Home Blog Page 3855

भरत जाधव आणि अमृता सुभाष ही जोडी रुपेरी पडद्यावर!!

0

‘सत्या व्हिजन अचिव्हर्स स्पेक्ट्रम फिल्म्स’ च्या कल्पना सेट्टी, संगीता बालचंद्रन आणि सहनिर्माते प्रणव विनोद पाठक यांची पहिली-वहिली सिनेनिर्मिती असलेला सांगितला बालचंद्रन दिग्दर्शित ‘चिंतामणी हा सिनेमा येत्या ३१ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच सिनेमातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
‘चिंतामणी’ सिनेमाची कथा ही एका मध्यमवर्गीय माणसाच्या असामान्य कर्तुत्वाची आहे. मुंबईच्या चाळीत आपल्या बायको आणि मुली सोबत राहणारा ‘चिंतामणी’ आपल्या घरच्यांच्या आणि स्वतःच्या छोट्या-मोठ्या गरजा परिस्थितीमुळे भागवू शकत नाही त्यामुळे त्याला होणाऱ्या वेदनांची ही गोष्ट आहे. श्रीमंत माहेर असलेली प्रेमविवाह करून आणलेली बायको, सासऱ्यांच्या मते कुचकामी ठरलेला तिचा पती चिंतामणी. आपले बाबाही सुपरहिरो असावेत अशी माफक इच्छा असलेली १० वर्षाची मुलगी. त्यांच्या अपेक्षेला चिंतामणी कधीच उतरलेला नसतो. मध्यमवर्गीय वृत्ती आणि पैसा आड येतो. इच्छा प्रत्येकाच्या मनात असतात पण त्यासाठी धमक लागते पण तीदेखील या चिंतामणीत नाही. ‘आल अंगावर घेतलं शिंगावर’ खरय अगदी अशीच गोष्ट चिंतामणीच्या आयुष्यात घडते. वर्तमानपत्र आणि अनेक इतर माध्यमातून आज विविध प्रकारच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या आपण आवर्जून वाचतो ही. परंतु …एक जाहिरात तुमच आयुष्य बदलू शकते? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘चिंतामणी’ हा सिनेमा पहावा लागेल.
सिनेमाची कथा जशी सिनेमाच्या सुरुवातीला मला जशी सांगण्यात आली तशीच ती पडद्यावर उतरवली याचा मला जास्ती आनंद असून दिग्दर्शिका संगीता बालचंद्रन यांचे करावे तेवढे कौतुक कमी असल्याचे अभिनेते भरत जाधव यांनी सांगितले. आजवर रसिक प्रेक्षकांनी मला अनेक भूमिकांमधून पाहिले आहे परंतु या सिनेमातील माझी व्यक्तिरेखा रसिक प्रेक्षकांना नक्कीच पसंतीस पडेल असा विश्वास अभिनेते भरत जाधव यांनी व्यक्त केला.
आजवर अनेक सिनेमांमध्ये मी काम केले असून अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ असून ही संधी मला संगीता बालचंद्रन यांनी दिली यासाठी मी त्यांची आभारी असल्याचे अभिनेत्री अमृता सुभाष यांनी सांगितले.
‘चिंतामणी’ सिनेमात अभिनेते भरत जाधव, अभिनेत्री अमृता सुभाष, रुचिता जाधव आणि बालकलाकार तेजश्री वालावलकर यांच्या मुख्य भूमिका असून उदय टिकेकर, हेमांगी राव, मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, जयराज नायर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, माधव देवचक्के आणि मोनिका दबडे यांच्याही भूमिका ही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सिनेमाची कथा दीपक अनंत भावे यांची असून पटकथा आणि संवाद किरण श्रीनिवास कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांनी लिहिले आहेत. या सिनेमात तीन वेगळ्या बाजाची गाणी असून ही गाणी अरविंद जगताप, सागर खेडेकर आणि संजीव कोहली यांनी लिहिली असून या तिन्ही गाण्यांना संजीव कोहली यांनीच संगीत दिले आहे. सुरेश सुवर्णा यांनी सिनेमाचे कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे.
येत्या ३१ ऑक्टोबरला …एक जाहिरात तुमच आयुष्य बदलू शकते का ? हे ‘चिंतामणी’ सिनेमातून आपल्याला उलगडणार आहे.

