते.

श्री एकविरा देवी चैत्री उत्सव 2025 पार्श्वभूमीवर वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे, दि. 27: मावळ तालुक्यातील वेहेरगाव, कार्ला येथील श्री एकविरा देवी चैत्री उत्सव 4 एप्रिल रोजी सुरू होत असून या कालावधीत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील जड, अवजड वाहतुकीवर काही निर्बंध घालून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार यात्रा कालावधीत कार्ला फाटा ते श्री एकविरा देवी पायथा मंदिर दरम्यान पूर्ण वेळ अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश निषेध (नो एंट्री) करण्यात येत आहे. मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत जुना मुंबई-पुणे व पुणे-मुंबई महामार्गावारील कुसगाव बुद्रुक टोलनाका लोणावळा ते वडगाव फाटा, वडगाव मावळ असे अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश निषेध करण्यात येत आहे.

जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन पुणे बाजूकडे जाणारी जड-अवजड व मोठी वाहने यांना लोणावळा येथील कुसगाव बु. टोलनाका मार्गे एक्सप्रेस हायवेने उर्से टोलनाक्यामार्गे पुणे शहराकडे जाण्याकरीता वळविण्यात येणार आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी जड अवजड व मोठी वाहने ही वडगाव येथील तळेगाव फाटा येथून उर्से खिंडीतून मुंबईकडे जाण्याकरीता द्रुतगती महामार्गाचा वापर करावा. नागरिकांनी वाहतुकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. डूडी यांनी केले आहे.

जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग येण्यासाठी प्रयत्न

  • विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

टूलिंग उद्योगांच्या वाढीसाठी क्लस्टर विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. २७: राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याचे राज्यशासनाचे धोरण असून जिल्ह्यामध्ये अधिकाधिक आणि विविध क्षेत्रातील उद्योग यावेत यासाठी प्रशासनातर्फे निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध प्रशासकीय विभागांनी सामुहिक दृष्टीकोन ठेऊन एकत्रित प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसोबत उद्योजकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे सभागृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड शहरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसाच्या कृती आराखड्यांतर्गत राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या दृष्टीने उद्योगांना सर्व ते सहकार्य तसेच सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. त्यासाठी उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्यादृष्टीने दर दोन महिन्याला बैठक आयोजित करण्यात येत आहे. या बैठकीत उद्योजकांनी मांडलेल्या समस्या, अडचणींवर चर्चा केली जात असून संबंधित विभागांनी पुढील बैठकीपूर्वी त्यावर कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

उद्योगांना वीज, पाणी, रस्ते आदी पायाभूत सुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्राधान्याने द्याव्यात. त्यासाठी प्रस्ताव मंजुरी, निधीबाबतचे शासनाच्या पातळीवरील मंजुरीचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. महावितरणने अखंडित वीजपुरवठ्यासाठी फीडर, उपकेंद्रे, वीज वाहिन्या आदी यंत्रणा अद्ययावत कराव्यात. औद्योगिक वसाहतीतील रस्ते निर्मिती व दुरुस्तीला एमआयडीसीने गती द्यावी. या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी प्रयत्न करू.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्हा परिषद तसेच महसूल विभागाने समन्वयाने रस्त्यांवरील अतिक्रमणे मोकळी करावीत. सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी यापैकी त्यांच्या हद्दीतील रस्त्यांचे तात्काळ डांबरीकरण करून वाहतूक सुरू करावी. रस्ते अतिक्रमण मुक्त ठेवण्याची व सुस्थितीत राहतील याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहील.

पुणे शहरातील एकात्मिक वाहतूक आराखडा मंजुरीच्या टप्प्यात असून मंजुरीनंतर लवकरच कार्यवाहीला सुरुवात होईल. पुणे बाह्यवळण मार्गालाही गती देण्यात आली असून येत्या दोन वर्षात हा मार्ग पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. वाहतुकीच्या अनुषंगाने अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांना लागणारा आवश्यक वेळ पाहता तात्काळ करण्यासारख्या उपाययोजना हाती घेऊन उद्योगांना वाहतूक कोंडीपासून दिलासा द्यावा, असेही ते म्हणाले.

