Home Blog Page 379

“क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन तर्फे विविध संस्थांना उपयुक्त वस्तू भेट”

गरजेवर आधारित उपक्रमांचे महत्व जास्त – ना. चंद्रकांतदादा पाटील.

पुणे-एखाद्या संस्थेला, गणपती मंडळाला नेमकं काय हवंय हे ओळखून त्यांच्या गरजेवर आधारित उपक्रमाचे महत्व हे जास्त असतं आणि म्हणून संदीप खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन, मुकुलमाधव फाउंडेशन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या कल्पकतेचे मी अभिनंदन करतो असे गौरवोदगार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन च्या वतीने आज 35 संस्था, गणेश मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ व ज्ञाती संस्था तसेच भजनी मंडळाना उपयुक्त असे खुर्च्या, स्पीकर सेट, वॉटर कुलर व इतर साहित्य भेट देण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, योगेश रोकडे, क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विश्वस्त प्रतीक खर्डेकर, विश्वस्त सतीश कोंडाळकर,कोथरूड मंडल भाजपा अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेवक दीपक पोटे,विशाल धनवडे,भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, उपाध्यक्ष मंदार बलकवडे,सर्वेश जोशी, संदीप पाटील, योगेश सुपेकर, रशीद शेख, अनुज खरे,विश्वजित देशपांडे, मंदार रेडे,राजन परदेशी,सुनील पारखी, राजू दाभाडे,राजा पाटील, दिनेश भिलारे,प्रभाग अध्यक्ष ऍड. प्राची बगाटे, केतकी कुलकर्णी,यासह संतोष लांडे,शंतनू खिलारे,संगीताताई शेवडे, पूनम कारखानीस,मंगल शिंदे, कविता सदाशिवे,अपर्णा लोणारे, रामदास गावडे,कुणाल तोंडे,समीर ताडे,दत्तात्रय देशपांडे,नितीन कंधारे, सतीश गायकवाड इ मान्यवर उपस्थित होते.
कोणताही कार्यक्रम, उपक्रम सुरु केले जाते वर्ष दोन वर्ष ते कार्यक्रम होतात मात्र नंतर आलेले वाईट अनुभव, त्यातून आलेली निराशा किंवा इतर कारणांनी हे बंद पडते, मात्र सातत्याने वर्षानुवर्षे उपक्रम करण्यात क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन चे वेगळेपण आहे त्याचेही मी कौतुक करतो असेही ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. समाजात काम करताना लोकोपयोगी वस्तू भेट देणे महत्वाचे असून केवळ सरकार वर अवलंबून राहून समाजाची परिस्थिती किंवा सामाजिक स्वास्थ्य सुदृढ होणार नाही तर त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी आपल्या परीने गरजुंना मदत करावी असे आवाहन देखील ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन ने सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार केला असून यापुढील काळात रोख स्वरूपात वर्गणी न देता वस्तूरूपी मदत करण्यात येणार असल्याचे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.गणेश मंडळ असतील अथवा अन्य संस्था, संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, हे जेव्हा मदत मागायला येतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातून वस्तूंचा अभाव असल्याचे लक्षात आले , यातूनच ही कल्पना सुचली आणि मग स्पीकर, खुर्च्या, वॉटर कुलर, वॉटर प्युरिफायर, पंखे,अन्न धान्य अश्या वस्तू मदत म्हणून देण्याचा मानस केला असेही संदीप खर्डेकर म्हणाले. प्रत्येक महिन्यात क्रिएटिव्ह फाउंडेशन, मुकुलमाधव फाउंडेशन,ग्लोबल ग्रुप, संजीव अरोरा मित्र परिवार,नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट,वेस्टर्न इंडिया फोर्जिंग अश्या सर्वांनीच एकत्र येऊन सेवाकार्याचे मॉडेल तयार केले असून सामाजिक संस्थांना गरजेनुसार मदत करण्याचा निर्धार केला असल्याचे ही संदीप खर्डेकर, संजीव अरोरा, मनोज हिंगोरानी, सचिन कुलकर्णी, अरुण जिंदल यांनी जाहीर केले.
आज प्रामुख्याने अखिल भारतीय मराठा महासंघ, ऑल आर्टिस्ट फाउंडेशन, अखिल भारतीय ब्राह्मण संघ,हिंदुत्ववादी बहुजन मोर्चा, अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना,रोलबॉल असोसिएशन, नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, परशुराम हिंदू सेवा संघ, सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डिसएबीलीटीज, एनॅबलर चॅरिटेबल ट्रस्ट,देशप्रेमी मित्र मंडळ, दशभुजा मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, बाल तरुण मंडळ, एकता मित्र मंडळ, सिद्धेश्वर मंडळ,उमेद फाउंडेशन, सेवाव्रत फाउंडेशन इ संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले,सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी स्वागत,योगेश रोकडे यांनी आभार प्रदर्शन केले तर प्रतीक खर्डेकर व कल्याणी खर्डेकर यांनी संयोजन केले.

जनतेच्या कराच्या पैशावर उभारलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अद्दल घडवा.

रुग्णालयातील अंतर्गत चौकशी ही निव्वळ धुळफेक, संबंधित डॉक्टरांवरही कठोर कारवाई करा.

