Home Blog Page 381

मोहम्मद अली जिना यांचे अधुरे काम भाजपने केले:तर भाजपने हिंदुत्व सोडले का? -ठाकरे


मुंबई-मोहम्मद अली जिना यांना जे जमले नाही, ते भाजपने करून दाखवले, अशा जहाल शब्दांत गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल मोदी सरकारवर टीका केली. वक्फ विधेयक मुस्लिमांच्या हिताचे असेल, तर तुम्ही हिंदुत्व सोडले का, सवालही त्यांनी केला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही बिलाला विरोध केला नाही तर भाजपच्या ढोंगाला आणि भ्रष्टाचाराला विरोध केला. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचे आणि हिंदुत्वाचे काय देणे घेणे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तुम्ही मुसलमानांचे लांगुलचलन करत असाल तर हिंदूंनी काय केले? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

नुकतीच रमजान ईद झाली आहे. ईदच्या या सर्व लोकांनी मेजवान्या झोडल्या आहेत. ईदच्या मेजवान्या झोडून या लोकांनी काल वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडले आहे. मात्र, यामध्ये मंत्री किरण रिजिजू यांनी हे विधेयक मांडले हा योगायोग आहे. याच किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचे समर्थन केले होते. त्यामुळे हा योगायोग घडवून आणला आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नेमके भारतीय जनता पक्ष काय करतोय, हे देखील मला अद्याप कळाले नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आता राज्यात कुठेही बसून करा घरांची नोंदणी:1 मेपासून ‘एक राज्य एक नोंदणी’ धोरण, ऑनलाईन मुद्रांक नोंदणीची ही प्रक्रिया 1 मेपासून

0

पुण्यात बसून मुंबईतील घराची करता येणार नोंदणी ,पुण्यात बसून नागपुरातील घराची किंवा मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी करता येईल,आधार कार्ड व प्राप्तिकर दस्तऐवजांच्या मदतीने नोंदणी,राज्यातील कुठलीही नोंदणी व मुद्रांक नोंदणी घरी बसून करता येणार

सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

मुंबई-महाराष्ट्रात येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजे 1 मेपासून ऑनलाईन मुद्रांक नोंदणी व ‘एक राज्य एक नोंदणी’ उपक्रम राबवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केली. या उपक्रमामुळे पुण्यात बसून नागपुरातील घराची किंवा मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी नोंदणी करता येईल. ही सर्व प्रक्रिया फेसलेस असेल, असे ते म्हणाले. या प्रक्रियेमुळे घर खरेदीच्या प्रक्रियेतील दलालीला चाप बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सद्यस्थितीत घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालयात किवा तहसील कार्यालयात खेटे मारावे लागतात. अनेकदा या प्रकरणी नागरिकांचा मोठा वेळ व पैसे वाया जातात. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1 मेपासून राज्यात एक राज्य एक नोंदणी धोरण राबवण्याची घोषणा केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यासंबंधी म्हणाले, घर खरेदी – विक्री करतेवेळी नोंदणीसाठी सध्या सरकारी कार्यालयात जावे लागते. तिथे अनेक हेलपाटे मारावे लागतात. नोंदणी करतान दलालांचाही अडथळा असतो. त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शक व गतीमान सरकारच्या 100 दिवसांचा कार्यक्रम दिला होता.

या अंतर्गत महसूल खात्याचा मुद्राक निरीक्षकांनी व महानिरीक्षकांनी एक चांगला उपक्रम पुढे आणला आहे. त्यानुसार आपले सरकार एक राज्य एक नोंदणी पद्धत सुरू आहे. या अंतर्गत राज्यातील कुठलीही नोंदणी व मुद्रांक नोंदणी घरी बसून करता येणार आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या योजनेची अधिक माहिती देताना पुढे म्हणाले, तुम्ही एखादे घर खरेदी केले असेल तर तुम्हाला कुठेही बसून त्याची नोंदणी करता येईल. पुण्यात बसून नागपुरातील घराची किंवा मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी करता येईल. ही सर्व प्रक्रिया फेसलेस असेल. आधार कार्ड व प्राप्तिकर दस्तऐवजांच्या मदतीने तुम्हाला ही नोंदणी करता येईल. ऑनलाईन मुद्रांक नोंदणीची ही प्रक्रिया आपण 1 मेपासून सुरू करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजीटल इंडिया, डिजीटल महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. आमचे सरकार त्यावर काम करत आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे सरकारने प्रायोगिक पातळीवर ही प्रक्रिया मुंबई व उपनगरांत राबवली होती. तिचा आता राज्यभरात विस्तार केला जाणार आहे.

म्हाडाच्या जनता दरबारात 11 प्रकरणे निकाली

पुणे, दि. 3: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने मार्च महिन्यात आयोजित जनता दरबारात नागरिकांकडून प्राप्त एकूण 13 प्रकरणापैकी 11 प्रकरणे निकाली काढण्यात आले तर उर्वरित 2 प्रकरणावर कार्यवाही सुरु आहे.