टूलिंग उद्योगांच्या वाढीसाठी क्लस्टर विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील
–जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, टूल बनविणारे लघू उद्योग हे मोठ्या उद्योगांसाठी पूरक तसेच कोणत्याही क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहेत. ते विखुरलेले असल्याने त्यांना सुविधा पुरविण्यात येत असलेल्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने जागा तसेच अन्य सुविधा उपलब्ध करुन त्यांचा समूह (क्लस्टर) विकसित करण्यासाठी व खासगी क्षेत्रातील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

पुणे- मुंबई हा देशातील सर्वात मोठा औद्योगिक कॉरिडॉर व्हावा असा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी उद्योजकांच्या समस्यांबाबत नियमितपणे बैठका आयोजित करुन त्या वेगाने सोडविण्यावर भर राहील.

महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा (मैत्री २.०) पोर्टल या एकाच व्यासपीठावरुन उद्योगांना सर्व परवानग्या, सुविधा देण्याची व्यवस्था तयार करण्यात आली आहे. पोर्टलमध्ये समाविष्ट नसलेल्या उद्योजकांच्या विविध विभागांशी संबंधित समस्या, परवानग्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसीने प्रत्येक औद्योगिक वसाहतीत एक खिडकी व्यवस्था करावी. एक खिडकी विभागाने संबंधित विभागांशी समन्वय साधून उद्योजकांच्या समस्या सोडवाव्यात, असे निर्देशही श्री. डूडी यांनी दिले.

मनपा आयुक्त डॉ. भोसले म्हणाले, एमआयडीसी तसेच उद्योगांनी आपल्या परिसरात औद्योगिक निवासी संकुले उभारावीत; जेणेकरून मनुष्यबळाचा प्रवासाचा वेळ वाचू शकेल. कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी पुढाकार घ्यावा. महानगरपालिकेशी संबंधित उद्योगांच्या समस्या गतीने सोडविण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

उद्योजकांना कोणत्याही घटकाकडून त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्यास त्यांची ओळख गुप्त ठेऊनही पोलीस विभागाकडून उपद्रव देण्याऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे, असे पोलीस अधीक्षक श्री. देशमुख यांनी सांगितले.

बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, माथाडी कामगार मंडळ, कामगार विभाग, पोलीस, जिल्हा परिषद आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

13 मिनिटांत… पुणे विमानतळ ते पूना हॉस्पिटल ग्रीन कॅारिडॅार…

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांची कमालीची तत्परता

अपघाग्रस्त पुणेकराला तातडीने पोर्ट ब्लेअरहून पुण्यात आणले

एअर एम्बुलंन्सची उपलब्धता केल्याने रुग्णावर तातडीचे उपचार

एअर एम्बुलंस रात्री ९ः३० वाजता पुणे विमानतळावर पोहोचली…

पुणे विमानतळ ते पूना हॉस्पिटलचे अंतर कापले अवघ्या १३ मिनिटांत

मोहोळ यांच्या सूचनेनंतर पुणे पोलिसांचा ग्रीन कॅारिडॅार

पुणे- सिंहगड रोड येथील लोहपात्रे कुटुंबिय सहपरिवार (पती, पत्नी, मुलगा) अंदमान निकोबार/ पोर्ट ब्लेअर येथे सहपरिवार फिरायला गेले होते. काल २६ मार्च रोजी संध्याकाळी सौ. शोभना मंगेश लोहपात्रे यांचा एका छोट्या बेटावर जबरदस्त अपघात झाला. त्यांच्या दुचाकीला एक भरधाव वाहनाने उडवले. त्या छोट्या बेटावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने रात्री उशिरा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने त्यांना उपचारांसाठी एअरफोर्सच्या मदतीने अंदमान/ पोर्ट ब्लेयर येथे रात्री १.३०-२ वाजता आणले. त्यांच्या डोक्याला मोठा मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे.

आज सकाळी मोहोळ यांच्या मदतीने एक Air Ambulance उपलब्ध झाली असून आज रात्री 9.30 वाजता ही Air Ambulance पुणे विमानतळावर येणार आहे.मुरलीधर मोहोळ यांनी तिथून पूना हॉस्पिटलपर्यंत पुणे पोलिसांना ग्रीन कॉरिडॉर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शोभना यांच्या उपचारांसाठी एक एक मिनिट महत्वाचा आहे.