मुंबई, दि. ४ एप्रिल २०२५
पुण्यात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे बळी गेला, ही घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. जनतेत मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीपणा विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पण ना सरकार ना पोलीस प्रशासन कोणीही योग्य ती कारवाई केलेली नाही. या मातेचा मृत्यू दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणा व मुजोरपणाचा बळी असून संबंधित डॉक्टर व रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात संताप व्यक्त करत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय नोंदणी असलेले रुग्णालय आहे, जनतेच्या कराच्या पैशातून ते उभे राहिले आहे, सरकारने या रुग्णालयाला एक रुपयाने जमीन दिली आहे. पण या रुग्णालयात सामान्य लोकांना लुटण्याचे काम होत आहे. मयत तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाने २० लाख रुपयांचा खर्च येईल व १० लाख रुपये आधी भरा असे सांगितल्याचे समजते. २० लाख रुपये एवढी मोठी रक्कम मध्यमवर्गीय कुटुंबालाही परवडणारी नाही. पैशासाठी या रुग्णालयाने एका मातेचा बळी घेतला आहे, दोन बाळं आईच्या प्रेमाला व दुधाला मुकली आहेत, हे अत्यंत गंभीर आहे.

या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचा कांगावा रुग्णालय प्रशासन करत आहे, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. अशा मुजोर रुग्णालयावर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणते बाळ आईच्या मायेला पोरके होणार नाही, अशी कडक कारवाई करण्याची धमक देवेंद्र फडणवीस सरकारने दाखवावी, असेही अतुल लोंढे म्हणाले.

अनधिकृत बांधकाम करणाऱ्या माने नामक बिल्डरवर पोलिसांनी केली धडक कारवाई

पुणे- अनधिकृत बांधकामे करणाऱ्या वर कारवाईची हक्क जसा महापालिकेला आहे तसा तो पोलिसांना देखील आहे. रस्त्यावर पुढे सरकलेली अतिक्रमणे ,महापालिकेचा परवाना नसलेली अनधिकृत बांधकामे पोलीस हटवू शकतात अथवा ती करणारांवर फौजदारी कारवाई करू शकतात मात्र याकडे आजपर्यंत फारसे लक्ष देण्यात आलेले नाही या पार्श्वभूमीवर अवैध बांधकाम करणा-या एका बांधकाम व्यावसायिकावर कोंढवा पोलीस स्टेशनने कारवाई केली आहे. पोलिसांनी सांगितले कि,’
कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मलिकनगर, साईबाबानगर, भाग्योदयनगर, मिठानगर, शिवनेरीनगर, या भागात मोठ्या प्रमाणावर पुणे महानगरपालीकेची कोणतीही परवानगी न घेता अवैध बांधकामे करणा-या बांधकाम व्यावसायिक नवनाथ महादेव माने वय ४५ वर्षे रा.२१७ गंजपेठ पुणे यांचे विरूध्द पुणे मनपा कडुन अनेकवेळा गुन्हे दाखल असुन सुध्दा परत अशा पध्दतीने अवैध बांधकाम चालु केल्याने पुणे मनपा कडुन पुणे मनपा अभियंता यांच्या तक्रारीवरून कोढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं १०७/२५ महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४३,५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी याने जिल्हा सत्र न्यायालय, पुणे यांच्याकडे दाखल गुन्ह्यात
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. सदर गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये नवनाथ माने याने साईबाबानगर येथील इमारत पाडताना कोणत्याही प्रकारचे स्थानीक नागरीकांच्या सुरक्षीतेबाबत उपयोजना न केल्याने तसेच कोंढवा भागात एक फ्लॅट अनेक लोकांना विक्री करणे, ठरलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता दमदाटी करणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सदर गुन्ह्यात भा.न्या. संहिता २०२३ चे कलम १२५,३५१,३१८ (४) प्रमाणे दाखल गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली होती त्या गुन्ह्याच्या अनुषगांने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर आरोपीचा शोध घेवुन त्याला दि. ०२/०४/२०२५ रोजी खडक पोलीस स्टेशन हद्दीतील सध्या रहात्या घरातुन ताब्यात घेवून त्यास कोर्टासमक्ष हजर केले असता कोर्टाने नवनाथ माने यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक, मयुर वैरागकर, कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे हे करीत आहेत.

भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत-उपमुख्यमंत्री अजित पवार

अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि.4 :- ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात देशप्रेम जागवले. ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी समाजातील वास्तव आणि देशासाठी असलेली निष्ठा मोठ्या ताकदीने मांडली. त्यांच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात असलेली राष्ट्रभक्ती ही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणारी नाही. ‘दादासाहेब फाळके’, ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त असलेले मनोज कुमार हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान होते.

त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.

दीनानाथ रुग्णालयाला वार्षिक 1 रुपया भाड्याने जमीन:मग प्रसूतीसाठी 10 लाखांची मागणी का? 18 फेब्रुवारीच्या मंत्रिमंडळ निर्णयावर सवाल

वार्षिक 1 रुपया भाड्याने 795 चौ. मीटर जमीन

पुणे-केवळ प्रसूतीसाठी 10 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला सरकारने वार्षिक 1 रुपया दराने हजारो चौरस फूट जागा भाड्याने दिल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी सरकारच्या 18 फेब्रुवारी 2025 रोजीच्या एका मंत्रिमंडळ निर्णयावर हरकत घेतली जात आहे.

भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांचे प्रसूतीनंतर झालेल्या गुंतागुंतीमुळे निधन झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तब्बल 10 लाख रुपयांचे डिपॉझिट मागितले होते. पैसे जमा केल्याशिवाय उपचार करणार नाही अशी आडमुठी भूमिका रुग्णालयाने या प्रकरणी घेतली होती. त्यामुळे तनिषा यांचा उपचारास विलंब झाल्यामुळे मृत्यू झाला, असा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला वार्षिक 1 रुपया भाड्याने जमीन दिल्याची बाब समोर आली आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरला एरंडवणा येथील जमीन देण्यात आली आहे. ट्रस्टने कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे. या दोन्ही मिळकतीच्या दरम्यान नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यासाठी 795 चौरस मीटर जमिनीची गरज असल्याची मागणी ट्रस्टने केली होती. त्यानुसार त्यांना ही जमीन वार्षिक 1 रुपया या नाममात्र दराने भाडेपट्ट्याने देण्यास मंजुरी दिली आहे. सरकारने 18 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. हा निर्णय आता वादात सापडला आहे.केवळ प्रसूतीसाठी 10 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या या हॉस्पिटलला नाममात्र दरात जमीन देण्याची गरज काय? असा सवाल आता सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. आत्ता… आत्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य शासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुण्यातील जवळपास आठ हजार चौरस फुट जागा वार्षिक नाम मात्र एक रुपया भाड्याने दिली आहे.

यापूर्वी रुग्णालयासाठी दिलेली जमीन ही अशीच नामामात्र भाड्याने दिलेली आहे. आत्ता दिलेल्या जमिनीची किंमत सध्याच्या बाजार भावाने कमीत कमी 10 कोटी रूपये तरी असेल. रुग्णालयाने मात्र 10 लाख रूपये आगाऊ भरले नाहीत म्हणून उपचार नाकारले आणि रूग्ण दगावला. काय अर्थ लावायचा या सगळ्यांचा? असे कुंभार यांनी म्हटले आहे. त्यांनी या शासननिर्णयाचे फोटो आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केलेत.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन नाममात्र दराने वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी मौ. एरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे. या शिवाय ट्रस्टने मौजे कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे. या दोन्ही मिळकतीच्या दरम्यान हा नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यासाठी 795 चौ. मीटर जमिनीची आवश्यकता असल्याची मागणी ट्रस्टने केली आहे. त्यानुसार ही जमीन वार्षिक 1 रुपया या नाममात्र दराने भाडेपट्ट्याने देम्यास मंजुरी देण्यात आली. नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचा खर्च हा संबंधित ट्रस्ट करणार आहे. या पुलामुळे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, रुग्णवाहिका, रुग्णांच्या नातेवाईकांचे वाहने व ट्रस्टचे संबंधित वैद्यकीय अधिकारी – कर्माचरी यांना ये-जा करणे सूकर होणार आहे, असे सरकारने आपल्या आदेशात म्हटले होते.

मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करून कारवाई :आरोग्य मंत्र्यांनी दिले आदेश; सत्ताधारी शिवसेनेची रुग्णालयाबाहेर तीव्र निदर्शने

शिवसैनीकांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यावर चिल्लर फेकले
पुणे-पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तसेच पैशांच्या मागणीवर अडून बसल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली होती. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली असून रुग्णालय प्राशासनावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयावर चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत.या घटनेनंतर नागरिकांकडून तसेच मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या नातेवाईकाला 10 लाख डिपॉझिट भरण्यास सांगितल्याची रीसीट समोरही आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रुग्णालयात येणारे रुग्ण व नातेवाईक यांना तपासूनच आत प्रवेश देण्यात येत आहे. पुणे पोलिसांकडून आज रुग्णालय प्रशासनाची चौकशी केली जाणार आहे. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत. याच सोबत भिसे कुटुंबियांच्या संपर्कात राहिलेल्या नर्स आणि डॉक्टरांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.
रुग्णालयातील प्रशासनाची चौकशीनंतर याचा अहवाल आरोग्य खात्याला देण्यात येणार आहे. यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रुग्णालयांनी घ्यावायच्या काळजीबद्दल नियमावली तयार करण्यात येणार असल्याची देखील माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर शिवसेना ठाकरे गट तसेच शिवसेना शिंदे गटाने जोरदार आंदोलन केले असल्याची माहिती समोर आली आहे. गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप या रुग्णालयावर लावण्यात येत आहे. तसेच रुग्णालयाच्या या असंवेदनशील कारभारामुळेच महिलेचा जीव गेला असल्याचे म्हटले जात आहे. या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी रुग्णालयातील अधिकारी आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी आले असता त्यांच्यावर चिल्लर फेकण्यात आले. जोपर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार असल्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे.

समोर आलेली माहिती दिशाभूल करणारी – रुग्णालय अधिकारी:नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाल्यावर तसेच शिवसैनिकांनी रुग्णालयाच्या बाहेर तीव्र आंदोलन केल्यानंतर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. समोर आलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. तसेच दीनानाथ रुग्णालय योग्य ती माहिती प्रशासनाला देणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी 10 लाख रुपये मागीतल्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली नाही.

अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन

मुंबई- देशभक्तीवर , आणि देशप्रेमावर सर्वाधिक उत्कृष्ट गाणी , संगीत कथानक असलेले चित्रपट काढलेले , तसेच शिर्डी के साईबाबा नावाचा चित्रपट काढून शिर्डी आणि परिसराची भरभराट साधलेले प्रख्यात अभिनेता मनोज कुमार यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या देशभक्तिपर चित्रपटां च्यामुळे त्यांना भारत कुमार म्हणूनही ओळखले जात . उपकार, पूरब-पश्चिम, क्रांती, रोटी-कपडा और मकान. हरियाली और रास्ता, शोर हे त्यांचे यशस्वी चित्रपट होते.सामाजिक समस्यांवर , गरिबी आणि श्रीमंतीच्या दरीवर , विषमतेवर वास्तवतेवर चित्रपट काढणारे अभिनेते म्हणून त्यांचा लौकिक होता.

मनोज कुमार यांना ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. पहिला फिल्मफेअर पुरस्कार १९६८ मध्ये ‘उपकार’ चित्रपटासाठी मिळाला. ‘उपकार’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. १९९२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१६ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकृष्ण गोस्वामी होते. त्यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी ब्रिटिश भारतातील अबोटाबाद (आता खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान) येथे झाला. २ मे २०११ रोजी अमेरिकेने ओसामा बिन लादेनला जिथे मारले होते तेच अबोटाबाद आहे. मनोज कुमार १० वर्षांचे असताना १९४७ मध्ये त्यांचे धाकटा भाऊ कुक्कूचा जन्म झाला. त्याची तब्येत बिघडली तेव्हा, २ महिन्यांच्या भावाला आणि आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा दंगल सुरू झाली. सर्वत्र गोंधळ उडाला आणि रुग्णालयातील कर्मचारी जीव वाचवण्यासाठी पळू लागले.

सायरन वाजताच, उर्वरित डॉक्टर आणि परिचारिका भूमिगत झाले. अशा परिस्थितीत, योग्य उपचारांअभावी, मनोज कुमारच्या २ महिन्यांच्या भावाचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यावेळी आईची प्रकृतीही गंभीर होती. ती वेदनेने ओरडत राहिली, पण कोणत्याही डॉक्टर किंवा नर्सने तिच्यावर उपचार केले नाहीत. एके दिवशी हे सर्व पाहून मनोज यांना इतका राग आला की त्यांनी काठी उचलली, डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण करायला सुरुवात केली. मनोज तेव्हा फक्त 10 वर्षांचे होते, पण ते त्यांच्या आईचे दुःख पाहू शकत नव्हते. वडिलांनी त्यांच्यावर ताबा मिळवला आणि कुटुंबाने आपले प्राण वाचवण्यासाठी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यांचे कुटुंब जंदियाला शेरखान येथून पळून दिल्लीला पोहोचले. येथे त्यांनी निर्वासित छावणीत २ महिने घालवले. वेळ निघून गेला आणि दंगली कमी होऊ लागल्या. कसे तरी संपूर्ण कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले, जिथे मनोज शिक्षण घेऊ शकले. शाळेनंतर, त्यांनी हिंदू कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आणि नोकरी शोधू लागले.

लाइट टेस्टिंगसाठी कॅमेऱ्यासमोर उभे केले, तिथेच मिळाला रोल
एके दिवशी मनोज कुमार कामाच्या शोधात फिल्म स्टुडिओमध्ये फिरत असताना त्यांना एक माणूस दिसला. मनोज यांनी सांगितले की ते काम शोधत आहेत, म्हणून तो माणूस त्यांना सोबत घेऊन गेला. त्यांना चित्रपटाच्या चित्रीकरणात वापरले जाणारे लाइट्स आणि इतर उपकरणे वाहून नेण्याचे काम मिळाले. हळूहळू, मनोज यांच्या कामावर खूश झाल्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम मिळू लागले.

मोठे कलाकार त्यांचे शूटिंग सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी चित्रपटाच्या सेटवर पोहोचायचे. अशा परिस्थितीत, मनोज कुमार यांना सेटवर नायकाच्या जागी उभे करून नायकावर पडणारा प्रकाश तपासायला लावण्यात आले.

एके दिवशी जेव्हा मनोज कुमार लाइट टेस्टिंगसाठी नायकाच्या जागी उभे राहिले. कॅमेऱ्यावर प्रकाश पडताच त्यांचा चेहरा इतका आकर्षक दिसत होता की एका दिग्दर्शकाने त्यांना १९५७च्या फॅशन चित्रपटात एक छोटीशी भूमिका दिली. भूमिका छोटी होती, पण मनोज यांनी काही मिनिटांच्या अभिनयातच आपली छाप सोडली. त्या भूमिकेमुळे मनोज कुमार यांना कांच की गुडिया (1960) या चित्रपटात मुख्य भूमिका देण्यात आली. पहिला यशस्वी चित्रपट दिल्यानंतर मनोज यांनी रश्मी रुमाल, चांद, बनारसी ठग, गृहस्ती, अपने हुए पराये, वो कौन थी यांसारखे अनेक बॅक टू बॅक हिट चित्रपट दिले.

दिलीप कुमार यांच्यामुळे मनोज हे नाव ठेवले
मनोज कुमार लहानपणापासूनच दिलीप कुमार यांचे खूप मोठे चाहते होते. मनोज कुमार यांना दिलीप साहेबांचा ‘शबनम’ (१९४९) हा चित्रपट इतका आवडला की त्यांनी तो अनेक वेळा पाहिला. चित्रपटात दिलीप कुमार यांचे नाव मनोज होते. जेव्हा मनोज कुमार चित्रपटांमध्ये आले तेव्हा त्यांनी दिलीप कुमार यांच्या नावावरून त्यांचे नाव मनोज कुमार असे ठेवले.

