Home Blog Page 391

कुणाल हा अतिरेकी,देशद्राही आहे का? शिंदे गट त्याचा खून करणार का? महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न राबवता ? संजय राऊतांचे सवाल

मुंबई-महाराष्ट्रात एकप्रकारे गुजरात किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न राबवला जात आहे. महाराष्ट्र थोडासा वेगळा आहे असे आम्हाला वाटले होते पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्याच मार्गाने नेत आहेत. अजित पवार यांचा मार्ग मला वेगळा दिसत आहे, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवारांना हे सर्व माहिती असल्याने त्यांची भूमिका आणि भाषा वेगळी आहे. पण ते कैचीमध्ये अडकलेले दिसून येत आहे. कुणाल कामरा आणि माझे कालच बोलणं झाले. मी त्याला सांगितले की आपण कायद्याला सामोरे गेले पाहिजे. कुणाल कामरा हा अतिरेकी, देशद्राही कोण आहे तो? ता काय अल कायदाचा मेंबर आहे का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.संजय राऊत म्हणाले की, प्रताप सरनाईक यांनी लक्षात घेतले पाहिजे की तुम्ही फार किरकोळ लोकं आहात. बाळासाहेब ठाकरे नाही, त्यांच्यासोबत स्वत:ची तुलना करू नका. तुम्ही चिल्लर लोकं आहात, हे लक्षात ठेवा. कुणालने कुठे यावे कुठे नाही हे ठरवणारे तुम्ही कोण आहात. तुम्ही त्याचा मर्डर करणार आहात का? तसे जाहीर करा की तुम्ही त्यांचा खून करणार आहात. ह्या सर्व गल्लीतील टोळ्या आहेत. दाऊदने जसे शुटर नेमले होते तसे यांनी राजकारणात नेमले आहे. त्यांच्याकडे असलेले गुंड हे भाडोत्री गुंड आहेत, सत्ता गेली तर ते सोबत राहणार नाही.

संजय राऊत म्हणाले की, कुणाल कामरा हे देशातील एक कलाकार, कवी, लेखक आहेत. शिंदेंचे कुणाबरोबर फोटो आहे ते आम्ही बाहेर काढू का? कुणाल हा फुटीरतावादी आहे का? त्याने मला विचारल्यावर मी सांगितले आपण कायद्याला समोर गेले पाहिजे. हा देश संविधानावर चालतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईत हे असे हल्ले आपल्याला सहन करावे लागतात. आम्हीही सुद्धा सहन केले आहे. कुणी जर कायदेशीर कारवाई केली असेल तर त्याला सामोरे गेले पाहिजे.

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या गटातील लोकांना कुणाल कामरा जर क्षत्रू वाटत असेल तर आम्ही त्याच्याशी बोलायचे नाही का? आम्हालाही वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्राचे क्षत्रू आहेत, पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोकं त्यांच्या पायाशी जाऊन बसतात. आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू.

संजय राऊत म्हणाले की, कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्यावर आणलेला हक्कभंग मान्य करण्यात असेल तात्यावर आमचे काही म्हणणे नाही. आमदारांचा हक्कभंग आणायचा अधिकार असून आमचे लोकं त्यांना उत्तर देतील. महाराष्ट्रात परिवहन खात्याचे अनेक प्रश्न आहेत, प्रताप सरनाईक यांनी त्याचा अभ्यास करावा, त्यावर त्यांनी बोलले पाहिजे. तुमच्यावर टीका केली म्हणून कुणी राष्ट्राचे शत्रू होत नाही. तुम्हाला उत्तर देण्याचा अधिकार आहे ते तुम्ही देऊ शकतात, पण त्यांची एक पद्धत असते.

२०२५ चे पहिले सूर्यग्रहण आज …

नासाच्या मते, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जातो तेव्हा सूर्यग्रहण होते, ज्यामुळे पृथ्वीवर एक सावली पडते जी काही भागात सूर्याचा प्रकाश पूर्णपणे किंवा अंशतः रोखते.