रमेश बागवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

0

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ भवानी पेठेतील भवानी माता मंदिर येथून सकाळी झाला . रमेश बागवे आणि त्यांच्या पत्नी सौ. जैन्नब बागवे यांनी खना नारळाने ओटी भरून भवानी मातेचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. आजचा प्रचार प्रभाग क्रंमांक ४७ हरकानगर , राजेवाडी या भागात झाला .
भवानी माता मंदिर , प्रथम – जुना मोटार स्टण्ड , सरस्वती सोसायटी , पदमजी चौकी , कादरी मंझील , जिज्ञाचा मार्गसा वसाहत , मिलिंद मंडळ , जयभीम मंडळ , एस. आर. ए. वसाहत , पत्र्याची चाळ , प्रगतीशील मंडळाच्या गल्लीमधून , कॉलनी नंबर १२ , बाहेर निघून ए. डी. कॅम्प चौक , किराड हॉस्पिटल , संत कबीर चौक , भोर्डे आळी , इस्लामपुरा . रास्ते मांग वाडा , राजेवाडी , भवानी पेठ पोलिस लाईन , पदमजी चौकातून निशात टाकीज , गाडी अड्डा , मंजुळाबाई चाळ , वॉचमेकर चाळ , गणपत भोई चाळीतून चुडामण तालीम चौक , नवीन हिंद समोरून चुडामण तालीम वसाहत , बाहेर निघून ७१७ भवानी पेठ कब्रस्थान मागे , हरकानगर वसाहत , ५१२ भवानी पेठ , मेमजादे अपार्टमेंट , बर्फाचा कारखाना , तबेला , नानेशा कॉर्नर अशा मार्गाने समारोप झाला .
या पदयात्रेत पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, हाजी नदाफ , नगरसेविका लता राजगुरू , नगरसेविका लक्ष्मी घोडके , नगरसेवक अविनाश बागवे , माजी उपमहापौर प्रकाश मंत्री , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक संगीता पवार , करण मकवानी , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष विनोद संघवी , शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी, नगरसेवक सुधीर जानजोत, स्थायी समिती माजी अध्यक्ष रशीद शेख ,अनिस सुंडके ,पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजित दरेकर , रमेश अय्यर , जया किराड , विठ्ठल थोरात , वाल्मिक जगताप , रफिक शेख , सोमनाथ किराड , विरु किराड , झोपडपट्टी सेलच्या महिला अध्यक्षा सुरेखा खंडागळे , भगवान धुमाळ , राजेश शिंदे , राजाभाऊ चव्हाण , बबलू सय्यद , स्मिता मुळीक, चेतन अग्रवाल , सुनील घाडगे , जोस्वा रत्नम , जोसेफ अंथोनी , रशीद खिजर , व कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी , सेवा दल व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते .

मत विभाजनाने गोंधळ कि कोणा एकालाच प्रचंड बहुमत ?

0

शिवसेना-भाजप महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्यामुळे राज्यात पंचरंगी लढती होणार असून या परिस्थितीत शिवसेना – भाजप – मनसे यांच्या मतांमधील विभाजन होणार असल्याचे मत मांडण्यात येत आहे यात आघाडी आणि महायुती तुटल्याचा राजकीय तोटा शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांना सर्वाधिक सहन करावा लागणार आहे. असा दावा करण्यात येतो आहे कॉंग्रेसचा परंपरागत मतदार राज्यात आता ठामपणे काँग्रेस च्या पाठीशी उभा राहतो काय ? हा हि प्रश्न निर्माण झाला आहे एकंदरीतच मत विभाजनाने गोंधळ कि कोणा एकालाच प्रचंड बहुमत ? हा सवाल आता अनेकांना त्रस्त करतो आहे , मतदार राजाच्या हातीच आता महाराष्ट्राचे भवितव्य आहे .
गेल्या २५ वर्षांत शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष युती म्हणून लढत असल्यामुळे परस्परांच्या ​विरोधात उमेदवार उभे केले जात नव्हते. जेथे सेनेचा उमेदवार असे तेथील भाजपचे कार्यकर्ते हे शेजारच्या भाजपचा उमेदवार असलेल्या मतदारसंघात प्रचाराचे काम करीत. तसेच सेनेच्या बाबतीतही असे. परंतु सेनेकडे मुंबई, मराठवाड्यात संघटनात्मक जाळे असल्यामुळे त्याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना होत असे. आता शिवसेना व भाजपला परस्परांविरोधात लढायचे आहे. त्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावरच महायुती तुटल्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचाही गोंधळ उडाला आहे.
शिवसेना-भाजप युती असती तर मुंबईत २५च्या आसपास जागा निवडून आल्या असत्या. परंतु आता शिवसेनेचा उमेदवार असेल तेथे भाजपचा उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे युतीच्या मतांचे विभाजन होईल. त्यात काँग्रेसच्या उमेदवारांचा काही मतदारसंघांत फायदा होईल, अशी भीती आता दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना वाटत आहे. मुंबईत काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीची ताकद नगण्य आहे. त्यामुळे आघाडी तुटली तरी मुंबईत काँग्रेसला फटका बसणार नाही. मात्र काँग्रेसबरोबरची आघाडी तुटल्यामुळे मुस्लिम, दलित आणि उत्तर भारतीय मतांचा फटका मुंबईतील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसेल की काय, अशी राष्ट्रवादी उमेदवारांना शंका आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असल्याने हा धोका आहे.