म्हाडा प्राधिकरणाचे उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली 9 जानेवारी 2025 रोजी झालेल्या विभागीय मंडळाच्या बैठकीत नागरिकांच्या प्रश्न तत्परतेने सोडविण्याकरिता लोकशाही दिनाच्या धर्तीवर प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या गुरुवारी जनता दरबार आयोजित करण्याबाबत निर्देश देण्यात आले, त्यानुसार हा जनता दरबार घेण्यात आला आहे, अशी माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

इंडियन मिलीटरी कॉलेज प्रवेश प्रक्रियेचे अर्ज १५ मेपर्यंत स्वीकारण्यात येणार

पुणे, दि. २: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून’ प्रवेश प्रक्रिया परीक्षा १ जून २०२५ रोजी घेण्यात येणार आहे; परीक्षा अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत संस्थेचे कमांडंट यांनी १५ मे २०२५ पर्यंत वाढविली आहे, असे परीक्षा परीषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

जन सुरक्षा अधिनियम, २०२४ मधील तरतुदींविरोधात पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जोरदार निदर्शने

पुणे- महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम, २०२४ मधील तरतुदींविरोधात पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या या विधेयकाचा निषेध नोंदवण्यात आला.जाचक अटी रद्द करा, अशा घोषणाबाजी यावेळी संघटनेतील सभासदांकडून करण्यात आली. या विधयकातील जाचक तरतूदी महाराष्ट्र शासनाने रद्द कराव्यात, अशी प्रमुख मागणी श्रमिक पत्रकार संघटनेचे सुनीत भावे यांनी केली आहे.

यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी सुनीत भावे, पुणे श्रमिक पत्रकार संघ, शैलेश काळे, प्रतिष्ठान अध्यक्ष, मीनाक्षी गुरव, सरचिटणीस आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक प्रस्तावित केलेले आहे. त्या संदर्भातील हरकती व सूचना नोंदवण्याची मुदत दोन दिवसांपूर्वी संपली आहे. यामधील काही तरदूदी पत्रकार संघटना आणि पत्रकार म्हणून काम करणाऱ्या यांच्यावर जाचक होतील. त्यांच्यावर निर्बंध आणले जातील. सेन्सॉरशिप लादली जाईल, असे सुनीत भावे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या तरतूदींना सगळ्याच पत्रकार संघटना विरोध करत आहेत. मुंबईतही आंदोलन होत आहे. या जाचक तरतूदी रद्द कराव्यात अशी प्रमुख मागणी असल्याचे भावे यांनी सांगितले.

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलं होतं. पण, विरोधकांच्या विरोधामुळं ते मंजूर होऊ शकले नाही. सध्या हे विधेयक विधीमंडळातील दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश असलेल्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. सध्या या समितीनं राज्यातील जनता, विधीमंडळाचे माजी सदस्य, सामाजिक संस्था, संघटना यांच्याकडून 1 एप्रिलपर्यंत यावर सूचना मागवल्या आहेत. पण पुण्यासह राज्यातील विविध पत्रकार संघटना याला विरोध करत आहेत.

विधेयकावर नेमका काय आक्षेप आहे…?
– विधेयकामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांच्या नागरी स्वातंत्र्यावर आणि भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटना आणि सभा स्वातंत्र्य आणि गोपनीयतेच्या हक्कावर प्रतिकूल परिणाम होईल.
– सरकारला केवळ ‘बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनांचे सदस्य असल्याच्या आरोपावरून संघटनांवर बंदी घालण्याचे आणि संशयितांची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार दिले आहेत.
– सरकारला प्रश्न विचारता येणार नाही, असे अधोरेखित होत आहे.
– कोणत्याही स्वरूपात किंवा पद्धतीने सरकारचा असंतोष किंवा टीका व्यक्त करणे बेकायदेशीर ठरवले जाईल.
– जिल्हाधिकारी किंवा पोलिस आयुक्तांना बेकायदेशीर कृतीसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट क्षेत्र किंवा इमारतीची निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. त्यानंतर हे अधिकारी मालमत्तेचा ताबा घेऊ शकतात.

ठाणे कि रिक्षा संकटमोचक ..पुण्यातून कामराच्या विडंबनाला असेही उत्तर

0

पुणे- कॉमेडीयन कुणाल कामरा चे विडंबन त्यातून केलेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मानहानी बाबत एकीकडे संताप व्यक्त होत असताना आणि पोलीस कारवाई सुरु असताना दुसरीकडे पुण्यातून या विडंबनावर सकारात्मक कवितेतून प्रहर करण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या पुण्यातील समर्थकांनी सुरु केले आहे.

अनेक ठिकाणी असे फलक उभारून या फलकावर शिंदे समर्थांनी दिलेली कविता वाचा …

ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढ़ी,
आंखों पे चश्मा, आए हाए…!
एक झलक दिखलाए कभी,
सरकार पलट जो जाए, आए हाए…!
जनता की नजर से तुम देखो,
तो शेर नजर वो आए…!