२०२५ चे पहिले सूर्यग्रहण आता काही तासांवर येऊन ठेपले आहे, ते शनिवारी होणार आहे. जगभरातील लोक या वर्षीच्या पहिल्या सूर्यग्रहणाची उत्सुकतेने तयारी करत असताना, या घटनेबद्दल उत्सुकता आधीच वाढत आहे. २०२५ चे पहिले सूर्यग्रहण हे आंशिक सूर्यग्रहण असेल नासाच्या मते, २९ मार्च रोजी होणारे आंशिक सूर्यग्रहण युरोप, वायव्य आफ्रिका, ग्रीनलँड, आइसलँड, ईशान्य अमेरिकेचे काही भाग आणि पूर्व कॅनडामध्ये दिसेल. दुर्दैवाने, चंद्राची सावली देशावरून जात नसल्याने हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. भारतीय प्रमाण वेळेनुसार (IST), आंशिक सूर्यग्रहण दुपारी २:२१ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६:१४ वाजता संपेल, ज्याचा शिखर ४:१७ वाजता असेल. जागतिक स्तरावर हे ग्रहण ३ तास ​​५३ मिनिटे चालेल. दरम्यान, अमेरिकेत, हे ग्रहण सकाळी ४:५० वाजता सुरू होईल, सकाळी ६:४७ वाजता त्याची शिखर गाठेल आणि सकाळी ८:४३ वाजता संपेल.

वैदिक ज्योतिषशास्त्रात, सूर्यग्रहणाचा काळ (सूर्यग्रहण) अशुभ मानला जातो आणि लोकांना सामान्यतः या काळात खाणे-पिणे,खरेदी टाळण्याचा सल्ला दिला जातो. ग्रहणाच्या दरम्यान ध्यानधारणा ही एक सकारात्मक क्रिया म्हणून शिफारस केली जाते. २०२५ चे आंशिक सूर्यग्रहण आशिया, आफ्रिका, युरोप, अटलांटिक महासागर, आर्क्टिक महासागर, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये दिसेल.
तथापि, वेळेतील फरक आणि घटनेच्या संरेखनामुळे, आंशिक सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार याचा परिणाम मात्र एकूण ३ दिवस जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

DD India ने आजच्या सूर्य ग्रहणाबाबत दिलेली माहिती …

म्यानमार भूकंप – 10 हजार लोकांच्या मृत्यूची भीती:बँकॉकमध्ये 30 मजली इमारत कोसळली, 704 लोकांच्या मृत्यूची पुष्टी; 110 लोक ढिगाऱ्याखाली

नायपिडॉ-म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 10 हजारांपेक्षा जास्त असू शकते. हा अंदाज युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने मांडला आहे. भूकंपाचे धक्के थायलंड, बांगलादेश, चीन आणि भारतापर्यंत जाणवले.

म्यानमारच्या लष्करी सरकारने किमान 694 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे, तर 1,670 लोक जखमी झाले आहेत. दुसरीकडे, थायलंडमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे, या आपत्तीत आतापर्यंत 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.शुक्रवारी सकाळी 11:50 वाजता म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला. म्यानमार आणि थायलंडमध्ये गेल्या 200 वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसामुळे म्यानमारच्या 6 राज्यांमध्ये आणि संपूर्ण थायलंडमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.म्यानमार, थायलंड, बांगलादेश, भारत आणि नैऋत्य चीनसह ५ देशांमध्ये याचा परिणाम दिसून आला. येथील अनेक भागात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील कोलकाता, इंफाळ, मेघालय आणि ईस्ट कार्गो हिलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. ढाका, चितगावसह बांगलादेशातील अनेक भागांना ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. बारा मिनिटांनंतर, म्यानमारमध्ये ६.४ तीव्रतेचा आणखी एक भूकंपाचा धक्का बसला.

शुक्रवारी झालेल्या ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर म्यानमारमध्ये किमान १४ भूकंपाचे धक्के बसले आहेत, असे युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार. बहुतेक भूकंपाची तीव्रता ५ पेक्षा कमी होती. सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता जो मोठ्या भूकंपानंतर सुमारे १० मिनिटांनी बसला.

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भूकंपानंतर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. यापैकी आतापर्यंत १० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बँकॉकच्या डेप्युटी गव्हर्नरने सांगितले की, बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारतींमधून १०१ लोक बेपत्ता आहेत.

महापारेषणच्या भूमिगत वीजवाहिनीत बिघाड; माण, मारूंजी,हिंजवडी फेज २ मध्ये भारनियमन टाळण्याचा प्रयत्न सुरु

पुणे, दि. २९ मार्च २०२५: महापारेषणच्या २२० केव्ही पिरंगुट-हिंजवडी-१ अतिउच्चदाबाच्या भूमिगत वीजवाहिनीमध्ये शुक्रवारी (दि. २८) रात्री ७ च्या सुमारास बिघाड झाल्यामुळे सुमारे १०० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली. भारव्यवस्थापनातून ही तूट भरून काढत महापारेषण व महावितरणकडून पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र कमाल मागणीच्या काळात सुमारे ४० मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन शक्य झाले नाही तर पुढील २४ तासांमध्ये हिंजवडी फेज-२, मेगापोलीस, माण व मारूंजी परिसरात चक्राकार पद्धतीने आवश्यकतेनुसार भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. मात्र ते टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत.

       याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही पिरंगूट-हिंजवडी-१ अतिउच्चदाबाच्या भूमिगत वीजवाहिनीमध्ये काल रात्री बिघाड झाला. महापारेषणच्या पाहणीमध्ये हिंजवडी येथे हा प्रकार घडल्याचे दिसून आले. मात्र बिघाडाचे कारण कळू शकले नाही. या वीजवाहिनीद्वारे १०० मेगावॅट विजेचे वहन केले जाते.  बिघाड झाल्यामुळे महापारेषणकडून पर्यायी वीजपुरवठाद्वारे भारव्यवस्थापन करून ही १०० मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यात आली आहे.

महापारेषणच्या २२० केव्ही पिरंगुट-हिंजवडी १ वीजवाहिनीद्वारे प्रामुख्याने हिंजवडी फेज दोन, मेगापोलीसमधील २०० आयटी उद्योगांसह माण व मारूंजी परिसरातील सुमारे १५ हजार ग्राहकांनी वीजपुरवठा केला जातो. या परिसरासाठी ४० मेगावॅट विजेची गरज आहे. तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत आहे. त्यामुळे विजेच्या भारव्यवस्थापनाचे मोठे आव्हान आहे. यात कमाल मागणीच्या कालावधीत ४० मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन शक्य झाले नाही तर हिंजवडी फेज दोन, मेगापोलीस, माण व मारूंजी परिसरात पुढील २४ तासांमध्ये आवश्यकतेनुसार चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित उद्योग व वीजग्राहकांना समाज माध्यमे व मोबाईल एसएमएसद्वारे पूर्वमाहिती देण्यात येत आहे.

दरम्यान, महापारेषणकडून बिघाड झालेल्या भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी (दि. २९) सकाळी सुरु करण्यात आले. यामध्ये खोदकाम करून वीजवाहिनीची पाहणी करण्यात येणार आहे व आवश्यकतेनुसार जाईंट देऊन दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी १२ ते २४ तासांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती देण्यात आली.

पुरंदर विमानतळाच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा- पी. वेलरासू

भूसंपादन प्रक्रियेचे तात्काळ नियोजन करुन अचूक व पारदर्शकपणे प्रक्रिया पूर्ण करा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि.२८: पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावित जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन विमानतळाचे काम सुरु करावे, अशा सूचना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी केल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पुरंदर विमानतळाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, बारामती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, पुरंदरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपअधीक्षक भूमी अभिलेख,महापारेषण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पी. वेलरासू म्हणाले, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २८३२ हे.आर. क्षेत्राचे भूसंपादन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार शासनाने मान्यता दिली आहे. मोजणीसाठी लागणारे शुल्क ४.८० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

भूसंपादन प्रक्रियेचे तात्काळ नियोजन करुन अचूक व पारदर्शकपणे प्रक्रिया पूर्ण करावी, नियोजित क्षेत्रासाठी प्रस्तावित केलेल्या गावांतील ७/१२ अद्ययावत असल्याची तसेच मोजणीमध्ये असलेल्या वस्तुस्थितीनुसार ७/१२ असल्याची, त्या गावांतील पीक पाहणी झाली असल्याची खात्री करा, ड्रोन सर्व्हेक्षण करा, जिल्हाधिकारी यांच्या नियोजित गावांमध्ये बैठका झाल्यानंतर नोटीस पाठवून मोजणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

९ एप्रिल पासून ड्रोन सर्व्हेक्षणाला सुरुवात करावी, मोजणीपूर्वी गावकऱ्यांना पूर्वकल्पना द्यावी, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

बैठकीत अधिसूचना प्रसिद्धी, ड्रोन सर्वेक्षण, मोजणी शुल्क, शासकीय जमीन वर्ग करणे, चर्चेने दर ठरविणे व निवाडा, चर्चा फिस्कटल्यास सक्तीचे भूसंपादन व निवाडा करणे, सरकारी क्षेत्र व वनक्षेत्र महामंडळास हस्तांतरीत करणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, भूमी अभिलेख व पोलीस विभाग यांनी मौजे वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपुर, मुंजवडी, खानवडी व पारगाव या ७ गावांतील संयुक्त मोजणी पूर्ण करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