सामान्य माणसाच्या घरापर्यंत काय पोहोचले ? रमेश बागवेंचा सवाल

0

आता संपूर्ण बहुमताचे सरकार चालविण्याची संधी केंद्रात भाजपला मिळाली आहे; तरीही सामान्य माणसाच्या थेट घरापर्यंत काय पोहोचले आहे ? सध्या केंद्रात असलेल्या सरकारने कोणते आश्वासन पूर्ण केले ?.महागाई , भ्रष्टाचार , बेरोजगारी यावर सारेच बोलतात पण काँग्रेस ने प्रत्यक्ष काम केले , भ्रष्टाचार प्रकरणी प्रसंगी आपल्या माणसांची हि गय काँग्रेस ने केली नाही . सर्व जाती धर्मांना बरोबर घेवून जाणारा काँग्रेस हाच पक्ष आहे ज्याला गांधी घराण्याच्या बलिदानाची परंपरा आहे . देशासाठी बलिदान देणाऱ्या , स्वातंत्र्य चळवळीतला हा पक्ष आहे पंतप्रधानपदाच्या खुर्चीचाहि प्रसंगी त्याग केलेला हा पक्ष आहे; इथे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी खेचाखेची नाही . गेल्या काही वर्षात इतर राजकीय पक्षांना बरोबर घेवून आघाडी करीत काँग्रेस ने देशाची हि सत्ता चालविली त्यावेळी इतर पक्षांनी वेळोवेळी अडचणी निर्माण केल्या . आता जनतेने बहुमताने राज्यात काँग्रेस ला निवडून द्यावे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण सारखे नेतृत्व या राज्याचे कसे सोने करेल हे दिसून येईल असे प्रतिपादन आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी येथे केले
आज प्रचारा दरम्यान त्यांनी आपल्या मतदारांशी संवाद साधला , ते म्हणाले , ‘ राज्यात काँग्रेस ला पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमताने जनतेने सत्ता प्रस्थापित करण्याची संधी द्यावी म्हणजे काँग्रेस आम जनतेसाठी काय करू शकते हे स्पष्ट दिसेल . जनतेला संभ्रमात पाडायची कामे विरोधी पक्ष करीत आहे. केंद्रात संपूर्ण बहुमताने भाजपचे सरकार आहे. पण तरीही थेट सामान्य माणसाच्या घरापर्यंत अजूनही काही पोहोचलेले नाही , केंद्रातल्या सरकारने प्रांता – प्रांतात , माणसा -माणसात दरी निर्माण करून जनतेच्या मूळ पक्षांकडे दुर्लक्ष करू नये म्हणून त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी देखील राज्यात काँग्रेस च्या बहुमताचे सरकार येणे गरजेचे आहे . माझ्या मतदार संघातील सामान्य – मध्यमवर्गीय माणसाला शांततेने , समाधानाने, आनंदी जीवन कसे व्यतीत करता येईल याकडे आपल्या विकासकामांचा कल राहील . वर्षानुवर्षे माझी येथील सामान्य जनतेशी थेट नाळ जोडली गेली आहे असेहि ते म्हणाले

अम्मा तुरुंगात गेल्याने सहा आत्महत्या …

0

e0488a04-d00c-4a30-adca-c1ed7e80b7ceWallpaper2

चेन्‍नई: बेंगलुरूच्या कोर्टानेसाडेसहासष्ट कोटींची संपत्ती सापडल्यामुळे एआयएडीएमकेच्या अध्यक्षा जयललिता यांना दोषी ठरवल्यानंतर जवळपास 6 जणांनी आत्महत्या केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे तर 10 जणांना हृदयविकाराचा झटका आला आहे. याशिवाय दोन जणांनी स्वतःला आग लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एक 12वीत शिकत असलेला विद्यार्थी आहे. तर दुसरीकडे त्रिपूर येथे एआयएडीएमके समर्थकाने आपले बोट कापून घेतले आहे. जयललिता यांच्या विरूध्दचा आरोप सिध्द झाल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. सोमवारी जयललिता यांच्या जवळचे पनीरसेल्वम यांना पक्षातर्फे तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यात आले असून ते आज मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.असे वूत्तसंस्थांनी म्हटले आहे
तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांना 18 वर्षे जुन्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षे कारावास आणि 100 कोटी रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना बेंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद करण्यात आले आहे. जयललिता या ठिकाणी कैदी क्रमांक 7402 आहेत. विशेष म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची व्हीआयपी सुविधा पुरवण्यात आलेली नाही.
सोशल वेलफेअर फंडचे चेअरमन आणि एआयएडीएमकेच्या महिला विंगची उपसचिव सी. आर. सरस्‍वती म्हणाल्या की, राज्यातील प्रत्येक जण जयललिता यांना आईप्रमाणेच मानतो. पक्षाच्या नेत्यांकडून चाहत्यांनी, कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे कोणतेच पाऊल उचलून नये असे अपिल केले आहे.

“लाईफ स्कूल फाऊंडेशन’तर्फे “सुपर अचिव्हर्स’ विद्यार्थ्यांनी “मर्सिडिझ’ मधून केली लोणावळा सैर!