हिंदुत्व का अंगार है वो,
सबको दिया दिखलाए!
एक फोन पर ‘चिपळूण’ और ‘इर्शाळवाडी’
वो पहुंच जाए!
आंखें खोलकर तुम देखो,
तो ‘लाल चौक’ में दिख जाए!
बिन ऑक्सीजन जो हाल हुआ,
वो उससे देखा न जाए!

ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढ़ी, आए हाए…!

आरोग्य सहायता का कार्य उसका,
जीवन लक्ष्य बन जाए!
लाड़ली बहन उसको फिर से,
विजय तिलक लगवाए!

बोलने वाले बोलते रहे,
वो काम ही करता जाए!
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढ़ी,
हाथों में भगवा, आए हाए…!

‘Dedicated To Common Man’ची ही संकटमोचक ‘ठाणे की रिक्षा’ अशीच भरधाव धावत राहो, ही सर्वसामान्यांची इच्छा!

युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव वाघ यांनी हा फलक दुर्वांकुर डायनिंग हॉलसमोर लावला आहे. ‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी’ गाण्यांच्या ओळी लिहीत ‘शेर नजर वो आए’ असा गौरवपूर्ण उल्लेख शिंदे यांचा करण्यात आला. हिंदुत्वाचा कैवारी, चिपळूणचा महापूर, इर्शाळवाडीची दुर्घटना यामध्ये शिंदे यांनी तत्परता दाखवत थेट घटनास्थळी जाऊन केलेले कार्य, आरोग्य कक्षाच्या माध्यमातून केलेले कार्य यासह लाडकी बहीण योजना या काव्यातून मांडली आहे. काश्मीरच्या लाल चौकातील गणेशोत्सवात त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग यातून त्यांची कीर्ती ठाणेच नव्हे, तर पूर्ण देशभर असल्याचे दिसून येते, असे यातून सांगण्याचा प्रयत्न आहे.

या संदर्भात वैभव वाघ म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी अवघ्या अडीच वर्षात मुख्यमंत्री केलेले लोकोपयोगी कार्य प्रेरणादायी आहे. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अधिकाधीक चांगल्या सोयीसुविधा, योजना देण्याचे काम त्यांनी केले. लाडकी बहीण योजना आणली, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षातून लाखो गोरगरिबांना सेवा दिली. शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, कामगारांसाठी, हिंदुत्वासाठी चोवीस तास उपलब्ध असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांबाबत कुणाल कामराने बदनामीकारक वक्तव्य संतापजनक आहे. कोणतेही कार्य न करणाऱ्या माणसाने शिंदे यांच्यासारख्या सर्वसामान्यांचा कैवारी असलेल्या व्यक्तीवर अवमानजनक काव्य रचणे ही विकृती आहे. कलेच्या नावाखाली अशी विकृती आपण सहन करता कामा नये. सामान्य माणसासाठी अहोरात्र झटणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा गौरव व सन्मान करणे आपले कर्तव्य आहे.”

नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा हा फ्लेक्स लावणारे वैभव वाघ हे पुणे जिल्ह्यात एक कल्पक आणि क्रियाशील नेतृत्व म्हणून प्रसिध्द आहेत. वंदेमातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तसेच दिल्ली येथील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने झालेल्या मराठी साहित्ययात्री संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून वाघ ह्यांनी काम पाहिले आहे. कोरोना काळात विविध संघटना आणि गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून वैभव वाघ ह्यांनी केलेल्या कामाची देशपातळीवर दखल घेण्यात आली होती. ह्याच कामावर आधारित वाघ ह्यांनी लिहिलेले #व्हायरल_माणुसकी हे पुस्तक अल्पावधीतच प्रसिध्द झाले आहे. निवडणुकांचे व्यवस्थापन ह्या विषयात देखील वाघ ह्यांचा हातखंडा आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वाघ ह्यांची राज्यभर निवडणुक व्यवस्थापन ह्या विषयावर भाषणे आयोजित केली जात. आता ह्या फ्लेक्सच्या निमित्ताने पुणेकरांशी नाळ जोडला गेलेला पुण्याचा सामाजिक कामातील वाघ एकनाथ शिंदे ह्यांच्या शिवसेनेत प्रवेश करतोय की काय अशी चर्चा पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून उपायुक्त संदीप कदम यांना थेट इशारा..सूस घनकचरा प्रकल्प आजच बंद करा, अन्यथा….

पुणे-नामदार चंद्रकांतदादा पाटील हे आज पुन्हा सूस घनकचरा प्रकल्पावरुन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची झाडाझडती घेत, आजच प्रकल्प बंद न झाल्यास, उद्या सदर प्रकल्पाविरोधात खूर्ची टाकून बसण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा दिला.