0000

विद्यापीठ चौकातील पुलाची एक बाजू एक मे रोजी वाहतुकीसाठी खुली होणार

छत्रपती शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती

 पुणे, दि. २८ मार्च, २०२५ : पुणे विद्यापीठ चौकामधील ब्रेमेन चौक ते ई-स्केअर दरम्यानचा पूल येत्या एक मे रोजी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे  छत्रपती शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या पुण्यासंदर्भातील प्रश्नांची माहिती देण्यासाठी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भाजपचे दत्तात्रय खाडे, गणेश बागडे, रवींद्र साळेगावकर, सुनील पांडे, आनंद छाजेड, किरण ओरसे, सचिन वाडेकर, प्रकाश सोळंकी आदी उपस्थित होते.

विद्यापीठ चौकातील पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. दरम्यान या चौकात बाणेर आणि राजभवनकडे येणाऱ्या पुलाचे काम ऑगस्टपर्यत पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिरोळे यावेळी म्हणाले.पुणे शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात यावे अशी मागणी विधानसभेत केल्याचे सांगत शिरोळे पुढे म्हणाले की, “पुण्यातील सीसीटीव्ही हे पोलीस, महानगरपालिका, मेट्रो आणि अन्य काही खासगी संस्थांच्या माध्यमातून चालवण्यात येतात. या कॅमेऱ्यांच्या दर्जामध्ये फरक आहे. त्याची देखभाल देखील होत नाही हे लक्षात आले.  गुन्ह्यांना आळा घालणे, वाहतुकीचा प्रश्न सोडवणे यासाठी सीसीटीव्ही हा महत्वाचा घटक झाला असून पुण्यात सध्या १० हजार कॅमेरे आहेत. भविष्यात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम ठेवायची असले तर  पुण्यात आणखीन १० हजार कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. पोलिसांच्या दृष्टीने महत्वाचे असणारे निर्णय घेणे शक्य व्हावे, असे धोरण असायला हवे हे लक्षात घेत सीसीटीव्हीसाठीचे सर्वसमावेशक धोरण  येत्या महिन्याभरात करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.”

सर्व सरकारी रुग्णायालयात मेडिकल तज्ज्ञ नाहीत, त्यासाठी आपण जर आऊट सोर्सिंग करू शकलो, तर त्याचा फायदा मिळू शकतो असा विचार करीत त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शिरोळे म्हणाले. ससून रुग्णालयामध्ये प्रशासकीय स्थिरता नाही, अनेकदा तिथली एमआरआयची सुविधा बंद असते, त्यामुळे रुग्णांना बाहेर जावे लागते. तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याची सूचना सरकारला केली असल्याचे शिरोळे म्हणाले.  मुंबईमध्ये वेगाने विकास होत आहे, नवी मुंबईमध्ये विमानतळ होत आहे, त्यामुळे पुणे-मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर प्राधिकरण स्थापन करण्याची  मागणी केल्याची माहिती शिरोळे यांनी दिली.यासोबतच अंमली पदार्थांचे वाढते सेवन लक्षात घेत त्यामध्ये सोशल ऑडिट करण्याची मागणी सभागृहात केली आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिकेमध्ये विलीनीकरण करण्याच्या संदर्भात येत्या १५ दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अध्येक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.जीबीएस रुग्णांसाठी अनुदानात वाढ मिळावी अशी मागणी मी अधिवेशानादरम्यान केली होती यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जीबीएस रुग्णांना होणारा त्रास तसेच रुग्णाच्या नातेवाईकांचा होणारा खर्च याचा विचार करून आयुष्मान योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना याद्वारे २ लाखापर्यंत दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन सभागृहाला दिले. शिवाय एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत ३ महिने वाढवा अशी मागणी मी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांकडे केली होती तिच्यावरही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत वाढवून मिळाल्याने सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला. अधिवेशनात वेगेवेगळे विषय मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल शिरोळे यांनी समाधान व्यक्त केले.

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना लकी ड्रॉ ७ एप्रिल

 मुंबई, २८ मार्च २०२५-

महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहकांच्या सहाय्याने लकी ड्राफ्टची क्षमता पध्दतीने दि. ७ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात येत आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक प्रमाणे पहिल्या क्रमांकासाठी ६५१ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन बक्षीस म्हणून दिले जाते. तर प्रत्येक उपविभागात प्रत्येक दोन विजेत्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट व प्रत्येक दोन ग्राहकांना फोन नंबरसाठी १३०२ विजेत्या स्मार्ट वॉच बक्षीस म्हणून दिले जाते. याढीपुल लकी ड्रा मे व जून २०२५ या विरोधाभासी कारणे आहेत.