0

q

पुणे :
दहावीत चमकदार कामगिरी करणाऱ्या “सुपर अचिव्हर्सना’ आणखी प्रेरणा देण्यासाठी “लाईफ स्कुल फाऊंडेशन’ (कोेरेगांव पार्क) तर्फे आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी 40 विद्यार्थ्यांना 10 “मर्सिडीज्‌ ‘ गाड्यांमधून पुणे-लोणावळा सफर घडविण्यात आली. “लाईफ स्कूल’चे संस्थापक नरेंद्र गोयदानी, समन्वयक राज मुछाल आणि ज्योती गोसावी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
“कीप मुव्हिंग मुव्हमेंट’ (पुढे चलूया अभियान) अंतर्गत हा उपक्रम आखण्यात आला होता.
भारतभरातील दहावीतील हजारो विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये जाऊन 7 उपयुक्त सत्रांमधून मोफत मार्गदर्शन करण्यात आले होते. यात सरकारी तसेच खासगी शाळांचाही समावेश होता. “कीप मुव्हिंग मुव्हमेंट’ उपक्रमांतर्गत पुण्यातील 16 शाळांमधून विद्यार्थ्यांना निवडण्यात आले.
यामध्ये कमलनयन बजाज स्कूल, प्रियदर्शनी हायस्कूल, बदरियॉं हायस्कूल, विश्वकर्मा विद्यालय व्ही.आय.टी. इंग्लिश मिडीयम स्कूल, विश्वकर्मा विद्यालय व्ही.आय.टी. मराठी माध्यम स्कूल, सरनोबत गजानन थोपटे स्कूल, एस.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल, सीएमएस इंग्लिश मिडियम हायस्कूल, ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम स्कूल, डीएव्ही पब्लिक स्कूल, न्यू ग्रेस इंग्लिश स्कूल, जयहिंद हायस्कूल, मोलेदिना हायस्कूल, एस.एम.चोकसे हायस्कूल, सिंहगड स्प्रिंग डेल तसेच महानगरपालिकेच्या मौलाना मोहमद अली जौहर उर्दू माध्यमिक विद्यानिकेतन (गणेश पेठ), वसंतदादा पाटील विद्यालय (बाजीराव रोड) या शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
दहावी इयत्तेत 90 % च्या वर गुण मिळविलेल्या या 30 “सुपर अचिव्हर’ विद्यार्थ्यांना “स्टार ऑफ फ्युचर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी या विद्यार्थ्यांसाठी पुणे-लोणावळा सफर मर्सिडीज्‌ बेंझ गाड्यांमधून करण्याची संस्मरणीय भेट मिळाली. या विद्यार्थ्यांना त्यंाच्या घरून “मर्सिडीज्‌ बेंझ’ गाड्यामधून आणण्यात आले. “मर्सिडीज्‌ बेंझ’ कंपनीने या उपक्रमासाठी 18 गाड्या दिल्या होत्या.
हे विद्यार्थी लोणावळा सफर करत असतानाच पालकांशी नरेंद्र गोयदानी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कोणते प्रयत्न करता येतील याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना पुढील 10 वर्षाच्या मेंटॉरिंग प्रोग्राम अंतर्गत तज्ज्ञ प्रशिक्षणाद्वारे सतत मार्गदर्शन करण्याची योजना आहे. “लाईफ स्कुल’ अभिनव उपक्रमांद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नव्या संधींचा प्रकाश आणण्यासाठी कार्यरत आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
“लाईफ स्कूल’चे 200 कार्यकर्ते भारतभरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. “कीप मुव्हिंग मुव्हमेंट’ या उपक्रमाद्वारे शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाते. त्याआधारे शिक्षकांनादेखील प्रेरणा मिळते आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्म विचार निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरत आहे. या उपक्रमातंर्गत भारतातील 15 शहरांतील 25,000 शिक्षक आणि लाखभर विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यात “लाईफ स्कूल’ला यश आले आहे, अशी माहिती संस्थापक नरेंद्र गोयदानी, समन्वयक राज मुछाल आणि ज्योती गोसावी यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाला लाइफ स्कूल चे संस्थापक नरेंद्र गोयदानी, चंद्रा वर्धन भंडारी, देवेन भंडारी, अमित भंडारी, राज मुछाल हे उपस्थित होते.