सूस रस्त्यावरील ओल्या कचऱ्यापासून सीएनजी तयार करण्याचा प्रकल्प बंद करण्याची सातत्याने मागणी होत आहे. सदर प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करुन नांदे-चांदे येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय जानेवारी २०२४ मध्ये झाला होता. त्याअनुषंगाने ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्या सोबत आज बैठक झाली. या बैठकीत ना. पाटील यांनी सदर प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

या बैठकीत अद्याप सदर प्रकल्प स्थलांतरित का झाला नाही? असा प्रश्न ना. पाटील यांनी उपायुक्त संदीप कदम यांना विचारला. त्यावर कदम यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे महापालिकेकडून कोणतीच कारवाई झालेली नसल्याने, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.

तसेच, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधून महापालिकेच्या भोंगळ काराभाराप्रति निषेध व्यक्त केला. त्याशिवाय महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांना सदर प्रकल्प आजच बंद झाला नाही; तर उद्या प्रकल्पाविरोधात बसण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा दिला.

खरगे म्हणाले- माझ्याकडे वक्फची 1 इंचही जमीन नाही:अनुराग ठाकूर यांनी आरोप सिद्ध करावेत, नाहीतर राजीनामा द्यावा

वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर
नवी दिल्ली-राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध करावेत किंवा त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

अनुराग ठाकूर यांच्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा खराब झाली आहे, असे खरगे म्हणाले. खरगे यांनी अनुराग ठाकूर यांना आव्हान देत म्हटले की, जर त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर त्यांनी पुरावे सादर करावेत अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा.खरं तर, बुधवारी वक्फ दुरुस्ती विधेयकावर बोलताना काँग्रेस अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी खरगे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. ते म्हणाले- कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. कर्नाटकातील मंदिरे दरवर्षी ४५० कोटी रुपये जमा करतात. ते त्यांचे पैसे कुठे खर्च करतात याचे उत्तर कोण देते?ठाकूर पुढे म्हणाले- तुम्ही कोणत्याही मशिदीतून पैसे घेतले का? तुम्ही कोणत्याही वक्फ बोर्डाकडून पैसे घेतले का? पण कर्नाटकात झालेल्या घोटाळ्यांमध्ये त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचेही नाव आहे.अनुराग ठाकूर यांनी खरगे यांचे नाव घेताच सभागृहात गदारोळ सुरू झाला. मात्र, गदारोळ वाढत असताना अनुराग ठाकूर यांनी खरगे यांचे नाव मागे घेतले. हे विधान सभागृहाच्या नोंदींमधूनही काढून टाकण्यात आले.

शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे:त्यांनी मशि‍दीवर हल्ला केला नाही, त्यांनी अफजलखानची कबर बांधायचा आदेश दिला- गडकरी

शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक
दिल्ली-छत्रपती शिवाजी महाराज हे 100 टक्के सेक्युलर होते, छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शासक होते, न्यायप्रिय होते, कल्याणकारी राजे होते, आदर्श पिताही होते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक लढाया जिंकल्या पण त्यांनी कधीही मशिदीवर हल्ला केला नाही. लढाई जिंकल्यानंतर महिला शरण आल्या त्यावेळी ते सन्मानाने वागले.

नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र इंग्रजीत येत आहे ही आनंदाची बातमी आहे. आमच्या मनात आई-वडिलांपेक्षा शिवाजी महाराजांचे स्थान मोठे आहे. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या दोन इंग्रजी पुस्तकांचा प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले की, अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर भेट झाली. तेव्हा शिवाजी महाराज यांच्यावर अफजल खान याने वार केला. तेव्हा शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध केला. त्यानंतर शिवाजी महाराज यांनी आदेश दिला की अफजल खानाची कबर सन्मानाने झाली पाहिजे. आजकाल सेक्युलर हा शब्द खूप प्रचलित आहे. या शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीत दिलेला अर्थ धर्मनिरपेक्षता नाही. सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे सर्वधर्मसमभाव. सगळ्या धर्मांशी न्यायाने वागणे हा सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते जे 100 टक्के सेक्युलर होते.

नितीन गडकरी म्हणाले की, जात पात धर्म पंथ याने व्यक्ती मोठा होत नाही तर पराक्रमाने मोठा होतो. शिवाजी महाराज यांचं कार्य फक्त महाराष्ट्र पुरत मर्यादित न राहता जगभर जायला हवे. त्यांच्या सैन्यात सैन्यात मुस्लिम सैनिक देखील होते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने माघारी पाठवले. वेळ प्रसंगी शिवाजी महाराज यांनी मुलाला शिक्षा करायला देखील मागे पुढे पाहिले नाही. नाहीतर राजकारणात आजकाल सगळे आपली मुले, मुली आणि पत्नी यांना तिकीट मागतात.