महावितरण योजना वीज बिल भरणा ग्राहकांचा टक्का विकास करण्याच्या उद्देशाने लकी डिजिटल ग्राहक सुरू केली आहे. या सर्वांसाठी वीज बिल भरणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३, २०२५ या घटनात भाग मे तीन  वा तीनपेक्षा अधिक वीजबिले भरून ग्राहकांच्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू ( एल टी-लाईव्ह) वीजग्राहकांसाठी लागू असून , ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी एक वर्ष म्हणजे ०.०१.२०२३ ते ३१.०३.२०२४ या स्वरात एकदा वीज देवाचा भरणा किंवा वीज देयक भरणा वापरला नाही. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in भेट द्यावी.

ग्राहक रांगेत राहण्यापेक्षा वेळ , वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा , यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ , महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना देय ग्राहकेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. जनता सध्या ७० टक्के अधिक वीज ग्राहक पध्दतीने वीज बिल भरत आहेत. हे प्रमाण वाढवण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबत आहे.

या प्रत्येकाच्या प्रत्येक ग्राहकाने नेट बँकिंग , डेबिट कार्ड ,  क्रेडिट कार्ड , युरोपीय , वॉलेट , कॅश कार्ड , एनएसीएच , क्यूआर कोड , एनईएफटी , आरटीजीएस इ. विजेचा वीज बिल भरणे पर्याय वापरून लोकांच्या अगोदर दरमहा एकाप्रमाणे तीन किंवा तीनपेक्षा जास्त वीज बिल भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in भेट द्यावी.

राज्यातील ५६० गोशाळांना पहिल्या टप्प्यात २५ कोटी ४५ लाखांचे अनुदान वितरित

पुणे : देशी गाईंची उत्पादन क्षमता कमी असल्यामुळे त्यांचे संगोपन करणे व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीर ठरत नाही, अशा गाईंना गोशाळेत ठेवण्यात येते.  गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गोशाळेतील गाईंना प्रतिदिन ५० रुपये अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी शासनाने गोवंश परिपोषण ही योजना राबवली आहे.    

या अंतर्गत राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ हजार ५६९ गाईंसाठी, २५ कोटी ४५ लाख ६६ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी अभियानाला शुभेच्छा दिल्या, अशी माहिती गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.

आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, उद्धव नेरकर, संतकुमार गुप्ता, मनीष वर्मा, परेश शाह, दीपक भगत, सदस्य सचिव डॉ. मंजुषा पुंडलिक यांनी  विशेष परिश्रम घेतले.

शेखर मुंदडा म्हणाले, गोवंश परिपोषण योजनेचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आहे. गोशाळांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या गाईंना परिपोषणासाठी अनुदान देण्यात येत आहे. देशी गोवंश संवर्धन ही काळाची गरज असून त्यामुळे ग्रामीण विकास गतिमान होण्यास मदत होणार आहे. 

प्रशांत कोरटकरसोबत फडणविसांच्या कार्यालयातील प्रतिक पडवेकर होता का? मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा: अतुल लोंढे

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला मदत करणारे कोण?

मुंबई, दि. २८ मार्च २०२५
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकला तेलंगणातील मंचरेला येथून अटक करण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे परंतु अटक केली त्यावेळी कोरटकर सोबत मुख्यमंत्री कार्यालतील कर्मचारी प्रतिक पडवेकर होता, त्यांना सोबत घेऊनच कोल्हापूर पोलीस आले, हे खरे आहे का? याचा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

प्रशांत कोरटकर अटकेसंदर्भात गौप्यस्फोट करत अतुल लोंढे म्हणाले की, आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक करण्यात आली त्यावेळी प्रतिक पडवेकर हा प्रशांत कोरटकर सोबत होता. मग त्यांना का लपवून ठेवले आहे, त्याला का दाखवत नाहीत. महिनाभर प्रशांत कोरटकरला खरी मदत कोण करत होते, ते पुढे का येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. प्रशांत कोरटकरच्या अटकेसंदर्भात काही माहिती का लपवली जात आहे? हा प्रश्न पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे प्रेमी असाल तर गृहमंत्र्यांनी सर्व माहिती जाहीर करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर महिनाभर लपून बसला होता, त्याला कोणी साथ दिली, कोणाच्या आशिर्वादाने तो लपला होता याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत आणि महाराष्ट्राच्या जनतेला ती जाणून घेण्याचा हक्क आहे असेही काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण:मद्रास हायकोर्टाचा दिलासा