‘कँडल मार्च ‘ २८ नोव्हेंबरला

0

महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात क्रांती घडवणारी कथा असलेल्या कँडल
मार्चचे चित्रिकरण आणि पोस्ट प्रॉडक्शन चाणक्य क्रिएशन्सने पूर्ण केले असून
२८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे चाणक्य क्रिएशन्स,
के4 एन्टरप्रायझेस ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे
भारतातील सामाजिक प्रश्न धोरणकर्त्यांच्या नजरेस आणून ते सोडवण्याच्या
उद्देशाने चाणक्य क्रिएशन्सची स्थापना झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून,
चाणक्य क्रिएशन्स एरवी दुर्लक्षिल्या जाणाऱ्या सामाजिक समस्या
सोडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणार आहे.
‘कँडल मार्च’, हा एक सत्य घटनेवर आधारित मराठी चित्रपट असून त्याची
कथा लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्या चार महिला नायिकांच्या भोवती
फिरत राहते. घटनांची एक शृंखला तयार होतो ज्यामुळे चारही नायिका व्यवस्था
आणि अन्यायाविरोधात लढण्यासाठी एकत्र येतात. भारतात घडलेल्या लैंगिक
अत्याचाराच्या घटनांवर आधारलेली ही कथा असून यात तेजस्विनी पंडित,
स्मिता तांबे, मनवा नाईक आणि सायली सहस्रबुध्दे यांनी आशिष पाथाडे
यांच्यासह उत्तम भूमिका साकारल्या आहेत. समाजाची एक काळी बाजू
दाखवणाऱ्या खलनायकाची भूमिका निलेश दिवेकर यांनी साकारली आहे.
संपूर्ण कथा अतिशय सुंदरपणे पडद्यावर उभी केली आहे ती दिग्दर्शक सचिन
देव यांनी तर सचिन दरेकर आणि सचिन देव यांनी पटकथा लिहीली आहे.
चित्रपटाची संकल्पना आणि हृदयस्पर्शी संवाद सचिन दरेकर यांनीच लिहीले
आहेत. मंदार चोलकर यांच्या शब्दांना अमितराज यांनी सूरसाज चढवला आहे.
तसेच वास्तवदर्शी चित्रण छायालेखक राजा सातणकर यांनी केले आहे तर कला
दिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे. चित्रपटाचा कणा निर्माते अंजली आणि
निलेश गावडे आहेत.

अनंतसृष्टीतील तिसर्‍या टप्प्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

0

पुणे २८ सप्टेंबर २०१४ : घरांच्या किमती गगनाला भिडल्या असून मध्यमवर्गीय ग्राहकांना
घर घेणे आवाक्याबाहेर झाले आहे. त्यामुळे किफायतशीर किमतीत दर्जेदार घरे उपलब्ध करून
देण्याच्या उद्देशाने, दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्सने अनंतसृष्टी हा परिपूर्ण गृहप्रकल्प सादर
केला आहे.
या गृहप्रकल्पाच्या तिसर्‍या टप्प्याचे नुकतेच दिमाखात उदघाटन झाले. पहिल्याच दिवशी
अनंतसृष्टीतील ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक
व दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्सचे मुख्य कार्यकारी संचालक श्री सौरभ गाडगीळ, याप्रसंगी पी.
एन.गाडगीळ ज्वेलर्सच्या संचालिका सौ वैशाली गाडगीळ, दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्सच्या
संचालिका सौ. राधिका गाडगीळ, दाजीकाका डेव्हलपर्सचे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री
अमोल ताविलदार उपस्थित होते. नावनोंदणी करणाऱ्या ग्राहकास दाजीकाका गाडगीळ यांच्या
जन्मशताब्दीच्या निमित्ताने पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स कडून १ लाख रुपयांचे कुपनही देण्यात आले.
ही सवलत ५ ऑक्टोबर २०१४ पर्यंतच सुरू आहे. आयसीआयसीआय, एसबीआय, एक्ससेस बँक अशा
वित्तसंस्थांशी संलग्न असून यामुळे ग्राहकांना गृहकर्ज सुलभतेने उपलब्ध होण्यास मदतहोणार आहे.
‘अनंतसृष्टीच्या तिसर्‍या टप्प्या पहिल्या २ इमारतीतील घरांची विक्री सुरू झाल्यानंतर दोन
दिवसातच त्यातील सर्व फ्लॅट विकले गेले. अनंतसृष्टीमागील आमची संकल्पना आम्ही योग्य रीतीने
ग्राहकांपर्यंत पोचवण्यात यशस्वी झाल्याचे समाधान आहे.’ असे श्री सौरभ गाडगीळ यांनी
यावेळी सांगितले.
‘अनंतसृष्टी विषयी माहिती देताना ताविलदार म्हणाले की, प्रमुख माहिती तंत्रज्ञान (आयटी)
कंपन्या, अनेक महत्त्वपूर्ण उत्पादन उद्योग व नामवंत शैक्षणिक संस्था असणाऱ्या
तळेगाव-कान्हेफाटा भागामध्येनिसर्गाच्या सहवासात ‘अनंतसृष्टी’ हा प्रकल्प वसलेला
आहे. क्लब हाउस, प्रशस्त मोकळी जागा आणि पुणे-मुंबई महामार्गाशी कनेक्टीव्हिटी
हेअनंतसृष्टीचेवेगळेपण आहे. आजूबाजूला रुंद व मोकळेरस्तेआणि सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण
असा ‘अनंतसृष्टी’ प्रकल्प गुंतवणूकदारांसाठीसुद्धा एक सुवर्णसंधी आहे. ग्राहकांनी दिलेल्या
मोबदल्यात त्यांना दर्जेदार व चांगली घरे देण्यासाठी तसेच आपल्या व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचे
सूत्र दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स जपले आहे. यामुळेच अल्पावधीत आम्ही ग्राहकांचा विश्वास
संपादन केला आहे.