ट्रम्प म्हणाले- मोदी चांगले मित्र,पण त्यांचे वर्तन अयोग्य अमेरिकेने भारतावर 26% कर लादला

9 एप्रिलपासून लागू

सर्वाधिक ४९% कर कंबोडियावर : चीनवर ३४%, पाकिस्तानवर २९%, बांगलादेश ३७%


वॉशिंग्टन-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रात्री उशिरा भारतावर २६% कर (परस्पर म्हणजेच टिट फॉर टॅट टॅरिफ) लादण्याची घोषणा केली. ट्रम्प म्हणाले- भारत खूप कडक आहे. मोदी माझे चांगले मित्र आहेत, पण ते आमच्याशी योग्य वागणूक देत नाहीत.
टॅरिफ हा एक प्रकारचा सीमा शुल्क किंवा कर आहे, जो कोणताही देश परदेशातून येणाऱ्या वस्तूंवर लादतो. हा कर आयात करणाऱ्या कंपनीवर आकारला जातो. हे वाढवून किंवा कमी करून देश आपापसातील व्यापार नियंत्रित करतात.

ट्रम्प म्हणाले,भारत अमेरिकेवर ५२% पर्यंत कर लादतो, म्हणून अमेरिका भारतावर २६% कर लादेल. इतर देश आमच्याकडून जे शुल्क आकारत आहेत त्याच्या जवळपास निम्मे शुल्क आम्ही आकारू. त्यामुळे दर पूर्णपणे परस्परसंवादी नसतील. मी ते करू शकतो, पण ते अनेक देशांसाठी कठीण होईल. आम्हाला हे करायचे नव्हते.

भारताव्यतिरिक्त, चीनवर ३४%, युरोपियन युनियनवर २०%, दक्षिण कोरियावर २५%, जपानवर २४%, व्हिएतनामवर ४६% आणि तैवानवर ३२% शुल्क आकारले जाईल. अमेरिकेने सुमारे 60 देशांवर त्यांच्या करांच्या तुलनेत निम्मा कर लादण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय, इतर देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या सर्व वस्तूंवर १०% बेसलाइन (किमान) शुल्क आकारले जाईल. बेसलाइन टॅरिफ ५ एप्रिल रोजी लागू होईल आणि परस्पर टॅरिफ ९ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजल्यानंतर लागू होईल. व्यापाराच्या सामान्य नियमांनुसार आयातीवर बेसलाइन टॅरिफ लादला जातो, तर परस्पर टॅरिफ दुसऱ्या देशाने लादलेल्या टॅरिफला प्रतिसाद म्हणून लादला जातो.

ट्रम्प यांच्या भाषणातील ठळक मुद्दे…

अमेरिकेचा आर्थिक स्वातंत्र्य दिन: आज अमेरिकेसाठी आर्थिक स्वातंत्र्याचा दिवस आहे. आपल्याला अमेरिकेला पुन्हा महान बनवायचे आहे. आम्ही परस्पर शुल्क जाहीर करत आहोत, म्हणजेच देश आपल्यावर जे काही शुल्क लादत आहे, तेच आम्ही त्यांच्याशी करू.
७ मार्च रोजी शुल्काची घोषणा केल्यानंतर ट्रम्प म्हणाले होते की भारत आमच्याकडून खूप जास्त शुल्क आकारतो. तुम्ही भारतात काहीही विकू शकत नाही. तथापि, भारत आता त्यांचे शुल्क मोठ्या प्रमाणात कमी करू इच्छित आहे कारण आम्ही त्यांचे गैरकृत्ये उघड करत आहोत.

ऑटो क्षेत्रात २५% कर: अमेरिका परदेशात उत्पादित होणाऱ्या वाहनांवर २५% कर लादणार आहे. आतापर्यंत, अमेरिका इतर देशांमधून येणाऱ्या मोटारसायकलींवर फक्त २.४% कर आकारत होती. भारत ६०%, व्हिएतनाम ७०% आणि इतर देश त्याहूनही जास्त शुल्क आकारत आहेत. त्यांनी ५० वर्षे अमेरिकेला लुटले, पण आज ते संपत आहे.
अमेरिका सर्वात श्रीमंत देश बनेल: अमेरिका जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा श्रीमंत असेल. आज आपण अमेरिकन कामगारांच्या बाजूने उभे आहोत. आम्ही अखेर अमेरिका फर्स्टची अंमलबजावणी करत आहोत. आपण खरोखर खूप श्रीमंत होऊ शकतो. आपण इतके श्रीमंत असू शकतो की ते अविश्वसनीय वाटेल, पण आता आपण हुशार होत आहोत.
टॅरिफ टाळण्यासाठी अमेरिकेत उत्पादने बनवा: टॅरिफच्या बाबतीत अमेरिका आता समान प्रतिसाद देईल. ज्या देशांना अमेरिकन बाजारपेठेत प्रवेश हवा आहे त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. जर कोणत्याही कंपनीला टॅरिफमधून सूट हवी असेल तर तिला अमेरिकेत आपले उत्पादन करावे लागेल. टॅरिफमुळे अमेरिकेची वाढ होण्यास मदत होईल.
अमेरिकेत नोकऱ्या आणि कारखाने परत येतील : अनेक देशांनी अमेरिकन बाजारपेठेचा फायदा घेऊन स्वतःला श्रीमंत बनवले, परंतु नंतर अमेरिकन वस्तूंसाठी स्वतःच्या बाजारपेठांवर निर्बंध लादले. आता अमेरिका स्वतःच्या फायद्यांचाही विचार करेल. आता अमेरिकेत नोकऱ्या आणि कारखाने परत येतील.
कॅनडाचे दुग्धजन्य पदार्थांचे दर अन्याय्य आहेत: कॅनडाचे दुग्धजन्य पदार्थांचे दर आपल्या शेतकऱ्यांसाठी योग्य नाहीत. कॅनडा आणि मेक्सिको सारख्या देशांना त्यांचे उद्योग टिकवून ठेवण्यासाठी अमेरिका अनुदान देते. जगभरातील देशांकडून क्रूर वागणूक मिळणाऱ्या आमच्या महान शेतकऱ्यां आणि पशुपालकांसाठी आम्ही उभे राहतो.