‘आयुष्याची कॉमेडी’ करण्याचा इशारा दिला सुधीर मुनगंटीवार यांनी

मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकात्मक गाण्यामुळे अडचणीत सापडलेल्या कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाने 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. यामुळे कामराला तूर्त अभय मिळाले आहे. दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी कुणाल कामरावर टीकेची झोड उठवत त्याच्या ‘आयुष्याची कॉमेडी’ करण्याचा इशारा दिला आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्याच्या या विधानामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कामराच्या हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कामराविरोधात समन्स बजावला आहे. यामुळे त्याच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे.

या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने मद्रास हायकोर्टात धाव घेऊन अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. हायकोर्टाने त्याच्या याचिकेवर शुक्रवारी तातडीने सुनावणी करत त्याला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले. कोर्टाच्या या निर्णयामुळे कुणाल कामरावरील अटकेची टांगती तलवार तूर्त दूर झाली आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनीही या प्रकरणी कुणाल कामरावर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांना कुणाल कामराच्या आयुष्याची कॉमेडी करण्याचा सल्ला दिला आहे. पोलिसांनी त्याला पकडावे व त्याच्या आयुष्याची कॉमेडी करावी. त्याला खूप मस्ती आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही काहीही बोलू शकत नाही. हा स्वैराचार आहे. प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. केतकी चितळेने कुणाचेही नाव घेतले नव्हते. त्यानंतरही तिला 30 दिवस तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणी आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘सौगात-ए-मोदी’ म्हणजे ‘सौ चुहे खाके के बिल्ली हज को चली’! : हर्षवर्धन सपकाळ

दरवर्षी दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पेट्रोल ४० रुपये लिटर करण्याच्या ‘सौगात’चे काय झाले?

मुंबई, दि. २८ मार्च २०२५
नरेंद्र मोदी एक राजकीय व्यक्तीमत्व म्हणून २००२ साली गुजरात मध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर उदयाला आले. या दंगलीत मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकावर अत्याचार झाले, त्यांचे मॉब लिंचिंग झाले, ही सर्व जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे असे तत्कालीन परिस्थितीत म्हटले गेले. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची जगाला, देशाला ओळख झाली. पुढे राजकारण करत असताना अल्पसंख्याक सामाजाला एकही तिकीट न देणे, एकही मंत्रीपद न देणे, मोदींच्या पक्षातील आणि त्यांच्या मातृसंस्थेतील सहकाऱ्यांनी या समाजावर अत्यंत खालच्या भाषेत अपमानजनक वक्तव्ये व अत्याचार केले. हे सर्व पाहता सौगात-ए-मोदी म्हणजे सौ चुहे खा के बिल्ली हज को चली, असे आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

ईद निमित्त भारतीय जनता पक्ष ३२ लाख मुस्लीम कुटुंबाला ‘सौगात-ए-मोदी’ कीट देणार असल्याच्या मुद्द्यावर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ही ‘सौगात’ देत असताना दर वर्षी दोन कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दिडपट भाव देणार, विदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, पेट्रोल ४० रुपये तर डिझेल ३५ रुपये लिटरने देणार, अशी आश्वासने २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिली होती, त्या ‘सौगात’ची देश आजही वाट पहात आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरु

काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती

निरीक्षकांच्या अहवालानंतर पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल होणार

मुंबई दि. २८ मार्च २५
काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा आणि बळ देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतर संघटनेत बदल करण्यात येणार आहेत.

फेरबदलाच्या या प्रक्रियेत मंडल स्तरापासून प्रदेश पातळीपर्यंत काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक ते बदल केले जाणार आहेत. रिक्त पदावर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. तसेच जिथे आवश्यक आहे तिथे नवीन चेह-यांना जबाबदारी दिली जाणार आहे. या संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षकांची बैठक आज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, प्रफुल्ल गुडदे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, मोहन जोशी उपस्थित होते. या बैठकीत प्रांताध्यक्षांनी निरीक्षकांना यासंदर्भात सूचना केल्या. हे सर्व निरीक्षक त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून १५ दिवसांत प्रदेश काँग्रेसला आपला अहवाल सादर करणार आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संघटनात्मक फेरबदलांच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

ब्रिटनचे खासदार म्हणाले- जालियनवाला घटनेवर ब्रिटिश सरकारने भारताची माफी मागावी

लंडन-ब्रिटनमधील विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी १९१९च्या जालियनवाला बाग हत्याकांडासाठी ब्रिटिश सरकारने भारतीय जनतेची औपचारिक माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यांनी गुरुवारी संसदेत सांगितले की, ब्रिटिश सरकारने 13 एप्रिलपूर्वी माफी मागावी.