शंभर टक्के मतदान करा-आमदार निम्हण

0

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मुळा रोड परिसरात काँग्रेस पक्षाचे
आमदार विनायक निम्हण यांनी मतदारांशी थेट संवाद साधून वैयक्तिक संपर्कावर
भर दिला.या संपर्क मोहिमेत येत्या 15 ऑक्टोबर रोजी
शंभर टक्के मतदान करा, असे आवाहनही आमदार निम्हण यांनी सर्वांना केले.
सोमवारी सकाळी 10.30 वाजता त्यांनी या परिसरात घरोघरी जाऊन
वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या. या वेळी अनेक ठिकाणी त्यांचे घराघरांतून औक्षण
करण्यात आले.
आमदार निम्हण यांच्यासोबत बाळासाहेब अरगडे, विजू शेवाळे, पंडित
पुनरंगम, पिट्टू भट्टी, सदाशिव डांगे, संदीप खडसे, दत्तात्रय सहाणे, टिंकू दास,
प्रशांत भोगले, अमित पिल्ले, विजय गायकवाड, अशोक आल्लाट, सुनिल शेलार,
सुमित गायकवाड, आकाश माने, रमेश शेख आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित
होते. आमदार निम्हण यांनी अरगडे कॉर्नर येथे कार्यकर्त्यांना सूचना देऊन
आपल्या पदयात्रेला सुरुवात केली. सत्यम सोसायटी, लक्ष्मीनारायण कुंज
सोसायटी, इश्‍वर कृपा सोसायटी, दिपाली अपार्टमेंट आदी सोसायट्यांमध्ये जाऊन
नागरीकांशी वैयक्तिक संपर्क साधत पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले. त्यानंतर
त्यांनी बौद्ध विहाराला भेट दिली. त्यानंतर आदर्शनगरमधील सर्व
गल्ल्यांमधील मतदारांची भेट घेतली. यावेळी नागरीकांनी विजयी करण्याचे
आश्‍वासन दिले. दरम्यान, शंकर मंदिरात जाऊन शंकराचे दर्शन घेतले.
याबरोबरच मयुरेश्‍वर गणपतीचेही दर्शन घेतले. सर्वच ठिकाणी निम्हण यांचे
स्वागत करण्यात आले. चहा-पानाचाही आग्रह धरला जात होता. तसेच
महिलांकडून औंक्षणही करण्यात आले. मुळारोडवरील शॉपिंग सेंटर, व्यावसायिक,
व्यापारी यांच्याही निम्हण यांनी भेट घेतली. नुकताच वीजेचा शॉक लागून मरण
पावलेल्या अतिश शिंदे या युवकाच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
सुमारे चार तास चाललेल्या या संपर्क मोहिमेत येत्या 15 ऑक्टोबर रोजी
शंभर टक्के मतदान करा, असे आवाहनही आमदार निम्हण यांनी सर्वांना केले.

महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न अजेंड्यावर घेणार- गिरीश बापट

0

पुणे, ता: 29 (प्रतिनिधी) पुण्यात महिला सार्वजनिक
स्वच्छतागृहाचा प्रश्न अजूनही सुटला नाही, वारंवार प्रयत्न
करूनही प्रशासन दरबारी याची कोणतीच दखल घेतली जात
नाही. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने महिलांची
कुचंबणा होत आहे, तसेच शहरात महिला सुरक्षिततेचा प्रश्न
देखील गंभीर बनत चालला आहे. महिलांवर हल्ला करून
मंगळसूत्र चोर्‍याच्या घटना वाढत आहेत. अशा घटना घडत
असल्याने महिलांसाठी शहर असुरक्षित बनत चालले आहेत.
शिक्षणासाठी परगावहून आलेल्या मुलींचे प्रश्न वेगळेच आहेत.
त्यामुळे महिलांच्या प्रश्नांची समस्या सोडवण्यासाठी सक्षम
यंत्रणा निर्माण करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. असे
प्रतिपादन प्रचार पदयात्रे दरम्यान कसबा विधानसभा मतदार
संघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी केले.
गिरीश बापट यांची प्रचार पदयात्रा सकाळी दहा वाजता
प्रभाग क्रमांक 37 मधून सुरु झाली. या प्रभागातील
नागरिकांच्या समस्या जाणून घेताना ते बोलत होते. भारतीय
जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शनिवार वीर मारुती
मंदीरापासून प्रत्येकाच्या व्यक्तीगत भेटीने सुरू झालेली ही
पदयात्रा शनिवारवाडा, शिंदेपार चौक करत नारायण पेठ
भागात आली. यानंतर पत्र्या मारुती चौकात येऊन बापट यांनी
प्रत्येकांना हस्तांदोलन करत समस्या जाणून घेतल्या. पुढे
आप्पा बळवंत चौक करत पदयात्रा केळकर रस्त्यावर आली,
बुधवार पेठ भागातील दगडूशेठला पदयात्रेचे समापन करताना
नागरिकांशी संवाद साधून अनेक प्रश्नांचे उत्तरे त्यांनी दिली.
यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येणपुरे, प्रभाग
क्रमांक 37 चे अध्यक्ष निलेश कदम, हेमंत रासने, बाळासाहेब मोरे, उमेश मोहरे,
अरुण जोशी, कौस्तुभ गाडे, विशाल घरात, रोहीत धावडे, रवी नारळीकर, उमेश
कांड्डरे, संजयमामा देशमुख, छगन बुलाखे, आनंद मालेगांवकर, दिपक पोटे, सुहास
कुलकर्णी, पुष्कर तुळजापूरकर, नामदेव माळवदे, योगिता गोगावले, निर्मला
कदम, विजया हंडे, रीना सपकाळ, रूपाली कदम, शारदा गोखले आदी उपस्थित
होत्या.