लाल बहादूर शास्त्री यांच्या सांगण्यावरून उपकार बनवला
१९६५ मध्ये, मनोज कुमार यांनी ‘शहीद’ या देशभक्तिपर चित्रपटात स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग यांच्या भूमिकेत काम केले. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यातील ‘ए वतन, ए वतन हमको तेरी कसम’, ‘सरफरोशी की तमन्ना’ आणि ‘मेरा रंग दे बसंती चोला’ या गाण्यांना चांगलीच पसंती मिळाली.

लालबहादूर शास्त्रींना हा चित्रपट खूप आवडला. शास्त्रीजींनी जय जवान, जय किसानचा नारा दिला. शास्त्रीजींनी मनोज यांना या घोषणेवर चित्रपट बनवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मनोज यांनी ‘उपकार’ (१९६७) हा चित्रपट बनवण्यास सुरुवात केली, जरी त्यांना चित्रपट लेखन किंवा दिग्दर्शनाचा कोणताही अनुभव नव्हता.

एके दिवशी मनोज कुमार यांनी मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी ट्रेनचे तिकीट काढले आणि ट्रेनमध्ये चढले. त्यांनी अर्धा चित्रपट ट्रेनमध्ये बसून लिहिला आणि उरलेला अर्धा परतताना लिहिला. या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कारकिर्दीची दुसरी इनिंग सुरू केली. नंतर त्यांनी पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान यांसारखे देशभक्तिपर अनेक चित्रपट केले.

या चित्रपटाने मनोज कुमार यांना भारत कुमार हे नाव दिले
उपकार हा १९६७ चा सर्वात मोठा चित्रपट होता. मेरे देश की धरती सोना उगले… या चित्रपटातील गाणे अजूनही सर्वोत्तम देशभक्तिपर गाण्यांमध्ये गणले जाते. चित्रपटात मनोज कुमार यांचे नाव भारत होते. चित्रपटातील गाण्याची लोकप्रियता पाहून माध्यमांनी मनोज कुमार यांना भारत म्हणायला सुरुवात केली आणि नंतर ते भारत कुमार म्हणून ओळखले जाऊ लागले. मनोज कुमार यांनी दिलीप कुमार यांना दिग्दर्शित केलेला त्यांचा पहिला चित्रपट क्रांती (1981) होता.

लाल बहादूर शास्त्री पाहू शकले नाहीत उपकार चित्रपट
लाल बहादूर शास्त्री यांच्या विनंतीवरून उपकार बनवण्यात आला होता, पण ते पाहू शकले नाहीत. १९६६ मध्ये, शास्त्रीजींनी ताश्कंद (उझबेकिस्तान) ला भेट दिली. परतल्यानंतर त्यांनी उपकार हा चित्रपट पाहिला असता, परंतु ताश्कंदमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ११ जानेवारी १९६६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर, ११ ऑगस्ट १९६७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. मनोज कुमार यांना आयुष्यभर शास्त्रीजींना चित्रपट दाखवता आला नाही याबद्दल खेद राहिला
.

दीनानाथ रुग्णालय:महापालिकेचे आरोग्य खाते झोपले काय ?

पुणे: 10 लाख रुपये अनामत रक्कम भरली नाही म्हणून गर्भवती महिलेला वाऱ्यावर सोडून दिल्या प्रकरणी पुणे महापालिकेचं आरोग्य खाते नेमके करतंय काय? त्यांचा रुग्णालयावर अंकुश हरवला कुठे? असे सवाल होत असताना आता या प्रकरणी महिला आयोगाने महापालिकेला झापले आहे. आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी महापालिकेला याबाबत तातडीने अहवाल ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या संदर्भात आयोगाने महापालिकेला लेखी आदेश पाठविले आहेत त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १०(१) (फ) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे याकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे.

पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका महिलेचा २ जुळ्या मुलींना जन्म देवून मृत्यू झाला. तसेच सदर महिलेस अॅडमिट होण्याआधीच पैशाची मागणी करण्यात आली होती. अशी बातमी प्रसार माध्यमाद्वारे प्रसारीत होत आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.सदर प्रकरणी तथ्य तपासून योग्य ती नियमानुसार चौकशी करुन कार्यवाही करावी व आपण केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२(२) व १२ (३) नुसार आयोगास mscwmahilaayog@gmail.com या ई-मेल वर तात्काळ पाठविण्यात यावा, .

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील निवृत्तआयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख चौकशीच्या फेऱ्यात

पुणे:भाजपचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात एका महिलेला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता याप्रकरणी पुण्यातील माजी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.सातारा पोलीस पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील प्रभाकर देशमुख यांच्या घरी दाखल झाले असून त्यांची तब्बल तीन तास चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या संपर्कात प्रभाकर देशमुख होते, असे सांगितले होते. त्यामुळे देशमुख यांची चौकशी सातारा पोलिसांकडून करण्यात आली. तब्बल तीन तास चौकशी करून सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्या घरून रवाना झाले आहेत. यामुळे आता या प्रकरणी कोणती नवी माहिती मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी एका महिलेला रंगेहात पकडण्यात आले होते. तसेच सातत्याने आरोप करणारे पत्रकार तुषार खरात यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणासंदर्भात माझी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांचं नाव समोर आल्याने त्यांची चौकशी केली जात आहे.प्रभाकर देशमुखांवरील कारवाईबाबत मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. ते म्हणाले, खंडणी प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्याबाबत आत्ता पोलीस तपास सुरू आहे. काही गोष्टी अजून पुढे यायच्या आहेत. त्यामुळे मी काही बोलणार नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे, त्यांना तपास करू द्या असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