जालियनवाला बाग हत्याकांडाचा १०६ वा स्मृती दिन पुढील महिन्यात साजरा केला जाईल. ब्रिटिश खासदार ब्लॅकमन यांनीही त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आपल्या भाषणात, ब्लॅकमन म्हणाले-बैसाखीच्या दिवशी अनेक लोक त्यांच्या कुटुंबासह शांततेत जालियनवाला बागेत सामील झाले. जनरल डायरने ब्रिटीश सैन्याच्या वतीने आपले सैनिक पाठवले आणि त्यांना गोळ्या संपेपर्यंत निष्पाप लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले.खासदार ब्लॅकमन म्हणाले- जालियनवाला हत्याकांड हा ब्रिटिश साम्राज्यावरील कलंक आहे. यामध्ये १५०० लोक मृत्युमुखी पडले आणि १२०० जण जखमी झाले. अखेर, ब्रिटीश साम्राज्यावरील या डागासाठी जनरल डायरची बदनामी झाली.

ब्रिटिश खासदार पुढे म्हणाले – मग आपण सरकारकडून काय चूक झाली हे कबूल करणारे आणि भारताच्या लोकांची औपचारिक माफी मागितली गेली का असे निवेदन मिळवू शकतो का?आजपर्यंत कोणत्याही ब्रिटिश पंतप्रधानांनी जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल माफी मागितलेली नाही. तथापि, अनेक ब्रिटिश नेत्यांनी वेळोवेळी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे, परंतु अधिकृतपणे कोणतीही माफी मागितलेली नाही.

२०१३ मध्ये तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी जालियनवाला बाग स्मारकाला भेट दिली होती. त्यांनी या हत्याकांडाला लज्जास्पद घटना म्हटले होते पण कधीही माफी मागितली नाही. यानंतर, ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी १० एप्रिल २०१९ रोजी या हत्याकांडाच्या १०० व्या वर्धापन दिनापूर्वी एक विधान केले.

थेरेसा मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांड हे ब्रिटिश-भारतीय इतिहासातील सर्वात लज्जास्पद कलंक असल्याचे वर्णन केले होते. त्यानेही दिलगिरी व्यक्त केली पण माफी मागितली नाही. १९९७ मध्ये भारत भेटीदरम्यान, ब्रिटीश राणी एलिझाबेथ यांनी ही एक दुःखद घटना असल्याचे वर्णन केले.तज्ज्ञांच्या मते, जर ब्रिटीश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल अधिकृतपणे माफी मागितली तर ते अनेक कायदेशीर आणि आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकू शकते. जर माफी मागितली गेली तर पीडित कुटुंबांकडून भरपाईची मागणी बळकट होऊ शकते.ब्रिटनला असा आर्थिक भार टाळायचा आहे, कारण त्याच्या वसाहती इतिहासात अशा अनेक घटना आहेत ज्या माफी मागण्यासाठी एक आदर्श ठेवू शकतात.

रौलेट कायद्याचा निषेध करण्यासाठी लोक जालियनवाला बागेत आले होते-भारतातील क्रांतिकारी कारवायांना आळा घालण्यासाठी ब्रिटिश सरकारने रौलेट कायदा लागू केला. त्यात खटल्याशिवाय ताब्यात ठेवण्याची आणि गुप्तपणे खटले चालवण्याची तरतूद होती. याबद्दल भारतीय जनतेमध्ये संताप होता. याचा निषेध करण्यासाठी लोक जालियनवाला बागेत जमले होते.या मेळाव्यात महिला, मुले आणि वृद्ध लोकही उपस्थित होते. ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर यांनी आपल्या सैन्याला कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार करण्याचे आदेश दिले. या सैन्यात गोरखा आणि बलुच रेजिमेंटचे सैनिक होते, जे ब्रिटिश भारतीय सैन्याचा भाग होते.ब्रिटिश सरकारच्या मते, या हत्याकांडात ३७९ लोक मारले गेले. तथापि, असे म्हटले जाते की मृतांचा आकडा १००० पेक्षा जास्त होता. जालियनवाला बागेतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता. रस्ता अरुंद असल्याने लोक पळून जाऊ शकत नव्हते. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी विहिरीत उड्या मारल्या, जिथे त्यांचे मृतदेह नंतर सापडले.असे करण्यामागे डायरचा उद्देश नि:शस्त्र लोकांमध्ये दहशत पसरवणे होता, जेणेकरून स्वातंत्र्याची मागणी दडपता येईल. या हत्याकांडामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट निर्माण झाली. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांचा शूरवीर दर्जा सोडला आणि महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली.