‘बुद्धीजीवी वर्ग भाजपाच्या पाठीशी’ : मीनाक्षी लेखी

0

‘बुद्धीजीवी वर्ग भाजपाच्या पाठीशी’ : मीनाक्षी लेखी

पुणे :

‘कॉंग्रेसला कंटाळून बुद्धीजीवी वर्गाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला मतदान केल्याने परिवर्तन झाले. बुद्धीजीवी वर्गाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पूर्ण परिवर्तन करून भाजपला विजयी करावे,’ असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि खासदार मीनाक्षी लेखी यांनी केले.

” फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ संस्थेतर्फे ‘संपर्क-संवाद’ अभियानातंर्गत बुद्धीजीवी संमेलनात त्या बोलत होत्या. माजी खासदार प्रदीप रावत अध्यक्षस्थानी होते. “फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ चे प्रदेश समन्वयक आर.पी.सिंग आणि सहसमन्वयक उषा वाजपेयी उपस्थित होते. हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी मौलाना आझाद स्मारक सभागृहात झाला.

मीनाक्षी लेखी म्हणाल्या,” समाज परिवर्तनात बुद्धीजीवी वर्गाची भूमिका महत्वाची असते. हाच वर्ग दिशा देण्याचे काम करतो. भविष्य घडविण्यासाठी हा वर्ग पुढे आला आहे हे पाहून समाधान वाटते. “राजकारण हे रोजगाराचे साधन नाही तर योगदान देण्याचे आवाहन आहे’ हे नरेंद्र मोदींचे प्रतिपादन बुद्धीजीवी वर्गाला आवडले आहे’ , असेही निरीक्षण मिनाक्षी लेखी यांनी नोंदविले.

“भ्रष्टाचाऱ्यांना खाली खेचून देशाची प्रतिमा जगात उंचावण्याचे काम नरेंद्र मोदी पंतप्रधान या नात्याने करीत आहेत. महाराष्ट्रदेखील त्यांच्या पाठीशी उभा राहील’, असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी पोलीस आयुक्त संतोष दत्ता यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. महेंद्र गलांडे, विशाल चास्कर, पियुष बाफना, राजीव गुप्ते, अच्युत दिक्षीत आदी उपस्थित होते.

आमदार निम्हण यांची मतदारांना भेट

0

रविवार सुट्टीचा दिवस साधत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील
काँग्रेसचे उमेदवार विनायक निम्हण यांनी औंधगाव परिसरातील प्रमुख
सोसायटी, मंडळांबरोबरच दुकाने, भाजी मंडईमध्ये जाऊन मतदारांची भेट घेत
आज संध्याकाळी चर्चा केली. तसेच चर्च, गुरुद्वारामध्ये जाऊन आशीर्वाद
घेतले. यावेळी तेथील नागरीकांनी निम्हण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार
असल्याचे सांगितले.

सायंकाळी सहाच्या सुमारास विनायक निम्हण यांनी औंध गावातील पुरातन
विठ्ठल मंदिर कोळीवाडा येथे जुनवणे परिवाराची बैठक घेतली. औंध गावातून
विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन यावेळी केले. नागरीकांनीही पक्षाबरोबरच
व्यक्ती म्हणूनही निम्हण यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. त्यानंतर ते भैरवनाथ
मंदिर गावठाणात आले. भाजीमंडईतील व्यापार्‍यांना मत देण्याचे आवाहन करीत
ते चर्चमध्ये गेले. पिटर भाऊसाहेब चव्हाण यांनी निम्हण यांना आशीर्वाद दिले.
त्यानंतर गावठाणातील विविध सोसायट्यांना भेट दिली. मुलाणी वाड्याला भेट देत
धर्मनिरपेक्ष पक्ष असलेल्या काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केले. विविध
कॉम्प्लेक्समध्ये जाऊन त्यांनी आवाहन केले. त्यानंतर ते जय महाराष्ट्र
चौकातील बाळासाहेब पवार यांच्या घरी भेट दिली. डिंबर समाज, शिंपी
समाजाचीही भेट घेतली. अनेक ठिकाणी महिलांनी निम्हण यांचे औंक्षण केले.
गुरुद्वाराला भेट देत तेथील धर्मगुरु समशेरसिंग मान यांचेही निम्हण यांनी
आशीर्वाद घेतले. निम्हण यांच्यासमवेत नगरसेवक सनी निम्हण, कार्यकर्ते
राहुल जुनवणे, समीर जुनवणे, सुनिल जुनवणे, तेजस बामगुडे, बाळासाहेब शेळके,
अल्लाउद्दीन पठाण, हरुण सवार, औंधगाव व्यायाम मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.
तानाजीराव चोंधे, संचालक बाळासाहेब पवार, कैलास पवार, वसंतराव जुनवणे,
निलेश जुनवणे, रोहन कुंभार, पांडुरंग रानवडे, नितीन चोंधे, रुपेश जुनवणे, अशोक
रानवडे आदी सहभागी झाले होते.