मंगेशकर रुग्णालयात जाऊन पोलीसांची चौकशी सुरु:गर्भवतीला पैशाअभावी उपचार नाकारले

पुणे:
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बेजबादारपणामुळं एका गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर आता हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. कारण आता पुणे पोलिसांचे काही वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले आहेत. त्यांनी चौकशी सुरू केली आहे.रुग्णालयानं संबंधित महिला रुग्णाला उपचारांसाठी भरती करुन घेण्यासाठी नेमका किती खर्च सांगितला? तसंच उपचारांसाठी नकार का दिला? याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे.तनिषा उर्फ मोनाली भिसे या गर्भवती महिलेचा वेळेत उपचार न मिळाल्यामुळं मृत्यू झाला. त्यांना कुठले आणि कोणी उपचार दिले? त्यांच्या कुटुंबियांकडं किती रुपयांची मागणी करण्यात आली? कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनुसार यासाठी कुठले डॉक्टर जबाबदार आहेत? याची देखील पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू केली जात आहे. त्याचबरोबर अलंकार पोलिस ठाण्यात भिसे कुटुंबियांकडून जबाबही नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी आ अमित गोरखे यांनी x वर आपली कैफियत मांडली होती . ती पहा ऐका..

मृत्यू झालेली गर्भवती महिला ही भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. एका आमदाराच्या पीएवर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगाला केवळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं प्रशासनच कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप खुद्द आमदार गोरखे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं देखील याबाबत तक्रार केली आहे. तसंच या रुग्णालयावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. जर आमदाराच्या पीएवर ही वेळ येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची इथं काय अवस्था असेल? असा सवालही त्यांनी केला आहे.

ऐपत नसेल तर ससूनला जा
तनिषा ऊर्फ मोनाली भिसे या जुळ्या मुलांना जन्म देणार होत्या. त्यांच्या प्रसूती कळा येऊ लागल्यानंतर त्यांना रक्तस्राव होऊ लागला त्यानंतर त्यांचा बीपी वाढला होता. त्यामुळं त्यांना कुटुंबियांनी तातडीनं मंगेशकर रुग्णालयात हलवलं. पण इथं आणल्यानंतर बराच काळ त्यांना ओपीडीमध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर कुटुंबियांना २० लाख रुपये खर्च सांगण्यात आला. यानंतर एका डॉक्टरनं १० लाख रुपये भरावे लागतील असं सांगितलं. यांपैकी ३ लाख रुपये सुरुवातीला भरण्याची तयारी कुटुंबियांनी दाखवली. पण तरीही या रुग्णालयानं त्यांना अॅडमिट करुन घेतलं नाही, उलट ऐपत नसेल तर ससूनला जा असा सल्लाही दिला, अशी माहिती भिसेंच्या कुटुंबियांनी दिली आहे.दरम्यान, या सर्व गोंधळात दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर या महिलेनं जुळ्यांना जन्म दिला पण गर्भवती महिलेचा बीपी वाढल्यानं व भीतीमुळं तिनं आपले प्राण गमावले.

कुशल आणि उपक्रमशील मनुष्यबळासाठी ‘डीपेक्स’ उपयुक्त- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे गौरवोद्गार

देशात तंत्रज्ञानासह संशोधनाला प्रोत्साहन- शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश रेड्डी

पुणे, दि.३: जागतिक स्तरावरील कुशल मनुष्यबळाची मागणी विचारात घेता ‘डीपेक्स’च्या माध्यमातून कुशल, उपक्रमशील मनुष्यबळ उपलब्ध होत आहे, आगामी काळात सामाजिक गरजांची पूर्तता डीपेक्सच्या माध्यमातून होईल, अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. देशात तंत्रज्ञानासह संशोधनाला प्रोत्साहन दिले जात असल्याची भावना संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी अध्यक्ष शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केली.

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, सीईओपी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डीपेक्स-२०२५’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. जी. सतीश रेड्डी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुनील भिरुड, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजीव सोनावणे, सृजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘डीपेक्स’ प्रदर्शनाची सुरुवात सांगली येथून १९८६ साली झाली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध कौशल्याधिष्ठीत गुणवंत विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन मिळत असून विविध क्षेत्रात या कल्पना मॉडेल स्वरुपात विकसित होत समाजातील गरजा पूर्ण करण्याचे काम होत आहे.