ते म्हणाले – सर्वांनी आपला देश लुटला आहे, पण आता हे थांबले आहे. माझ्या पहिल्या सत्रात मी ते बंद केले होते. आता आपण हे पूर्णपणे थांबवणार आहोत, कारण हे खूप चुकीचे आहे. आर्थिक, आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून जगातील जवळजवळ प्रत्येक देशाने अमेरिकेला लुटले आहे.
35 अब्जांचा बाेजा
ते म्हणाले, सध्या तरी मी उदारता दाखवतोय.जे देश अमेरिकी मालावर जेवढा कर लावतात त्याच्या ५०% आयात कर लावतोय. भारत आणि पंतप्रधान मोदी माझे मित्र आहेत. परंतु भारत अमेरिकी मालावर ५२% कर वसूल करतो. त्यामुळे अमेरिकाही भारताकडून २६% कर वसूल करेल. जाणकारांच्या मते, या व्यापार करामुळे भारताच्या अमेरिकेतील निर्यातीवर सुमारे ३५ अब्ज रुपयांचा बोजा पडणार आहे.

बाइकच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी भारतावर ७०% कर आकारण्याचा आरोप केला. त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच भारताचा दोन वेळा उल्लेख केला. ट्रम्प म्हणाले, अमेरिका फर्स्ट अभियानासाठी कर लावणे गरजेचे होते. जशास तसे कर लावल्याने अमेरिकी तिजोरीत दरवर्षी ४३ लाख कोटी रुपयांची भर पडेल. कार आयातीवरही २५%कर लावण्याचा पुनरुच्चार केला. इकडे, येल विद्यापीठाने करामुळे अमेरिकेत मंदीची शंका व्यक्त करून कुटुुंबावर ३५ हजार रुपयांचा बोजा पडेल, असे सांगितले.

भारत-अमेरिकेतील ४३ लाख कोटी रुपयांच्या व्यापार कराराला गती मिळाली आहे. हा करार वर्षअखेरीस अंतिम होईल. सूत्रांच्या मते टेस्ला ईव्हीवर आयात कर कमी होऊ शकतो. कृषी क्षेत्रातही अमेरिकेला प्रवेश मिळू शकतो.

भारताने आधीच प्रीमियम बाइक्स हार्ले डेव्हिडसन व अमेरिकन बर्बन व्हिस्कीवरील आयात शुल्कात ५०% पर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे.

कुठे सर्वाधिक फटका? (वार्षिक उलाढाल किती?)

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम ७.२४ टक्के १४.३९ अब्ज डॉलर
फार्मा प्रॉडक्ट्स १०.९० टक्के १२.७२ अब्ज डॉलर
सोनं, चांदी आणि दागिने ३.३२ टक्के १.८८ अब्ज डॉलर
मशिनरी आणि कम्प्युटर ५.२९% ७.१० अब्ज डॉलर
केमिकल्स (फार्मा वगळून) ६.०५% ५.७१ अब्ज डॉलर
कापड, सूत आणि कार्पेट ६.५९% २.७६ अब्ज डॉलर
मासे, मांस आणि सीफूड २७.८३% २.५८ अब्ज डॉलर
तृणधान्यं, भाज्या आणि मसाले ५.७२% १.९१ अब्ज डॉलर
सिरॅमिक अँड ग्लास ८.२७% १.७१ अब्ज डॉलर
रबर उत्पादनं ७.७६% १.०६ अब्ज डॉलर्स
प्रोसेस्ड फूड, साखर आणि कोको २४.९९% १.०३ अब्ज डॉलर
दुग्धजन्य पदार्थ ३८.२३% १८१.४९ मिलियन डॉलर्स

वक्फ सुधारणा विधेयक म्हणजे भ्रष्टाचार:म्हणूनच त्या विरोधात मतदान; संजय राऊतांचे स्पष्टिकरण; अमित शहा यांच्यावरही निशाणा