म्हैस पाण्यात … अन मोहोर चालू – वळसे पाटलांची टीका

0

पारगाव-सत्तेवर येण्याआधीच विरोधकांपैकी कोणी म्हणते मी मुख्यमंत्री होणार, कोणी म्हणते मी गृहमंत्री होणार. हे म्हणजे म्हैस पाण्यात आणि मोहोर चालू असा प्रकार आहे. अशी टीका आंबेगाव- शिरूर चमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी येथे केली
पदे येतात आणि जातात, मला पदांचे अप्रूप कधी वाटले नाही. तुमच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी प्रय▪करायचे आहे. जो जीवनात बदल घडवतो, जीवनमान सुधारतो तोच विकास, हीच माझी भूमिका आहे, आज पारगाव परिसरातील सगळ्या वाड्या-वस्त्यांवर लोकांमध्ये उत्साह दिसला. त्यामुळे मताधिक्याची खात्री वाटते ,
वळसे पाटील यांनी शनिवारी पारगाव, लबडे वस्ती, चिचगाई, दातखिळे वस्ती, माळी मळा आदी भागांतील ग्रामस्थांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत पंचायत समितीच्या सभापती जयश्रीताई डोके, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, पारगावच्या सरपंच प्रज्ञा कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दौलतराव लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले,राजकारण कमी करायचे, समाजकारण जास्त करायचे, हा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. खरे तर आंबेगाव तालुक्यात विकासाची चर्चाच आम्ही सुरू केली. त्यातून भविष्यात पारगाव एक मोठे व्यापारी केंद्र झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच भीमाशंकर कारखान्याच्या परिसरात एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेसारखी शिक्षणसंस्था सुरू करणार आहेविरोधकांच्या राजकारणावर टीका करताना वळसे पाटील म्हणाले, सत्तेवर येण्याआधीच विरोधकांपैकी कोणी म्हणते मी मुख्यमंत्री होणार, कोणी म्हणते मी गृहमंत्री होणार. हे म्हणजे म्हैस पाण्यात आणि मोहोर चालू असा प्रकार आहे.
यावेळी प्रज्ञा कुलकर्णी, सुभाष बबन ढोबळे, अचर्ना वाळुंज, दौलतराव लोखंडे, संतराम ढोबळे गुरूजी यांनीही मनोगत व्यक्त केले

जुन्या वाड्याच्या दुरुस्तीसाठी महामंडळ स्थापन करणार -गिरीश बापट

0

पुणे, ता. 28: (प्रतिनिधी) मुंबईच्या धर्तीवर पुण्यात जुन्या वाड्यासाठी दुरूस्ती महामंडळ स्थापन करण्यासाठी येणार्‍या काळात पाठपुरावा करणार. यामुळे शहरातील मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीत राहणार्‍या नागरिकांना दिलासा मिळेल. सत्तेत आल्यास अशा रहिवाशी व भाडेकरूंसाठी विशेष योजना लागू करण्याचे आश्वासन यावेळी दिले. तसेच, शहरातील वाहतुकीचा प्रश्न खूपच बिकट होत चालला आहे, तो सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार. असे मत कसबा विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचार पदयात्रे दरम्यान काढले.

कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक 58 मध्ये आज बापट यांची पदयात्रा झाली. सकाळी दहा वाजता अकरा मारुती येथून या पदयात्रेला सुरवात झाली. त्यानंतर शुक्रवार पेठ येथील विविध भागात फिरून मतदारांचे प्रश्न समजून घेण्यात आले. अकरा मारुती चौक परिसरातील नागरिकांच्या समस्या बापट यांनी जाणून घेऊन सुभाष नगर, राष्ट्रभूषण चौक, खडके गणेश मंदीर या भागात मतदारांशी संवाद साधण्यात आला. नंतर खडकमाळ आळ करत गुरुवार पेठ येथे या पदयात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी गिरीश बापट यांनी मतदारांशी बोलताना नाकर्त्या आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. या पदयात्रेत मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या.

यावेळी नगरसेवक अशोक येणपुरे, प्रतिभाताई ढमाले, कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश ऐनपुरे, उदय लेले, संजयमामा देशमुख, छगन बुलाखे, सोहन भोसले, अनिल थिटे, विजय मरळ, महेश गोखले, संदीप खरडेकर, आनंद मालेगांवकर, भारत निजामपूरकर, दीपक पोटे, सुहास कुलकर्णी, पुष्कर तुळजापूरकर, नामदेव माळवदे, अमित कंक, मुकेश पायगुडे, निलेश वैराट, संजय पायगुडे, कुमार रेणुसे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभाताई गोखले, शाबाना देशपांडे, सीमा जांभुळकर, चारू शिंदे, क्रांती खंडारे, वर्षाताई धोंगडे, मृणाल घोळे, कल्पनाताई जाधव आदी उपस्थित होते.