म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप, 20 जणांचा मृत्यू:बँकॉकमध्ये इमारत कोसळल्यानंतर 80 जण बेपत्ता; 3 ठार; भारतासह 5 देशांमध्ये हादरे

नेपिता-शुक्रवारी सकाळी ११:५० वाजता म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. भारत, थायलंड, बांगलादेश आणि चीनसह पाच देशांमध्ये त्याचे धक्के जाणवले. म्यानमार आणि थायलंडमध्ये २३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.म्यानमारमध्ये २० जणांचा मृत्यू झाला, तर येथे ३०० जण जखमी झाले. त्याच वेळी, थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली ३० मजली इमारत कोसळली. या साईटवर ४०० लोक काम करत होते. यापैकी ८० लोक बेपत्ता आहेत, तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे.या ५ देशांच्या वेगवेगळ्या भागात शेकडो लोक घाबरून घरे आणि कार्यालये सोडून पळून गेले. मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसामुळे थायलंडचे पंतप्रधान पिथोंगटार्न शिनावात्रा यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.यूएस जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) नुसार, मध्य म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू सागाईंग शहराच्या वायव्येस १६ किमी (१० मैल) अंतरावर १० किमी खोलीवर होता.
म्यानमार, थायलंड, बांगलादेश, भारत आणि नैऋत्य चीनसह ५ देशांमध्ये याचा परिणाम दिसून आला. येथील अनेक भागात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील कोलकाता, इंफाळ, मेघालय आणि ईस्ट कार्गो हिलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. ढाका, चितगावसह बांगलादेशातील अनेक भागांना ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. बारा मिनिटांनंतर, म्यानमारमध्ये ६.४ तीव्रतेचा आणखी एक भूकंपाचा धक्का बसला.

म्यानमारमधील ऐतिहासिक राजवाडा मंडाले पॅलेसच्या काही भागांचे नुकसान झाले आहे. त्याच वेळी, भूकंपात सागाईंग प्रदेशातील सागाईंग टाउनशिपमधील एक पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. राजधानी नायपिताव व्यतिरिक्त, क्युक्से, पिन ओओ ल्विन आणि श्वेबो येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या शहरांची लोकसंख्या ५० हजारांपेक्षा जास्त आहे.

अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक-शिक्षक सभा उत्साहात

पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षणाच्या नंतरच्या पवार कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च पर्वती , पुणे जिल्ह्याच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे पालक पालकांचे दर्शनासाठी आले होते. पालकांचे प्रश्न , एकत्र, पालकांच्या समस्या आदि विषयावर चर्चा करून शिक्षक पालक यांच्यात साधकता यावा उद्देशाने पालक सभा बोला लोकशाही आली होती . या कंस डॉ.दत्तात्रय कांबळे यांनी बदलणारे तंत्रज्ञान आत्मसात करून स्वत:मधील सुप्त कौशल्याचा विकास कर्मचारी यांच्याबरोबरच, एक यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न पहिल्यांदाच उरी धारण करण्याचा मंत्र दिला. प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ.बालाजी सेलूकर यांनी आजची बदली परीक्षा,अभ्यासाचे बदली या सर्वांचा आर्थिक विकास होणार आहे आणि त्याचे परिणाम होणार आहेत. प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे असे सांगून मार्गदर्शन केले. या पालकांनी सर्व वर्गशिक्षक आणि पालकांनी शंकांचे निरसन केले. सदर अभ्यासासाठी प्राचार्य डॉ.सुनील ठाकरे, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ.बालाजी सेलूकर, डॉ. दत्तात्रय कांबळे, कुल कुल प्रा.नवनाथ सरोदे . सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. या स्वतःचे सूत्रसंचालन डॉ.गायत्री कांबळे यांनी केले. शिक्षक पालकाने शिक्षकांचे प्रश्न केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षणाच्या सरचिटणीस मा. सौ. प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.