मुंबई- वक्फ बोर्डाच्या जमिनी आम्ही विक्री करू, असे काल अमित शहाच्या तोंडून निघाले, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कालपर्यंत आम्ही वक्फच्या संपत्तीला हात लावणार नाही, आम्ही त्याचे रक्षण करते आहोत, असे ते सांगत होते. मात्र, त्यांच्या तोंडून काल नकळत खरे बाहेर पडले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनीतून त्यांना पैसे मिळवायचे आहेत. या जमिनीचा त्यांना व्यापार करायचा आहे. दोन लाख कोटी रुपयांच्या वरती या जमिनी आहेत. त्या जमिनीवर डोळा असल्यामुळेच हे विधेयक मंजूर करण्यात आले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. वक्फ बोर्ड मध्ये होणारा हा भ्रष्टाचार आहे. आम्ही या भ्रष्टाचाराच्या विरोधातच मतदान केले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

वक्फ बोर्ड संदर्भातील आमच्या पक्षाच्या भूमिकेविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. ते या पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भातील भूमिकेवर स्पष्टपणे बोलणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे विधेयक मंजूर झाले, या माध्यमातून देशभरात फार मोठी क्रांती करत आहोत, अशा प्रकारचे वातावरण तयार करण्यात आले. मात्र, ते बिल मंजूर झाले आणि पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले आहेत. या बिलामुळे या देशांमध्ये काय होणार? यापूर्वी काय झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा सर्व व्यवहार मुस्लिमांच्या संपत्तीवर कब्जा मिळवण्यासाठी असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. गरीब मुसलमानांचा यातून उद्धार होणार आहे, अशी भाषा काल सरकारच्या वतीने करण्यात आली. ही पूर्णपणे धुळफेक असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

२०२५ पर्यंतच्या मशिदी, दर्गा यांना आम्ही हात लावणार नाही. मात्र रिक्त जमिनीची विक्री करणार असल्याचे अमित शहा यांनी काल लोकसभेत सांगितले. म्हणजेच ते खरेदी विक्रीच्या मुद्द्यावर आले आहेत, अशा प्रकारे संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या तोंडातून नकळत हे सत्य बाहेर पडले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. वक्फ बोर्डाच्या मोकळ्या जमिनीची किंमतच दोन लाख कोटी रुपये आहे. त्यांचा सौदा करण्याची भाषा काल त्यांनी केली. त्यांच्या पोटात जे होते ते काल बाहेर आले. या मोकळ्या जमिनी कोण कोणाला विकणार? आणि कशा पद्धतीने विकणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. धारावी आणि मुंबईतील विमानतळ आणि देशभरातील विमानतळे विकल्या गेले आहेत. या देशात विक्री करणारे देखील दोघेच आहे आणि खरेदी करणारे देखील दोघेच आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी होता. मात्र जय शहा हे क्रिकेटचे सूत्रधार झाले, त्यानंतर क्रिकेट हा देशाचा राष्ट्रीय खेळ झाला आहे. त्यामध्ये देखील हिंदू मुसलमान केले जात आहे. देशात हिंदूंच्या विरुद्ध हिंदूला लढवले जाते आणि मुस्लिमांच्या विरोधात मुस्लिमांना लढवले जात आहे. या माध्यमातून हा नवा राष्ट्रीय खेळ या लोकांनी सुरू केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काल विधेयकावर झालेली भाषण ऐकल्यानंतर त्यामध्ये केवळ संपत्ती – संपत्ती – संपत्ती असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारला झोपेत देखील संपत्ती दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. मग ती संपत्ती ही धार्मिक असो की राष्ट्राची असो, सरकारला केवळ सर्व संपत्ती दिसत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आ

लॉरेन्स टोळीतील 5 जणांना अटक:गुन्हे शाखेने 7 पिस्तूल आणि 21 जिवंत काडतुसे जप्त केली, काही सेलिब्रिटी होते लक्ष्य


मुंबई-मुंबई गुन्हे शाखेने अंधेरी परिसरातून लॉरेन्स गँगच्या 5 सदस्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 पिस्तूल आणि 21 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. ही माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, त्यांना संशय आहे की, एक सेलिब्रिटीला या टोळीचे लक्ष्य बनवण्यात आले होते.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विशिष्ट माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी लॉरेन्स गँगच्या सदस्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे शस्त्रे बाळगण्यामागील हेतू तपासला जात आहे.

विकास ठाकूर उर्फ ​​विकी, सुमित कुमार दिलावर, श्रेयस यादव, देवेंद्र सक्सेना आणि विवेक गुप्ता अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. सुमित कुमार आणि विकास हे हिस्ट्रीशुटर आहेत.

खरंतर, सलमान खानला लॉरेन्स गँगकडून सतत धमक्या मिळत आहेत. अशा परिस्थितीत, टोळीतील 5 जणांना अटक केल्यानंतर आणि त्यांच्याकडून शस्त्रे जप्त केल्यानंतर, सलमान खानच्या सुरक्षेसाठी हा एक मोठा धोका म्हणूनही पाहिले जात आहे.