देशात सर्वत्र संशोधनात्मक वातावरण असून नवोन्मेषक ‘स्टार्टअप’ उभारत आहेत. या स्टार्टअपमधून तयार होणाऱ्या नवनवीन संशोधनाला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. जागतिक पातळीवर संरक्षण क्षेत्रात लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात देशात निर्माण होत असल्याने भारताला संरक्षण सामग्रीच्या निर्यातीची मोठी संधी आहे. डीपेक्स प्रदर्शन उपक्रम विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

डॉ. जी. सतीश रेड्डी म्हणाले, देशात आयआयटी, विद्यापीठ, महाविद्यालयात संशोधन आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यात येत आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांचा नवकल्पनांना चालना मिळत आहे. आपल्या नवकल्पनाची जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल, देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावेल, या गोष्टीचा विचार करुन प्रचंड मेहनत करा, सन २०४७ मध्ये भारत देश जगाचे नेतृत्व करेल यादृष्टीने विकसित भारत करण्याची जबाबदारी तरूण पिढीवर आहे. जगाकरीता निर्मिती संकल्पना डोळ्यासमोर। ठेवून काम करावे, असे आवाहन श्री. रेड्डी यांनी केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेला डीपेक्समध्ये स्थान देणे गरजेचे आहे. डीपेक्सच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सूचनांची नोंद घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनात त्यांचा समावेश करावा, असे डॉ. भिरुड म्हणाले.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आशिष चौहान, संकल्प फळदेसाई, डॉ. शांतीनाथ बागेवाडी, अथर्व कुलकर्णी, प्रसेनजीत फडणवीस, उद्योजक प्रकाश धोका यांनी आपले विचार व्यक्त केले.
0000

मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून फोन तरीही रुग्णालयाने ऐकलं नाही..गर्भवतीच्या उपचारासाठी मागितले 10 लाख,अखेर महिलेचा मृत्यू

आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक यांच्या पत्नी चे दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना निधन

जुळ्या मुलींना जन्म दिला पण आई गेली… BJP आमदार गोरखेही व्यवस्थेसमोर हतबल, मंगेशकर हॉस्पिटलला इशारा

रुग्णालयाचे स्पष्टीकरण…बदनामी म्हणत प्रशासनाचं मोठं पाऊल…
भाजप आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आणि माध्यमांनी बातमी उचलून धरल्यानंतर अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने या घटनेवर स्पष्टीकरण दिले असल्याचे वृत्त आहे. या संपूर्ण प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय रुग्णालय व्यवस्थापनाने घेतल्याचे सांगण्यात आले आहे.दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने यावर भूमिका स्पष्ट करताना एकांगी पद्धतीने ही घटना सांगितली जात असल्याचे म्हणत रुग्णालयाची बदनामी सुरू आहे, अशी खंत व्यक्त केली. या संपूर्ण घटनेप्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू असून रुग्णालय यासंबंधी राज्य सरकारला अहवाल सादर करेल, असेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

पुणे : येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर येत आहे. पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाने रुग्णाकडे डीपॉझीट म्हणून दहा लाखांची मागणी केली होती.
प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यावर या महिलेस दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आले. हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असतानाही महिलेला दाखल करून घ्यायलाही रुग्णालय प्रशासन तयार झाले नाही. शेवटी इतर रुग्णालयात हलवत असताना महिलेस त्रास झाला. अखेर जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. तनिषा सुशांत भिसे असे जीव गेलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा प्यारा झाला का? असा सवालही उपस्थित केला जातोय. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.

पुण्यातील नामांकित रुग्णालय म्हणून हे रुग्णालय महाराष्ट्रात ओळखले जाते. कोणत्याही दूर्धर आजारावर अधूनिक उपकरणे आणि प्रगत तंत्रज्ञानासोबत निष्णात डॉक्टरांसाठी म्हणून या रुग्णालयाची ख्याती आहे.


पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला.

महापालिकेकडून आता हवा प्रदूषण कमी करण्यासाठी फॉग कॅनॉन मशीनचा वापर

0

पुणे-महापालिकेकडून आता हवा प्रदूषण कमी करण्यासाठी फॉग कॅनॉन मशीनचा वापर करण्यात येणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी.आणि अन्य अधिकाऱ्यांनी आज Fog cannon machine mounted vehicle चे प्रत्याक्षिक महानगरपालिकेच्या आवारात पाहिले ,तपासले आणि माहिती घेऊन कार्यान्वित केले.


केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोगाम (NCAP) मधील 15 व्या वित्तीय आयोग अंतर्गत भारतातील १३० शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. हवा प्रदूषणामध्ये PM 10 (१० मायक्रॉन पेक्षा कमी आकार असलेले धुलीकण)  व PM 2.5 (२.५ मायक्रॉन पेक्षा कमी आकार असलेले धुलीकण ) अशा धुलीकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून NCAP मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणेसाठी पुणे महापालिकेमार्फत ५ परिमंडळसाठी प्रत्येकी १ असे एकूण ५ फॉग कॅनन मशीन खरेदी करण्यात आले आहेत.

फॉग कॅनॉन मशीन: फॉग कॅनॉन मशीनसाठी एका CNG इंधन वापरणाऱ्या  ट्रकच्या चासीवर ६००० लिटरची स्टीलची टाकी बसविण्यात आली आहे. ट्रकच्या मागील बाजूस २२ नोझल असलेले ३ KW चा high pressure pump पॉवर असलेले फॉग कॅनॉन मशीन बसविण्यात आले आहे. या मशीनमध्ये २२ पाण्याचे नोझल बसविणात आले असून  त्यामधून १० kg /sq cm एवढ्या प्रेशरने ५० मायक्रॉन पर्यंतचे पाण्याचे अतिसूक्ष्म कण बाहेर फेकले जातात.  यामुळे  हवेतील धुलीकणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारच्या मशीन्स दिल्ली, चंडीगड, मीराभायंदर, पिंपरी-चिंचवड व इतर शहरांमध्ये वापरण्यात येत आहे.