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्रीनंतर लोकसभेत मंजूर

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव मंजूर


नवी दिल्ली:
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल (बुधवारी) संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले होते. त्यांनंतर काल दुपारी १२ वाजल्यापासून आज मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर सभागृहात चर्चा झाली. त्यानंतर या विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली. तर विरोधात 232 मते पडली. या विधेयकाला काँग्रेसह इंडिया आघाडीने विरोध केला. शेवटी हे विधेयत लोकसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाईल.
यामध्ये सत्ताधारी खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मते व्यक्त केली. तर विरोधकांनी याला जोरदार विरोध केल्याचे पाहायला मिळाले.

बुधवारी लोकसभेत 12 तासांच्या चर्चेनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. पहाटे २ वाजता झालेल्या मतदानात ५२० खासदारांनी भाग घेतला. २८८ जणांनी बाजूने तर २३२ जणांनी विरोधात मतदान केले.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी याला उमीद (युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट, एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट) असे नाव दिले आहे. हे विधेयक आज राज्यसभेत सादर केले जाईल.

चर्चेदरम्यान एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हे विधेयक फाडले. ते म्हणाले – या विधेयकाचा उद्देश मुस्लिमांना अपमानित करणे आहे. मी गांधींसारखे वक्फ बिल फाडतो.

विधेयकावरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, गैर-इस्लामी गोष्टी वक्फमध्ये समाविष्ट केल्या जाणार नाहीत. अशी कोणतीही तरतूद नाही. मतपेढीसाठी अल्पसंख्याकांना धमकावले जात आहे.

विधेयकावर चर्चा आणि मतदान झाल्यानंतर, गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव मांडला, जो सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर केला.

“हे तर मुस्लिमांना देशोधडीला लावण्याचं हत्यार”, वक्फवरील चर्चेदरम्यान राहुल गांधींचं ट्विट

0


नवी दिल्ली: व क्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर बुधवारी दिवसभर संसदेमध्ये जोरदार चर्चा झाली. तसेच रात्री उशिरा त्यावर मतदान घेण्यात आले. तत्पूर्वी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया माध्यम एक्सवर एक जळजळीत पोस्ट लिहून या विधेयकाला तीव्र विरोध केला.
सरकारने आणलेलं वक्फ बोर्ड संशोधन विधेयक हे मुस्लिमांना देशोधडीला लावणारं हत्यार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांनी आज वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत झालेल्या चर्चेत सहभाग घेतला नव्हता. मात्र त्यांनी ट्विट करत या विधेयकाविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. त्यात राहुल गांधी यांनी लिहिलं की, वक्फ संशोधन विधेयक हे मुस्लिमांना देशोधडीला लावणारं आणि त्यांचे वैयक्तिक कायदे व मालमत्तेच्या अधिकारांना हडप करण्यासाठी तयार केलेलं हत्यार आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून मुस्लिमांना लक्ष्य करून घटनेवर हा हल्ला केला जात आहे. मात्र भविष्यात इतर समुदायांना लक्ष्य करण्यासाठी उदाहरण म्हणून याचा वापर केला जाईल, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.

दरम्यान, काँग्रेस पक्ष हा वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध करत आहे. कारण हे विधेयक भारताच्या मूळ संकल्पनेवर हल्ला करणारं आहे. तसेच कलम २५, धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचं उल्लंघन करतं, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

ओवेसींनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक फाडले:म्हणाले- त्याचा उद्देश मुस्लिमांना अपमानित करणे

मध्यरात्री १२ वाजता देखील संसद सभागृह कामकाज सुरूच

नवी दिल्ली- अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सादर केले. रिजिजू यांनी याला उम्मीद (युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट, एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट) असे नाव दिले आहे.AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वक्फ विधेयकाला विरोध केला. ते म्हणाले- हे कलम २५, २६ चे उल्लंघन आहे. हे विधेयक मुस्लिमांवर अन्याय करणारे आहे.

एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, या विधेयकाचा उद्देश मुस्लिमांना अपमानित करणे आहे. मी गांधींसारखे वक्फ बिल फाडतो. विधेयक फाडल्यानंतर ओवेसी संसदेच्या कामकाजातून निघून गेले.

ओवेसी यांनी या विधेयकावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपा देशात संघर्ष निर्माण करत असल्याचा आरोप केला. तसेच महात्मा गांधी यांनी जसे आफ्रिकेत कायदा फाडलेला तसे मी हे वक्फ विधेयक फाडत असल्याचे सांगत लोकसभेत वक्फ विधेयक फाडत विरोध दर्शविला आहे.

या विधेयकाचा उद्देश मुस्लिमांना अपमानित करणे आहे. हे कलम २५, २६ चे उल्लंघन आहे. हे विधेयक मुस्लिमांवर अन्याय करणारे आहे, असा आरोप त्यांनी केला.