रस्त्यांवरील धुळीचे प्रमाणकमी करणेच्या दृष्टीने Fog Cannon मशीनचा वापर करण्यातया येणार असून शहरातील खालील प्रमुख रस्त्यांवर याचा वापर करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त शारामध्ये इतर आवश्यक ठिकाणी देखील या मशीनचा वापर करण्यात येणार आहे.
शिवाजीनगर ते बाणेर
कर्वे रस्ता (पुणे मनपा भवन ते वारजे)
सातारा रोड (स्वारगेट – कात्रज- कोंढवा)
सोलापूर रोड (स्वारगेट- शेवाळेवाडी)
संगवाडी- येरवडा –केसनंद फाटा
सिंहगड रोड (दांडेकर पूल-धायरी फाटा
)

पूना क्लब कामगारांचा ऐतिहासिक वेतन करार .

पुणे-पूना क्लब कामगार युनियन आणि पूना क्लब व्यवस्थापण यांच्यामध्ये आर्थिक वर्ष 2025 ते 2028 करिता वेतन करार मोठ्या उत्साहात पार पडला. पूना क्लबच्या 140 वर्ष्याच्या इतिहासात पहिली वेळ हा करार दिनांक 01 तारखेला पार पडला मागील करार दिनांक 31.03.2025 ला संपुष्टात आला आणि 01 .04.2025 ला नवीन करारावर स्वाक्षरी करण्यात आली .त्यामुळें सर्व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नवीन करार यशस्वी करण्यासाठी पूना क्लबचे अध्यक्ष -गौरव गढोक ,उपाध्यक्ष -इंद्रनील मुजगुले , स्टाफिंग चेअरमन मनजीत राजपाल ,हाऊस चेअरमन – श्री. शशांक हळबे ब ,केटरिंग चेअरमन-सो.मालव्या मॅडम व इतर कमिटी सभासद ,पूना क्लबचे सी .ई.ओ सेक्रेटरी लेफ्टनंट कर्नलअशोक सरकार (रिटायर्ड) ,पूना क्लब चे लीगल ऍडव्हायजर आदित्य जोशी यांचे मोठे योगदान दिले .
या करारामध्ये पूना क्लब कामगार युनियन तर्फे युनियनचे अध्यक्ष -सचिन धोंगडे,उपाध्यक्ष-विलास पार्टे,सचिव – सिद्धेश्वर ओव्हाळ ,खजिनदार -श्री प्रवीण देवघन ,संचालक -दिपक कुचेकर ,संचालक -राहुल कांबळे ,संचालक–किरण शिंदे तसेच युनियनचे सल्लागार -शिवाजीराव खटकाळे साहेब (भाऊ) व वकिल – गौरव पोळ यांचा मोलाचा वाटा आहे .

महिलांकडून पुरुषांवरील अत्याचारात वाढ :राज्यात पुरुष हक्क आयोगाची स्थापना करा: तृप्ती देसाईंची मागणी

सोलापूर -देशात तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये कौटुंबिक कलाहातून पुरुष आत्महत्या करत असल्याच्या तसेच पती-पत्नीच्या वादातून पतीची हत्या केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेने तर एकच खळबळ उडवली होती. प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्याच पतीची हत्या करून त्याचे तुकडे करत एका ड्रममध्ये ठेवले होते. या पार्श्वभूमीवर आता पुरुष हक्क आयोगाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

राज्यात सध्या ज्या पद्धतीने महिलांकडून क्रूर हत्येचे प्रकार समोर येत आहेत, ते पाहता पुरुषांना न्याय व अधिकार देण्यासाठी पुरुष हक्क आयोगाची स्थापना करण्याची गरज वाटू लागली असल्याचे भूमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. पुरुष आणि महिला दोघांनाही समान न्याय असला तरी पूर्वी महिलांवर होणरे अत्याचार थांबवण्यासाठी महिला आयोगाची स्थापना झाली होती. मात्र, सध्याच्या काळात महिला ज्या पद्धतीने वागत आहेत, ते पाहता पुरुषांसाठी पुरुष हक्क आयोगाची निर्मिती करण्याची वेळ आली असल्याचे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या, नुसते समुपदेशन करून भागणार नसून महिलांनाही आपण काय वागतो याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. राज्यात पुरुष हक्क आयोग स्थान झाल्यास पुरुषांनाही न्याय व अधिकार मिळतील. महिलांच्या प्रश्नावर नेहमी पुढाकार घेणाऱ्या तृप्ती देसाई यांनी आता अलीकडच्या काळात पुरुषांवर होणारे अत्याचार, त्यांचा मानसिक छळ तसेच क्रूर हत्या पाहता पुरुषांच्या हक्कासाठी आता तृप्ती देसाई यांनी पुढाकार घेतला आहे.

तृप्ती देसाई यांनी यावेळी बोलताना राज्यातील महिलांच्या कर्तुत्ववार देखील भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, सध्या राज्यातील महिला अनेक कर्तुत्वाची कामे करत असल्याने राज्याच्या मुख्यमंत्री पदावर महिला विराजमान व्हावी. राज्यात मुख्यमंत्री बदलाची वेळ आली तर भाजपने महिलांना संधी द्यावी. पंकजा मुंडे या आक्रमक चेहरा असून त्यांना मुख्यमंत्री केल्यास आमची काहीच हरकत असणार नसल्याचेही तृप्ती देसाई म्हणाल्या.